शिंदे गटाच्या आमदाराचा प्रताप, 'लाडक्या लेका'ला तलवारीच्या टोकाने भरवला केक
MLA Sanjay Gaikwad Cacke Cutting Controversy:
Source link
MLA Sanjay Gaikwad Cacke Cutting Controversy:
Source link
Shocking News in Pune : पुण्यातील हडपसर इथल्या एका नामांकित शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रतापामुळे एकच खळबळ उडालीय. विद्यार्थ्यांनी मिळून आपल्या वर्गातील मैत्रिणींचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दहावीच्या वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या मैत्रिणींचे फोटो टेलिग्राम या ॲपवर अपलोड करून त्याला न्यूड फोटोमध्ये (Nude photos) मॉर्फ (Morph) केले. या दोन विद्यार्थ्यांनी मॉर्फ केलेले फोटो शाळा सोडून गेलेल्या त्यांच्या मित्राला पाठवले. शाळेतील एका शिक्षिकेच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांना याबाबतची माहिती देण्यात आली..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार 16 जून ते 30 जून दरम्यान पुण्यातील हडपसर (Hadapsar) भागातील असलेल्या एका नामांकित शाळेत घडला. पिडीत विद्यार्थिनी आणि ताब्यात घेतलेले 2 विद्यार्थी हे इयत्ता दहावीमध्ये शिकत असून एकाच वर्गात आहेत. तर ताब्यात घेतलेला तिसरा मुलगा हा शाळा सोडून गेला असला तरी शाळेतील मित्रांच्या संपर्कात होता. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी (Pune Police) सर्व अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून त्यांना बाल न्याय मंडळात हजर करण्यात आलं.
या प्रकारानंतर 3 पैकी एका पिडीत विद्यार्थिनीच्या आईनं सदर विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल केली.. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकारातून मुलांकडून इंटरनेटचा आणि मोबाईलचा कसा दुरुपयोग केला जातो हे अधोरेखित होतंय. मुलांच वय अल्लड असतं. मोबाईलवरील इंटरनेटचा अतिवापर मुलांच्या मानसिकतेला धक्का पोहोचवतोय. त्यामुळे पालकांनी मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं मत चाइल्डलाईनकडून व्यक्त करण्यात आलंय..
हडपसर मधील या धक्कादायक प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्यांवर पालकांनी लक्ष ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. आपली मुलं मोबाईलवर काय पाहातात, कोणते गेम खेळतात, कोणाशी बोलतात? या बारीक सारीक गोष्टीवर पालकांचं लक्ष असायला हवं.
मोबाईलचा दुष्परिणाम
सध्याच्या काळात लहान मुलं मोबाईलच्या प्रचंड आहारी गेल्याचे चित्र घरोघरी बघायला मिळते. उठता, बसता, जेवताना देखील मुलांना मोबाईल हातात लागतो, त्यातल्या त्यात किशोरवयीनांमध्ये मोबाईल गेम खेळाची क्रेझ आहे. मोबाईलचा हा मुलांकडून होणारा अतिवापर पालकांसाठी मोठी डोकेदुखी (Headache) ठरत असून, खेळ आणि अभ्यासात दुर्लक्ष, विविध आजार, सायबर गुन्हेगारी अशा गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.
Kalyan Crime News: कल्याण तालुक्यातील वरप गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दादर स्थानकात सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्यानंतर आता वरप येथेही बॅगेत मृतदेह आढळला आहे. एका अज्ञात व्यक्तीचा मृतेदह बॅगेत भरुन कचरा कुंडीत फेकून देण्यात आला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वरप परिसरातील गावदेवी मंदिर भागात स्थानिकांना ही बॅग दिसली होती. त्यानंतर रहिवाशांना संशय आल्याने त्यांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी ही बॅग उघडून बघितली तेव्हा त्यांनादेखील धक्काच बसला. या बॅगेत एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह होता. अज्ञात मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
वृद्ध व्यक्तीची हत्या करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ही बॅग कचऱ्यात फेकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कल्याण ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून या संदर्भात तात्काळ तपास सुरू केला आहे .तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि डॉग स्कॉडने हा परिसर पिंजून काढला आहे.
दरम्यान ही व्यक्ती कोणाच्या ओळखीची असेल किंवा मिसिंग असेल तर तात्काळ पोलिसांसोबत संपर्क साधावा, असा आवाहन करण्यात आलंय. अंगाने मध्यम बांधा असलेल्या सावळ्या रंगाच्या या वृद्धाची उंची साधारण 5 फूट 5 इंच इतकी आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. तसंच, या वृद्धाच्या परिचितांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असं अवाहनदेखील करण्यात आलं आहे.
पोलिसांनी वृद्धाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. तसंच, वृद्धाची हत्या कोणी केली याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासून ही सुटकेस कोणी टाकली याचा शोध घेतला जात आहे.
दादर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ११ येथे एक अनोळखी व्यक्ती एक मोठी ट्रॉली बॅग घेऊन जात होता. गस्तीवर असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोषकुमार यादव यांना त्याच्याव संशय आल्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीला थांबवून त्याची बॅग तपासली असता त्यात रक्ताने माखलेला मृतदेह होता. तपासणी तो मृतदेह अर्शद अली सादीक अली शेख (३०) याचा असून तो सांताक्रुझ कलिना परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून दोघे आरोपी मुकबधिर आणि अपंग आहेत. त्यांनीच पायधुनी येथे मित्र अर्शद खान याची हत्या करुन मृतदेह बॅगेत टाकला, असे समोर आले आहे. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते तुतारी एक्स्प्रेसमधून नेत होते. प्रवासात एखाद्या पुलावरुन ही बॅग ढकलण्याचा त्यांचा प्लान होता
Ajit Pawar : अजित पवार यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौफ्यस्फोट केले आहेत. अजित पवार यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना दिलेली उमेदवारी कुटुंबासाठी चुकीची होती. कुटुंबासाठी हा निर्णय चुकीचा होता. कारण पवार कुटुंबातीलच व्यक्ती हरणार आणि जिंकणार होती. बारामतीच्या निकालाला मीच जबाबदार आहे. सुप्रिया सुळेंविरोधात पत्नीला उभं करणं ही माझी चूक होती. असं अजित पवार म्हणाले.
सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय कोणाचा?
सुनेत्रा यांना उभ करणं कुटुंबाच्या दृष्टीने योग्य नव्हतं. बारामतीतून उमेदवार देण्यासंदर्भात माझ्यावर महायुतीतून कोणताही दबाव नव्हता. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय हा संसदीय समितीचा होता. असं अजित पवार म्हणाले.
सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड
बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेत बिनविरोध निवड झाली.
शरद पवारांसोबत पुन्हा जाणार का?
राजकारणातील सर्व निर्णय माझेचं असतात. शरद पवार यांच्यासोबत जाणार का असा प्रश्न विचारल्यावर अजित पवार यांनी ‘नो कमेंट’ असं उत्तर दिलं. 1991 मध्ये माझा राजकारणात प्रवेश झाला. माझ्यानंतर येऊन फडणवीस, शिंदे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ असणं महत्त्वाचं असते. कधीही निवडणूक न लढवलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे महायुतीकडून आम्ही विधानसभा लढवणार. असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
ड्रायव्हर भरतीची… पण ही भरती होणाराय थेट जर्मनीमध्ये… तुम्हालाही जर्मनीत जाऊन ड्रायव्हर बनायचं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी.
Source link
Job News : नोकरीच्या शोधात असणारी अनेक मंडळी बऱ्याचदा मनाजोग्या संधीच्या प्रतीक्षेत असतात. काही मंडळी ही संधी मिळेपर्यंत पर्यायी नोकरी करण्याला प्राधान्य देत करिअरच्या वाटांवरील प्रवास सुरू करतात. या साऱ्यामध्ये नोकरीच्या परदेशी संधींची भलतीच हवा असते. चांगला पगार, चांगल्या सुविधा आणि तितक्याच चांगल्या सवलती या आणि अशा अनेक कारणांनी परदेशातील नोकरीचा अनेकांनाच हेवा वाटतो. अशीच एक संधी महाराष्ट्रातील अनेकांसाठीच चालून आली आहे.
महाराष्ट्रातील कुशल चालकांसाठी ही संधी असून आता ते थेट जर्मनीला जाऊ शकतात. राज्य शासनाकडून यासाठीची सोय करण्यात येणार असून, आता राज्यातील परिवहन विभाग चांगल्या चालकांचा शोध घेणार आहे.
25 फेब्रुवारीला जर्मनीतील बाडेन-युटेनबर्ग या राज्यासोबत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतचा एक सामंजस्य करार करण्यात आला. ज्यामध्ये वाहनचालकांचाही समावेश आहे.
शासननिर्णयानुसार मनुष्यबळ पुरवण्याबाबतच्या या प्रकल्पाच्या अनुषंगाने यंत्रणा, प्रशिक्षण व्यवस्थेसह कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी आता शासन मान्यता मिळाली आहे. त्याशिया यासाठी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि तांत्रिक समित्याही गठित करण्यात आल्या आहेत.
राज्यातील उमेदवारांना गरजेनुसार त्यांच्या कौशल्याला अधिक वाव देण्यासाठीचं अतिरिक्त प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेडनिहाय तांत्रिक समिती गठीत करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली वाहनचालक (बस, रेल्वे, ट्रक, हलकी, जड वाहनं) या ट्रेडसाठीची समिती सज्ज असेल. दरम्यान या प्रक्रियेमध्ये पुढे जिल्हास्तरावर सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सर्व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करत इच्छुक उमेदवार शोधण्यात येतील.
या प्रकल्पाअंतर्गत जर्मनीमध्ये नोकरीसाठी जायला इच्छुक असणाऱ्या वाहनचालकांनी शासनानं जारी केलेला QR Code स्कॅन करुन त्यावर दिलेला अर्ज भरावा.
सदर उपक्रमाअंतर्गत उमेदवाराला जर्मन भाषा येणं अनिवार्य असून, जर्मन भाषा प्रशिक्षणाबाबतची कार्यवाही ही शासनामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळं शासननिर्णयानुसार या उमेदवारांचा सर्व खर्च राज्य शासनच करणार आहे.
इच्छुक उमेदवारानं भारतासह जर्मनीतील वाहनचालन नियमांबाबच महत्त्वाचं प्रशिक्षण घेणं अपेक्षित असेल. त्यामुळं राज्य शासनाकडूनच याबाबतची कार्यवाही आणि खर्च करण्यात येणार असल्याची नोंद घ्यावी.