सांगलीत ढगफुटी, महाबळेश्वर खोऱ्यात मुसळधार पाऊस

सांगलीत ढगफुटी, महाबळेश्वर खोऱ्यात मुसळधार पाऊस


Maharashtra Rain Update :  काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. सांगलीत ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे. तर,  महाबळेश्वर खोऱ्यातही तुफना पर्जन्यवृष्टी झाली आहे. राज्यात अनेक जिह्यात धो धो पाऊस पडला. या पावासामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली.  

सांगली शहरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे.मुसळधार पडलेल्या पावसामुळे सांगली शहरातले अनेक रस्ते जलमय झाले होते.अचानकपणे धुंवाधार अशा पावसाने हजेरी लावली आणि सुमारे तासभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील स्टेशन रोड, शिवाजी मंडई, झुलेलाल चौक, सिव्हिल चौक,मारुती चौक, वखार भाग आदी भागातील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन धारकांची मोठी तारांबळ उडाली,तर पावसामुळे सांगलीकरांची दाणादाण उडाली.

महाबळेश्वर खोऱ्यात मुसळधार पाऊस….

महाबळेश्वर खोऱ्यात मुसळधार पाऊस पडला.  पोलादपूर पायटा, कापडे गाव परिसराला पावसाने झोडपले. सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली.  चार दिवसांच्या विश्रांतीनंतर दक्षिण रायगडमध्ये पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस पडला. 

संध्याकाळच्या सुमारास महाबळेश्वर घाटात तसेच रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्यातील पायटा , कापडे परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने सावित्री नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली.दक्षिण रायगडात 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पावसाने हजेरी लावली. महाड, माणगाव परिसरात पावसाच्या किरकोळ सरी कोसळल्या.

साता-यात अचानक मुसळधार पावसाची हजेरी

साता-यात अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. गेल्या 10 दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यानंतर वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला. उत्तर पुणे जिल्ह्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झालीये. आंबेगाव तालुक्यातील डोंगर माथ्यावर आणि मंचर शहरी भागात धो धो पाऊस बरसलाय… सुमारे एक तासाच्या धो धो पावसामुळे रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झालंय…

पुण्यात ऐन संध्याकाळी जोरदार पाऊस बरसला. हडपसर, हांडेवाडीमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सखल भागांतील रस्त्यांवर पाणी साचलं. तर घरी परतणा-या पुणेकरांना पावसाचा चांगलाच फटका बसला.  अहमदनगरच्या जामखेड परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली… यामुळे शेतामध्ये पाणी साचले असून शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय… साकत, कोल्हेवाडी, कडभनवाडी या गावांना जोडणारा लेंडी नदीवर असलेला पूल पाण्याखाली गेला. तसंच नदीपलीकडे अडकलेल्या काही लोकांना जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यात आलं… 

चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. यामुळे शेतातील उभ्या धान पिकांना मोठा लाभ होणार आहे. आतापर्यंत वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 93 टक्के एवढा पाऊस झालाय. जिल्ह्यातील सर्वच लघु व मध्यम सिंचन प्रकल्प तुडुंब भरलेत.  
लातुर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात जोरदार पाऊस कोसळतोय…जळकोटच्या वांजरवाड्यात शेताचा बांध फुटुन पाणी बाहेर येतंय…तर हडोळती – सावरगाव रस्त्यावरील ओढ्यालाही पूर आलाय…पुराचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने बराच वेळ वाहतूक बंद होती.





Source link

मित्रांनीच केले मैत्रिणींचे न्यूड फोटो व्हायरल, पुण्यातल्या नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

मित्रांनीच केले मैत्रिणींचे न्यूड फोटो व्हायरल, पुण्यातल्या नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार


Shocking News in Pune : पुण्यातील हडपसर इथल्या एका नामांकित शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रतापामुळे एकच खळबळ उडालीय.  विद्यार्थ्यांनी मिळून आपल्या वर्गातील मैत्रिणींचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दहावीच्या वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या मैत्रिणींचे फोटो टेलिग्राम या ॲपवर अपलोड करून त्याला न्यूड फोटोमध्ये (Nude photos) मॉर्फ (Morph) केले. या दोन विद्यार्थ्यांनी मॉर्फ केलेले फोटो शाळा सोडून गेलेल्या त्यांच्या मित्राला पाठवले. शाळेतील एका शिक्षिकेच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांना याबाबतची माहिती देण्यात आली..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार 16 जून ते 30 जून दरम्यान पुण्यातील हडपसर (Hadapsar) भागातील असलेल्या एका नामांकित शाळेत घडला. पिडीत विद्यार्थिनी आणि ताब्यात घेतलेले 2 विद्यार्थी हे इयत्ता दहावीमध्ये शिकत असून एकाच वर्गात आहेत. तर ताब्यात घेतलेला तिसरा मुलगा हा शाळा सोडून गेला असला तरी शाळेतील मित्रांच्या संपर्कात होता. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी (Pune Police) सर्व अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून त्यांना बाल न्याय मंडळात हजर करण्यात आलं.

या प्रकारानंतर 3 पैकी एका पिडीत विद्यार्थिनीच्या आईनं सदर विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल केली.. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकारातून मुलांकडून इंटरनेटचा आणि मोबाईलचा कसा दुरुपयोग केला जातो हे अधोरेखित होतंय. मुलांच वय अल्लड असतं. मोबाईलवरील इंटरनेटचा अतिवापर मुलांच्या मानसिकतेला धक्का पोहोचवतोय. त्यामुळे पालकांनी मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं मत चाइल्डलाईनकडून व्यक्त करण्यात आलंय..

हडपसर मधील या धक्कादायक प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्यांवर पालकांनी लक्ष ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. आपली मुलं मोबाईलवर काय पाहातात, कोणते गेम खेळतात, कोणाशी बोलतात? या बारीक सारीक गोष्टीवर पालकांचं लक्ष असायला हवं. 

मोबाईलचा दुष्परिणाम
सध्याच्या काळात लहान मुलं मोबाईलच्या प्रचंड आहारी गेल्याचे चित्र घरोघरी बघायला मिळते. उठता, बसता, जेवताना देखील मुलांना मोबाईल हातात लागतो, त्यातल्या त्यात किशोरवयीनांमध्ये मोबाईल गेम खेळाची क्रेझ आहे. मोबाईलचा हा मुलांकडून होणारा अतिवापर पालकांसाठी मोठी डोकेदुखी (Headache) ठरत असून, खेळ आणि अभ्यासात दुर्लक्ष, विविध आजार, सायबर गुन्हेगारी अशा गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. 





Source link

दादरनंतर आता कल्याण; बॅगेत आढळला मृतदेह, पोलिसांनी केलं महत्त्वाचं अवाहन

दादरनंतर आता कल्याण; बॅगेत आढळला मृतदेह, पोलिसांनी केलं महत्त्वाचं अवाहन


Kalyan Crime News: कल्याण तालुक्यातील वरप गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दादर स्थानकात सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्यानंतर आता वरप येथेही बॅगेत मृतदेह आढळला आहे. एका अज्ञात व्यक्तीचा मृतेदह बॅगेत भरुन कचरा कुंडीत फेकून देण्यात आला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

वरप परिसरातील गावदेवी मंदिर भागात स्थानिकांना ही बॅग दिसली होती. त्यानंतर रहिवाशांना संशय आल्याने त्यांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी ही बॅग उघडून बघितली तेव्हा त्यांनादेखील धक्काच बसला. या बॅगेत एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह होता. अज्ञात मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. 

वृद्ध व्यक्तीची हत्या करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ही बॅग कचऱ्यात फेकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कल्याण ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून या संदर्भात तात्काळ तपास सुरू केला आहे .तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि डॉग स्कॉडने हा परिसर पिंजून काढला आहे. 

दरम्यान ही व्यक्ती कोणाच्या ओळखीची असेल किंवा मिसिंग असेल तर तात्काळ पोलिसांसोबत संपर्क साधावा, असा आवाहन करण्यात आलंय. अंगाने मध्यम बांधा असलेल्या सावळ्या रंगाच्या या वृद्धाची उंची साधारण 5 फूट 5 इंच इतकी आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. तसंच, या वृद्धाच्या परिचितांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असं अवाहनदेखील करण्यात आलं आहे.

पोलिसांनी वृद्धाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. तसंच, वृद्धाची हत्या कोणी केली याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासून ही सुटकेस कोणी टाकली याचा शोध घेतला जात आहे. 

दादर स्थानकातही आढळला होता सुटकेसमध्ये मृतदेह

दादर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ११ येथे एक अनोळखी व्यक्ती एक मोठी ट्रॉली बॅग घेऊन जात होता. गस्तीवर असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोषकुमार यादव यांना त्याच्याव संशय आल्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीला थांबवून त्याची बॅग तपासली असता त्यात रक्ताने माखलेला मृतदेह होता. तपासणी तो मृतदेह अर्शद अली सादीक अली शेख (३०) याचा असून तो सांताक्रुझ कलिना परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून दोघे आरोपी मुकबधिर आणि अपंग आहेत. त्यांनीच पायधुनी येथे मित्र अर्शद खान याची हत्या करुन मृतदेह बॅगेत टाकला, असे समोर आले आहे. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते तुतारी एक्स्प्रेसमधून नेत होते. प्रवासात एखाद्या पुलावरुन ही बॅग ढकलण्याचा त्यांचा प्लान होता





Source link

सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय कोणाचा होता? अजित पवार स्पष्टच बोलले

सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय कोणाचा होता? अजित पवार स्पष्टच बोलले


Ajit Pawar : अजित पवार यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौफ्यस्फोट केले आहेत. अजित पवार यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना दिलेली उमेदवारी कुटुंबासाठी चुकीची होती. कुटुंबासाठी हा निर्णय चुकीचा होता. कारण पवार कुटुंबातीलच व्यक्ती हरणार आणि जिंकणार होती. बारामतीच्या निकालाला मीच जबाबदार आहे. सुप्रिया सुळेंविरोधात पत्नीला उभं करणं ही माझी चूक होती. असं अजित पवार म्हणाले. 

सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय कोणाचा? 

सुनेत्रा यांना उभ करणं कुटुंबाच्या दृष्टीने योग्य नव्हतं. बारामतीतून उमेदवार देण्यासंदर्भात माझ्यावर महायुतीतून कोणताही दबाव नव्हता. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय हा संसदीय समितीचा होता. असं अजित पवार  म्हणाले. 

सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेत बिनविरोध निवड झाली. 

शरद पवारांसोबत पुन्हा जाणार का? 

राजकारणातील सर्व निर्णय माझेचं असतात. शरद पवार यांच्यासोबत जाणार का असा प्रश्न विचारल्यावर अजित पवार यांनी ‘नो कमेंट’ असं उत्तर दिलं. 1991 मध्ये माझा राजकारणात प्रवेश झाला. माझ्यानंतर येऊन फडणवीस, शिंदे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ असणं महत्त्वाचं असते.  कधीही निवडणूक न लढवलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे महायुतीकडून आम्ही विधानसभा लढवणार. असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp