Nagpur Hit & Run: 'कायदा फडणवीसांच्या कोठ्यावर नाचतोय'; 'दोघे मृत्यूशी झुंज असताना…'

Nagpur Hit & Run: 'कायदा फडणवीसांच्या कोठ्यावर नाचतोय'; 'दोघे मृत्यूशी झुंज असताना…'


Nagpur Hit And Run Case: नागपूरच्या सीताबर्डी परिसरात रविवारी मध्यरात्री झालेल्या भरधाव ऑडी कारच्या अपघातावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. ऑडी कारनं (Audi Car) दोन कार आणि एका बाईकला उडवलं. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर गदारोळ झाला आणि पोलिसांनी या प्रकरणी अर्जुन हावरे चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या रोहित चिंतमवार यांच्याविरोधात रॅश ड्रायव्हिंगच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही गाडी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत यांच्या नावावर नोंदणी केलेली आहे. त्यामुळेच या प्रकरणावरुन आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सर्व सामान्यांना एक कायदा आणि बड्या बापाच्या मुलांना एक कायदा असं आहे का? असा प्रश्न विचारला आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राऊत यांनी निशाणा साधला आहे. 

 

चालकाची आदलाबदली का केली?

“बावनकुळेंचा मुलगा असो किंवा इतर कोणत्याही नेत्याचा मुलगा असो, या राज्यामध्ये दोन कायदे आहेत का? महाराष्ट्रात हिट अँड रनची प्रकरणं एवढी वाढली आहेत की मोठ्या बापाची पोरं मद्यपान करुन रस्त्यावर कोणालाही चिरडतात, उडवतात, जखमी करतात. मोठ्या बापाच्या पोरांची नावही एफआयआरमध्ये नसतात. फडणवीस गृहमंत्री आहेत आणि राज्यात एकच कायदा आहे तर त्यांनी सांगितलं पाहिजे की नागपूरमध्ये हिट अँड रनचं जे प्रकरण घडलं त्यामधील कार कोणाची आहे? गाडी कोण चालवत होतं? चालकाची आदलाबदली का केली? हे सर्व रेकॉर्डवर आहे. आरटीओ अधिकाऱ्याने नंबरप्लेट का बदलली?” असा प्रश्न राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना विचारला.

दोघे मृत्यूशी झुंज देत आहेत साधं एफआयआरमध्ये नाव नाही?

“बावनकुळेंचा त्यांच्या कुटुंबाचा या अपघाताशी काही संबंध नाही तर ही चोरी कशासाठी? ही चोरी केली कारण जो शहजादा गाडी चालवत होता तो नशेत धुंद होता. त्याला वाचवण्यात आलं आहे. हे सारं प्रकरण समोर आल्यानंतर कायदा सुव्यवस्था किती उद्धवस्त झाली आहे हे दिसतं. फडणवीस ज्या शहरातून येतात त्या शहराची अवस्था बघा. इतर कोणत्या पक्षातील नेत्याचा हा मुलगा असता तर आतापर्यंत फडणवीसांची फौज आमच्यावर किती हल्ले केले असते. मात्र आज तुमच्या प्रदेशाध्यक्षांचा मुलगा आहे. नशेत धुंद होता, असं रेकॉर्डवर आहे. तो गाडी चालवत होता. दोघे मृत्यूशी झुंज देत असताना साधं एफआयआरमध्ये नावही नाही,” असं म्हणत राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

कायदा फडणवीसांच्या कोठ्यावर नाचतोय

“गाडी बावनकुळेंच्या मुलाची आहे. तो गाडी चलवत होता. सर्व पुरावे नष्ट केलं. असं करत असाल तर कायद्याचं नाव घेऊन विरोधकांना त्रास देण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? नाहीये. फडणवीस तुम्ही त्या पदावर बसण्यास लायक नाहीत. निष्पक्ष चौकशी हे काय करणार? जोपर्यंत फडणवीस या पदावर आहेत तोपर्यंत कोणत्याही प्रकरणाची निष्पक्ष तपासणी होणार नाही. जोपर्यंत रश्मी शुक्ला डीजी आहेत तो निष्पक्ष तपासणी होणार नाही. कायदा फडणवीसांच्या कोठ्यावर नाचतोय. कायद्याला नाचवलं जात आहे. विकत घेतलं जात आहे. लोकांना चिरडून मारलं जात आहे. साधं एफआयआरमध्ये नावही नाही, लाहोरी रेस्तराँ बार आहे तेथील सीसीटीव्ही फुटेज काढा. कोण दारु पीत होतं. कोण दारुच्या नशेत गाडी चालवत होतं एकदा तपासून पाहा. त्याची सीसीटीव्ही फुटेज सापडणार नाहीत,” असं राऊत म्हणाले. 

फडणवीस लायक नाहीत

“विषय चंद्रशेखर बावनकुळेंचा नाही. हा विषय या राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा कचरा झाल्याचा आहे. मोदी कायदा सगळ्यांसाठी सारखा असं म्हणत समान नागरी कायदा असं म्हणतात ना? गाडी कोण चालवत होतं? अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसवलं आणि त्याचं नाव घेतलं. हा या राज्यातला कायदा आहे? मी सर्वांशी समान न्यायाने वागेन म्हणून आपण संविधानाची शपथ घेतली आहे. सर्वासामान्यांना एक न्याय आणि तुमच्या पक्षातील नेत्यांना त्यांच्या मुलाबाळांना एक न्याय. आमच्यावर गुन्हे दाखल करणार, अटक करणार आणि तुम्ही लोकांना चिरडून मोकाट फिरणार? फडणवीसांसारखी व्यक्ती या राज्याच्या गृहमंत्रीपदाला लायक नाही,” अशी टीका राऊत यांनी केली.

घडलं काय?

पोलिसांच्या माहितीनुसार, संकेतने कार चालक अर्जुन हावरे (24) आणि रोनित चिंतमवार (27) यांना चालवायला दिली होती. याच कारने रविवारी मध्यरात्री 5 वाहनांना धडक दिली. अपघातग्रस्त जितेंद्र सोनटक्के (40) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी चालक हावरे आणि चिंतमवार यांना अटक केली. पोलिसांनी kकार जप्त करून पोलीस ठाण्यात आणली. त्यावेळी तिची ‘नंबर प्लेट’ काढण्यात आल्याचे उघड झाले. कार कुणाच्या नावावर आहे, याची माहिती वाहतूक कार्यालयाकडून मागविल्याचे पोलीस अधिकारी चंद्रशेखर चकाटे यांनी सांगितले होते. संविधान चौकापासून ते सेंट्रल बाजार रोडवरील सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आल्याची चर्चा शहरामध्ये आहे.





Source link

Apple’s ‘Glowtime’ event to unveil four new versions of iPhone 16

Apple’s ‘Glowtime’ event to unveil four new versions of iPhone 16


Apple is set to launch a slate of new products at its flagship “Glowtime” Event 2024. The event which will be taking place on September 9, 10:30 PM IST will showcase the much anticipated iPhone 16 series, with four new additions to the smartphone family: iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro, and iPhone 16 Pro Max. 

Reports suggest that customers can expect a new capture button, faster chips, vertical camera lenses for standard models and many more goodies. New AI features are expected as well.

The new smartphone might come in seven colors: blue, pink, yellow, green, black, white, and purple. Furthermore, the 5G connectivity is likely to become faster and more efficient, as the iPhone 16 series is expected to be equipped with Qualcomm Inc.’s Snapdragon X75 modem. Lastly, the latest models’ batteries are anticipated to use stacked battery technology, which will provide them with a longer lifespan and better capacity. The launch date for the iPhone 16 series is said to be September 20.

Prices for the smartphone

Prices for the smartphone series have been leaked online. The Apple iPhone 16 is tipped to start at $799 (around ₹67,100), while the iPhone 16 Plus could cost $899 (approximately ₹75,500). For the Pro models, the Apple iPhone 16 Pro might be priced at $1,099 (around ₹92,300) for the 256GB variant and the iPhone 16 Pro Max could start at $1,199 (around ₹1,00,700). 

These prices are for the US market, but Indian buyers should brace for higher costs due to import duties and additional expenses.

Among other gadgets to be featured during the event will likely be the Apple Watch Series 10 or Apple Watch X, marking the product’s 10th anniversary since it was first unveiled. 

Finally, AirPods 4 and AirPods Max are also likely to be in the line-up of this event.

Ahead of Apple’s biggest event for the year, reports further note that Apple will be ramping up its production capacity in India. iPhone 16 and all its versions will likely begin production in India soon after its launch. 





Source link

नाशिक बाजार समिती लिलावात गावठी कोथिंबीरने मोडले सर्व रेकॉर्ड; जुडीची किंमत ऐकून व्हाल हैराण!


Nashik Gavathi Kothimbir Price: गेल्यावर्षी टोमॅटोने रडवल्यानंतर आता कोथिंबीरने सर्वसामान्यांचा खिसा रिकामी करायला सुरुवात केली आहे. कोथिंबीरचे दर दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत. रोजच्या जेवणातील महत्वाचा भाग असलेली कोथिंबीर आता गृहिणींना परवडेनाशी झाली आहे. पालेभाज्याशी उत्पादन कमी होत असल्याने आवक घटली आहे. नाशिक बाजार समितीत 8 सप्टेंबर रोजी लिलाव पार पडला. काल पार पडलेल्या या लिलावात गावठी कोथिंबीरला किमान सहा हजार पाचशे रुपये तर सर्वाधिक चाळीस हजार रुपये प्रति शेकडा भाव मिळालाय.

स्थानिक विक्रीसाठी खरेदी

नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीत सद्यःस्थितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर आदी भागांतून. पालेभाज्या आणि फळभाज्या येत आहेत. बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल हा मुंबई, गुजरात अहमदाबाद कडे पाठविला जातो. आणि काही प्रमाणात हा स्थानिक विक्री साठी व्यापारी खरेदी करत असतात.

जुडीचे दर 

पालेभाज्या आवक सद्यःस्थितीत घटली आहे. यामुळे बाजारभाव वधारले आहेत . बाजार समितीत रविवार रोजी झालेल्या लिलावात सायंकाळी गावठी कोथिंबीर किमान ,65रुपये जुडी ते सर्वाधिक 400 रुपये जूडी,चायंना कोथिंबीर किमान 40 तर सर्वाधिक 280 रुपये जूडी, मेथी किमान 50 तर सर्वाधिक 130 रुपये जूडी, शेपू किमान  22 तर सर्वाधिक 57 रुपये जूडी, कांदापात किमान  15 तर सर्वाधिक 42 रुपये जूडीला भाव मिळाला आहे. 

गृहीणींचं बजेट कोलमडलं

तेच किरकोळ बाजारात कोथिंबीर,मेथी,शेपू, कांदापात यांची झूडी छोटी करून डबल बाजार भावाने विक्री होत आहेत.भाजीपाल्याचे भाव प्रचंड वाढल्याने मात्र गृहिणीच्या घरातील किचनचे बजेट कोलमडले आहे.





Source link

बारामतीला मी सोडून दुसरा आमदार मिळाला पाहिजे; अजित पवार असं का म्हणाले?



Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकाची सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय . सर्वच पक्ष मतदारांसोबत संवाद साधत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना निवडणुकीबाबत एक सूचक विधान केलंय. 



Source link

माझं डोकं फिरवू नका; आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात खडाजंगी

माझं डोकं फिरवू नका; आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात खडाजंगी



विजयाचे अनेक जण वाटेकरी असतात. मात्र पराभवाला कोणी वाली नसतो, असं म्हणतात.सातत्यानं महायुतीत हाच प्रत्यय येतोय… लोकसभेतील पराभवामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला वेळोवेळी टार्गेट करण्यात आलं.. आता शिंदेंच्या मंत्र्यांकडून अर्थ खात्याला टार्गेट करत अजितदादांवर निशाणा साधलाय..



Source link

₹500 काढल्यावर ₹1100 अन् ₹1000 ऐवजी ₹1600 देणारं ATM; नागपूरकरांची तुफान गर्दी! बँकेला कळेपर्यंत..

₹500 काढल्यावर ₹1100 अन् ₹1000 ऐवजी ₹1600 देणारं ATM; नागपूरकरांची तुफान गर्दी! बँकेला कळेपर्यंत..



Nagpur Bank ATM 600 Rs Extra Cash: अशाप्रकारे अतिरिक्त पैसे निघत असल्याची बँकेला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथक या एटीएममध्ये पाठवलं मात्र तोपर्यंत या बँकेला लाखो रुपयांचा आर्थिक तोटा झाल्याचं समोर आलं. नक्की घडलं काय जाणून घ्या…



Source link

YouTube
Instagram
WhatsApp