कॅलिफॉर्नियाच्या धर्तीवर कोकणात होतोय कोस्टल रोड; मुंबई-गोवा अंतर कमी होणार, 93 पर्यटन स्थळांना जोडणारा मार्ग

कॅलिफॉर्नियाच्या धर्तीवर कोकणात होतोय कोस्टल रोड; मुंबई-गोवा अंतर कमी होणार, 93 पर्यटन स्थळांना जोडणारा मार्ग


Revas Reddy Highway: मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी ठरणारा रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडीपर्यंतच्या सागरी महामार्गाचे भूमीपूजन आज करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रेवस (रायगड) ते रेडी (सिंधुदुर्ग) या सागरी महामार्गावरील सात खाडी पुलांच्या कामाचे भूमीपूजन करण्यात येत आहे. आज सकाळी 11 वाजता दुरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. रेवस ते रेडी या सागरी महामार्गाची एकूण लांबी 498 किमी इतकी आहे. पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा महामार्ग असणार आहे. 

रेवस ते रेडी हा महामार्ग कोकण किनारपट्टीवरील सर्व सागरी किनाऱ्यांना जोडतो. कॉलिफॉर्नियाच्या धर्तीवर या सागरी महामार्गाची रचना करण्यात येणार आहे. तसंच, या सागरी महामार्गावरील पुढील सात पुलांचे आज भूमीपूजन करण्यात येणार आहे. या सर्व 7 पुलांची लांबी 26.70 किमी असून एकूण प्रशासकीय मान्यता रु. 7851 कोटी इतकी आहे.

रेवस ते रेड्डी हा महामार्ग रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यातून जाणार आहे. तसंच, मुंबईकरांना थेट गोव्याला जाण्यासाठी या महामार्गाचा फायदा होणार आहे. समुद्र किनाऱ्यालगतची शहरे मुख्य रस्त्याशी सोडली जाणार असून मुंबई ते गोवा अंतरही कमी होणार आहे. तसंच, समुद्रा किनाऱ्याजवळून हा महामार्ग जाणार असल्यामुळं पर्यटनाला चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे कोकणातील 93 पर्यटकांना हा मार्ग जोडणार आहे. 

रेवस-रेडी सागरी किनारा प्रकल्प काम सुरू केल्यानंतर पाच वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. म्हणजेच 2030 पर्यंत प्रवाशांना सागरी किनारा मार्गावरुन प्रवास करता येणार आहे. 

सागरी किनारा मार्गावरील सात पूल

1) रेवस- कांरजा भागातील धरमतर खाडी वरील पुल 
एकूण लांबी : 10.20 किमी.
प्रशासकीय मान्यता : रु. 3057 कोटी
पुलाचा प्रकार : स्टिल ब्रिज (लोखंडी पुल)
कामाची मुदत : 3 वर्ष 

2)रेवदांडा- साळाव भागातील कुंडलिका खाडी वरील पुल:
एकूण लांबी : 3.82 कि मी 
प्रशासकीय मान्यता रक्कम : 1736 कोटी
पुलाचा प्रकार : केबल स्टे
कामाची मुदत : 3 वर्ष

3)दिघी आगरदांडा भागातील आगरदांडा खाडी वरील पुल:
एकूण लांबी : 4.31 किमी.
प्रशासकीय मान्यता रक्कम : 1315 कोटी.
पुलाचा प्रकार : केबल स्टे 
कामाची मुदत : 3 वर्ष

4)बागमांडला वेश्वी भागातील बाणकोट खाडीवरील पुल :
एकूण लांबी : 1.711 किमी.
प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 408 कोटी
पुलाचा प्रकार : केबल स्टे
कामाची मुदत : 3 वर्ष

5)केळशी भागातील केळशी खाडीवरील पुल :
एकूण लांबी : 670 मी.
प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 148 कोटी
पुलाचा प्रकार: बॉक्स गर्डर
कामाची मुदत : 3 वर्ष

6)जयगड खाडीवरील पुल:
एकूण लांबी : 4.40 किमी.
प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 930 कोटी
पुलाचा प्रकार : केबल स्टे
कामाची मुदत : 3 वर्ष 

7)कुणकेश्वर येथील पुलाचे बांधकाम 
एकूण लांबी : 1580 मी.
प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 257 कोटी
पुलाचा प्रकार :  केबल स्टे





Source link

महाराष्ट्रात निवडणुका कधी? आचार संहिता कधी लागणार? अजित पवार यांचं मोठं विधान

महाराष्ट्रात निवडणुका कधी? आचार संहिता कधी लागणार? अजित पवार यांचं मोठं विधान


पुढील
बातमी

सुरज चव्हाणचा डायलॉग आणि खळखळून हसले अजित पवार! आयुष्यातली ‘ती’ इच्छा पूर्ण करण्याचे दिले आश्वासन





Source link

सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून अजित पवारांना मोठी ऑफर!

सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून अजित पवारांना मोठी ऑफर!



 सिन्नरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात  सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी  अजितदादांना एक मोठी ऑफर दिलीय. कोकाटेंनी अजित दादांना कोणती ऑफर दिलीय त्या ऑफरला अजितदादांनी काय उत्तर दिलंय पाहूयात. 



Source link

मीरा रोड मध्ये थरार! भर रस्त्यात पत्नीची हत्या

मीरा रोड मध्ये थरार! भर रस्त्यात पत्नीची हत्या



भर रस्त्यात पतीने पत्नीची हत्या केली आहे. मीरा रोड मध्ये ही थरारक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला आहे.  मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत असलेल्या नया नगर परीसरात ही घटना घडली आहे.  भर रस्त्यात पतीने पत्नीवर जीवघेणा चाकू हल्ला केला आहे.



Source link

काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी लगीनघाई, अंतर्गत गटबाजीमुळे महाराष्ट्रातही हातचा डाव घालवेल का?

काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी लगीनघाई, अंतर्गत गटबाजीमुळे महाराष्ट्रातही हातचा डाव घालवेल का?



Congress For CM Post: मविआत जागावाटपाचं भिजत घोंगडं पडलेलं असताना काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी लगीनघाई सुरू आहे.



Source link

शिवरायांचा उल्लेख करत राज ठाकरेंची रतन टाटांना श्रद्धांजली; म्हणाले, 'भारताने कदाचित शेवटचा…'

शिवरायांचा उल्लेख करत राज ठाकरेंची रतन टाटांना श्रद्धांजली; म्हणाले, 'भारताने कदाचित शेवटचा…'


Ratan Tata Death Raj Thackeray Tribute: ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या निधनानंतर जगभरातून हळहळ व्यक्त होत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी अत्यंत भावूक शब्दांमध्ये त्यांना आदरांजली वाहिली आहे. “रतन टाटा यांचं निधन झालं. जवळपास 156 वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकांत आणलं आणि ‘टाटा’ ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली ती रतन टाटांनी. बरं, हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे अंगीकारायची हे खरंतर कठीण, पण ते रतन टाटांना जमलं,” असं राज यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टच्या सुरुवातीला म्हटलं आहे.  

कॉफीपासून, हातातल्या घड्याळापर्यंत ते जगातील सगळ्यात मौल्यवान…

रतन टाटांच्या पाया पडतानाचा फोटो राज यांनी या पोस्टसोबत जोडला आहे. तसेच रतन टाटा राज यांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर गेले होते त्यावेळेचेही फोटो राज यांनी शेअर केले आहेत. “रतन टाटांकडे टाटा समूहाची धुरा आलीच ती जेआरडींसारख्या एका अत्यंत प्रतिभाशाली उद्योजकाकडून. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सरकारांशी आणि ‘लायसन्स राज’शी झगडा करत जेआरडीनी टाटा उद्योगाचे पंख विस्तारले, आणि ते पंख मधून मधून छाटण्याचे उद्योग त्या त्या वेळच्या सरकारने केले. योगायोग बघा की ‘लायसन्स राज’ संपायला आला आणि उदारीकरणाच्या उंबरठ्यावर असताना रतन टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. भारतीय उद्योगाच्या पायातल्या शृंखला गळून पडल्या, पण पुरेशी ताकद आलेली नसताना ऑलिंपिक्स स्पर्धेत उतरल्यावर जे होईल तशी काहीशी अवस्था भारतीय उद्योग जगाची झाली होती. पण रतन टाटांना खऱ्या अर्थाने जागतिकरण, भारतीय मनांना कसं घडवेल याचा अंदाज होता, आणि भारतीय मनगटं जागतिक बाजारपेठ पेलायला कशी सक्षम आहेत हे देखील अचूक माहित होतं. त्यामुळे कॉफीपासून, हातातल्या घड्याळापर्यंत ते जगातील सगळ्यात मौल्यवान आयटी कंपनी टीसीएस बनवण्यापर्यंत ते ब्रिटिशांचा मानबिंदू असणारी जॅग्वार आणि लँड रोव्हर कंपनी ताब्यात घेण्यापर्यंत अनेक सीमोल्लंघने रतन टाटांनी साध्य केली,” असं म्हणत राज यांनी रतन टाटांच्या प्रवासाचा आढावा घेतला आहे. 

सगळं उभारायचं पण तरीही कशातच गुंतून न पडता…

“स्वतःच छोटेखानी घर असावं हे प्रत्येक भारतीयाचं स्वप्न, हे हेरून टाटा हाऊसिंगची सुरुवात करणारे रतन टाटाच आणि प्रत्येक भारतीयाला परवडेल अशी ‘नॅनो’ गाडीच्या निर्मितीचं स्वप्न वास्तवात उतरवणारे टाटाच. टेटली, कोरस स्टील, जॅग्वार यासारखे आंतरराष्ट्रीय ब्रँड ताब्यात घेणाऱ्या रतन टाटांना, सामान्य भारतीय माणसाची नस पण अचूक माहित होती. सगळं उभारायचं पण तरीही कशातच गुंतून न पडता, निर्विकार रहायचं हे कोणाकडून शिकायचं असेल तर रतन टाटांकडूनच,” असं भावनिक विधान रतन टाटांनी केलं आहे. 

नक्की वाचा >> Tata Death: मध्यरात्री रुग्णालयात पोहोचले मुकेश अंबानी; भावूक होत म्हणाले, ‘रतन तू कायम माझ्या..’

…असं कधीच झालं नाही

“माझे आणि रतन टाटांचे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते आणि मी एखादी कल्पना त्यांच्यापुढे मांडली आणि रतन टाटांनी त्याला प्रतिसाद दिला नाही असं कधीच झालं नाही. आम्ही मांडलेल्या महाराष्ट्राच्या विकास आराखड्याबाबत त्यांनी केलेल्या सूचना असोत की नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्तेच्या काळात उभारलेल्या ‘बोटॅनिकल उद्याना’साठी सीएसआरमधून दिलेला निधी असो, त्यांचा माझ्याबद्दलचा आणि पक्षाबद्दलचा जिव्हाळा अनेकदा दिसून आला,” असं राज यांनी रतन टाटांबरोबर राहिलेल्या त्यांच्या वैयक्तिक नात्याबद्दल भाष्य करताना म्हटलं आहे. 

…तेव्हा ते स्वतः नाशिकला आले होते

“बोटॅनिकल उद्यानाच्या उभारणीच्या वेळेला, सुरुवातीला मंजूर झालेला निधी कमी पडला, पण कामाचा आवाका लक्षात घेऊन, आणि जीव ओतून आम्ही जे काम करत होतो ते पाहून त्यांनी कधीच निधीच्या बाबतीत हात आखडता घेतला नाही. इतकंच नाही ते उद्यान पूर्ण झाल्यावर, त्यांनी ते बघायला यावं अशी विनंती मी केली होती, ज्याला त्यांनी मान देऊन ते स्वतः नाशिकला आले होते,” असं राज ठाकरे म्हणाले. 

नक्की वाचा >> Ratan Tata Death: ‘आपण एवढच करु शकतो की…’, महिंद्रांची हेलावणारी पोस्ट; पिचाई म्हणाले, ‘भारताला…’

रतन टाटा माणूस म्हणून किती मोठे होते हे…

“रतन टाटांची अजून एक गोष्ट मला प्रचंड आवडायची ती म्हणजे त्यांचं श्वान प्रेम. आमच्यातली ही एक समानता. ताज हॉटेल समूहाच्या परिसरात असू देत की ‘बॉंबे हाऊस’ हे टाटा समूहाचं मुख्यालय, तिथे भटक्या श्वानांची पण उत्तम काळजी घेतली जायची. रतन टाटांच्या श्वान प्रेमाबद्दलचा एक किस्सा मी एके ठिकाणी वाचला होता. रतन टाटांना त्यांच्या दातृत्वाचा गौरव करणारा एक खूप मोठा सन्मान लंडनमधल्या बकिंगहॅम राजवाड्यात होणार होता. पण अगदी ऐनवेळेला त्यांनी त्यांचा कार्यक्रम रद्द केला कारण त्यांच्याकडच्या ‘टॅंगो’ आणि ‘टिटो’ या दोन श्वानांपैकी एक, खूप आजारी होता. रतन टाटांनी प्रिन्स चार्ल्स यांना कळवलं की अशा स्थितीत मी माझ्या श्वानांना सोडून येऊ शकत नाही. रतन टाटा माणूस म्हणून किती मोठे होते हे या उदाहरणातून जाणवतं,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

भारताने कदाचित शेवटचा…

“आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख आहेच, पण एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा ‘कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक’ गमावला, हे त्याहून मोठं दुःख,” अशा शब्दांमध्ये राज यांनी श्रद्धांतली वाहिली आहे.  

छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख…

“छत्रपती शिवाजी महाराजांशी या जगात कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. पण समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचं वर्णन जसं अचूक केलं आहे तसं इतर कुठे आढळत नाही. त्यात त्यांनी महाराजांना ‘श्रीमंत योगी’ म्हणलं आहे, रतन टाटांबद्दल विचार करताना, ‘श्रीमंत योगी’ ही उपमा तंतोतंत पटते. पण श्रीमंत असून देखील त्यांनी आपल्या श्रीमंतीचा तमाशा कधी मांडला नाही. असा माणूस पुढच्या पिढयांना पहायला न मिळणं ही अधिक दुःखाची बाब,” असं राज यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे. 

“रतन टाटांना माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली,” असं म्हणथ राज यांनी पोस्टचा शेवट केला आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp