by Hansraj Agrawal | Sep 16, 2024 | Trending News
Ganesh Visarjan 2024 : दहा दिवसांच्या सेवेनंतर बाप्पाच्या निरोपाची वेळ जवळ आली आहे. अनंत चतुर्थीला दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने मुंबई, पुण्यात तगडा पोलिस बंदोबस्त पहायला मिळत आहे. गणेश विसर्जनसाठी प्रशासनाने देखील चोख तयारी केली आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक विभागात कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत.
गणेश विसर्जनसाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झालीय. शांततेत विसर्जन होण्यासाठी जवळपास 12 हजार अधिकारी-कर्मचारी सज्ज झालेत. गणरायाचं विसर्जन सुलभ आणि शांततेत व्हावे यासाठी प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आलीय. नियंत्रण कक्ष, नैसर्गिक आणि 204 कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेत.
पुण्यात 12, 500 पोलिस तैनात
पुण्यात गणेश विसर्जन सोहळ्यासाठी साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणारेय. विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरही असणार आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गांवरून गणेश विसर्जन मिरवणूक जाणारेय…मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीची मिरवणूक उद्या दुपारी 4 वाजता निघणार आहे. उमांगमलज रथामधून गणरायाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. यासाठी जटोली शिवमंदिराची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. तसंच या रथाला आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. या रथाच्या माथ्यावर जटा सोडलेली शंकराची मूर्ती असणार आहे. त्याच्या बाजूला त्रिशूळ आणि डमरुही असेल. तर कळस म्हणून मोठा रुद्राक्ष दाखवण्यात आला आहे. नागाच्या फण्यावर तो तोललेला असून, बाजूला 21 छोटे कळस लावण्यात आलेत. तर रथावर 23 नंदींचे चेहरे बसवले आहेत. तसंच रथावर तब्बल 18 क्रिस्टलचे झुंबर लावण्यात येतील. दगडूशेठ गणेशोत्सवाचं यंदा 132वं वर्ष आहे.
नाशिकमध्ये लेजर लाईट आणि डीजेला बंदी
नाशिकमध्ये गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त मिरवणूक मार्गावर बघायला मिळणारे.. मिरवणूकमध्ये लेजर लाईट देखील न लावण्याच्या सूचना गणेश मंडळांना सूचना देण्यात आल्या आहे.. गणपती विसर्जन मिरवणुकीत कर्कश डीजे लावल्यास आणि लेझर लाईट वापरल्यास कडक कारवाईचा इशारा अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. या नियमांचं उल्लंघन केलं तर कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 16, 2024 | Trending News
पुढील
बातमी
मुस्लिमांची नोंदणी नवीन मतदार यादीमध्ये नको, शिंगणापूर ग्रामपंचायतीचा तुघलकी ठराव
Source link
by Hansraj Agrawal | Sep 15, 2024 | Trending News
कोल्हापुरमध्ये भीषण अपघात झाला आहे. एका कंटेनरने 7 वाहनांना धडक दिली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 15, 2024 | Trending News
Sanjay Raut: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी एका ज्येष्ठ विरोधी पक्षनेत्याने संपर्क करुन मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती. तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही पाठिंबा देऊ, असं मला विचारण्यात आलं होतं, असा दावा नितीन गडकरी यांनी केला होता. नितीन गडकरींच्या या दाव्यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे सर्व मान्य असे नेते आहेत. त्यांना पंतप्रधान पदासाठी तडजोड करा, असं कोणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही. मुळात या देशात ज्या पद्धतीची हुकूमशाही एखाधिकारशाही सुरू आहे. ज्या पद्धतीने आणीबाणी लावण्याचा प्रयत्न सुरू केला. दहा वर्षापासून सुरू आहे. त्याच्याशी तडजोड करू नका त्या प्रवृत्तीची तडजोड करू नका ही भूमिका त्यांच्याकडे कोणी जर मांडली असेल तर विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याने त्यात चुकीचं केलं असं आहे मला वाटत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
आज जे सरकारमध्ये बसून सध्याच्या या देशातल्या मूल्यांशी तडजोड करत आहेत. लोकशाही असेल स्वातंत्र्य असेल न्यायपालिका असेल तो एक राष्ट्रीय अपराध आहे असे मी मानतो आणि नितीन गडकरी या सगळ्याच्या विरुद्ध सातत्याने बोलत राहिले आवाज उठवत राहिले आपल्या भूमिका मांडत राहिले म्हणून जर त्यांना कोणी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याने ज्या नेत्याला ते फार मानतात त्यांनी जर हा त्यांना सल्ला दिला असेल त्याच्यामध्ये फार पिडा होण्याचं कोणाला कारण नाही, असंही राऊतांनी म्हटलं आहे.
जगजीवन राम यांनी 1977 साली काँग्रेस पक्षातून याच मूल्यांसाठी बंड केलं होतं आणि इंदिरा गांधीचा पराभव झाला होता. जर देशात स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवायची असेल न्यायपालिकेचे स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर काही जणांना सत्तेतल्यांचा त्याग करावा लागतो तो त्याग केला म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळाले, असंही राऊतांनी म्हटलं आहे.
नितीन गडकरी काय म्हणाले?
मी कोणाचंही नाव घेणार नाही. मात्र मला एका त्या व्यक्तीने विचारलं होतं. तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही पाठिंबा देऊ. मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पाठिंबा का द्याल? तसंच मी तुमचा पाठिंबा का घेऊ? पंतप्रधान होणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही. मी माझी मूल्यं, विचार आणि माझी संघटना यांच्याशी प्रामाणिक आहे. मी कुठल्याही पदासाठी तडजोड करत नाही. मला माझ्या मूल्यांवर विश्वास आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं. नागपूरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 14, 2024 | Trending News
मराठा आंदोलक मनोज जरांगे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवसापासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहेत. अशातच मंत्री छगन भुजबळ यांनी कोणता खळबळजनक दावा केलाय.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 14, 2024 | Trending News
Chhatrapati Sambhaji Nagar Accident: पुण्यावरुन परत येत असताना या कुटुंबाच्या कारला समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओ कारने जोरदार धडक दिल्याने या कारमधील प्रवाशांचा मृत्यू झाला.
Source link