पावसाळ्यानंतर थेट उन्हाळा? ऑक्टोबर हिटने नागरिक हैराण; नवरात्रीत मिळणार दिलासा पण….

पावसाळ्यानंतर थेट उन्हाळा? ऑक्टोबर हिटने नागरिक हैराण; नवरात्रीत मिळणार दिलासा पण….


मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात गेल्या आठवड्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. पण आता मात्र नागरिक अक्षरशः तापमान वाढीच्या गरमीने हैराण झाले आहे. तर झालं असं की, उत्तर भारतातील काही भागांतून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. काही दिवसांतच महाराष्ट्रातूनही मोसमी वारे माघारी परतण्यास सुरुवात होईल. त्यामुळे आता अनेक भागात तुरळक सरी पडल्या तरी वातावरणातील हवामान अतिशय कोरडे राहील. 

नवरात्रीत कसा असेल पाऊस? 

हवामान्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार; महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला 5 ते 10 ऑक्टोबरदरम्यान मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. दरम्यान, मुंबईत मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास साधारणपणे 8ऑक्टोबरपासून सुरू होतो.  त्यामुळे नवरात्रीत तुरळक प्रमाणात पाऊस पडेल. यामुळे गरबा किंवा नवरात्रीच्या उत्सवावर पावसाचं सावट राहील. 

परतीच्या पावसाची जोरदार हजेरी 

मोसमी वाऱ्याच्या परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्याचत पावसाने विशेष हजेरी लावली. अगदी कोकण, पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. परतीच्या पावसाने नागरिकांना अक्षरशः झोडपलं. पण ऑक्टोबरची सुरुवात अक्षरशः उन्हाचा चटका लागून झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत.  हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी 33.5 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात 32.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. 

ऑक्टोबर महिन्याची सुरुवात 

ऑक्टोबर महिना सुरू होताच ‘ऑक्टोबर हिट’ची झळ जाणवू लागली. पारा वाढल्यामुळे गेल्या आठवड्यात पाऊस आणि या आठवड्यात गरमी असं वातावरण आहे.  या आठवड्यात रात्री 27.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात फक्त 6 अंशाचा फरक आहे. अशा परिस्थितीत मुंबईकरांना दिवस-रात्र गरमीला सामोरं जावं लागत आहे. आर्द्रता आणि तापमान या समीकरणामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.





Source link

सर्वात मोठी घडामोड! निलेश राणे शिवसेनेकडून निवडणूक लढणार? वर्षावर CM शिंदेंनी- नारायण राणेंची भेट

सर्वात मोठी घडामोड! निलेश राणे शिवसेनेकडून निवडणूक लढणार? वर्षावर CM शिंदेंनी- नारायण राणेंची भेट



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknat Shinde) यांनी वर्षा निवासस्थानी (Varsha Bunglow) भाजपा नेते नारायण राणे (Narayan Rane) यांची आज भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना तातडीने वर्षा निवासस्थानी भेटण्यासाठी बोलवलं अशी सूत्रांची माहिती आहे. 
 



Source link

एसटीच्या स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र आणि महिला बचत गटाचे स्टॉल, नवे अध्यक्ष गोगावलेंचा धडाकेबाज निर्णय

एसटीच्या स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र आणि महिला बचत गटाचे स्टॉल, नवे अध्यक्ष गोगावलेंचा धडाकेबाज निर्णय



ST Mahamandal: महाराष्ट्र एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांनी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.



Source link

Pune Metro: 'तिकीटपेक्षा पार्किंगचे शुल्क जास्त!' पुणेकर संतापल्यानंतर मेट्रो प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Pune Metro: 'तिकीटपेक्षा पार्किंगचे शुल्क जास्त!' पुणेकर संतापल्यानंतर मेट्रो प्रशासनाने घेतला मोठा निर्णय


Pune Metro News: वाढती वाहने, छोटे रस्ते यामुळे शहरांमध्ये पार्किंगची समस्या काही नवी नाही. पुणेकरांनादेखील पार्किंगच्या समस्येला सामोरे जावे लागले. पण या पार्किंगवरुन सजग पुणेकरांनी वाद घातला आणि पुणे मेट्रो प्रशासनाला मोठा निर्णय घ्यावा लागला. पुणे जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशनवर पे-अँड-पार्कची सुविधा सुरू करण्यात आली. पण पहिल्याच दिवश ही सुविधा वादात आली. कारण पे-अँड-पार्कसाठी नेमलेल्या कंत्राटदाराने पुणेकरांकडून  जास्त पार्किंग शुल्क आकारायला सुरुवात केली. काही सजग पुणेकरांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात आवाज उठवला. बघता बघता या पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होऊ लागल्या. आणि पुणे मेट्रो प्रशासनापर्यंत पोहोचल्या. यानंतर प्रशासनाला कडक पाऊल उचलावे लागले.  काय आहे हा प्रकार? जाणून घेऊया. 

किती आकारायचे शुल्क?

शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन परिसरात ही पे अॅण्ड पार्किंगची सुविधा सुरु होती. कंत्राटदाराने सोमवारपासून काम सुरू केले आणि तो ठरल्यानुसार दर आकारत नसल्याचे आम्हाला समजले. त्यामुळे आम्ही त्याला काम करण्यापासून रोखले आणि निलंबितही केले. पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक (प्रशासन आणि जनसंपर्क) हेमंत सोनवणे यांनी माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली. करारानुसार वाहनचालकांकडून 2 तासांसाठी 15 रुपये शुल्क आकारणे अपेक्षित होते. असे असताना कंत्राटदार नुकत्याच सुरू झालेल्या पे-अँड-पार्कमध्ये दुचाकी चालकांकडून एक तासासाठी 15 रुपये आणि चारचाकीसाठी 35 रुपये आकारत असल्याचे आढळले.या संपूर्ण प्रकरणामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर त्यांची नाराजी आणि चिंता व्यक्त केली. मेट्रोच्या तिकिटापेक्षा पार्किंग शुल्क जास्त असल्याचा दावा त्यांनी केला.

पुणेकरांच्या सोशल मीडियात प्रतिक्रिया  

एका यूजरने लिहिले, तिकीटावर जीएसटी क्रमांक कुठे आहे? सरकारी कंत्राट मिळविण्यासाठी सर्व पार्किंगच्या ठिकाणी ते अनिवार्यपणे असणे आवश्यक आहे. तसेच ‘जर एखादा माणूस सकाळी ऑफिसला जातो आणि मेट्रो पार्किंगच्या जागेवर आपली कार पार्क करतो आणि 10 तासांनंतर परत येतो, तर त्याची किंमत किती असेल? लोक मेट्रो तिकिट घेणार नाहीत आणि स्वतःची वाहने वापरतील’, असे दुसऱ्या युजरने लिहिले.

‘मेट्रो पार्किंगची सेवा विनामूल्य असणे आवश्यक आहे. किंवा ते एखाद्या शॉपिंग मॉलसारखे असावे, जिथे तुम्ही मेट्रोचे तिकीट दाखवाल आणि पार्किंग विनामूल्य मिळेल, अशी प्रतिक्रिया एका युजरने व्यक्त केली. 

 

मेट्रोची वेळ वाढवण्याची मागणी 

दरम्यान, पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प (टप्पा-1) पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे उद्घाटन केले. आता मेट्रोची वेळ मध्यरात्री वाढवण्याची मागणी प्रवाशांनी सुरू केली आहे. सध्या मेट्रो सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालते.





Source link

तुतारी जोमात, इनिकमिंग जोरात! विधानसभेआधी शरद पवारांकडे जोरदार इनकमिंग?

तुतारी जोमात, इनिकमिंग जोरात! विधानसभेआधी शरद पवारांकडे जोरदार इनकमिंग?



Sharad Pawar NCP:   निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गाठीभेटींना मोठं महत्त्व प्राप्त झालंय. 



Source link

'आधी कोयत्याचे वार मग चाकू खुपसला…' बारामतीच्या टीसी कॉलेजमध्ये रक्तरंजित थरार; विद्यार्थ्याने गमावला प्राण

'आधी कोयत्याचे वार मग चाकू खुपसला…' बारामतीच्या टीसी कॉलेजमध्ये रक्तरंजित थरार; विद्यार्थ्याने गमावला प्राण



Baramati Crime: पुण्याच्या बारामतीत असलेल्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय म्हणजेच टीसी कॉलेजमध्ये रक्तरंजित थरार पाहायला मिळाला.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp