by Hansraj Agrawal | Aug 27, 2024 | Trending News
Deepak Kesarkar on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु असताना दीपक केसरकर यांनी एक अजब विधान केलं आहे. वाईटातून चांगल घडायचं असेल म्हणून अपघात झाला असावा असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. दीपक केसरकरांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची आणि महायुती सरकार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
महाराजांचा पुतळा कोसळल्याने संताप व्यक्त होत आहे असं विचारण्यात आलं असता दीपक केसरकर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हा अपघात आहे. त्याच पद्धतीने ते घेतलं पाहिजे. कदाचित वाईटातून काही चांगल घडायचं असेल म्हणूनही हा अपघात झाला असेल. अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्यानुसार पुढील कारवाईही केली जाईल”.
शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरेंचं ‘ते’ जुनं विधान पुन्हा चर्चेत, म्हणाले होते ‘समुद्रात महाराजांचा…’
“नौदलाने उभारलेला पुतळा अपघातग्रस्त झाला याचं दुःख आहे. अरबी समुद्रातील पुतळा उभारणीचं काम काही तांत्रिक गोष्टींमुळे थांबलं, त्यामुळे इथे हा पुतळा उभारला गेला. नौदलाला विश्वासात घेऊन पुन्हा या ठिकाणी स्मारक उभारलं गेलं तर ते चांगलं असेल. याबाबत मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन. या ठिकाणी आता 100 फुटी पुतळा असावा,” असंही केसरकर म्हणाले आहेत.
आता 100 फुटी पुतळा उभारला तर ते यथायोग्य स्मारक ठरेल. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला जशा व्यवस्था आहेत तशी येथेही झाल्यास चांगलं होईल. बोलणारे काम करत नाहीत आणि काम करणारे बोलत नाहीत. 100 फुटी पुतळा उभा राहिल्यास पंतप्रधानांना पुन्हा बोलावता येईल. तो राष्ट्राचा सन्मान असेल असंही ते म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले, “स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर हा पुतळा पुन्हा महाराष्ट्र शासन उभा करू शकतो. भव्य असं स्मारक उभारताना परिसराचा विकास करू. हा अपघात आहे. वाईटातून चांगलं घडायचं असेल म्हणून हा अपघात झाला असेल. संपूर्ण परिसराचा विकास करणे आणि पुतळा उभा करणे ही खरी आदरांजली असेल”.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“झालेली घटना योग्य नाही, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. तो पुतळा उभारला तेव्हा त्या कार्यक्रमाला आम्हीसुद्धा होतो. हा पुतळा नौदलाकडून उभारला गेला होता, त्याचं डिझाईन नौदलाने तयार केलं होतं,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले की, “मी जिल्हाधिकाऱ्यांशी यासंदर्भात बोललो. त्यांनी मला सांगितलं की, ताशी 45 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता. यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं आहे. उद्या तिथे नौदलाचे अधिकारी येणार आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी जात आहेत. नौदलाचे अधिकारी आणि आमचे काही अधिकारी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिमाखात उभा राहील यासाठी उद्या पाहणी करू. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत असून हा पुतळा आम्ही तात्काळ उभारू”.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 26, 2024 | Trending News
यावरुन राजकारणही सुरु झालंय. पुतळा कोसळणे हा राजकीय कट असल्याचा मोठा आरोप स्थानिक भाजप नेत्याने केला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 26, 2024 | Trending News
Vadgaon Sheri Assembly Constituency Jagdish Mulik ON Sunil Tingre: विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीतील धुसफूस दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही धुसफूसमुळे घटक पक्षांच्या नेत्यांची डोकेदुखी वाढलीय. पुण्यात महायुतीत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी आमदारांमध्ये श्रेय वाद उफाळून आलाय. महायुतीत वडगाव शेरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर महायुतीत घटक पक्षामध्ये कलगीतुरा रंगल्याची पाहिली मिळत आहे.
कशावरुन महायुतीतील धुसफूस ?
वडगाव शेरीमधील विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या मतदार संघातील 300 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन आज अजित पवारांच्या हस्ते होणार आहे. त्याची जोरदार जाहिरातही टिंगरे यांनी सोशल मीडियावर केलीय. मात्र जाहिरातीवर आता माजी आमदार जगदीश मुळीक यांनी आक्षेप घेतलाय. मतदार संघातील विकास कामांचा पाठपुरावा एकट्या आमदारांनी केलेला नाही. जाहिरातीवर शिंदे आणि फडणवीस यांचे फोटो नसल्यानं मुळीक यांनी नाराजी व्यक्त केलीय. तसंच मुळीक विधानसभेसाठी वडगाव शेरीतून इच्छुक असल्याची माहिती आहे. त्यामुळे या जागेवरून महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वडगाव शेरी मतदारसंघातील येरवडा मध्यवर्ती इमारत, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय इमारत आणि जमावबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख इमारत या अशा तब्बल 306 कोटी 41 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. अजित पवार हे महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत अहिल्याभवन इमारतीच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी देखील करणार आहेत.
जगदीश मुळीक म्हणाले,वडगाव शेरी विधानसभेत महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेनीच पाळायचा का? महायुतीचा धर्म पाळणं, ही महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे, पण वडगावशेरीच्या या आमदारांना महायुतीचा विसर पडला आहे ! अशी टीका जगदीश मुळीक यांनी केली.
आगामी विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरीमध्ये पेच निर्माण होणार आहे. भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांना लोकसभेत संधी न मिळाल्यामुळे ते विधानसभेची अपेक्षा बाळगून आहेत. मात्र त्याच वेळी वडगाव शेरीमध्ये विद्यमान आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यामुळे ही जागा कुणाच्या वाट्याला जाते त्यावर आजी माजी आमदारांची भवितव्य अवलंबून आहे. तूर्तास तरी या प्रश्नावर तोडगा दृष्टीपथात नसल्याने दोघांमध्ये श्रेय वादाची ठिणगी पडली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 25, 2024 | Trending News
Supriya Sule On Koyata Attack On Police : पुण्यात कोयता गँगची दहशत पसरत असून आता थेट पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला झालाय. त्यावर सुप्रिया सुळेंनी टीका केलीये.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 25, 2024 | Trending News
Badlapur Sexual Assault Case: बदलापूर अत्याचार प्रकरणात सतत नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता एसआयटीने आणखी एक नवी शक्यता वर्तवली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 24, 2024 | Trending News
Badlapur Case : बदलापूरमधल्या एका शाळेत दोन चिमुकीलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात दोन सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालात धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. पीडित मुलींवर 15 दिवसांत अनेक वेळा आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे.
Source link