by Hansraj Agrawal | Sep 21, 2024 | Trending News
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 24 सप्टेंबरला होणार आहे.. याबाबत मुंबई हायकोर्टानं महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय.. विद्यापीठ प्रशासनानं ऐन वेळी निवडणूक स्थगित केल्यानं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं.. आता हायकोर्टाच्या निर्णयामुळे विद्यार्थी संघटनांना मोठा दिलासा मिळालाय..
Source link
by Hansraj Agrawal | Sep 21, 2024 | Trending News
Pune Airport Renamed: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामधील वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गांच्या भूमीपूजन सोहळ्यानिमित्त एक मोठी घोषणा केली आहे. पुण्यामध्ये आज वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गांच्या भूमिपूजनाचा सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीमध्ये पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी भाषणादरम्यान फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली. विशेष म्हणजे केंद्रात मंत्री असलेल्या गडकरींनीही फडणवीसांनी केलेल्या विधानाचा संदर्भ देत सदर मंजूरी मिळवणारच असं आश्वासन दिलं.
काय नाव देणार?
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये, पुण्यातील नुतनीकृत लोहगाव विमानतळाचे नामकरण करण्यास मंत्रिमंडळाकडून मंजुरी दिली जाईल असं जाहीर केलं. पुण्यातील नुतनीकृत लोहगाव विमानतळाचे नामकरण जगद्गुरु संत तुकाराम महाराज विमानतळ असे करणार असल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेचे स्वागत करत फडणवीसांनी हा निर्णय जाहीर केला आहे. “राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी घेऊन प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार आहोत,” असं फडणवीस जाहीर भाषणात म्हणाले.
प्रस्ताव मंजूर करून घेतल्याशिवाय…
पुण्यातील मेट्रो आणि विमानतळाचा प्रश्न गेली कित्येक वर्षे प्रलंबित होता. तो मार्गी लागला याचा आनंद आहे, असं नितीन गडकरी आपल्या भाषणामध्ये म्हणाले. तसेच पुढे बोलताना गडकरींनीही लोहगाव विमानतळाचा उल्लेख केला. “लोहगाव विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे. आम्ही केंद्रात पंतप्रधांनाकडून हा प्रस्ताव मंजूर करून घेतल्याशिवाय राहणार नाही,” असं गडकरी म्हणाले.
नक्की वाचा >> ₹1900 कोटींचा रस्ता बांधला मग ₹8000 कोटींची टोलवसुली का? गडकरी म्हणाले, ‘तुम्ही कार..’
5000 कोटींचे नवीन काम हाती घेणार
गडकरींनी यावेळेस बोलताना, “मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे कात्रजपासून सुरू करणे आवश्यक होते. पण अधिकाऱ्यांनी ते होऊ दिले नाही. ती माझी चूक झाली,” असंही म्हटलं आहे. तसेच गडकरींनी आता पुणे-सातारा रस्त्यासाठी नव्याने कंत्राट दिलं जाणार असल्याचं जाहीर केलं. “पुणे-सातारा रस्त्याचे सध्याचे कंत्राट रद्द करणार असून 5000 कोटींचे नवीन काम हाती घेणार आहोत. पुणे-सातारा एलिव्हेटेड रोडचा आराखडा मंजूर झालेला आहे,” असं गडकरींनी सांगितलं.
नक्की वाचा >> ‘कितीही परखड बोललं तरी राजाने ते सहन केलं पाहिजे, लोकशाहीत…’; गडकरींचं सूचक विधान
पुण्यात दीड लाख कोटींची कामे
पुणे जिल्ह्यात डिसेंबर अखेरपर्यंत दीड लाख कोटींची कामे सुरू होतील. पुणे ते संभाजीनगर 2 तासांत जाता येईल असा रस्ता करणार. आखणी झालेली आहे, असंही गडकरी म्हणाले. तर देवेंद्र फडणवीस यांनी, “पुण्यातील पालखी मार्गाचे 70 ते 80 टक्के काम पूर्ण झाल्याचं सांगतानाच आज शेवटच्या टप्प्याचा शुभारंभ होत आहे. लवकरच संपूर्ण मार्गाचे काम पूर्णत्वाला येईल. त्याबद्दल गडकरीजींना धन्यवाद देतो,” असं म्हणत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचे आभार मानले.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 20, 2024 | Trending News
Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकासाठी अजित पवारांनी गुलाबी कॅम्पेन सुरु केलं.. मात्र आता अजित पवार विधानसभेसाठी मुस्लीम कार्डही वापरणार असल्याचं समजतंय.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 20, 2024 | Trending News
अर्न्सट अँण्ड यंग (ईवाय) कंपनीचे अध्यक्ष राजीव मेमानी यांनी अतिताणामुळे मृत्यू झालेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी कंपनीतील कोणीही उपस्थित न राहिल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. आमच्या संस्कृतीत ही फार दुर्लक्षित बाब असल्याचं ते म्हणाले आहेत. 26 वर्षीय अॅना सॅबेस्टियनचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा तिच्या आईने केला आहे. अॅना सॅबेस्टियन कंपनीत चार महिन्यांपूर्वीच सीए म्हणून कामाला लागली होती. कंपनीत रुजू झाल्यानंतर चार महिन्यातच तिचा मृत्यू झाला.
तरुणीच्या मृत्यूनंतर राजीव मेमानी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राजीव मेमानी यांनी LinkedIn वर पोस्ट शेअर केली असून अॅना सॅबेस्टियनच्या मृत्यूमुळे आपण फार दु:खी असल्याचं म्हटलं आहे.
“मी त्यांच्या कुटुंबाप्रती मनापासून शोक व्यक्त केला आहे. मला कल्पना आहे की, कोणतीही गोष्ट त्यांच्या जीवनातील पोकळी भरून काढू शकत नाही. तिच्या अंत्यसंस्काराला आम्ही उपस्थित राहू शकलो नाही याबद्दल मला मनापासून खेद वाटतो. हे आपल्या संस्कृतीसाठी पूर्णपणे परके आहे. असे यापूर्वी कधीही घडले नाही; पुन्हा कधीही होणार नाही,” असं राजीव मेमानी म्हणाले आहेत.
राजीव मेमानी यांनी यावेळी आपण कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात मैत्रीपूर्ण, चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि ध्येय पूर्ण होईपर्यंत आराम करणार नाही असंही म्हटलं आहे. “आमच्यासाठी कामाच्या ठिकाणी सर्वोत्तम, निरोगी जागा निर्माण करणं नेहमीच प्राधान्य राहिलं आहे. आमच्या कर्मचाऱ्यांच्या हिताला आम्ही नेहमीच प्राधान्य देतो. मी हे सांगू इच्छितो की आमच्या लोकांचे कल्याण हे माझे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि मी वैयक्तिकरित्या हे उद्दिष्ट पूर्ण करेन,” असं ते म्हणाले आहेत.
अॅना सॅबेस्टियन मार्च महिन्यात कंपनीत रुजू झाली होती. 20 जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. तिची आई अनिता यांनी कंपनीला जाहीर पत्र लिहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. कामाच्या अतिताणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा तिच्या आईने केला आहे. तसंच त्यांनी दावा केला की कंपनीतील कोणीही तिच्या मुलीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित नव्हते. “तिच्या अंत्यसंस्कारानंतर, मी तिच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला, परंतु मला कोणतेही उत्तर मिळाले नाही. मूल्ये आणि मानवी हक्कांची भाषा करणारी कंपनी त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्यातील एका कर्मचाऱ्याच्या अंतिम क्षणी गैरहजर कसे राहू शकतात?”, असं त्यांनी पत्रात लिहिलं आहे.
दरम्यान हा मुद्दा समोर येताच केंद्राने अॅनाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या परिस्थितीची चौकशी सुरू केली. गुरुवारी, कामगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले की, असुरक्षित आणि शोषणकारक कामाच्या वातावरणाच्या आरोपांची सखोल चौकशी सुरू आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 19, 2024 | Trending News
काँग्रेसनं मविआतून मुख्यमंत्री पदावर दावा ठोकल्यानं महाविकास आघाडीत बिघाड होण्याची शक्यता आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 19, 2024 | Trending News
Pune Crime News Today: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या प्रियकराची हत्या करण्यासाठी एक सरकारी शिक्षक बिहारमधून पुण्यात आला अन्…
Source link