प्रितीसंगमवर दादागिरी! अजित पवारांनी काढले रोहित पवारांचे चिमटे, म्हणाले 'थोडक्यात वाचलास….'

प्रितीसंगमवर दादागिरी! अजित पवारांनी काढले रोहित पवारांचे चिमटे, म्हणाले 'थोडक्यात वाचलास….'


Rohit Pawar Meet Ajit Pawar :  अजित पवार आणि रोहित पवार या काका-पुतण्यात जवळपास दीड वर्षांत असा खुमासदार संवाद पाहायला मिळाला. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी रोहीत पवार कराडच्या प्रितीसंगमावर गेले होते. रोहित पवार तिथून परतत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार प्रितीसंगमावर आले होते. 

यावेळी काका-पुतणे समोरासमोर आल्यावर काय होणार असा प्रश्न तेथील कार्यकर्त्यांच्या मनात होता. अजित पवार यांनी मात्र राजकीय अभिनिवेश बाजूला सारत रोहित पवार यांचा हात हातात घेतला. काकांच्या अधिकारवाणीनं पायापड असं देखील अजित पवार यांनी रोहित पवार यांना सांगितलं. एवढंच नाही तर अजित पवार रोहित पवार यांना म्हणाले की, रोहित वाचलास, जर मी एक सभा घेतली असती तर काय झालं असतं हे तुला माहिती आहे ना म्हणत अजित पवार यांनी रोहित पवार यांना सुनावलं.

रोहित पवार काय म्हणाले? 

कराडच्या प्रितीसंगमावर रोहित पवार-अजित पवार आमने-सामने आले होते. यावेळी दोघांमध्ये खास गप्पा झाल्या. यावेळी रोहित पवार अजित पवार यांच्या पाया देखील पडले. यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार यांना शुभेच्छा देत म्हणाले की, वाचलास रोहित, जर मी एक सभा घेतली असती तर काय झालं असतं तुला माहिती आहे ना असं अजित पवार म्हणाले. त्यावर रोहित पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार काकांच्या अधिकारवाणीनं बोलले आहेत. आमचे वैचारिक मतभेद कायम असल्याचं रोहित पवार यावेळी म्हणाले. 

अजित पवारांचा घूमजाव

अजित पवार रोहित पवार यांना जे म्हणाले ते सगळ्या जगानं ऐकलं. परंतु, अजित पवार यांनी त्यावर घूमजाव केला. जामखेडच्या सभेबाबत आपण काहीच बोललो नसल्याचं अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी फुटल्यानंतर रोहित पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांत अबोला होता. दोघं कधीही सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी बोलले नव्हते. उलट एकमेकांवर टीकेची एकही संधी त्यांनी सोडली नव्हती. प्रितीसंगमावर मात्र काका-पुतण्यांच्या नात्यामधील ओलावा स्पष्ट जाणवला.





Source link

ठाण्यातून नाशिकला जाताना कसारा घाट लागणार नाही; महाराष्ट्रातील सर्वात अवघड आणि त्रासदायक प्रवास फक्त 8 मिनिटात

ठाण्यातून नाशिकला जाताना कसारा घाट लागणार नाही; महाराष्ट्रातील सर्वात अवघड आणि त्रासदायक प्रवास फक्त 8 मिनिटात



Kasara Tunnel :  कसारा घाटातील त्रासदायक प्रवास आता सोपा होणार आहे. ठाण्यातून नाशिकला जाताना कसारा घाट लागणार नाही. आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा अंतर पार होणार आहे.



Source link

उद्धव ठाकरेंचा दारुण पराभव झाल्यानंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली 'घाणेरड्या शिव्या…'

उद्धव ठाकरेंचा दारुण पराभव झाल्यानंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली 'घाणेरड्या शिव्या…'


Kangana Ranaut on Uddhav Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकीकडे महायुतीचा मोठा विजय झाला असताना, महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव झाला आहे. महायुतीला 234 जागा मिळाल्या असून, भाजपाला 132, शिवसेना 57 आणि राष्ट्रवादी 41 जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त 50 जागा मिळाल्या असून, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackkeray) शिवसेनेला फक्त 20 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादीला 10 जागा जिंकता आल्या. दरम्यान या निकालावर अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. 

उद्धव ठाकरेंच्या पराभवावर बोलताना कंगनाने दानवांचा पराभव झाला आहे अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया नोंदवली. तसंच आपल्या घरावर करण्यात आलेल्या कारवाईचा उल्लेख करत त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचं दिसत होतं असंही म्हटलं 

“आमच्या पक्षासाठी हा ऐतिहासिक विजय आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते उत्साहित आहोत. संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील जनतेचे आम्ही आभारी आहोत,” असं कंगना रणौत म्हणाली आहे. मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल? असं विचारलं असता कंगनाने “पक्ष यासंबंधी निर्णय घेईल असं सांगितलं. आमच्याकडे नेतृत्व करण्यासाठी एकापेक्षा एक लोक आहेत,” असं सांगितलं.

उद्धव ठाकरेंचा इतका वाईट पराभव होईल याची तुम्हाला अपेक्षा होती का? या प्रश्नावर कंगना म्हणाली, “हो मला अपेक्षा होती. इतिहास याचा साक्षीदार आहे आणि माझे अनेक रीलही व्हायरल होत आहेत की आपण देव आणि दानवांना कसं ओळखतो. जे महिलांची अब्रू उतरवतात, ते दैत्य असतात. दुसरीकडे महिलांना 33 टक्के आरक्षण, धान्य, गॅस सिलेंडर दिलं आहे त्यावरुन कोण देव आहे आणि कोण दैत्य हे समजत आहे.त्यामुळे दैत्यांचं तेच झालं जे नेहमी होतं. त्यांचा पराभव झाला. 

पुढे ती म्हणाली, “महाभारतात एकच कुटुंब होतं, पण किती फरक होता. सर्व भाऊ होते. जे महिलांचा अपमान करतात. माझं घऱ तोडण्यात आलं. घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या. त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचं दिसत होतं”. 





Source link

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात लक्षवेधी निकाल! महायुती सुसाट, महाविकासआघाडी भुईसपाट

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात लक्षवेधी निकाल! महायुती सुसाट, महाविकासआघाडी भुईसपाट


पुढील
बातमी

महायुतीच्या त्सुनामीनं महाविकास आघाडी नेस्तनाबूत; काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव





Source link

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार विजयी; कोट्यावधीच्या मालमत्तेमुळे चर्चेत आलेला मुंबईतील हायव्होल्टेज मतदार संघ

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार विजयी; कोट्यावधीच्या मालमत्तेमुळे चर्चेत आलेला मुंबईतील हायव्होल्टेज मतदार संघ



Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार विजयी म्हणून चर्चेत आलेले पराग शहा विजयी झाले आहेत.  राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार  राखी हरिश्चंद्र जाधव यांचा त्यांनी पराभव केला आहे. 



Source link

कोणालाच बहुमत मिळालं नाही तर महाराष्ट्रात कोणाचे येणार सरकार? कोण ठरणार गेमचेंजर?

कोणालाच बहुमत मिळालं नाही तर महाराष्ट्रात कोणाचे येणार सरकार? कोण ठरणार गेमचेंजर?



  विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागण्यासाठी अवघे काही तास राहिलेत. निकाल लागल्यानंतर केवळ दोन दिवसांतच म्हणजे 26 नोव्हेंबरपूर्वी नवं सरकार स्थापन करावं लागणार आहे. बहुमताचा 145 चा जादूई आकडा कुणालाही न गाठता आल्यास कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो. अशावेळी राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp