Pune News Today: दिव्य शक्ती असल्याची बतावणी करणाऱ्या भोंदूबाबाच्या विरोधात पुण्यातील बावधन येथे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. प्रसाद दादा उर्फ दादा उर्फ प्रसाद दादा भीमराव तामदार असं अटक केलेल्या 29 वर्षीय भोंदू बाबाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक असलेल्या 39 वर्षीय व्यक्तीने बावधन पोलिस ठाण्यात भोंदूबाबाने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, भोंदू बाबांना त्याच्याकडे दिव्यशक्ती असल्याचा बनाव करत फिर्यादीला अनेक गोष्टी करण्यास भाग पाडले. आरोपीने दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादीच्या मोबाइलमध्ये एक अॅप डाउनलोड करायला सांगितले होते. या अॅपच्या माध्यमातून त्याने त्याच्या मोबाइलचा अॅक्सेस मिळवला. मोबाईलवरील माहितीचा गैरवापर करत अश्लील कृत्य करण्यास तसेच मोबाईलवरील माहितीचा गैरवापर करत अश्लील कृत्य करण्यास तसेच वेश्यागमनास प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप आहे.
इतकंच नव्हे तर, फिर्यादीला प्रेयसीबरोबर अश्लील कृत्य त्याच बरोबर वेश्यागमन करण्यासही भाग पाडले आणि मोबाईल ॲपद्वारे ते बाबाने पाहिल्याचं फिर्यादित नमूद करण्यात आलं आहे. या भोंदू बाबाने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादित सांगण्यात आलं आहे. फिर्यादी बरोबरच इतरही अनेकांना या बाबाने फसवणूक केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. पोलीस अधिक तपास करत आहेत.
फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून, त्याच्यावर फसवणूक, माहिती तंत्रज्ञान कायदा, लैंगिक शोषणास प्रवृत्त करणे इत्यादी गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, बाबाने या सगळ्याच्या मोबदल्यात, मठाला मदत करण्याच्या बहाण्याने त्याने फार्यादीकडून 15 हजार रुपये उकळले असल्याचे समोर आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात घेताच फिर्यादीने थेट पोलिसांत धाव घेतली आहे.
नीतेश महाजन, झी 24 तास, जालना: जालन्यातल्या पारध गावात जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात शिकताना अडथळा येतोय. शाळेभोवती साचलेल्या तळ्यात मोठ्या प्रमाणात बेडूक आलेत. या बेडकांच्या ओरडण्यानं नेमकं शिक्षकांनी काय शिकवलं, हेच विद्यार्थ्यांना कळेनासं झालंय. याबद्दल जाणून घेऊया.
ग्रामीण भागातल्या समस्याचं वेगळ्या असतात. जालन्यातल्या पारध गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. मोठा पाऊस पडला आणि शाळेच्या मैदानाचं तळं बनलं. इतकंच नाही तर त्यात साप आणि बेडूकही आश्रयाला आले. त्यामुळे शाळेत येणा-या विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक आणि इतरांच्या जीवालाही धोका निर्माण झालाय. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वर्गात तास सुरू झाला की विद्यार्थ्यांना बेडकांचं डराव डराव सोडून काहीच ऐकू येत नाही. त्यामुळे शिक्षकांनी नेमकं काय शिकवलं, हेच विद्यार्थ्यांना कळत नाही.
पारधच्या जिल्हा परिषद शाळेसमोरच्या डबक्यामुळे डेंग्यू, मलेरियाचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जातेय. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी पावलं उचलावीत, अशी मागणी केली जाते.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून पावसाळ्यात या शाळेसमोर असंच पाणी साचतंय. वारंवार तक्रारींचा पाढा वाचूनही दुर्लक्ष केलं जातंय.. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आलाय. आता तरी लक्ष देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शाळेच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल
शाळांना सुरुवात झाली असताना शाळेसंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. रुवी कदम या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ अपलोड करण्यात आलाय. रुवीचे पालक तिच्या नावाने सोशल मीडिया अकाऊंट चालवतात. ज्यात ते रुवीच्या जीवनातील अनेक आनंदी क्षण सोशल मीडियात अपलोड करत असतात. असाच एक क्षण त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये शाळा सुटलेली दिसतेय. पालक आपल्या मुलांना घेण्यासाठी शाळेच्या गेटवर उभे आहेत. शाळेची घंटा वाजली आणि एक एक मुलं बाहेर येऊन आपल्या पालकांना भेटतंय आणि घरचा रस्ता पकडतंय. पण रुवीच्या बाबतीत याऊलट घडतंय. घरी जाण्याऐवजी पुन्हा शाळेत जाण्यासाठी रुवी रडतेय. ‘तिथे शाळेत जायचे नाही म्हणून बाकीची मुलं रडत होती आणि माझी मुलगी स्कूल सुटले तरी तिला स्कूल ला जायचे होते’, अशी कॅप्शन रुवीच्या पालकांनी व्हिडीओवर लिहिलीय. यावर अनेक मजेशीर प्रतिक्रियादेखील आल्या आहेत. मॅडम आईपेक्षा जास्त लाड करणारी भेटली असे वाटायला लागले आहे, अशी मिश्किल कमेंट एकाने केलीय. नव्वदीच्या मुलांना अर्धी शाळा घरी घ्यायला यायची आणि उचलून घेऊन जायची, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एकाने दिलीय.वाह! पुढे जाऊन ही मुलगी आयएएस, आयपीएस होणारं, अशी प्रतिक्रियादेखील देण्यात आलीय.काही दिवसांनी हीच शिक्षकांचा क्लास घेईल असे वाटते. शिस्त म्हणजे शिस्त. अशी प्रतिक्रिया एकाने लिहिलीय. घरी एवढा त्रास का देता तुम्ही? आई वडिलांच्या वादाला कंटाळलं असेल बाळ, अशी मिश्किल प्रतिक्रिया एकाने दिलीय. मागच्या आठवडाभरात या व्हिडीओवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स आलेल्या पाहायला मिळतायत.
Gold Rate Today: शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. याचे मुख्य कारण अमेरिकन डॉलरमध्ये आलेली वाढ आणि इस्राइल-ईराण या दोन देशांतील तणाव त्यामुळं सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी कमी झाली आहे. आता गुंतवणुकदारांचे लक्ष महागाईच्या आकड्यांवर आहे. ज्यामुळं फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याज दराबाबत संकेत मिळू शकतात. त्यामुळं सोन्याच्या दरात मोठे उलटफेर होताना दिसत आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरदेखील शुक्रवारी मोठी घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सोनं आज 930 रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहे. तर, चांदीदेखील स्वस्त झाली आहे. MCX वर सोनं 1013 रुपयांनी घसरले आहे. तर चांदी 408 रुपयांनी घसरून 1,06,347 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावले आहे. काल चांदीची किंमत 1.06,755 रुपये होती. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 0.4 टक्क्यांनी घसरून 3,313.23 डॉलर प्रति औंसवर पोहोचले होते. या आठवड्यात सोनं 1.7 टक्क्यांने घसरले आहे. अमेरिकेच्या सोनं वायदादेखील 0.7 टक्क्यांच्या घसरणीसोबत 3.325.70 डॉलरवर पोहोचले होते.
24 कॅरेट सोन्याच्या दरात आज 930 रुपयांची घसरण झाली असून 98,020 रुपयांवर पोहोचले आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 850 रुपयांची घसरण झाली असून 89,850 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 690 रुपयांची घट झाली असून 24 कॅरेट सोनं 73,520 रुपयांवर पोहोचलं आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत 10 ग्रॅम 22 कॅरेट 89,850 रुपये 10 ग्रॅम 24 कॅरेट 98,020 रुपये 10 ग्रॅम 18 कॅरेट 73,520 रुपये
ग्रॅम सोनं किंमत 1 ग्रॅम 22 कॅरेट 8,985 रुपये 1 ग्रॅम 24 कॅरेट 9,802 रुपये 1 ग्रॅम 18 कॅरेट 7, 352 रुपये
ग्रॅम सोनं किंमत 8 ग्रॅम 22 कॅरेट 78, 416 रुपये 8 ग्रॅम 24 कॅरेट 71, 880 रुपये 8 ग्रॅम 18 कॅरेट 58, 816 रुपये
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 89,850 रुपये 24 कॅरेट- 98,020 रुपये 18 कॅरेट- 73,520 रुपये
महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतल्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणारी याचिका हायकोर्टानं फेटाळलीये. कोर्टानं याचिकेत काहीही दम नसल्याचा निर्णय दिला असला तरी याचिकाकर्त्यांचे वकील प्रकाश आंबेडकरांचं त्यानं समाधान झालेलं नाहीय. प्रकाश आंबेडकरांनी सरकारला आणि निवडणूक आयोगाला तीन प्रश्न विचारुन कोंडीत पकडलंय.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानप्रक्रियेवर आक्षेप नोंदवणारी चेतन अहिरे यांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळलीये. याचिका फेटाळली असली तरी याचिकाकर्त्यांचे वकील प्रकाश आंबेडकरांच्या मनातल्या तीन प्रश्नांचं उत्तर मिळालं नाही असं आंबेडकरांनी सांगितलंय.
76 लाख पावत्या कुठं आहेत?
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ संपल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघ मिळून तब्बल 76 लाख मतं वाढली…मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान केंद्राच्या आवारात जे मतदार असतात त्या मतदारांना पावत्या दिल्या जातात. त्या पावत्या निवडणूक आयोग का देत नाही त्याचा रेकॉर्ड ठेवला की नाही असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी विचारलाय.
96 मतदारसंघात मतदान, मतमोजणीत तफावत कशी?
विधानसभा निवडणुकीत जवळपास 96 मतदारसंघात झालेलं मतदान आणि मोजलेली मतं यांच्यात तफावत निघाली. मतांची तफावत असताना निकाल जाहीर करु नये असा नियम आहे. तरीही त्या 96 मतदारसंघांचा निकाल कसा जाहीर करण्यात आला असा सवालही आंबेडकरांनी विचारलाय.
निवडणूक नियमानुसार झाली का?
विधानसभा निवडणूक ही कायदेमंडळानं बनवलेल्या नियमानुसार झाली का?. निवडणूक आयोगानं तयार केलेले नियम पाळले गेले का या प्रश्नांची उत्तर कोर्टात मिळाली नसल्याचं आंबेडकरांनी सांगितलंय.
न्यायालय काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष झालेले मतदान आणि निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नोंदवलेले मतदान यात विसंगती असल्याचा याचिकाकर्त्यांने केलेला दावा हा एका वृत्तपत्रातील लेखाच्या आधारे केला आहे.
मतदानाच्या शेवटच्या क्षणी म्हणजेच संध्याकाळी 6 वाजता झालेल्या मतदानात गैरप्रकार वा फसवणूक झाल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला. मात्र, त्यासंदर्भातील कोणत्याही प्रकारची तक्रार केलेली दिसून येत नाही. त्या संदर्भात कुठलीही सामग्री याचिकेसोबत सादर केलेली नाही.
हरि विष्णू कामथ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दाखला देत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेला युक्तीवाद स्वीकारता येणार नाही.
याचिका फेटाळली असली तरी प्रकाश आंबेडकर आणि याचिकाकर्त्यांचं समाधान झालेलं नाही. उत्तरं न मिळालेल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी प्रकाश आंबेडकर जनतेच्या कोर्टात जाणार का असा प्रश्न निर्माण झालाय.
‘शक्तिपीठ महामार्ग’ ही महाराष्ट्राची आजची तातडीची गरज आहे का? अशी विचारणा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सरकारला करण्यात आली आहे. ‘समृद्धी महामार्ग’ हा तुमचाच आधीचा ड्रीम प्रोजेक्ट! या नव्याकोऱ्या महामार्गावर सध्या खड्ड्यांची ‘समृद्धी’ झाली आहे याची आठवण सामनाच्या अग्रलेखातून करुन देण्यात आली आहे.