… तर हरियाणाचा निकाल बदलता येऊ शकला असता; संजय राऊत काँग्रेसबद्दल स्पष्टच बोलले

… तर हरियाणाचा निकाल बदलता येऊ शकला असता; संजय राऊत काँग्रेसबद्दल स्पष्टच बोलले


Sanjay Raut On Congress: हरियाणात काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. हरियाणातील पराभवाचा महाराष्ट्रात फटका बसू शकतो का, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर बोट ठेवलं आहे. कोणी स्वतःला मोठा भाऊ छोटा भाऊ समजू नये. लोकसभेतील यश हे इंडिया आघाडीचे आहे. हरियाणाचा कोणताही परिणाम महाराष्ट्रात होणार आहे. तीन पक्षांची आघाडी आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

हरियाणाचा विजय फार मोठा महान व दैदिप्यमान नाही. आमच्या मतांमध्ये विभजन आहे. काँग्रेस पक्षाने या निकालाविरोधात काही तक्रारी केली आहेत. त्यावरही विचार व्हावा. लहान राज्य आहे जातीपातीची काही गणित असतात. काँग्रेसला 36 जागा मिळाल्या बहुमताला 45 जागा लागलात. 9 जागा कमी पडल्या. अर्थात आम्ही निराश झालेलो नाही. काँग्रेस पक्षाला देखील भूमिका घ्यावी लागेल. काँग्रेसला स्वबळावर लढायचे असेल तर त्यांनी तशी भूमिका घ्यायला हवी. मग इतर पक्षही त्यांच्या राज्यात त्या दृष्टीने भूमिका घेतील, असं राऊतांनी स्पष्ट केलं आहे. 

काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने याचा विचार करायला हवा. ज्या राज्यात काँग्रेसची बाजू कमजोर असते त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या स्थानिक पक्षाने एकत्र घेऊन निवडणुका लढवते. पण जिथे काँग्रेसची हवा आहे त्या ठिकाणी स्थानिक पक्षांना लांब ठेवते. त्यातूनच हरियाणासारखा निकाल येतो. हरियाणाचा निकाल बदलता येऊ शकला असता.  कांटे की टक्कर होऊ शकली असती काही पक्षांना त्या ठिकाणी महत्त्व देऊ शकले असते. त्या सर्वांनी चर्चा करून निवडणुकांना सामोरे गेले असते तर निकाल बदलू शकले असते, असं म्हणत राऊतांनी एकप्रकारे काँग्रेसचे कान टोचले आहेत.   

हरियाणाच्या निकालामुळं महाराष्ट्रात आमदार दुरुस्ती करता येईल. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसंदर्भात कुठलीही बार्गेनिंग पॉवर आम्ही करणार नाही. ठाकरे यांनी सांगितले ते शंभर टक्के सत्य आहे जम्मू कश्मीरमध्ये उमर अब्दुल्ला चेहरा होता त्यांनी त्यांना मतदान केलं. हरियाणा मध्ये देखील असा चेहरा समोर आला असता तर चित्र वेगळं असतं, असं राऊतांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्रात देखील तसंच आहे. आधी निवडणूका लढायच्या आणि नंतर नेता ठरवायचा हे लोकांच्या पचनी पडत नाही. या राज्याला चेहरा कोणता आहे हे स्पष्ट केले पाहिजे, असंही राऊत म्हणाले आहेत. 





Source link

पाच वर्षांच्या लेकराला जन्मदात्या बापाची थर्ड डिग्री, उलटं टांगून केली मारहाण, कारण काय तर…

पाच वर्षांच्या लेकराला जन्मदात्या बापाची थर्ड डिग्री, उलटं टांगून केली मारहाण, कारण काय तर…



Nashik Crime : नाशिकच्या चांदवड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  सातत्याने आजारी पडत असल्यानं एका व्यक्तीने आपल्या पाच वर्षांचा स्वतःच्या लेकराला उलटं टांगून मारहाण केलीय. या घटनेमुळे मोठा संताप व्यक्त केला जातोय. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अघोरी उपचार असल्याचा संशय व्यक्त केलाय. 



Source link

Maharashtra Weather News : विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट… राज्यातील 'या' भागांमध्ये क्षणात बदलणार हवामान

Maharashtra Weather News : विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट… राज्यातील 'या' भागांमध्ये क्षणात बदलणार हवामान


पुढील
बातमी

कोणाला लागणार म्हाडाची लॉटरी? कुठे पाहता येईल निकाल, नाव जाहीर झाल्यानंतर पुढे काय? जाणून घ्या





Source link

घर पेटत होतं आणि मदत करणारेच लुटत होते; चेंबुरच्या दुर्घटनेत माणुसकी आगीत जळून खाक

घर पेटत होतं आणि मदत करणारेच लुटत होते; चेंबुरच्या दुर्घटनेत माणुसकी आगीत जळून खाक



मुंबईच्या चेंबूरमध्ये झालेल्या अग्नि तांडवात मदतीसाठी घरात शिरलेल्यांनीच घर लुटले आहे. 
 



Source link

कोकणातील रत्नदुर्ग किल्ल्यावरची भगवती देवी… मंदिराजवळून अरबी समुद्रापर्यंत जाणारा तीन तोंडाचा छुपा भुयारी मार्ग

कोकणातील रत्नदुर्ग किल्ल्यावरची भगवती देवी… मंदिराजवळून अरबी समुद्रापर्यंत जाणारा तीन तोंडाचा छुपा भुयारी मार्ग


Ratnadurg Bhagwati Devi Mandir Ratnagiri : कोकणातील अथांग समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. याच कोकणात अनेक ऐतिहासिक पर्यटन स्थळ देखील आहेत. यापैकीच एक आहे तो रत्नागिरी शहराजवळ असलेला रत्नदुर्ग किल्ला. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात एक  छुपा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग थेट अरबी समुद्रात बाहेर पडतो. हा किल्ला पाहण्यासाठी नेहमीच येथे पर्यटकांची गर्दी असते. याच किल्ल्यावर भगवती देवीचे मंदिर आहे. हे मंदिर शिवकालीन आहे. 

कुठे आहे रत्नदुर्ग किल्ला

रत्नदुर्ग किल्ला हा रत्‍नागिरी शहरापासून अवघ्या दोन ते तीन किलो मीटर अंतरावर आहे. रत्नागिरी शहरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांना रत्‍नदुर्ग किल्ला हा  मुख्य आकर्षण असते. हा किल्ला तीन बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला आहे. या किल्ल्याच्या आग्रेय दिशेला जमीन आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे. या किल्ल्याचा आकार किल्ल्याचा आकार  घोडाच्या नालासारखा आहे. किल्ल्यावरुन दि्सणाऱ्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणाऱ्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे किल्ला नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतो.  120 एकर क्षेत्रफळावर पसरलेला हा किल्ला अतिशय सुदंर आहे.

काय आहे रत्नदुर्ग किल्ल्याचा इतिहास

बहामनी राजवटीत बांधला गेलेला हा किल्ला आदिलशहाने ताब्यात घेतला. यानंतर 1670 साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी  आदिलशहाच्या ताब्यातून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. संभाजी राजेंनी या किल्ल्यावर काही काळ वास्तव्य केले. त्यानंतरच्या काळात हा किल्ला करवीर छत्रपतींच्या ताब्यात गेला. त्यानंतर हा किल्ला आंग्रे कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.आंग्रे सोबतच्या युद्धात पेशव्यांनी हा किल्ला जिंकला पण शेवटी 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

अशी आहे किल्ल्याची रचना

किल्ल्याची लांबी अंदाजे 1300 मीटर आणि रुंदी 1000 मीटर आहे. किल्ल्याच्या दक्षिण-पूर्वेकडून पश्चिमेकडे मजबूत तटबंदी आहे. तटबंदीच्या मध्यभागी एक मुख्य प्रवेशद्वार आहे. एका बुरुजावर दीपगृह आहे. या बुरुजाला “सिद्ध बुरुज” असे म्हणतात. किल्ल्याच्या परिसरात अनेक झाडे आहेत. किल्ल्यावर भगवती देवीचे मंदिर देखील आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच असलेले भगवती देवीचे मंदिर हे शिवकालीन मंदिर आहे. बालेकिल्ल्याला 9 बुरुज आहेत. तर, संपूर्ण किल्ल्याला एकूण 29 बुरुज आहेत. किल्ला पेठ, बालेकिल्ला आणि दीपगृह अशा तीन भागांत विभागला आहे. किल्ल्याच्या तीनही बाजूंना समुद्र तर एका बाजूला दीपगृह आहे. 

गुहेसारखा भुयारी मार्ग

किल्ल्यावर तीन तोंडाचा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग पर्यटकांसाठी बंद आहे. हा भुयारी मार्ग समुद्रात बाहेर पडतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येतांना लागणाऱ्या तटबंदीवरून या भुयाराचा शेवट खाली समुद्रकिनाऱ्यावर ज्याठिकाणी होतो तेथे असलेले गुहेसारखे भुयार स्पष्ट दिसते. 

रत्नदुर्ग किल्ल्यावर कसे जायचे

जवळचे रेल्वे स्थानक रत्नागिरी आहे. रत्नागिरी शहरातून रिक्षा पकडून थेट किल्यापर्यंत जाता येते. किल्ल्याजवळ राहण्याची तसेच जेवणाची सोय नाही.





Source link

Chembur Fire: होरपळून 7 जणांनी प्राण गमावलेली आग 'त्या' दिव्यामुळं? प्रत्यक्षदर्शी म्हणाला, '5 वाजता…'

Chembur Fire: होरपळून 7 जणांनी प्राण गमावलेली आग 'त्या' दिव्यामुळं? प्रत्यक्षदर्शी म्हणाला, '5 वाजता…'


Chembur News Today: मुंबईतील चेंबूर येथे एका घराला आग लागून त्यात सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे चारच्या सुमारास घडली आहे. चेंबूरयेथील सिद्धार्थ नगर येथे ही घटना घडली आहे. गुप्ता कुटुंबीय झोपेत असतानाच ही आगीची घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणात आणखी एक अपडेट समोर येत आहे. चेंबूर येथील आग ही पेटता दिवा खाली पडल्याने लागल्याचं समोर येत आहे. 

चेंबूर येथील सिद्धार्थनगर परिसरात एक दुमजली घर असून या घरातील तळमजल्यावर आगीचा भडका उडाला. पहाटे सुमारे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास घरात दिवा ठेवला होता तो दिवा खाली पडला. पेटता दिवा खाली पडल्याने आगी पकडली गेली. पाहता पाहता आग पसरत गेली. सुरुवातीला घरातील सदस्य छेदाराम गुप्ता हे झोपेतून जागे झाले. त्यांनी आग लागल्याचे पाहताच आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आग जास्तच पसरत गेली होती. त्यांनी घरातील सर्व सदस्यांना उठवले. मात्र तोपर्यंत आगीने संपूर्ण मजला वेढला होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी असलेल्या छेदाराम गुप्ता यांनी दिली आहे. 

छेदाराम गुप्ता यांनी बाहेर येऊन लोकांची मदत मिळवण्याचा प्रय़त्न केला. स्थानिकांनी घरातून बाहेर येऊन अग्निशमन दलाला याची माहिती दिली. या आगीच्या विळख्यातून छेदाराम गुप्ता आणि परिवारातील एक सदस्य बचावला आहे. मात्र, कुटुंबातील इतर सदस्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यात तीन चिमुकल्यांचाही समावेश आहे. 

चेंबूर आगीत स्थानिक युवकांची मदत

चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी येथे एका घराला आग लागली यात सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. स्थानिक युवक आणि अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं. तसंच, स्थानिक युवकांनी वेळीच या ठिकाणी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळं आजूबाजूला असलेल्या इतर घरांनाही आग लागली नाही. तर स्थानिक युवकांनीच घरांमध्ये मृत पावलेल्या सदस्यांना अग्निशामक दलाच्या मदतीने बाहेर काढले. सकाळी ही आग लागली होती तेव्हा घरामध्ये एकूण नऊ सदस्य होते त्यातले दोन सदस्य खाली झोपले होते. ते बाहेर पडले परंतू इतर सदस्यांचा होरपळून मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जिथे आग लागली ते घर  ग्राउंड प्लस दोन मजले होते. या घरामध्ये गुप्ता परिवार राहत होता ग्राउंड फ्लोअरला दोन जण झोपलेले होते तर वरती पाच जण झोपले असल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशामक दलाला याची माहिती मिळतात अग्निशामकदल घटनास्थळी पोहोचल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला, परंतु आगअधिक भडकत गेली. खालच्या मजल्यावर किराणा दुकान असल्यामुळे त्यामध्ये काही ज्वलनशील सामान सुद्धा होतं. त्यामुळे ही आग भडकतच गेली अग्निशामक दलाने मागच्या बाजूला घराचं छत तोडून जपत मृतदेह बाहेर काढले. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp