जर्मनीच्या रस्त्यांवर 'परभणी'चे ड्रायव्हर; ST महामंडळाकडून थेट इंटनॅशनल नोकरीची ऑफर

जर्मनीच्या रस्त्यांवर 'परभणी'चे ड्रायव्हर; ST महामंडळाकडून थेट इंटनॅशनल नोकरीची ऑफर



ड्रायव्हर भरतीची… पण ही भरती होणाराय थेट जर्मनीमध्ये… तुम्हालाही जर्मनीत जाऊन ड्रायव्हर बनायचं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी. 
 



Source link

Job News : जर्मनीत मेगा भरती; खास मराठी लोकांसाठी जर्मन सरकारची ऑफर, असा करा अर्ज

Job News : जर्मनीत मेगा भरती; खास मराठी लोकांसाठी जर्मन सरकारची ऑफर, असा करा अर्ज


Job News : नोकरीच्या शोधात असणारी अनेक मंडळी बऱ्याचदा मनाजोग्या संधीच्या प्रतीक्षेत असतात. काही मंडळी ही संधी मिळेपर्यंत पर्यायी नोकरी करण्याला प्राधान्य देत करिअरच्या वाटांवरील प्रवास सुरू करतात. या साऱ्यामध्ये नोकरीच्या परदेशी संधींची भलतीच हवा असते. चांगला पगार, चांगल्या सुविधा आणि तितक्याच चांगल्या सवलती या आणि अशा अनेक कारणांनी परदेशातील नोकरीचा अनेकांनाच हेवा वाटतो. अशीच एक संधी महाराष्ट्रातील अनेकांसाठीच चालून आली आहे.

महाराष्ट्रातील कुशल चालकांसाठी ही संधी असून आता ते थेट जर्मनीला जाऊ शकतात. राज्य शासनाकडून यासाठीची सोय करण्यात येणार असून, आता राज्यातील परिवहन विभाग चांगल्या चालकांचा शोध घेणार आहे.

काय आहे ही संधी… 

25 फेब्रुवारीला जर्मनीतील बाडेन-युटेनबर्ग या राज्यासोबत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतचा एक सामंजस्य करार करण्यात आला. ज्यामध्ये वाहनचालकांचाही समावेश आहे. 

शासननिर्णयानुसार मनुष्यबळ पुरवण्याबाबतच्या या प्रकल्पाच्या अनुषंगाने यंत्रणा, प्रशिक्षण व्यवस्थेसह कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी आता शासन मान्यता मिळाली आहे. त्याशिया यासाठी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि तांत्रिक समित्याही गठित करण्यात आल्या आहेत. 

राज्यातील उमेदवारांना गरजेनुसार त्यांच्या कौशल्याला अधिक वाव देण्यासाठीचं अतिरिक्त प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेडनिहाय तांत्रिक समिती गठीत करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली वाहनचालक (बस, रेल्वे, ट्रक, हलकी, जड वाहनं) या ट्रेडसाठीची समिती सज्ज असेल. दरम्यान या प्रक्रियेमध्ये पुढे जिल्हास्तरावर सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि  सर्व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करत इच्छुक उमेदवार शोधण्यात येतील. 

कशी असेल अर्जप्रक्रिया? 

या प्रकल्पाअंतर्गत जर्मनीमध्ये नोकरीसाठी जायला इच्छुक असणाऱ्या वाहनचालकांनी शासनानं जारी केलेला QR Code स्कॅन करुन त्यावर दिलेला अर्ज भरावा. 

महत्त्वाची अट विसरू नका… 

सदर उपक्रमाअंतर्गत उमेदवाराला जर्मन भाषा येणं अनिवार्य असून, जर्मन भाषा प्रशिक्षणाबाबतची कार्यवाही ही शासनामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळं शासननिर्णयानुसार या उमेदवारांचा सर्व खर्च राज्य शासनच करणार आहे. 

इच्छुक उमेदवारानं भारतासह जर्मनीतील वाहनचालन नियमांबाबच महत्त्वाचं प्रशिक्षण घेणं अपेक्षित असेल. त्यामुळं राज्य शासनाकडूनच याबाबतची कार्यवाही आणि खर्च करण्यात येणार असल्याची नोंद घ्यावी. 





Source link

Exclusive : राज्यात पीएचडी परीक्षेत मुन्नाभाईगिरी? माजी उच्च शिक्षण मंत्र्यांसाठी वाकवले नियम

Exclusive : राज्यात पीएचडी परीक्षेत मुन्नाभाईगिरी? माजी उच्च शिक्षण मंत्र्यांसाठी वाकवले नियम


सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : पीएचडी मिळवण्यासाठी कसे नियम वाकवले जातात. माजी मंत्र्यासाठी कशी व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जाते याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.  प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhobale) हे शाहू शिक्षण संस्‍थेचे संस्‍थापक आणि भाजपचे ज्येष्ठ नेतेही आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री ते राहिलेत. त्यांनी PhD केली तर त्यात वावगं काय असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल.. मात्र थांबा. लक्ष्मणराव ढोबळे PhD करतायत ही समस्या नाही. तर एका PhD साठी सर्व यंत्रणा कशी राबवली जाते याचं धक्कादायक वास्तव झी 24 तास तुमच्यासमोर मांडणार आहे.

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पुन्हा एकदा PhD परीक्षा देतायत. तसा याआधीसुद्धा त्यांनी प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले. गेल्या वर्षी याच परीक्षेत तिन्ही विषयांमध्ये ते नापास झाले होते. हे आम्ही म्हणत नाही तर ते रिपीटर असल्याचा उल्लेख त्यांच्याच हॉल तिकीटवर आहे. यंदा मात्र काहीही करुन PhD पास करायचं असं त्यांनी ठरवलं. मग झाडून यंत्रणा कामाला लागली.

सोलापूर विद्यापीठात 22 ते 26 जुलै 2024 दरम्यान PhD संशोधकांची सर्व विषयांसाठीची कोर्स वर्क परीक्षा पार पडली. सर्वांसाठी विद्यापीठातल्या संगणक शास्त्र संकुलाचं केंद्र होतं. मात्र यात लक्ष्मण ढोबळेंना स्पेशल ट्रिटमेंट देण्यात आली. ढोबळेंसाठी फक्त एकट्यासाठी सुरुवातीला पंढरपुरातल्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात सेंटर देण्यात आलं. मात्र रयतशिक्षण संस्थेतलं हे सेंटर परत बदलण्यात आलं. लक्ष्मण ढोबळेंसाठी परीक्षा विभागाने न्‍यू सातारा कॉलेज ऑफ बीसीए, पंढरपूर या खाजगी महाविद्यालयात व्‍यवस्‍था केली.  म्हणजे संपूर्ण सेंटरवर लक्ष्मण ढोबळे हे परीक्षा देणारे एकमेव विद्यार्थी होते. 

हा प्रकार इथवरच थांबत नाही. तर एकमेव सेंटरवर पीएचडी परीक्षा देण्यासाठी लक्ष्मण ढोबळेंना लेखनिकही उपलब्ध करुन देण्यात आला. आता लेखनिक घेताना माजी मंत्र्यांनी दिव्यांगाचं प्रमाणपत्र देऊन लेखनिक घेतला. म्हणजे त्यांनी कारण दिलं होतं ते हात थरथरण्याचं. लेखनिक घेण्यासंदर्भातल्या पत्रात स्पष्ट लिहिलंय की उच्च शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखनिक देणेबाबत. आणि दिव्यांगाचा तपशील लिहिलाय त्यात कारण आहे हात थरथरणे. त्यामुळेच लक्ष्मण ढोबळेंना लेखनिक उपलब्ध करुन देण्यात आला. म्हणजे लक्ष्मण ढोबळेंनी परीक्षेला लेखनिक घेताना दिव्यांग असल्याचा उल्लेख केलाय. लक्ष्मण ढोबळेंनी मात्र आपण दिव्यांग असल्याचा फायदा घेतला नसल्याचा दावा केला.

बरं हा लेखनिक म्हणजे आनंद मधूकर मसलखांब हा विद्यार्थी सोलापूरमधल्याच दयानंद महाविद्यालयात शिकतोय. हा विद्यार्थी MA भाग एकचा गुणवत्ताधारक विद्यार्थी आहे. शिवाय MAचा आणि पीएचडी कोर्स वर्कचा अभ्यासक्रम सारखाच आहे. आता हा विद्यार्थी ज्या दयानंद महाविद्यालयात शिकतो त्याच महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक देविदास गायकवाड हेच माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंचे पीएचडी मार्गदर्शक आहेत. सर्वसामान्यपणे अभ्यासक्रमापेक्षा कमी शिक्षण असणारा विद्यार्थी लेखनिक असावा असा संकेत आहे. 

याचमुळे अनेक सवाल निर्माण होतायत. अगदी पूजा खेडकरांच्या प्रकरणातही बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करण्यात आला होता. पूजा खेडकर यांनी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतलं होतं. डावा गुडघा सात टक्के कायमस्वरूपी अधू असल्याचं या प्रमाणपत्रात नमूद करण्यात आलं होतं. आता हात थरथरणे या एकमेव कारणाखाली लक्ष्मण ढोबळेंना दिव्यांगाचा लाभ देण्यात आलाय. ढोबळेंना दिव्यांग प्रमाणपत्रामुळे लेखनिक पुरवण्यात आला. हा लेखनिकसुद्धा MA भाग एकचा गुणवत्ताधारक विद्यार्थी होता.

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंसाठी स्वतंत्र सेंटर, दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ, त्यानंतर मग गुणवत्ताधारक लेखनिक, अशा अनेक सोयी ढोबळेंच्या पीएचडीसाठी देण्यात आल्यात का असा सवाल उपस्थित होतोय. नियम वाकवून IAS झालेल्या पूजा खेडकरांचं प्रकरण चर्चेत आहे. आता शिक्षणाची सर्वोच्च पदवी मानल्या गेलेल्या पीएचडीसाठी नियम वाकवले जातात का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय..  





Source link

'माझ्याकडून चूक झाली,' सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत अजित पवारांनी दिली कबुली; 'राजकारण घरात…'

'माझ्याकडून चूक झाली,' सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत अजित पवारांनी दिली कबुली; 'राजकारण घरात…'



Ajit Pawar on Politics: राजकारण हे पार घरात शिरु द्यायचं नसतं. मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली अशी कबुलीच अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली आहे. अजित पवारांनी ही कबुली दिल्याने भविष्यात पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चाच रंगली आहे. 
 



Source link

अजित पवारांना टक्कर देणार त्यांच्याच धाकट्या भावाचे सुपूत्र; बारामतीच्या राजकारणात पुन्हा काका पुतण्याची लढाई

अजित पवारांना टक्कर देणार त्यांच्याच धाकट्या भावाचे सुपूत्र; बारामतीच्या राजकारणात पुन्हा काका पुतण्याची लढाई



Maharashtra Politics :  युगेंद्र पवार बारामतीमधून विधानसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीच तसे संकेत दिलेत. युगेंद्र पवारांना उमेदवारी मिळाल्यास बारामतीत काका विरुध्द पुतण्या लढाईचा दुसरा अंक पाहायला मिळू शकतो. 



Source link

'दिल्लीतून आदेश येतो तसं राज ठाकरे बोलतात, हिंमत असेल तर…' कोणी दिलं खुलं चॅलेन्ज?

'दिल्लीतून आदेश येतो तसं राज ठाकरे बोलतात, हिंमत असेल तर…' कोणी दिलं खुलं चॅलेन्ज?


अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : (Loksabha election 2024) लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर पवार कुटुंबातून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. (NCP) राष्ट्रवादीशी थेट संबंध असणाऱ्या या नेत्यानं राज ठाकरे यांना खुलं आव्हान दिल्यामुळं आता या टीकेला ठाकरेंकडून नेमकं काय आणि कसं उत्तर मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना, (Raj Thackeray) ‘राज ठाकरे दिल्लीतून, गुजरातमधून आदेश आले की तसंच वागायला लागतात’, असं म्हणत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी नाराजीचा तीव्र सूर आळवला. प्रत्यक्षात राज ठाकरे हे नाव युवा नेत्यांमध्ये आणि राजकारणाच्या वर्तुळात नव्यानं प्रवेश करणाऱ्या अनेकांमध्येच कमालीचं लोकप्रिय. रोहित पवारही यास अपवाद नाहीत. पण, सध्या मात्र त्यांची भूमिका काहीशी बदललेली दिसत आहे. 

‘मी त्यांचा (राज ठाकरे) फॅन होतो. पण आज महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी त्यांचा वापर होत आहे. अशा पक्षांना सामान्य लोक सुपारीबाज पक्ष आणि सुपारीबाज नेते असं म्हणतात’ अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिरांवर ताशेरे ओढले. 

आता शेवटी लोक शेवटी भूमिका घेत आहेत, येत्या काळातही घेतील. मतदार योग्य व्यक्तीला निवडून देतील असं म्हणत रोहित पवार यांनी त्यांना खुलं आव्हान दिलं. ‘राज ठाकरेंनी हिंमत असेल तर फडणवीसांविरोधात यांच्या विरोधात बोलावं. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम भाजपनं केलं आहे. द्वेष निर्माण केला जात आहे. याब्बदल राज ठाकरेंनी बोलावं’, असं ते म्हणाले. 

 

पाच वर्षात काय बदलल की तुम्हाला झुकावं लागत आहे? असा सवाल करताना लोक निर्णय घेतील खड्यासारख कुणाला बाजूला करायचं अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंना आणि पर्यायी महायुतीला सावधगिरीचा इशाराही दिला. दरम्यान, रोहित पवार यांनी एकिकडे राज ठाकरे यांच्या भूमिकेसंदर्भात नाराजीचा सूर आळवलेला असतानाच तत्पूर्वी त्यांच्या एका X पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. 

सुपारीचा फोटो शेअर करत, ‘#सुपारीबाज पक्षाला #सुपारी खूपच लागलेली दिसतेय… पार घायाळ झालेत… पण महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही तर स्वाभिमानी आहे. कुणाच्याही सांगण्याला भुलणारी नाही, म्हणून केवळ मतं खाणाऱ्या इतर पक्षांनीही याचा विचार करावा.’ असं लिहिलं होतं. त्यामुळं त्यांचं हे ट्विट आणि शब्द नेमके कोणासाठी हे आता अधिकच स्पष्ट झालं आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp