by Hansraj Agrawal | Aug 21, 2024 | Trending News
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बेघर झालेल्या पोलंडच्या हजारो नागरिकांना कोल्हापूरनं आश्रय दिला. त्याची आठवण म्हणून पोलंडमध्ये उभारण्यात आलेल्या खास स्मृतीस्तंभाचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.. यासाठी मोदी पोलंडमध्ये दाखल झाले आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 21, 2024 | Trending News
Mumbai Police News: मुंबईतील माहीम पोलीस कॉलनीत एकाच वेळी तेरा पोलिसांच्या घरात चोरी झाल्याचं समोर आलं आहे. चोरट्याने थेट पोलिसांच्याच घरात डल्ला टाकण्याचे धाडस केल्याने हा प्रकार सध्या चर्चेत आहे. या घटनेने परिसरातही एकच खळबळ उडाली आहे. तसंच, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीतदेखील कैद झाली आहे. पोलिसांच्याच घरात दरोडे पडत असतील तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मध्यरात्री पोलिसांच्या घरांचा कडी-कोयंडा तोडणारा चौर सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मध्यरात्री दबक्या पावलाने पोलिस वसाहतीत येत पोलिसांची घरं बंद असल्याची खात्री करुन घरफोडी करण्यात आली आहे. पोलिसांच्या घरातून रोकड आणि मौल्यवान वस्तूंची तसेच देवाच्या चांदीच्या मूर्तीची चोरी करण्यात आली आहे. पोलिस कॉलनीतच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या घरासहं प्ले ग्रुप, नर्सरी आणि वसाहतीच्या कार्यालयालादेखील चोरट्यांनी लक्ष्य केलं आहे. रात्रपाळीवर असलेले पोलीस, सुट्टीनिमित्त गावी गेलेल्या पोलिसांची घर तसेच निवृत्त पोलिसांच्या बंद घरांना लक्ष केलं गेलं आहे. माहिम पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू केला आहे.
चोरीची ही घटना 16 ते 17 ऑगस्टच्या दरम्यान घडली आहे. यावेळी 13 पोलिस अधिकाऱ्यांच्या घरांमध्ये चोरी झाली आहे. ज्यावेळी चोरी झाली तेव्हा घरात कोणीही अधिकारी नव्हते. घर बंद असल्याची खात्री करुनच चोरट्यांनी डाव साधला आहे. पोलिस या परासरातील सीसीटीव्हीची तपासणी करत असून चोरांचा शोध घेतला जात आहे.
पोलिस जनतेची रक्षा करत असतात अशावेळी पोलिसांची घरेच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांची घरे किती सुरक्षित आहेत, असा प्रश्न उभा राहत आहे. 17 तारखेच्या मध्यरात्रीनंतरची ही घटना आहे. पोलिसांच्या एका सीसीटिव्हीत हा सर्व प्रकार कैद झाला आहे. या चोराचा शोध घेण्यात येत आहे. एकाचवेळी 13 पोलिसांच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 20, 2024 | Trending News
Maharashtra politics : भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 20, 2024 | Trending News
Kolkata Rape Case Sanjay Rathod Mention: कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणावरुन आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सु-मोटो याचिकेवर सुनावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आजच्या ‘सामना’ अग्रलेखातून महिलांवरील अत्याचाराची ठराविक प्रकरणेच प्रकाशझोतात येतात असं म्हणत भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केले आहेत. भारतीय जनता पार्टी कोलकात्यामधील महिला डॉक्टरवरील बालत्कार आणि हत्या प्रकरणाचं राजकीय भांडवल करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. विशेष म्हणजे ही टीका करताना महाराष्ट्रामधील विद्यमान मंत्री संजय राठोड यांचा उल्लेख करत ठाकरे गटाने खोचक टीका केली आहे.
यंत्रणांना जाग आल्याबद्दल आभार पण…
कोलकात्यामधील बलात्कार व हत्या प्रकरणानंतर यंत्रणांना जाग आल्याचा उल्लेख करत ठाकरे गटाने, “केंद्र सरकार, सीबीआय, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आणि चिंता व्यक्त केली याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. हे सर्व प्रकरण पश्चिम बंगालात घडल्याने केंद्राला त्यात इतका रस निर्माण झाला आहे काय?” असा सवाल उपस्थित केला आहे. ममता बॅनर्जी सरकारने या प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई केल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.
ममता सरकारने केलेल्या कारवाईचं कौतुक
“ममता बॅनर्जी यांच्या सरकारने कोलकात्यामधील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बलात्कार व हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपास केला. कोलकाता पोलिसांनी पळून गेलेल्या मुख्य आरोपीस अटक करण्यासाठी खास पथके नेमली. त्यांनी या नराधमाच्या मुसक्या बांधल्या. आता त्याला फासावर लटकवून न्याय केला जाईल. याला कायदा आणि सुव्यवस्थेची बूज राखणे म्हणतात, पण आपल्याकडे बलात्कारासारख्या घटनांचेही राजकारण होते,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. तसेच, “महिला डॉक्टरवरील बलात्कार व हत्येने फक्त कोलकाताच नव्हे, तर देश हादरला, पण या घटनेचे राजकीय भांडवल ‘भाजप’ करीत आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे. “ममता सरकारविरोधात बलात्कार व हत्येचे प्रकरण पेटवून त्यांचे राज्य बदनाम केले जात आहे. कोलकात्यासारखी प्रकरणे गेल्या महिनाभरात उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांत घडली आहेत,” असा आरोपही ठाकरे गटाने केला आहे.
संजय राठोड यांचा उल्लेख
महिलांवरील अत्याचारांचा संदर्भ देताना भाजपावर निशाणा साधत ठाकरे गटाने थेट संजय राठोड यांचा उल्लेख केला आहे. “महाराष्ट्रातील एक मंत्री संजय राठोड यांचे प्रकरण अतिगंभीर आहे. पीडित पूजा चव्हाणने तर आत्महत्याच केली व त्याबद्दल भाजपच्या महिला मंडळाने त्या वेळी आंदोलने केली होती. आज हे महाशय मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसतात व भाजपचे महिला मंडळ या मंत्र्यांची ओवाळणी करत आहे. याप्रकरणीही ना सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली ना तुमच्या त्या सीबीआयने, पण कोलकात्याच्या घटनेने या सगळ्याच संस्था छाती पिटत आहेत. या ढोंगबाजीस काय म्हणावे?” असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 19, 2024 | Trending News
Pune Porsche Car Acident: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. अपघातग्रस्त कार परत मिळावी यासाठी अग्रवाल कुटुंबाने बाल न्याय मंडळात अर्ज दाखल केला आहे. पुण्यातील कल्याणीनगर येथे 19 मे रोजी कारने दुचाकीला उडवलं होतं. या भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता. कोर्टाने 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची अट घातल्यानेही नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अपघातग्रस्त पोर्शे कार परत मिळण्यासाठी अग्रवाल कुटुंबीयांकडून अर्ज करण्यात आला आहे. बाल न्याय मंडळात हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. अर्जावर 26 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. 28 ऑगस्टला याप्रकरणी निर्णय येण्याची शक्यता आहे. कोर्टाने पोलिसांना यावर 28 जुलैपर्यंत आपलं म्हणणं मांडा असा आदेश दिला होता. पण अद्याप पोलिसांनी यावर काहीही उत्तर दिलेलं नाही.
जामीन अर्जावर उद्या निकाल
या अपघाताप्रकरणी आरोपी मुलाचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल, आई शिवानी अग्रवाल, ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉक्टर अजय तावरे, आपातकालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीहरी हाळनोकर, अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण येरवडा कारागृहात असून जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला आहे. 20 ऑगस्टला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.
नेमकी घटना काय?
19 मे रोजी. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या पोर्श या कारने दुचाकी चालवत असलेल्या दोघांना जोरदार धडक दिली, त्यात दोघांचाही मृत्यू झाला. यानंतर नागरिकांनी त्याला रस्त्यावर बेदम मारहाण केली होती. पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या अपघातावेळी हा अल्पवयीन तरुण मद्यधुंद अवस्थेत होता. परंतु फक्त 15 तासात त्याला जमीन मंजूर करण्यात आला. जामिनसाठी घातलेल्या अटींमध्ये 300 शब्दांचा निबंधही होती. यावरुन अनेकांनी नाराजी जाहीर केली होती.
मृतकाच्या मित्राने एफआयआर दाखल करण्यासाठी धाव घेतल्यानं ही घटना पहिल्यांदा समोर आली होती. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीत अनिश अवधिया आणि आश्विनी कोष्टा अशी दोघा मृत्यू झालेल्या पीडितांची नावं आहेत. दोघेही मध्यप्रदेशमधील रहिवासी होते. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले अनिश आणि अश्विनी पुण्यात जॉब करत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पवयीन मुलाला मिळालेल्या जामीनावर आश्चर्य व्यक्त केले होते.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन आरोपीने त्यांना सांगितले की तो दारू पितो हे त्याच्या वडिलांना माहिती आहे. पोलिसांकडे आरोपीचे आणखीन काही सीसीटीव्ही फुटेज आहेत ज्यामध्ये तो शनिवारी उशिरापर्यंत मित्रांसह मद्यप्राशन करत असल्याचे दिसत आहे. 21 मे रोजी पुणे पोलिसांकडून अल्पवयीन मुलाला दारू पिऊन पोर्श कार चालवण्याची परवानगी दिल्याबद्दल बाल न्याय कायद्याच्या कलम 75 आणि 77 अंतर्गत आरोपीच्या वडिलांना अटक करण्यात आली.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 18, 2024 | Trending News
महाराष्ट्राचे लोकप्रिय नेता आणि माजी गृहमंत्री रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर पाटील आजही आपल्या चांगुलपणामुळे ओळखले जातात. महाराष्ट्राचा लोकप्रिय नेता असलेले आर आर पाटील हे तासगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. आर आर पाटील यांनी दोन वेळा महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद सांभाळले आहे. आर आर पाटील यांचे 16 फेब्रुवारी 2015 रोजी कर्करोगाने निधन झाले. पण आता सोशल मीडियावर आर आर पाटील यांचा एक किस्सा व्हायरल होत आहे.
हा किस्सा आर आर पाटील यांच्यासोबत काम करणारे गणेश जगताप यांनी सांगितला आहे. हा किस्सा एनसीपीएच्या नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सध्ये एका कार्यक्रमात घडलेला आहे. गणेश जगताप यांनी ‘बोल भिडू’ ला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे.
काय आहे हा किस्सा
एनसीपीएला सर्व राज्याच्या पर्यटन विभागाचा मेळावा भरलेला होता. ज्यामध्ये वेगवेगळे स्टॉल्स होते. एका संध्याकाळी आर आर पाटील स्टॉल्सला भेट देण्यासाठी आले. तेव्हा युपीच्या स्टॉलला प्रचंड गर्दी होती. बाकीच्या कुठल्या स्टॉलवर फारशी गर्दी नव्हती. महाराष्ट्राच्याही स्टॉलवर गर्दी नव्हती.
गणेश यांनी पुढे सांगितले की, त्यावर आबांनी विचारलं, तिकडे एवढी गर्दी का आहे? तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांचे ब्रँड ऍम्बॅसिडर अमिताभ बच्चन आहेत आणि ते त्या ठिकाणी आल्यामुळे गर्दी आहे. त्यावर आर आर पाटील यांनी एकच प्रश्न विचारला की, महाराष्ट्राच्या स्टॉलवर आले होते का? त्यावर अधिकाऱ्यांनी नाही म्हटले. युपीचे ब्रँड ऍम्बॅसिडर आहेत म्हणून तिकडेच गेले.
पुढे आर आर पाटील निघून गेले. गाडीत बसल्यावर ते मला म्हणाले की, अमिताभला फोन लाव. मी म्हणालो की, ते अजून तिथेच असतील. तर आर आर पाटील म्हणाले की, लाव तर खरं. त्यांच्या ऑफिसला फोन लावला आणि निरोप दिला, असं गणेश जगताप म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, त्यानंतर अमिताभ यांचा फोन आला. आणि तीन ते चार मिनिटं आर आर पाटील अमिताभ यांना झापत होते. आर आर पाटील म्हणाले की, या राज्याने एवढं सगळं दिलं, लोकप्रियता दिली, पैसे दिले, काम दिलं, एवढा मानसन्मान दिला. इथं राहून तू मोठा झालास आणि तुला एकदाही असं वाटलं नाही की, आमच्या स्टॉलवर यावं, एवढी तुझी नैतिकता घसरली… अशा शब्दात आर आर पाटील यांनी खडेबोल सुनावले. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी वारंवार माफी मागितली.
Source link