भाजपने काँग्रेसची चूक पुन्हा करू नये….नितीन गडकरींनी आपल्याच पक्षाला का दिला इशारा?

भाजपने काँग्रेसची चूक पुन्हा करू नये….नितीन गडकरींनी आपल्याच पक्षाला का दिला इशारा?


Nitin Gadkari Warn BJP Party Workers: भाजपने काँग्रेससारख्या चुका करू नयेत, काँग्रेस करत होती तेच आपण करत राहिलो तर फायदा नाही असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलंय ते गोव्यामध्ये बोलत होते.  भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. यावेळी त्यांनी आपल्याच पक्षाबाबत मोठं विधान केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. काय म्हणाले गडकरी? सविस्तर जाणून घेऊया.

काँग्रेसच्या चुकांमुळेच भाजपला निवडून दिलंय

भाजप एक वेगळ्या विचारसरणीचा पक्ष असून, त्यामुळेच तो वारंवार जनतेचा विश्वास जिंकत आहे.मात्र, ज्यामुळे लोकांनी काँग्रेसला सत्तेबाहेर काढलं, त्याच चुका आपण करत राहिलो तर काँग्रेसला सत्तेतून जाण्यात आणि आपण सत्तेत येण्याला काही अर्थ राहत नाही.काँग्रेसच्या चुकांमुळेच भाजपला निवडून दिलंय असं गडकरी म्हणालेत.

‘काँग्रेसच्या चुकीची पुनरावृत्ती नको’

गडकरी म्हणाले की, काँग्रेस जे करत होती तेच करत राहिलो तर सत्तेतून जाण्यात आणि आम्ही सत्तेत येण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे काँग्रेसने जी चूक केली तीच चूक भाजपने करू नये, त्यामुळे त्यांना बाहेर व्हावे लागले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याच पक्षाबाबत (भाजप) मोठे विधान केले आहे. भाजपने काँग्रेसच्या चुकीची पुनरावृत्ती करू नये, असे ते म्हणाले आहेत. गडकरी म्हणाले की, भाजप हा वेगळ्या विचारसरणीचा पक्ष आहे, त्यामुळेच तो वारंवार जनतेचा विश्वास जिंकत आहे.काँग्रेस जे करत होती तेच करत राहिलो तर त्यांच्या सत्ता सोडण्यात आणि आमच्या येण्यात काही अर्थ नाही. गडकरी पुढे म्हणाले की, काँग्रेसने जी चूक केली तीच चूक भाजपने करू नये, त्यामुळे सत्तेतून बाहेर पडावे लागले.काँग्रेसच्या चुकांमुळेच लोकांनी भाजपला निवडले, असे नागपूरचे लोकसभा खासदार गडकरी म्हणाले. 

भ्रष्टाचारमुक्त देश बनवण्यासाठी योजना हवी 

भ्रष्टाचारमुक्त देश बनवायचा आहे आणि त्यासाठी योजना आखली पाहिजे. ते म्हणाले की, राजकारण हे सामाजिक आणि आर्थिक सुधारणा घडवून आणण्याचे माध्यम आहे, हे आगामी काळात कार्यकर्त्यांनी जाणून घेतले पाहिजे. गोव्यातील पणजी येथे झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत गडकरी यांनी या गोष्टी सांगितल्या

भाजप एक वेगळ्या विचारसरणीचा पक्ष 

भाजप एक वेगळ्या विचारसरणीचा पक्ष असून, त्यामुळेच तो वारंवार जनतेचा विश्वास जिंकत आहे.मात्र, ज्यामुळे लोकांनी काँग्रेसला सत्तेबाहेर काढलं, त्याच चुका आपण करत राहिलो तर काँग्रेसला सत्तेतून जाण्यात आणि आपण सत्तेत येण्याला काही अर्थ राहत नाही.असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी भाजप नेत्यांना दिला.





Source link

जळगाव हादरलं! मध्यवर्ती कारागृहात धक्कादायक प्रकार, गृहमंत्री फडणवीसांच्या राजीमान्याची मागणी

जळगाव हादरलं! मध्यवर्ती कारागृहात धक्कादायक प्रकार, गृहमंत्री फडणवीसांच्या राजीमान्याची मागणी



Jalgoan Crime News : भुसावळ येथील माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात यांच्या हत्याकांडातील आरोपी सध्या जळगाव मध्यवर्ती कारागृहात आरोपींमध्ये अंतर्गत वादातून त्याची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यावरून आता जिल्ह्यातील राजकारण तापले असून ठाकरेंच्या सेनेचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी पोलीस अधीक्षक जेलर आणि या सर्वांची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.



Source link

IAS Pooja Khedkar Case: थेट पंतप्रधान कार्यालयाकडून दखल; महाराष्ट्र सरकारचं टेन्शन वाढलं

IAS Pooja Khedkar Case: थेट पंतप्रधान कार्यालयाकडून दखल; महाराष्ट्र सरकारचं टेन्शन वाढलं



IAS Pooja Khedkar Case: महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशामध्ये सध्या आयएसएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आहेत. असं असतानाच आता या प्रकरणामध्ये थेट दिल्लीने लक्ष घातल्याचं दिसत आहे.



Source link

'ऑडी'वाल्या कलेक्टरीण! खासगी कारवर अंबर रंगाचा दिवा लावून मिरवणं पूजा खेडकर यांना भोवलं

'ऑडी'वाल्या कलेक्टरीण! खासगी कारवर अंबर रंगाचा दिवा लावून मिरवणं पूजा खेडकर यांना भोवलं



Pooja Khedkar :  IAS अधिकारी पूजा खेडकर यांना भोवलंय. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पूजा खेडकर यांची बदली करण्यात आलीये. आता पोलिसांनाही त्यांना दणका दिलाय.



Source link

मराठा आरक्षणावरून विधिमंडळात रणकंदन; सत्ताधाऱ्यांचा गोंधळ, मार्शल्स बोलावण्याची वेळ!

मराठा आरक्षणावरून विधिमंडळात रणकंदन; सत्ताधाऱ्यांचा गोंधळ, मार्शल्स बोलावण्याची वेळ!


Maratha Reservation : राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात बुधवारी जोरदार गदारोळ झाला. विधानसभा आणि विधानपरिषदेतही मराठा ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधी आमदार आमनेसामने आले. निमित्त ठरलं ते राज्य सरकारनं आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीनं घातलेला बहिष्कार… मविआच्या नेत्यांनी बैठकीला दांडी मारल्यानं बुधवारी कामकाज सुरू होताच सत्ताधारी आमदारांनीच गोंधळाला सुरूवात केली. या गदारोळामुळं विधानसभा तब्बल 4 वेळा तहकूब करण्यात आली. शेवटी अडीच वाजता दिवसभरासाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्याची वेळ अध्यक्षांवर आली. 

मराठा आरक्षण बैठकीला विरोधक का आले नाहीत. त्यांचा बोलवता धनी कोण?, असा सवाल आमदार आशिष शेलारांनी यावेळी केला. तर सरकारकडून मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला. 

सत्ताधारी मराठा समाजाला आरक्षणावरुन झुलवत ठेवत असल्याचा गंभीर आरोप विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय. सरकारमधील नेते छगन भुजबळ दोन समाजात वाद लावण्याचा प्रयत्न करतात. उपमुख्यमंत्री फडणवीस एक बाजू सांभाळतात आणि मुख्यमंत्री दुसरी बाजू सांभाळतात.. असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय. गरज होती तेव्हा आम्हाला विश्वात घेतलं नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

विधानपरिषदेतही आरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण तापलं. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गोंधळ एवढा वाढला की, मार्शल्सना बोलवण्याची वेळ उपसभापती नीलम गोऱ्हेंवर आली. तरीही गोंधळ थांबेना. अखेर परिषदेचं कामकाजही तहकूब करण्यात आलं.

कोणत्याही समाजावर अन्याय व्हायला नको अशी भूमिका सरकार आणि विरोधक नेहमीच मांडतात. मात्र आरक्षणाचा राजकीय तिढा काही संपत नाही. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतच राहतात. या सगळ्यामध्ये राज्यातील सामाजिक वीण कुठेतरी सैल पडताना दिसतेय आणि ते पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारं नाहीय.

दरम्यान, एकही कुणबी नोंद रद्द केली तर विधानसभा निवडणुकीत तुमचे 288 आमदार पाडून टाकू असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिलाय. तसंच कुणबी नोंद रद्द झाल्यास राज्यातील सगळे रस्ते जाम करु अशा इशाराही त्यांनी दिलाय. मनोज जरांगे पाटलांची जनजागृती शांतता रॅली धाराशिवमध्ये पोहोचली. इथे आयोजित सभेत जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर घणाघाती टीका करत हा इशारा दिला. 





Source link

फास्ट ट्रॅक नाही फिश ट्रॅक… मुंबई लोकलच्या ट्रॅकवर माशांचं आऊटींग! अविश्वनीय Video पाहाच

फास्ट ट्रॅक नाही फिश ट्रॅक… मुंबई लोकलच्या ट्रॅकवर माशांचं आऊटींग! अविश्वनीय Video पाहाच


Fish Swimming On Local Train Tracks: केवळ महाराष्ट्रातच नाही तर मागील काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक राज्यांना धुवाँधार पावसाने झोडपलं आहे. महाराष्ट्राबरोबरच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारसहीत अनेक राज्यांमधील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अनेक राज्यांमधील नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. बिहारसारख्या राज्यामध्ये तर नदीवरील पूल पडण्याच्या एकामागून एक अनेक घटना घडल्यात. काही ठिकाणी कंबरभर पाण्यातून वाहनांना मार्ग काढावा लागथ आहे. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये रेल्वे ट्रॅकवर चक्क मासे पोहताना दिसत आहेत. 

ट्रॅकमध्ये पोहणारे मासे

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये दोन रुळांदरम्यान साचलेल्या पाण्यामध्ये काही सापासारखे दिसणारे लांबलचक मोठ्या आकाराचे मासे पोहत असल्याचं दिसत आहे. आता हा व्हिडीओ काहीजण कल्याणचा म्हणत आहेत तर काहीजण डोंबिवलीचा म्हणत आहेत. पण हा व्हिडीओ नेमका कुठला हे ठामपणे सांगता येत नसलं तरी हा व्हिडीओ व्हायरल झालाय हे मात्र खरं. 

महिला प्रवाशांच्या गप्पा

हा व्हिडीओ काही महिला प्रवाशांनी शूट केल्याच्या व्हिडीओमधील आवाजावरुन स्पष्ट होत आहे. एक महिला दुसरीला व्हिडीओ काढ असा सल्ला देत असतानाच दुसरी व्हिडीओच काढतेय असं सांगताना ऐकू येतं. त्यानंतर या महिला हे मासे नदीच्या पाण्यातून आले असतील. त्यांना कळत नाहीये ते कुठे आहेत. ट्रॅकवर हरवलेत. कसे सुस्तावले बघ, अशी वाक्य या महिलांच्या संवादामध्ये ऐकू येत आहेत. हा व्हिडीओ 8 जुलै रोजीचा म्हणजेच सोमवारचा आहे. याच दिवशी मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला होता. ज्यामुळे अनेक ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. तुम्हीच पाहा व्हायरल झालेले हे व्हिडीओ…

1)

2)

3)

4)

आता हे मासे ट्रॅकवर कसे आणि कुठून आले यासंदर्भातील वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. दरम्यान, हे मासे चिवण्या नावाने ओळखले जाणारे मासे असल्याचं सांगितलं जात आहे. याच माशांना ‘चढणीचे मासे’ किंवा ‘उद्धवनीचे मासे’ असंही म्हणतात.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp