by Hansraj Agrawal | Sep 20, 2024 | Trending News
अर्न्सट अँण्ड यंग (ईवाय) कंपनीचे अध्यक्ष राजीव मेमानी यांनी अतिताणामुळे मृत्यू झालेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी कंपनीतील कोणीही उपस्थित न राहिल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. आमच्या संस्कृतीत ही फार दुर्लक्षित बाब असल्याचं ते म्हणाले आहेत. 26 वर्षीय अॅना सॅबेस्टियनचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा तिच्या आईने केला आहे. अॅना सॅबेस्टियन कंपनीत चार महिन्यांपूर्वीच सीए म्हणून कामाला लागली होती. कंपनीत रुजू झाल्यानंतर चार महिन्यातच तिचा मृत्यू झाला.
तरुणीच्या मृत्यूनंतर राजीव मेमानी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राजीव मेमानी यांनी LinkedIn वर पोस्ट शेअर केली असून अॅना सॅबेस्टियनच्या मृत्यूमुळे आपण फार दु:खी असल्याचं म्हटलं आहे.
“मी त्यांच्या कुटुंबाप्रती मनापासून शोक व्यक्त केला आहे. मला कल्पना आहे की, कोणतीही गोष्ट त्यांच्या जीवनातील पोकळी भरून काढू शकत नाही. तिच्या अंत्यसंस्काराला आम्ही उपस्थित राहू शकलो नाही याबद्दल मला मनापासून खेद वाटतो. हे आपल्या संस्कृतीसाठी पूर्णपणे परके आहे. असे यापूर्वी कधीही घडले नाही; पुन्हा कधीही होणार नाही,” असं राजीव मेमानी म्हणाले आहेत.
राजीव मेमानी यांनी यावेळी आपण कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात मैत्रीपूर्ण, चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि ध्येय पूर्ण होईपर्यंत आराम करणार नाही असंही म्हटलं आहे. “आमच्यासाठी कामाच्या ठिकाणी सर्वोत्तम, निरोगी जागा निर्माण करणं नेहमीच प्राधान्य राहिलं आहे. आमच्या कर्मचाऱ्यांच्या हिताला आम्ही नेहमीच प्राधान्य देतो. मी हे सांगू इच्छितो की आमच्या लोकांचे कल्याण हे माझे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि मी वैयक्तिकरित्या हे उद्दिष्ट पूर्ण करेन,” असं ते म्हणाले आहेत.
अॅना सॅबेस्टियन मार्च महिन्यात कंपनीत रुजू झाली होती. 20 जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. तिची आई अनिता यांनी कंपनीला जाहीर पत्र लिहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. कामाच्या अतिताणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा तिच्या आईने केला आहे. तसंच त्यांनी दावा केला की कंपनीतील कोणीही तिच्या मुलीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित नव्हते. “तिच्या अंत्यसंस्कारानंतर, मी तिच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला, परंतु मला कोणतेही उत्तर मिळाले नाही. मूल्ये आणि मानवी हक्कांची भाषा करणारी कंपनी त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्यातील एका कर्मचाऱ्याच्या अंतिम क्षणी गैरहजर कसे राहू शकतात?”, असं त्यांनी पत्रात लिहिलं आहे.
दरम्यान हा मुद्दा समोर येताच केंद्राने अॅनाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या परिस्थितीची चौकशी सुरू केली. गुरुवारी, कामगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले की, असुरक्षित आणि शोषणकारक कामाच्या वातावरणाच्या आरोपांची सखोल चौकशी सुरू आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 19, 2024 | Trending News
काँग्रेसनं मविआतून मुख्यमंत्री पदावर दावा ठोकल्यानं महाविकास आघाडीत बिघाड होण्याची शक्यता आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 19, 2024 | Trending News
Pune Crime News Today: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या प्रियकराची हत्या करण्यासाठी एक सरकारी शिक्षक बिहारमधून पुण्यात आला अन्…
Source link
by Hansraj Agrawal | Sep 18, 2024 | Trending News
Raj Thackeray on One Nation One Election: ‘वन नेशन-वन इलेक्शन’ प्रस्तावाला मोदी मंत्रीमंडळाने (Modi Cabinet) मंजुरी दिली आहे. यानंतर आता यावरुन प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनीही मत मांडलं असून निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या असं सुनावलं आहे. राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का ? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.
राज ठाकरेंनी काय म्हटलं आहे?
“एक देश एक निवडणूक’ संकल्पनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी,” असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
“बरं जर एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का ? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? किंवा समजा काही कारणांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कुठलाच खुलासा झालेला नाही. तो कदाचित होईल,” अशी अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
यावेळी त्यांनी आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या असंही सुनावलं. ते म्हणाले की, “पण ‘एक देश एक निवडणूक’ हे सर्व ठीक आहे, आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या. येत्या ऑक्टोबर 2024 मध्ये कित्येक महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये प्रशासक येऊन 4 वर्ष होतील. इतका काळ नगरसेवक नाहीत म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीत. ते जास्त महत्वाचं नाही का? स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सामान्य माणसांच्या जगण्याशी, त्यांच्या प्रश्नांशी असतो. त्याच्याच निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे? निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या”.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 17, 2024 | Trending News
गणेश विसर्जनादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 17, 2024 | Trending News
Maharashtra Richest Village : महाराष्ट्रात अनेक गावखेडी असून, काही गावं ही त्यांच्या वेगळेपणामुळं चर्चेचा विषय ठरतात. ही गावं अशी आहेत जी त्यांचं वेगळेपण जपत प्रगतीच्या वाटेवर अविरतपणे चालत आहेत. असंच एक कमाल गाव अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे या गावात आरोग्य आणि धनधान्याची भरभराट… पण काही वर्षांपूर्वी मात्र हे चित्र असं नव्हतं. सध्या जिथं या गावात हिरवळ पाहायला मिळते तिथं की एकेकाळी रखरखाट होता.
महाराष्ट्रात इतर गावांसाठी आदर्श ठरणारं आणि जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवलेलं हे गाव म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार. या गावातील नागरिकांनी खऱ्या अर्थानं त्यांचं नशीब पालटलं असं म्हणायला हरकत नाही. 1990 च्या सुमारास इथं जवळपास 90 टक्के कुटुंबांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. पिण्याच्या पाण्याचीही या गावात सोय नसताना गावकऱ्यांनी केलेला संघर्ष आणि त्यांच्या प्रयत्नांना मिळालेलं यशच या गावाच्या यशाचं गमक ठरलं.
काही दशकांपूर्वी या गावात…
कैक दशकांपूर्वी हिवरे बाजार हे गाव एक आनंदी गाव होतं, अगदी इतर गावं असतात तसं. 1970 हे दशक असं जेव्हा गावाची ख्याती हिंद केसरींचा गाव अशीही होती. पण, परिस्थिती बिघडली आणि 80-90 च्या दशकात या गावानं दुष्काळाचा सामना केला. पिण्यासाठीही पाणी उरलं नाही, नाईलाजानं अनेकांनी गाव सोडलं. वास्तविक गावात 93 विहीरी असूनही पाणीटंचाईचं संकट भीषण होतं. पुढे सुरु झाला जगण्याचा संघर्ष…
1990 मध्ये गावात जॉईंट फॉरेस्ट कमिटी तयार करण्यात आली आणि याअंतर्गत विहिरी खोदण्यापासून वृक्षलागवडीसाठीची श्रमदानाची कामं सुरु करण्यात आली. 1994-95 मध्ये आदर्श ग्राम योजना आली आणि याअंतर्गत गाव वेगानं प्रगती करू लागलं. ज्या पिकांसाठी जास्त पाण्याची खपत होते अशा पिकांवर या समितीनं बंदी आणली. पाहता पाहता गावाती विहिरींची संथ्या 340 वर पोहोचली आणि जलस्तरातही वाढ झाली.
हिवरे बाजार हे राज्यातील सर्वात श्रीमंत गाव असण्याचं कारण म्हणजे इथं 80 हून अधिक कुटुंब कोट्यधीश असून, 50 हून अधिक अशी कुटुंब आहेत त्यांचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये आहे. या गावामध्ये दारिद्य्र रेषेसाठीचे वेगळे मापदंड आहेत. ज्यानुसार जी कुटुंब एका वर्षात 10 हजार रुपये खर्च करण्यात असमर्थ असतात त्यांची गणना या गटात होते.
हिवरे बाजारच्या यशाचं गुपित सांगावं तर, इथं काही सूत्र आत्मसाद केली जाता असं सरपंचांचं म्हणणं.
ही सूत्र खालीलप्रमाणं….
- वृक्षतोड न करणं
- कुटुंब नियोजन
- नशाबंदी
- श्रमदान
- हगणदारी मुक्त गाव
- भूजल पातळी नियोजन
आहे की नाही कमाल या गावाची? मग इथं तुम्ही कधी भेट देताय?
Source link