मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करण्याआधी 'ही' बातमी वाचा

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करण्याआधी 'ही' बातमी वाचा



गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. 
 



Source link

…तर गाठ माझ्याशी; पराभवाची नामुष्की विसरून सुजय विखे मैदानात उतरले आणि थेट इशाराच दिला

…तर गाठ माझ्याशी; पराभवाची नामुष्की विसरून सुजय विखे मैदानात उतरले आणि थेट इशाराच दिला



शिर्डी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना भाजपाचे नेते सुजय विखे पाटील यांनी  सूचक इशारा दिलाय. सुजय विखेंच्या या सूचक इशाऱ्यांचा रोख कुणाकडे? 



Source link

लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट; 31 ऑगस्टनंतर आता महिलांना…

लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट; 31 ऑगस्टनंतर आता महिलांना…


Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आधी या योजनेचा अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट होती शेवटची मुदत होती.  अधिकाधिक महिलांना लाभ घेता यावा यासाठी सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. लवकरच महाराष्ट्र सरकार यासंदर्भात निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. 

2.5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील 21 ते 35 वयोगटातील महिला आणि मुलीसाठी ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत त्यांना 1500 रुपये मासिक मदत मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्य आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक अकाऊंट डिटेल्स, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट, जन्म दाखला, मतदान कार्ड हे कागदपत्र आवश्यक आहेत. 14  ऑगस्टपासून या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.

काँग्रेसची कोर्टात धाव, सरकारचं उत्तर

 काँग्रेसने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या इतर योजनांविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. त्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. “ही योजना बंद पडावी यासाठी काहीजण जाणीवपूर्वक न्यायालयात जात आहेत. मात्र आम्ही आपली बाजू भक्कमपणे मांडू. या योजनेद्वारे माता भगिनी अर्थव्यवस्थेला चालना देत असून आम्ही या योजनेच्या लाभाची रक्कम पुढे वाढवत जाणार आहोत,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.  ही योजना बंद पडावी यासाठी काहीजण जाणीवपूर्वक न्यायालयात जात आहेत. मात्र आम्ही आपली बाजू भक्कमपणे मांडू. या योजनेद्वारे माता भगिनी अर्थव्यवस्थेला चालना देत असून आम्ही या योजनेच्या लाभाची रक्कम पुढे वाढवत जाणार आहोत, असे आवर्जून नमूद केले.

दरम्यान दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही असा निर्धार केला आहे.  “राजकारणात वेगवेगळे पक्ष असू शकतात. पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या योजना सगळ्या बंद करा काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टात गेले आहेत. त्यांनी याचिका दाखल केली आहे. हे अनिल वडपल्लीवार तेच आहेत जे नाना पटोले, विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रमुख होते. सुनील केदार यांचे राईड हँड म्हणून ओळखले जातात. आज त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून या योजनांवर फास पैसा खर्च होतो सांगत बंद करण्याची मागणी केली आहे. तुम्हीच सांगा या योजना बंद करायच्या का?,” अशी विचारणा देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित महिलांना केली. 

“राजकारणात वेगवेगळे पक्ष असू शकतात. पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या योजना सगळ्या बंद करा काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टात गेले आहेत. त्यांनी याचिका दाखल केली आहे. हे अनिल वडपल्लीवार तेच आहेत जे नाना पटोले, विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रमुख होते. सुनील केदार यांचे राईड हँड म्हणून ओळखले जातात. आज त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून या योजनांवर फास पैसा खर्च होतो सांगत बंद करण्याची मागणी केली आहे. तुम्हीच सांगा या योजना बंद करायच्या का?,” अशी विचारणा देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित महिलांना केली. 





Source link

पुण्यात गोळीबाराचा थरार! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर फायरिंग, नाना पेठ परिसरात खळबळ

पुण्यात गोळीबाराचा थरार! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर फायरिंग, नाना पेठ परिसरात खळबळ


पुढील
बातमी

‘महाराष्ट्रद्रोह्यांना कसं हद्दपार करायचं…’, रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला





Source link

तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर, कोल्हाटी समाजाच्या अमितची प्रेरणादायी कहाणी

तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर, कोल्हाटी समाजाच्या अमितची प्रेरणादायी कहाणी


IAS Amit Kale Success Story:   एमपीएससी, यूपीएससी उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत रुजू होणाऱ्यांच्या यशाच्या कहाण्या आपण वाचतो. या सर्वांनी अपार मेहनतीने हे यश मिळवलंय. त्यांतील अनेकांच्या वाट्याला तर कायमचा संघर्ष आलाय. पण संघर्षावर मात करत आपल्या शिक्षणाशी प्रामाणिक राहत त्यांनी हे यश मिळवलंय. अनेक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या यशाच्या कहाण्या आपण झी 24 तासच्या सक्सेस स्टोरीच्या सदरातून वाचत आलोय. त्यात आजची ही कहाणी खास आहे. ही कहाणी महाराष्ट्राच्या लेकाची आहे. ही कहाणी एका तमासगिरीणीच्या पुत्राची आहे. ही कहाणी म्हणजे लाखो लोककलांवतांची मान अभिमानाने उंचावणारी आहे. ही कहाणी अमित माने यांची आहे. 

अमित माने हे आयएएस अधिकारी आहेत. इथपर्यंत पोहोचण्यापर्यंतची त्यांची वाट खूप खडतर होती. लोककलाकाराच्या घरात त्यांचा जन्म झाला. बहुतांश लोककलाकारांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य नसतं. ना कधी सरकार दरबारी त्यांना मान सन्मान मिळत, ना कधी आपल्या कलेचा योग्य मोबादला मिळत. अशा परिस्थितीत ते आपली कला लोकांसमोर सादर करत असतात. लोककलेची पंरपरा पुढे नेत असतात. अशा परिवारात जन्म घेऊन आयएएस अधिकारी बनण्यापर्यंत मजल मारणं यामुळे अमित यांचं यश खास आहे. अमित यांनी घुंगरांचा आणि ढोलकीचा आवाज लहानपणापासूनच ऐकला.कोल्हाटी समाजात त्यांचा जन्म झाला.  तमाशाच या समाजाचे जग आहे, तमाशालाच हा समाज आपली पंढरी मानतो. आजुबाजूला शिक्षणासाठी पोषक वातावरण नसताना अमित माने यांनी यूपीएससी उत्तीर्ण केली. 

तमाशाच्या कमाईतून उदरनिर्वाह

राजश्री काळे या तमाशा कलावंतीण म्हणून आपली कला सादर करत. गावोगावी जाऊन कला सादर करत मिळालेल्या कमाईतून आपला उदरनिर्वाह त्या भागवत असत. त्या नगरच्या राहणाऱ्या आहेत. लोककलेवर त्यांचे अतिशय प्रेम. लोककला त्यांच्या अंगात अक्षरश: भिनली होती. लावणी कला जिवंत ठेवण्यासाठी त्या नगरमधल्या सुप्यात कालिका कला केंद्र चालवायच्या. व्यवसायानं तमाशा कलावंत असलेल्या राजश्री यांच्या पोटी अमोल यांचा जन्म झाला. तमाशा कलावंतीणीच्या पोटी जन्मलेला हा पोरगा भविष्यात आपल्या आईसह जिल्ह्याचं नाव रोशन करेल, असे फार कमी जणांनाच वाटले असेल. तमाशाच्या वातावरणात अमित काळेंचे शिक्षण पूर्ण झाले. तमाशाच्या सुपारीसाठी अमित यांच्या आईला गावोगावी फिरावं लागायचं. त्यात पोराबाळांची परवड होत असे. शिक्षणाचा तर मागमूसही नसायचा. कळत्या समजत्या वयाचा झाल्यावर आमितची ढोलकीशी सलगी नको, म्हणून राजश्री यांनी काळजावर दगड ठेवत पोटच्या मुलाला शिक्षणासाठी पुण्यात ठेवलं होतं.

कोल्हाटी समाजाचं नाव उंचावलं

अमितच्या शिक्षणाचा आणि हॉस्टेलचा खर्च सगळं राजश्री यांनी उचलला. लहानपणापासून मुलाला चांगले संस्कार दिला. तुला कलेक्टर व्हायचंय, हे ध्येय त्यांनी अमित यांच्या डोळ्यासमोर ठेवलं. अमित यांनादेखील परिस्थितीची जाणीव होती. त्यांनी यूपीएससी परीक्षेचा मन लावून अभ्यास केला. दिवस रात्र एक करुन मेहनत घेतली.कोल्हाटी समाज हा तसा कायमच शिक्षणापासून दूर राहिला आहे. त्यामुळे समाजाला त्यांच्या यशाचं खूप मोठं कौतुक आहे. आयएएस बनून कोल्हाटी समाजाचं नाव आणखी उंचावलं.   

माऊलीच्या कष्टाचं चीज

अमित काळे यांच्या आई राजश्री आजही नगर – पुणे रस्त्यावर कालिका कला केंद्र चालवतात. तिथे रोज संगीत बारी होते. लावणी-सम्राज्ञी म्हणून राजश्री यांना गौरवण्यात आलं. पण आज यूपीएससीतल्या यशस्वी वीर अमितची आई हा गौरव तिला जास्त मान मिळवून देतोय. या माऊलीनं याच दिवसासाठी  केला होता अट्टाहास…  तिच्या कष्टांची आज फुलं झाली आहेत.





Source link

संघाच्या मैदानात अजित पवार दक्ष! माजी प्रमुखांच्या समाधीस्थळावर न जाता थेट निघून गेले

संघाच्या मैदानात अजित पवार दक्ष! माजी प्रमुखांच्या समाधीस्थळावर न जाता थेट निघून गेले


पुढील
बातमी

बारामतीच्या राजकारणात लक्षवेधी घडामोड; जय पवार आणि युगेंद्र पवार कुस्तीच्या आखाड्यात





Source link

YouTube
Instagram
WhatsApp