by Hansraj Agrawal | Sep 26, 2024 | Trending News
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात उद्रेक पसरला होता. सर्वस्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. मात्र आता चौकशी समितीनं याप्रकरणी 16 पानी अहवाल सादर केलाय. या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका झाल्याचं या अहवालातून समोर आलेलं आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 26, 2024 | Trending News
Chatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरचा (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळा (Chatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. यावरुन विरोधकांनी महायुती सरकारला घेरलं आहे. तर शिवप्रेमी संतप्त झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा जयदीप आपटे (Jaideep Apte) या तरुण शिल्पकाराने बनवला होता. पण राजकोट किल्ल्यावर अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा सोमवारी, 26 ऑगस्ट रोजी कोसळला. भारतीय नौदल दिनानिमित्त म्हणजेच 4 डिसेंबर 2024 रोजी या पुतळण्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं.
चौकशी समितीचा अहवाल
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चौकशीची समितीची स्थापना केली होती. यात महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. या समितीने आता आपला अहवाल सादर केला आहे. चुकीच्या वेल्डिंग कामामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, पुतळ्याला गंज लागला होता तसंच कमकुवत फ्रेममुळे पुतळा कोसळला असा अहवाल चौकशी समितीने दिला आहे. पुतळा दुर्घटनेला एक महिला पूर्ण झाला असून चौकशी समितीने सोळा पाणी अहवाल सादर केला आहे.
शिवरायांचा पुतळा उभारण्याचं काम शिल्पकार जयदीप आपटेकडे देण्यात आलं होतं. तर पुतळा आणि पायासाठी संरचना सल्लागार म्हणून चेतन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती.
जयदीप आपटेला अटक
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली. कल्याणमधून त्याच्या राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली. कल्याण सिंधुदुर्ग पोलिसांनी ही कारवाई केली. जयदीपला अटक करण्यात आल्यानंतर आज त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे फरार होता. पण आपल्या कुटुंबीयांना भेटायला आला असतानाच त्याला ताब्यात घेण्यात आलं.
शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
राजकोट किल्ल्यावर आता आता छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पुतळा उभरला जाणार आहे. हा पुतळा इतका मजबूत असेल की 100 वर्ष याला काहीच होणार नाही अशी माहिीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. पुतळा कोसळल्या नंतर या संदर्भात दोन कमिट्या नेमण्यात आल्या आहेत. एक कमिटी पूर्वीच्या पुतळा दुर्घटना नेमकी कशी झाली याची चौकशी करणार आहे. तर, दुसरी कमिटी नव्याने पुतळा कशा स्वरुपाचा असेल, संदर्भात काम करणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती तलवारधारी पुतळा असणार आहे. गुजरातमधील ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा उभारणीसाठी जे निकष ठेवले होते, त्याच निकषांवर आधारित छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला जाणार आहे अशी माहितीही समोर आली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 25, 2024 | Trending News
LONAVALA-Karvi Flower : लोणावळ्यात सध्या पर्यटकांची तुफान गर्दी झाली आहे. लोणावळ्याचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालत आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 25, 2024 | Trending News
Mhada Mumbai Lottery: मुंबईत एक तरी हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र घरांच्या किंमती आता गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्यांना मुंबईत परवडेलच असं नसतं. मुंबईकरांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील असते. अलीकडेच म्हाडाने मुंबईत 2030 घरांची लॉटरी काढली आहे. त्याचबरोबर म्हाडाने आणखी एक दिलासा दिला आहे. म्हाडाच्या घरांसाठी इच्छुक असलेल्या अर्जदारांसाठी खूशखबर आहे. घरांसाठी अर्ज भरताना आता जुने म्हणजेच २०१८ पूर्वीचे डोमेसाईल प्रमाणपत्र (अधिवास दाखला) तात्पुरते ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र, घराचा ताबा घेण्यापूर्वी संबंधित अर्जदाराला नवीन डोमेसाईल सादर करणे बंधनकारक असणार आहे.
म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सोडतीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे शेकडो अर्जदारांना दिलासा मिळणार आहे. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरताना सध्या १ जानेवारी २०१८ नंतर जारी केलेले आणि बारकोड असलेले डोमेसाईल प्रमाणपत्र बंधनकारक आहे. बारकोड असल्यामुळे सिस्टममधून या डोमेसाईल प्रमाणपत्राची पडताळणी करणे म्हाडाला सोपे जाते.
अनेक जणांकडे २०१८ पूर्वीचे डोमेसाईल प्रमाणपत्र असून आपल्याला त्या डोमेसाईलच्या आधारावर म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरता येईल अशा भ्रमात ते अर्जदार राहतात. ऐनवेळी अर्ज भरताना मात्र त्यांची गोची होते. नुकतीच म्हाडाची मुंबई मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया पार पडली. त्यावेळीदेखील अनेकांनी जुने डोमेसाईल प्रमाणपत्र ग्राह्य धरले जावे, अशी मागणी म्हाडाकडे केली होती.
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरताना अर्जदार आता जुने डोमेसाईल प्रमाणपत्र अपलोड करू शकणार आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला असून पुढील सोडतीपासून याची अंमलबजावणी होईल. संबंधित अर्जदार विजेता झाल्यानंतर त्याला ठरावीक दिवसांची मुदत दिली जाईल आणि त्या मुदतीत त्याला बारकोड असलेले नवीन डोमेसाईल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
दरम्यान, मुंबई मंडळाच्या यंदाच्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३५९, अल्प उत्पन्न गटासाठी ६२७, मध्यम उत्पन्न गटासाठी ७६८ आणि उच्च उत्पन्न गटासाठी २७६ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या १३२७ सदनिका, विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त ३७० सदनिका आणि मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या ३३३ घरांचा समावेश आहे. २७ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. येत्या ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संगणकीय सोडत काढली जाणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 24, 2024 | Trending News
Akshay Shinde Encounter Post Mortem: 7 तासांनंतर पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलाय
Source link
by Hansraj Agrawal | Sep 24, 2024 | Trending News
Siddhivinayak Temple: मुंबईतल्या प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरात प्रसादाच्या लाडू मध्ये उंदरांच्या पिल्लांच्या सुळसुळाट असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर आला आहे.
Source link