शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांनी उदाहरणासह केलं स्पष्ट

शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांनी उदाहरणासह केलं स्पष्ट


Bhaskar Jadhav on Shivsena Is Becaming Congress : शिवसेनेची काँग्रेस झाली असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत केलं होतं. त्यांनी 14 जानेवारी 2025 मध्ये चिपळूनमध्ये हे वक्तव्य केलं होतं त्यावरच हा प्रश्न विचारण्यात आला. या मुलाखतीत भास्कर जाधव यांनी त्यांनी केलेल्या शिवसेनेची काँग्रेस झाली हे वक्तव्य करण्याचं कारण सांगितलं. 

भास्कर जाधव त्यांच्या या वक्तव्याविषयी बोलताना म्हणाले, ‘ही गोष्ट खरी आहे की शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना हे विधान मी केलं. पण हे विधान अर्धवट दाखवण्यात आलं. पूर्वीची शिवसेनेची कार्यप्रणाली काय होती? त्याचं स्ट्रकचर काय होतं? आणि आताचं शिवसेनेचं स्ट्रकरच बनत चाललंय हा फरक सांगत असताना मी हे विधान केलं. ही गोष्ट खरी आहे.’ 

शिवसेनेची कॉंग्रेस झाली म्हणजे नेमकं काय?

पुढे शिवसेनेची कॉंग्रेस झाली म्हणजे नेमकं काय? असा सवाल करताच भास्कर जाधव यांनी शिवसेनेचं स्ट्रकचर सांगत म्हणाले, ‘पूर्वी शिवसेनेचं स्ट्रकचर होतं. शिवसेना प्रमुख त्यानंतर शिवसेनेचे 13 नेते, त्यानंतर जिल्हा प्रमुख, त्यानंतर तालुका प्रमुख आणि त्यानंतर शाखा प्रमुख अशा पद्धतीची शिवसेनेची कार्यप्रणाली होती. आज आपण जर पाहिलं तर एक तालुका प्रमुख नेमायचा असेल तर तालुका प्रमुखाच्या बरोबरीनं तालुका समन्वय, एक तालुका संघटक, एक तालुका सचिव, एक तालुका कोण आणखीन. एका पदात्या भोवती आपण किती पद निर्माण करणार आहोत, जी कॉंग्रेसची पद्धत होती. कॉंग्रेसची पद्धत अशीच आहे. कोणी रुसला-रागवला की हा सरचिटणीस,  तो उप-सरचिटणीस, तो उपाध्यक्ष. शिवसेनेचं तसं नव्हतं. शिवसेनेचा एक प्रमुख हा जिल्हा परिषदेच्या गटा प्रमुखाप्रमाणे असायचा. एक उपविभाग प्रमुख पंचायतसमिती गणाप्रमाणे असायचा. जेणे करून त्याचं कार्यक्षेत्र हे ठरलेलं असतं. काहीही झालं तरी ते त्यासाठी उत्तर देण्यासाठी बांधील असतो. आपल्या कार्यक्षेत्रात रिझल्ट आणणं त्याच्यावर बंधन कारक असतं. आता एकाच कार्यक्षेत्रात 10 पदाधिकारी नेमले तर कोणाची जबाबदारी कोणावर द्यायची. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये ज्या प्रमाणे फक्त खूश करण्यासाठी पद दिलं जातं होतं, तसं शिवसेनेत दिलं जाऊ नये हा माझा आग्रह त्या भांडणात होता आणि आजही आहे.’ 

शिवसेनेची कॉंग्रेस होणं चांगलं की वाईट?

शिवसेनेची कॉंग्रेस होणं चांगलं की वाईट? यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की ‘प्रत्येक पक्षाची विचारधारणा ही वेगळी आहे. प्रत्येक पक्षाची कार्यप्रणाली ही वेगळी आहे. कॉंग्रेसची वेगळी आहे शिवसेनेची वेगळी आहे. आघाडी, युती हा विषय सोडून द्या, पण शिवसेनेची कार्यप्रणाली ही शिवसेनेप्रमाणेच राहिले पाहिजे. हे माझं मत आहे.’ 





Source link

63 हजार शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अनुदान रखडलं; घोटाळ्यामुळे अनुदान वाटप रखडलं?

63 हजार शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अनुदान रखडलं; घोटाळ्यामुळे अनुदान वाटप रखडलं?


नितेश महाजन, झी २४ तास, जालना : जालन्यातील अंबड आणि घनसावंगी या दोनच तालुक्यात आतापर्यंत तब्बल 40 कोटी रुपयांचा अतिवृष्टी अनुदान घोटाळा जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या त्रिस्तरीय चौकशीतून समोर आलाय.या घोटाळ्यात तलाठी,मंडळाधिकारी,कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांनी अतिवृष्टी बाधित लाखो शेतकऱ्यांचं पीक नुकसान अनुदान बोगस खात्यात वळवून हडपलंय.त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 63 हजार शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2024 मधील पीक नुकसानीचं अनुदान रखडल्याची चर्चा आहे

– 63 हजार शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अनुदान रखडलं
– घोटाळ्यामुळे अनुदान वाटप रखडलं?
– अनुदान कधी मिळणार? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप झालाय. जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात 2022 ते 2024 या दोन वर्षात तलाठी,कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांनी तब्बल 40 कोटींचा प्रशासन आणि राज्य सरकारला चुना लावलाय. शेतकऱ्यांच्या पीक नुकसान अनुदानापोटी आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न करता तलाठ्यांनी ही रक्कम बोगस खात्यात वळवून 40 कोटींचा अपहार केल्याचं त्रिस्तरीय चौकशी समितीच्या चौकशीतून समोर आलंय. या समितीनं आतापर्यंत अंबड आणि घनसावंगी या दोनच तालुक्यातील चौकशी केलीय. अजून 6 तालुक्यातील चौकशी बाकी असल्यानं प्रशासनानं शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी देण्यात येणारं अनुदान थांबवलंय. यामुळे शेतक-यांमधून संतप्त प्रतिक्रिया समोर येताहेत. अनुदान वाटपातील या घोटाळ्यामुळे अनेक शेतक-यांचं नाहक नुकसान झालंय.

– सप्टेंबर 2024 मध्ये खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक नुकसानापोटी राज्य सरकारकडून 412 कोटी रुपयाचं अनुदान मिळालं
– 2 लाख 57 हजार 297 शेतकऱ्यांना जे अनुदान वाटप करायचं होतं
– मात्र यापैकी केवळ 1 लाख 94 हजार 113 शेतकऱ्यांनाच अनुदान वाटप झालं
– 63 हजार 184 शेतकऱ्यांना पीक नुकसान अनुदान मिळालंच नाही
– अनुदान रखडलेल्या शेतकऱ्यांपैकी 15 हजार 31 शेतकऱ्यांची ई-केवायसी पेंडिंग आहे.

आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी 17 तलाठ्यांसह 4 कार्यालयीन क्लार्कना पीक नुकसान अनुदानात घोटाळा केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलंय. अतिवृष्टी होऊन आता 10 महिने उलटलेत…पण 63 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजूनही पीक नुकसानीचं अनुदान नाही. त्यामुळे प्रशासनाबरोबरच राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं अनुदान शक्य तितक्या लवकर शेतकऱ्यांना वाटप करावं एवढीच या शेतकऱ्यांची मागणी आहे.





Source link

जुन्या वाहनांना 'एचएसआरपी' नंबरप्लेट बसवण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ, ही असणार शेवटची डेडलाईन

जुन्या वाहनांना 'एचएसआरपी' नंबरप्लेट बसवण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ, ही असणार शेवटची डेडलाईन


HSRP Number Plate : 2019 पूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा पाटी बसवण्यासाठी राज्य सरकारने 30 मार्च पर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर ही मुदत 30 एप्रिलपर्यंत देण्यात आली. यासाठी राज्य सरकारकडून तीन कंपन्यांना हे टेंडर दिले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रादेशिक परिवहन विभागात उच्च सुरक्षा पाटी बसवण्यासाठी कार आणि बाईक चालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, वाहनांची संख्या आणि वाहनधारकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे राज्य सरकारने या पाट्या बसविण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ आता 15 ऑगस्टपर्यंत असणार आहे. 

जर आपण नवीन दिलेल्या मुदतवाढीचा विचार केला तर दररोज 3 लाख 16 हजार 71 वाहनांना पाटी बसवावी लागणार आहे. काही ठिकाणी तर दीड ते दोन महिन्यांची प्रतीक्षा वाहनचालकांना करावी लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलेल्या मुदतीमध्ये या पाट्या लावता येणार नाहीत. हे लक्षात घेऊन सरकारने मुदतवाढ दिली आहे.  मात्र, मुंबईसह इतर शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये वाहनधारकांनी अजूनही पाट्या लावल्याचं दिसून येत नाही. शासनाने या आधी देखील दोन वेळा मुदतवाढ दिली होती. परंतु अजूनही काही वाहनधारक नंबर प्लेट बसवत नसल्याचं दिसून येत आहे. 

HSRP म्हणजे काय?

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही खास प्रकारची नंबर प्लेट आहे. जी बनावट नंबर प्लेट्स व वाहन चोरी रोखण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 1 एप्रिल 2019 पूर्वी विकली गेलेली सर्व वाहने ज्यामध्ये दुचाकी, चारचाकीसह इतर सर्व वाहनांना ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे. 

सरकारने दिलेल्या मुदतीनंतर जर वाहनावर HSRP नंबर प्लेट नसेल तर त्या वाहनधारकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर वाहनधारकांनी आपल्या वाहनांवर ही नंबर  प्लेट बसवावी असं आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात येत आहे. 

महाराष्ट्रासह इतर राज्यात किती दर? 

यामध्ये दुचाकीसाठी इतर राज्यामध्ये जीएसटी वगळून 420 ते 480 रुपये इतका दर आहे. तर राज्यात हाच दर 450 रुपये इतका आहे. तीनचाकी वाहनांसाठी इतर राज्यात 450 ते 550 इतका दर आहे तर महाराष्ट्रात हाच दर 500 रुपये इतका आहे. चारचाकी वाहनासाठी इतर राज्यांमध्ये 690 ते 800 रुपये इतका दर आहे. हाच दर महाराष्ट्रात जीएटसी वगळून 745 रुपये इतका आहे. 





Source link

भीषण अपघात! देवगड तालुक्यात रिक्षाचा ताबा सुटून एसटीवर धडकली, 4 ठार

भीषण अपघात! देवगड तालुक्यात रिक्षाचा ताबा सुटून एसटीवर धडकली, 4 ठार


उमेश परब, झी मीडिया, देवगड : सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. देवगडमधील नारिंगरे येथे बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक प्रवासी बचावला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विजयदुर्ग मालवण एसटी बस नारिंगरे येथे आली असता समोरून येणाऱ्या रिक्षा चालकाचा ताबा सुटून त्याची धडक एसटी बसला बसली. अपघात एवढा भीषण होता की या अपघातात रिक्षाचा चकाचूर झाला आहे. रिक्षातून प्रवास प्रवासी मध्य धुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नारिंगरे इथे दुपारच्या सुमारास ही घटना घडली. देवगड तालुक्यातील नारिंगरे मार्गावर भरधाव ऑटो रिक्षाने एसटी महामंडळाच्या बसला समोरून धडक दिली.  विजयदुर्ग मालवण एसटी बस नारिंगरे इथं आली असता समोरून येणाऱ्या रिक्षा चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर रिक्षा हा थेट एसटी बसवर धडकला.

हा अपघात एवढा भीषण होता की,  या अपघातात रिक्षाचा चकाच्चूर झाला आहे. रिक्षातून प्रवास करणारे प्रवासी हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात घटनास्थळावर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण सुखरूप बचावला आहे. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.





Source link

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी ब्रेंकिंग न्यूज! शिवसेना मनसे युतीबाबत उद्धव ठाकरे यांचे जाहीर सभेत स्पष्ट संकेत; महाराष्ट्राच्या मनात असेल ते…

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी ब्रेंकिंग न्यूज! शिवसेना मनसे युतीबाबत उद्धव ठाकरे यांचे जाहीर सभेत स्पष्ट संकेत; महाराष्ट्राच्या मनात असेल ते…


Uddhav Thackeray Raj Thackeray alliance  Shivsena Foundation Day : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार का? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे.  शिवसेना मनसे युती होणार अशी चर्चा महाराष्ट्राच्या रंगली आहे. मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबात सकारात्मक चर्चा देखील सुरु आहेत.अशातच शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मुंबईत आयोजीत करण्यात आलेल्या जाहीर मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मनसे युतीबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. 

वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजीत मेळाव्यता बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी मनसे शिवसेना युतीबाबत एक सूचक वक्तव्य केले. काय होणार की नाही ते कळेल… जे राज्याच्या मनात आहे ते मी करेन असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मनसे युतीबाबत सकारात्मक विधान केले आहे.  महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होऊ नये यासाठी  मालकाचे नोकर गाठीभेटी घेतायत. मुंबईचा ताबा आम्ही घेणारच आहोत असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. 

मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे अजूनही सकारात्मक आहे. जनतेच्या मनात आहे तेच करणार असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी युतीसंदर्भात एक मोठं विधान केलंय. मराठी माणसांची शक्ती एकत्र येत असल्यामुळे त्यांच्याकडून भेटीगाठी सुरू आहेत. तसंच ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचा आरोप यावेळी उद्धव ठाकरेंनी केला आहे.

मागील काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून युतीसंदर्भात सकारात्मक वक्तव्य येताहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार असी अटकळ बांधली जात आहे. नुकतीच मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युतीसाठी सकारात्मक पाऊल उचलल्याची माहिती मिळतेय.. मनसेसोबत युती करायची की नाही असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी या बैठकीत माजी नगरसेवकांना विचारला. यावेळी युती केली तर फायदा होईल, कारण मुंबईत युतीसंदर्भात अनुकूल वातावरण आहे अशी माहिती माजी नगरसेवकांनी ठाकरेंना दिली.

युतीबाबत अद्याप उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये थेट चर्चा झालेली नाही. नातेवाईकांच्या माध्यमातून दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे. मनपा निवडणुकीआधी दोन्ही भावांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे समजते. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी दोन्ही पक्षांतील नेतेही सकारात्मक असल्याचा पाहायला मिळतंय. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी नातेवाईकांनी सुरू केलेल्या प्रयत्नांवर आता ठाकरेंच्या शिवसेनेत्या नेत्यांनीही सकारात्मक प्रतिक्रीया दिली.

दरम्यान, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मनसे आणि ठाकरे गटाची युती भाजपचे वरिष्ठ नेते होऊ देणार नाहीत असं ठाकरे गटाच्या काही नेत्यांना वाटतं असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर सत्ताधारी महायुतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. 100 टक्के महापालिका आणि जिल्हा परिषद ताब्यात घेण्याची भाजपची रणनीती आहे.  विशेषतः यांत भाजप आक्रमक दिसून येत आहे. 

 





Source link

महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार! कोल्हापुरात पुरुष आणि महिलेकडून स्मशानभूमीत नग्न पूजा

महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार! कोल्हापुरात पुरुष आणि महिलेकडून स्मशानभूमीत नग्न पूजा


Kolhapur Crime News : पुरोगामी, प्रगत कोल्हापुरात जादुटोण्याचा भयंकर प्रकार घडला. रात्रीच्या अंधारात पंचगंगा घाटावर  मांत्रिकाकडून भूत काढण्याचा अघोरी प्रकार घडला. ही घटना ताजी असतानाच असाच आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कोल्हापुरात पुरुष आणि महिलेकडून स्मशानभूमीत नग्न पूजा करण्यात आली. .या अघोरी प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अद्याप कोणावर कारवाई झालेली नाही.

कोल्हापूर जिल्ह्यातील उदगावच्या स्मशानभूमीत अघोरी कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महिला आणि पुरुषाकडून भरदिवसा नग्न होऊन करणी, भानामतीचे प्रकार सुरू आहेत. हे सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या प्रकारामुळे उदगाव आणि जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली आहे. 

 जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उदगाव वैकुंठधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व नातेवाईक वैकुंठधाम या ठिकाणी आले. मात्र, अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी रक्षा बाजूला करून काळी बाहुली, नारळ, नावाची चिठ्ठी लिहून भानामतीचा प्रकार केला होता. यानंतर नातेवाईकांनी उदगाव ग्रामपंचायतकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. यामध्ये महिला आणि पुरुषाकडून नग्न होऊन करणी, भानामतीचा प्रकार सुरू असल्याचे समोर आलं. मात्र, पुरुष आणि महिला वेगवेगळ्या वेळी वैकुंठधाम आलेचे दिसून आले. अमावस्या, पौर्णिमा, शनिवार, बुधवार दिवशी भरदिवसा ही अघोरी पूजा होत असल्याचे समोर आलं. या घटनेनंतर आता उदगाव ग्रामपंचायतकडून तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत आजवर कधीच अंधश्रद्धेला स्थान मिळालं नाही. पण गेल्या काही वर्षात भोंदूगिरीचे अनेक प्रकार कोल्हापुरात घडत आहेत. या भोंदूगिरीला कोल्हापुरातील अनेक सर्वसामान्य नागरिक बळी पडत आहेत.त्रीच्या अंधारात पंचगंगा घाटावर मांत्रिकाकडून पिडीत महिलेला झपाटलेला भूत काढण्याचा विधी केला जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. 

 





Source link