by Hansraj Agrawal | Apr 6, 2026 | Trending News
अशोक खरातच्या एसआयटी चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आलीय. अशोक खरात हा बदल्यांचंही रॅकेट चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनेक बड्या अधिका-यांना हवी ती पोस्टिंग खरातनं मिळवून दिल्याची माहिती आहे, त्याबद्दल खरात अधिका-यांकडून मोठी रक्कमही घेत असल्याचं चौकशीतून समोर आलं आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 6, 2026 | Trending News
उमेदवारी अर्जाआधीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना सुनेत्रा पवार भावुक झाल्या.अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर झाले. बारामतीकर, कार्यकर्त्यांना कधीही अंतर देणार नसल्याचं सुनेत्रा पवार म्हाणाल्या.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 5, 2026 | Trending News
Baramati Bypoll Election Sunetra Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाहीअखेर काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे. बारामतीत काँग्रेसकडून आकाश मोरेंना उमेदवारी देण्यात आली आहे. आकाशा मोरे सुनेत्रा पवारांविरोधात निवडणूक लढणार आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत आता मोठा ट्विस्ट आला आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा होती. मात्र, ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि काँग्रेसनं निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानं राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या अडचणी वाढल्या आहेत, तसंच बिनविरोध निवडीसाठी सुनेत्रा पवारांची धावाधाव देखील सुरू केली.
Add Zee News as a Preferred Source
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सुनेञा पवार यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता. पण, आता खूप उशीर झाला, आमची उमेदवार निवडीती प्रोसेस ऑलरेडी सुरूंय असं उत्कर काँग्रेसकडून देण्यात आल्याचे समजते. यामुळे बारामतीची पोट निवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळली आहे.
बारामतीतल्या पोटनिवडणुकीचं वातावरण आता चांगलंच तापायला लागल आहे. काँग्रेसनं आपला उमेदवार जाहीर करत आकाश मोरे यांना मैदानात उतरवलंय.. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे आता स्पष्ट झालं. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात मोरे थेट टक्कर देणार आहेत.. त्यामुळे बारामतीत पुन्हा एकदा जोरदार राजकीय सामना पाहायला मिळणार आहे. स्थानिक पातळीवर जय पवारांसह राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही सक्रिय झालेत.. त्यामुळे आता बारामतीमधे नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
कोण आहेत आकाश मोरे?
आकाश मोरे हे माजी आमदार तसेच विधान परिषदेचे सदस्य राहिलेले विजयराव मोरे यांचे चिरंजीव आहेत. स्थानिक पातळीवर त्यांचे कुटुंबीय राजकीयदृष्ट्या सक्रिय असल्याने त्यांना ओळख मिळाली आहे. विशेष म्हणजे, 2014 साली आकाश मोरे यांनी काँग्रेसच्या ‘पंजा’ चिन्हावर निवडणूक लढवली होती.
सुनेत्रा पवारांविरोधात 17 उमेदवारी अर्ज दाखल
2024 विधानसभेत अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार निवडणुकीच्या मैदानात होते, मात्र दादांच्या निधनानंतर पोटनिवडणूक न लढवण्याची भूमिका पवारांच्या राष्ट्रवादीनं घेतली. दादांना श्रद्धांजली म्हणून निवडणूक लढणार नसल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय. तर बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुनील तटकरेंकडून देखील प्रयत्न सुरू झाले आहेत, मल्लिकार्जून खर्गेंसोबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटले मात्र, काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्याने प्रयत्न फेल ठरल्याचे दिसत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक होणारय, दरम्यान या निवडणुकीसाठी आतापर्यंत 17 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, सुनेत्रा पवार उद्या त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे बिनविरोध निवडणूकीची शक्यता धूसर होण्याची चिन्ह आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 5, 2026 | Trending News
BJP MLA Controversial Speech: नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे शनिवारी रात्री आयोजित धर्मासभेत हैद्राबादचे वादग्रस्त भाजपा आमदार टी राजा सिंह यांनी महाराष्ट्रातील सगळे मदरशे बंद करण्याची मागणी केली आहे. एवढ्यावरच न थांबता प्रत्येकाच्या घरात पाच-पाच बंदुका असल्या पाहिजेत असंही या भाजपा आमदाराने जाहीर भाषणामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री नितेश राणेंसमोर म्हटलं आहे. सध्या या आमदाराच्या भाषणाची जोरदार चर्चा आहे.
Add Zee News as a Preferred Source
मदरशे विघातक शिक्षण देतात, असा आरोप
मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याला माझे समर्थन आहे. महाराष्ट्रातील सगळे मदरशे बंद करा. महाराष्ट्राच्या मदरशामध्ये देश विघातक शिक्षण देत आहे त्यामुळे मदरशे बंद करा. अनाधिकृत मदरशे बंद करण्या पेक्षा उध्वस्त करा असे वक्तव्य हैद्राबादचे आमदार टी राजा सिंह यांनी केले. त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
मदरशांवर बुलडोजर चालवण्याची गरज
“आपल्या महाराष्ट्रात बुलडोजरचा नियम लागू झाला आहे. जर मदरशे बंद केले तर पुन्हा चालू होतील. त्यामुळे अनाधिकृत मदरशांवर बुलडोजर चालवण्याची गरज आहे. दाऊद इब्राहिम आणि अफजल कसाब अश्याच मदरशातून तयार झालेत. मदरशामध्ये शिकवलं जाते हिंदूंची हत्या करा. नितेश राणेंना माझे निवेदन आहे, तुम्ही बोललेल्या वक्तव्याची अमलाबजावणी करा,” असं राजासिंह म्हणाले
औंरंगजेबची कबर उखाडून शौच्छालय बांधा
“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना औरंगजेबची कबर हटवण्यासाठी भीती का वाटतं आहे. तुम्हाला वाटते की तुम्हाला मतदान मिळणार नाही, ते तुम्हाला मतदान करणार नाही हे लिहून घ्या,” असंही टी राजा सिंह म्हणाले. “मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे, महाराष्ट्रच्या हिंदूंना वाटत आहे औरंगजेबची कबर उखडून तिथे शौचालय बांधा,” असे वक्तव्य आमदार टी राजा सिंह यांनी केले. “औरंग्याची कबर महाराष्ट्रासाठी नको आहे. माझ्या संभाजी राजाला हालहाल करून मारलं. ती कबर उखडवण्यासाठी मावळे हवे असतील तर लाखोने येऊ,” असेही टी. राजासिंह म्हणाले
घरात शस्त्र ठेवा
घरात शस्त्र ठेवण्याचा सल्लाही टी. राजासिंह यांनी दिला. “देवाच्या गाभाऱ्यात शस्त्र ठेवणे कायदेशीर आहे. बाहेर काढून हल्ला केला तर तो वेगळा विषय आहे. जर युद्ध झालं. शस्त्र नसतील तर, तुम्ही काय करणार? कसं लढणार धर्मासाठी? लढणाऱ्या लोकांनी बंदुकीचा परवाना घ्यावा. जिथे मदत लागेल तिचे आम्ही घेऊन देऊ. एका एका घरात पाच-पाच बंदूका असल्या पाहिजेत. देशद्रोही हल्ला करण्यासाठी आले, त्यांना गोळी मारण्यासारखे हत्यार राहिले पाहिजे,” असे आमदार टी. राजा सिंह म्हणाले.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 4, 2026 | Trending News
वनिता सुनिल कांबळे या ‘झी 24 तास’ डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
…Read More
Source link
by Hansraj Agrawal | Apr 4, 2026 | Trending News
Nashik Crime : सातपूरमधील एका व्यावसायिकाचा S** स्कँडल प्रकरणात धक्कादायक खुलासा झाले आहेत. नाशिकमध्ये खरात पार्ट 2 प्रकरण समोर आलंय. उद्योजक आणि NGO संस्था चालकाकडून 121 महिलांचं लैंगिक शोषण झाल्याच उघड झालं आहे.
Source link