महाराष्ट्रात मोठा पक्षप्रवेश! तब्बल 1111 कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्रात मोठा पक्षप्रवेश! तब्बल 1111 कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश



आम्ही टीम म्हणून काम करतोय, मी कॉमन मॅन म्हणून काम करतोय, हे सर्व सामान्यांचे सरकार आहे सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करणाऱ्या सरकार आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे महायुती प्रचंड मताधिक्क्याने विजयी होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. 



Source link

रतन टाटांचा बेस्ट फ्रेंड शांतनू नायडूचं अस्खलित मराठी ऐकलंत का?

रतन टाटांचा बेस्ट फ्रेंड शांतनू नायडूचं अस्खलित मराठी ऐकलंत का?


Ratan Tata and Shantanu Naidu: भारतातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली होती. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे टाटांबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका नावाची चर्चा होत आहे ती म्हणजे टाटांचा बेस्ट फ्रेंड शांतून नायडूची. टाटांच्या निधनानंतर शांतनूने एक भावून पोस्टदेखील केली होती. पण तुम्हाला माहितीये का शांतून नायडू हा अस्खलित मराठी बोलतो. 

कोण आहे शांतनू नायडू?

शांतनू नायडू हा टाटांच्या जवळच्या व्यक्तीपैकी एक होता. रतन टाटांपेक्षा 55 वर्षांनी लहान असलेला शांतनू त्यांचा मित्र व सहकारी म्हणून त्याने काम केले आहे. दोघांची ओळख 2014 साली झाली होती. गेल्या दहा वर्षांपासून शांतनू आणि रतन टाटा यांची मैत्री होती. शांतून हा टाटा कंपनीत काम तर करतोच. त्याचे स्वतःचे दोन स्टार्टअपदेखील आहेत. तसंच, तो लेखकदेखील आहे. त्याने  I Came Upon A Lighthouse हे पुस्तक लिहले आहे. त्याने यात टाटांच्या मैत्रीबद्दल लिहलं आहे. 

तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण शांतनू हा पुणेकर आहे. शांतनूचा जन्म 1993 मध्ये पुण्यातील तेलुगू कुटुंबात झाला आहे. तर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी आणि कॉर्नेल जॉन्सन ग्रॅज्युएट स्कुल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केलं आहे. 

गुडफेलोचा संस्थापक

शांतनू हा गुडफेलो नावाच्या स्टार्टअपचा संस्थापक आहे. गुडफेलो हा एक स्टार्टअप असून या माध्यमातून वृद्धांना युवकांसोबत जोडण्यात येते. या अॅपचा मुख्य उद्देश हा आहे की, वृद्ध नागरिकांना त्यांच्या रोजच्या कामात मदत व्हावी. जसं की, किराणा सामान खरेदी करणे, औषधांची व्यवस्था करणे, डॉक्टरांकडे नेणे याप्रकारेच वृद्धांची मदत करणे. 

गुडफेलोचे इन्स्टाग्रामवर अकाउंट आहे. या व्हिडिओवरुन अनेकदा शांतनू त्यांच्या स्टार्टअपविषयी माहिती देत असतो. तो बऱ्याचदा मराठीतूनही बोलताना दिसत आहे. अलीकडेच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रतन टाटा यांच्या अत्यंसंस्कारादरम्यानचा हा व्हिडिओ असून शांतून पोलिसांसोबत मराठीत संवाद साधताना दिसत आहे.

रतन टाटांच्या निधनानंतर शांतनूची पोस्ट

अखेर मला आता थोडासा शांत वेळ मिळाला आहे. मी आता त्यांना हसताना पाहू शकत नाही किंवा मी त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकत नाही, ही गोष्ट मी स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहेत, असं शांतनूने म्हटलं आहे. 





Source link

भाजपकडून फडणवीसांना बहुजनांचा नेता म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न; जाहिरातबाजीनं प्रतिमा उजळणार का?

भाजपकडून फडणवीसांना बहुजनांचा नेता म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न; जाहिरातबाजीनं प्रतिमा उजळणार का?



Maharashtra Politics :  विधानसभा निवडणुकीत भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातच निवडणुकीला सामोरं जाणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून  मनोज जरांगे फडणवीसांना टार्गेट करत असताना भाजपकडून फडणवीसांना बहुजनांचा नेता म्हणून प्रोजेक्ट करण्यात येतेय. 
 



Source link

दसरा होताच सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे 24 कॅरेटचे भाव

दसरा होताच सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे 24 कॅरेटचे भाव


Gold Price Today: सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होताना दिसत आहे. पितृपक्षात सोन्याने उच्चांक दर गाठला होता. तर, नवरात्रीत सातत्याने दरात चढ-उतार होत होते. आज सोन्याच्या दरात मात्र घट झाली आहे. दिवाळीच्या आधीच सोन्याच्या दरात घट झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाहूयात आज किती आहेत सोन्याचे दर 

आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. ही घट किंचितशी असली तरी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 50 रुपयांची घट झाली आहे. तर, प्रतितोळा सोनं 77,620 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 50 रुपयांनी कमी होऊन 71,150 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, 18 कॅरेट सोन्याचे दर 40 रुपयांनी कमी झाले असून प्रतितोळा 58220 रुपयांवर स्थिरावले आहेत. 

दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात होणार आहे. त्यामुळं नोव्हेंबरमध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मागणी अधिक वाढते. त्यामुळं येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, आता किंमती कमी होऊ लागल्याने सोनं खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  71,150 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  77,620 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  58,220 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,115 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 762  रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 822 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   56,920 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   62,096 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    58,220 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 71,150 रुपये
24 कॅरेट- 77,620 रुपये
18 कॅरेट- 58,220 रुपये





Source link

बाबा सिद्धीकींच्या हत्येनंतर KRK ची जीभ घसरली, युजर्सचा संताप!

बाबा सिद्धीकींच्या हत्येनंतर KRK ची जीभ घसरली, युजर्सचा संताप!



KRK on Baba Siddique: आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि पोस्टसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता केआरके याने बाबा सिद्धीकी यांच्यावर वादग्रस्त पोस्ट केली आहे.



Source link

कॅलिफॉर्नियाच्या धर्तीवर कोकणात होतोय कोस्टल रोड; मुंबई-गोवा अंतर कमी होणार, 93 पर्यटन स्थळांना जोडणारा मार्ग

कॅलिफॉर्नियाच्या धर्तीवर कोकणात होतोय कोस्टल रोड; मुंबई-गोवा अंतर कमी होणार, 93 पर्यटन स्थळांना जोडणारा मार्ग


Revas Reddy Highway: मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी ठरणारा रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडीपर्यंतच्या सागरी महामार्गाचे भूमीपूजन आज करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रेवस (रायगड) ते रेडी (सिंधुदुर्ग) या सागरी महामार्गावरील सात खाडी पुलांच्या कामाचे भूमीपूजन करण्यात येत आहे. आज सकाळी 11 वाजता दुरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. रेवस ते रेडी या सागरी महामार्गाची एकूण लांबी 498 किमी इतकी आहे. पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा महामार्ग असणार आहे. 

रेवस ते रेडी हा महामार्ग कोकण किनारपट्टीवरील सर्व सागरी किनाऱ्यांना जोडतो. कॉलिफॉर्नियाच्या धर्तीवर या सागरी महामार्गाची रचना करण्यात येणार आहे. तसंच, या सागरी महामार्गावरील पुढील सात पुलांचे आज भूमीपूजन करण्यात येणार आहे. या सर्व 7 पुलांची लांबी 26.70 किमी असून एकूण प्रशासकीय मान्यता रु. 7851 कोटी इतकी आहे.

रेवस ते रेड्डी हा महामार्ग रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यातून जाणार आहे. तसंच, मुंबईकरांना थेट गोव्याला जाण्यासाठी या महामार्गाचा फायदा होणार आहे. समुद्र किनाऱ्यालगतची शहरे मुख्य रस्त्याशी सोडली जाणार असून मुंबई ते गोवा अंतरही कमी होणार आहे. तसंच, समुद्रा किनाऱ्याजवळून हा महामार्ग जाणार असल्यामुळं पर्यटनाला चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे कोकणातील 93 पर्यटकांना हा मार्ग जोडणार आहे. 

रेवस-रेडी सागरी किनारा प्रकल्प काम सुरू केल्यानंतर पाच वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. म्हणजेच 2030 पर्यंत प्रवाशांना सागरी किनारा मार्गावरुन प्रवास करता येणार आहे. 

सागरी किनारा मार्गावरील सात पूल

1) रेवस- कांरजा भागातील धरमतर खाडी वरील पुल 
एकूण लांबी : 10.20 किमी.
प्रशासकीय मान्यता : रु. 3057 कोटी
पुलाचा प्रकार : स्टिल ब्रिज (लोखंडी पुल)
कामाची मुदत : 3 वर्ष 

2)रेवदांडा- साळाव भागातील कुंडलिका खाडी वरील पुल:
एकूण लांबी : 3.82 कि मी 
प्रशासकीय मान्यता रक्कम : 1736 कोटी
पुलाचा प्रकार : केबल स्टे
कामाची मुदत : 3 वर्ष

3)दिघी आगरदांडा भागातील आगरदांडा खाडी वरील पुल:
एकूण लांबी : 4.31 किमी.
प्रशासकीय मान्यता रक्कम : 1315 कोटी.
पुलाचा प्रकार : केबल स्टे 
कामाची मुदत : 3 वर्ष

4)बागमांडला वेश्वी भागातील बाणकोट खाडीवरील पुल :
एकूण लांबी : 1.711 किमी.
प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 408 कोटी
पुलाचा प्रकार : केबल स्टे
कामाची मुदत : 3 वर्ष

5)केळशी भागातील केळशी खाडीवरील पुल :
एकूण लांबी : 670 मी.
प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 148 कोटी
पुलाचा प्रकार: बॉक्स गर्डर
कामाची मुदत : 3 वर्ष

6)जयगड खाडीवरील पुल:
एकूण लांबी : 4.40 किमी.
प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 930 कोटी
पुलाचा प्रकार : केबल स्टे
कामाची मुदत : 3 वर्ष 

7)कुणकेश्वर येथील पुलाचे बांधकाम 
एकूण लांबी : 1580 मी.
प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 257 कोटी
पुलाचा प्रकार :  केबल स्टे





Source link

YouTube
Instagram
WhatsApp