तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर, कोल्हाटी समाजाच्या अमितची प्रेरणादायी कहाणी

तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर, कोल्हाटी समाजाच्या अमितची प्रेरणादायी कहाणी


IAS Amit Kale Success Story:   एमपीएससी, यूपीएससी उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत रुजू होणाऱ्यांच्या यशाच्या कहाण्या आपण वाचतो. या सर्वांनी अपार मेहनतीने हे यश मिळवलंय. त्यांतील अनेकांच्या वाट्याला तर कायमचा संघर्ष आलाय. पण संघर्षावर मात करत आपल्या शिक्षणाशी प्रामाणिक राहत त्यांनी हे यश मिळवलंय. अनेक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या यशाच्या कहाण्या आपण झी 24 तासच्या सक्सेस स्टोरीच्या सदरातून वाचत आलोय. त्यात आजची ही कहाणी खास आहे. ही कहाणी महाराष्ट्राच्या लेकाची आहे. ही कहाणी एका तमासगिरीणीच्या पुत्राची आहे. ही कहाणी म्हणजे लाखो लोककलांवतांची मान अभिमानाने उंचावणारी आहे. ही कहाणी अमित माने यांची आहे. 

अमित माने हे आयएएस अधिकारी आहेत. इथपर्यंत पोहोचण्यापर्यंतची त्यांची वाट खूप खडतर होती. लोककलाकाराच्या घरात त्यांचा जन्म झाला. बहुतांश लोककलाकारांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य नसतं. ना कधी सरकार दरबारी त्यांना मान सन्मान मिळत, ना कधी आपल्या कलेचा योग्य मोबादला मिळत. अशा परिस्थितीत ते आपली कला लोकांसमोर सादर करत असतात. लोककलेची पंरपरा पुढे नेत असतात. अशा परिवारात जन्म घेऊन आयएएस अधिकारी बनण्यापर्यंत मजल मारणं यामुळे अमित यांचं यश खास आहे. अमित यांनी घुंगरांचा आणि ढोलकीचा आवाज लहानपणापासूनच ऐकला.कोल्हाटी समाजात त्यांचा जन्म झाला.  तमाशाच या समाजाचे जग आहे, तमाशालाच हा समाज आपली पंढरी मानतो. आजुबाजूला शिक्षणासाठी पोषक वातावरण नसताना अमित माने यांनी यूपीएससी उत्तीर्ण केली. 

तमाशाच्या कमाईतून उदरनिर्वाह

राजश्री काळे या तमाशा कलावंतीण म्हणून आपली कला सादर करत. गावोगावी जाऊन कला सादर करत मिळालेल्या कमाईतून आपला उदरनिर्वाह त्या भागवत असत. त्या नगरच्या राहणाऱ्या आहेत. लोककलेवर त्यांचे अतिशय प्रेम. लोककला त्यांच्या अंगात अक्षरश: भिनली होती. लावणी कला जिवंत ठेवण्यासाठी त्या नगरमधल्या सुप्यात कालिका कला केंद्र चालवायच्या. व्यवसायानं तमाशा कलावंत असलेल्या राजश्री यांच्या पोटी अमोल यांचा जन्म झाला. तमाशा कलावंतीणीच्या पोटी जन्मलेला हा पोरगा भविष्यात आपल्या आईसह जिल्ह्याचं नाव रोशन करेल, असे फार कमी जणांनाच वाटले असेल. तमाशाच्या वातावरणात अमित काळेंचे शिक्षण पूर्ण झाले. तमाशाच्या सुपारीसाठी अमित यांच्या आईला गावोगावी फिरावं लागायचं. त्यात पोराबाळांची परवड होत असे. शिक्षणाचा तर मागमूसही नसायचा. कळत्या समजत्या वयाचा झाल्यावर आमितची ढोलकीशी सलगी नको, म्हणून राजश्री यांनी काळजावर दगड ठेवत पोटच्या मुलाला शिक्षणासाठी पुण्यात ठेवलं होतं.

कोल्हाटी समाजाचं नाव उंचावलं

अमितच्या शिक्षणाचा आणि हॉस्टेलचा खर्च सगळं राजश्री यांनी उचलला. लहानपणापासून मुलाला चांगले संस्कार दिला. तुला कलेक्टर व्हायचंय, हे ध्येय त्यांनी अमित यांच्या डोळ्यासमोर ठेवलं. अमित यांनादेखील परिस्थितीची जाणीव होती. त्यांनी यूपीएससी परीक्षेचा मन लावून अभ्यास केला. दिवस रात्र एक करुन मेहनत घेतली.कोल्हाटी समाज हा तसा कायमच शिक्षणापासून दूर राहिला आहे. त्यामुळे समाजाला त्यांच्या यशाचं खूप मोठं कौतुक आहे. आयएएस बनून कोल्हाटी समाजाचं नाव आणखी उंचावलं.   

माऊलीच्या कष्टाचं चीज

अमित काळे यांच्या आई राजश्री आजही नगर – पुणे रस्त्यावर कालिका कला केंद्र चालवतात. तिथे रोज संगीत बारी होते. लावणी-सम्राज्ञी म्हणून राजश्री यांना गौरवण्यात आलं. पण आज यूपीएससीतल्या यशस्वी वीर अमितची आई हा गौरव तिला जास्त मान मिळवून देतोय. या माऊलीनं याच दिवसासाठी  केला होता अट्टाहास…  तिच्या कष्टांची आज फुलं झाली आहेत.





Source link

संघाच्या मैदानात अजित पवार दक्ष! माजी प्रमुखांच्या समाधीस्थळावर न जाता थेट निघून गेले

संघाच्या मैदानात अजित पवार दक्ष! माजी प्रमुखांच्या समाधीस्थळावर न जाता थेट निघून गेले


पुढील
बातमी

बारामतीच्या राजकारणात लक्षवेधी घडामोड; जय पवार आणि युगेंद्र पवार कुस्तीच्या आखाड्यात





Source link

हाकेंच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा, 'तुम्ही असं बोलतात तर माझे कार्यकर्ते…'

हाकेंच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा, 'तुम्ही असं बोलतात तर माझे कार्यकर्ते…'


NCP Ajit Pawar: विधानसभा निवडणूक तोंडावर असताना महायुतीत सारंकाही अलबेल नसल्याचे चित्र दिसतंय. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठकीनंतर बाहेर येऊन उलटी होते, असे विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी केले होते. यानंतर भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबतची युती दुर्देवी होती, हा असंगाशी संग असल्याची टीका केली. यामुळे महायुतीतील नेते, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरणं आहे. या सर्वावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लाडकी बहीणच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपुरात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसमान यात्रा आज थेट काटोल विधानसभा मतदार संघात धडकणार आहे. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी 2019 मध्ये काटोल मतदारसंघ राष्ट्रवादी करता जिंकला होता. 

काय म्हणाले अजित पवार?

माझं बोलणं पंतप्रधान मोदी, केंद्रीय  अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाले आहे. तुम्ही जर असे बोलत बसलात तर माझे कार्यकर्तेदेखील प्रतिक्रिया देत राहतील. हाकेंच्या बोलण्याला काही अर्थ नाही. माझं माझं काम सुरु आहे. या उत्तरांना मी महत्व देत नाही, असे ते म्हणाले. 

दुर्दैवाने अजित पवारांच्या गटाशी युती झालीय. आता भाजप आणि राष्ट्रवादीतील  अजित पवार गटाशी युती म्हणजे असंगाशी संग, असा टोला गणेश हाकेंनी लगावलाय. अजित पवार गटाने युती धर्म पाळला का? भाजपच्या खासदाराला पाडल्याचाही आरोप हाकेंनी अजित पवार गटावर केलाय.यामुळे महायुतीच्या आमदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालंय. दुर्देवाने आमच्या सोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती आहे. ही युती ना आम्हाला पटली, ना आम्हाला पटली,असे ते म्हणाले. गणेश हाके हे भाजप प्रदेश प्रवक्ते असल्याने त्यांचे विधान गांभीर्याने घेतले जात आहे. 

राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया?

हे गणेश हाके यांचे वैयक्तिक मत आहे. त्यांना तिकिट हवं होतं. ते न मिळाल्याने हाके उद्वीग्न झाले असतील. गणेश हाकेंना विचारुन महायुती ठरली नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिली आहे. महायुतीचा धर्म पाळण्याची जबाबदारी एकट्या राष्ट्रवादीची नाही. विधानसभेला तिकिट न मिळाल्याने अशी वाचाळवीरासारखी वक्तव्ये करु नये, असे आवाहन त्यांनी हाकेंना केले. महायुतीमध्ये आम्ही काम करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जमिनीवर उतरुन काम करतोय. आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळतो. त्यामुळे यांच्या पोटात दुखतय. वरिष्ठ पातळीवर विधान होतील तेव्हा जशास तसं उत्तर दिली जातील. आपले आमदार आहेत तिथे भाजपला किती मतं मिळाली? याचे हाकेंनी आत्मचिंतन करावं. उगीच अशी विधाने करुन गोंधळ निर्माण करु नये असे सुरज चव्हाण म्हणाले. 

काटोल विधानसभेत राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमनेसामने?

मात्र राष्ट्रवादीतील फाटाफुटी नंतर ही जागा महाविकास आघाडीत पुन्हा एकदा अनिल देशमुख लढवतील अशी चिन्हं आहेत. तर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट  या जागेसाठी आग्रही  आहेत.. अजित पवार आज जनसमान यात्रेच्या निमित्ताने काटोल येथे कृषी उत्पन्न बाजार समिती महिला आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. तसेच तिथे बाईक रॅलीत सहभागी होणार आहे..महत्त्वाचं म्हणजे नागपुरात दाखल झाल्यानंतर अजित पवार जिल्ह्यात फक्त काटोल येथेच जाणार आहेत.. त्यामुळे महायुतीमध्ये काटोलची जागा मिळावी याचे संकेतच अजित पवार यांनी दिलेय .. तर भाजपही या जागेसाठी आग्रही असून भाजपाचे अनेक नेते काटोल मधून लढण्यास इच्छुक आहे





Source link

एक्स-रेसाठी आलेल्या तरुणीला कपडे काढायला सांगितले आणि…घाटी रुग्णालयातील संतापजनक घटना

एक्स-रेसाठी आलेल्या तरुणीला कपडे काढायला सांगितले आणि…घाटी रुग्णालयातील संतापजनक घटना



Chatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजी नगरचा घाटी रुग्णालय म्हणजे मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि आजूबाजूच्याही  जिल्ह्यांसाठी सगळ्यात मोठ हॉस्पिटल. या हॉस्पिटलमध्ये दररोज हजारो लोक उपचारासाठी येतात. मात्र याच दवाखान्यात एका तरुणीला संतापजनक प्रकाराला सामोरं जावं लागलंय.



Source link

'50 किमी अंतरावर घर, मग 15 मिनिटांत घटनास्थळी कसा पोहोचला ठाकरेंचा आमदार?' निलेश राणेंच्या पोस्टनं खळबळ

'50 किमी अंतरावर घर, मग 15 मिनिटांत घटनास्थळी कसा पोहोचला ठाकरेंचा आमदार?' निलेश राणेंच्या पोस्टनं खळबळ


Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : कोकणातील मालवण भागामध्ये असणाऱ्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेलाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला आणि येकच खळबळ माजली. पुताळ कोसळण्याच्या घटनेनंतर संपूर्ण देशाचं लक्ष वेधणाऱ्या राजकोट किल्ल्याकडे नेतेमंडळींचे पाय वळले आणि त्यातूनच टोकाचा संघर्षही डोकं वर काढताना दिसला. 

संघर्ष विकोपाला गेला असतानाच ही ठिणगी अद्याप धुमसत असल्याची स्थिती कायम आहे. त्यातच आता राजकीय आरोप प्रत्योरापंना सुरुवात झाली असून, सत्ताधाऱ्यांनी आता याच ठिकाणी शिवरायांच्या नव्या पुतळ्याच्या उभारणीसाठीच्या कामाला वेग दिला आहे. राजकोटमधील शिवरायांच्या पुतळ्याविषयीची महत्त्वाची माहिती दर दिवशी समोर येत असतानाच आता निलेश राणे यांनी X च्या माध्यमातून एक पोस्ट करत ठाकरे पक्षाच्या एका आमदाराचं नाव घेत काही प्रश्न उपस्थित केले आणि नव्या राजकीय वादानं डोकं वर काढलं. 

निलेश राणेंनी पोस्टमध्ये म्हटलं… 

‘आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसा पोहोचू शकतो??? 
जर काही यामधलं वैभव नाईक याने घडवलं असेल तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्याने करून ठेवावी.’

वैभव नाईक यांचं नाव घेत निलेश राणे यांनी केलेली ही पोस्ट पाहता आता यावर ठाकरे पक्ष आणि खुद्द नाईक काय प्रतिक्रिया देणार यावर सर्वांचं लक्ष असेल. दरम्यान, राजकोट किल्ल्यावर राणे समर्थक आणि ठाकरे समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर आपली पोलीस आणि गृखात्याकडून काहीही अपेक्षा नसल्याची प्रतिक्रिया नाईकांनी दिली होती. जोपर्यंत सरकार बदलणार नाही, तोपर्यंत दडपशाहीचं राजकारण सुरूच राहील असं सांगताना त्यांनी पुतळा उभारणी आणि अनावरण सोहळ्यादरम्यानच्या काळात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप केले होते. 

 

दरम्यान एकिकडे राजकीय हेवेदावे सुरू असतानाच दुसरीकडे सदर प्रकरणी कारवाईला वेग आला असून, शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असणाऱ्या स्ट्रक्चरल कन्सल्टंट  चेतन पाटीलला कोल्हापुरातून अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गुरुवारी मध्यरात्री ही अटकेची कारवाई केली.   





Source link

'काय चाललाय तुमचा कारभार?', उदय सामंत यांच्यासमोर भास्कर जाधव संतापले, म्हणाले 'तुम्हाला माझी ताकद…'

'काय चाललाय तुमचा कारभार?', उदय सामंत यांच्यासमोर भास्कर जाधव संतापले, म्हणाले 'तुम्हाला माझी ताकद…'


ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव एका कार्यक्रमात चांगलेच चिडलेले पाहायला मिळालं. चिपळूणमध्ये 75 फूट ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळ्यात शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचा पारा चढला. भास्कर जाधव या कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचले होते. मात्र पालकमंत्री उदय सामंत आणि शासकीय अधिकाऱ्यांना उशीर झाला होता. त्यामुळे भास्कर जाधव चांगलेच चिडले आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर शासकीय अधिकाऱ्यांना सुनावलं. तुमच्या नोकऱ्या नाही घालवल्या तर भास्कर जाधव नाव नाही सांगणार अशी धमकीच त्यांनी दिली. 

संतापलेल्या भास्कर जाधवांनी शासकीय कर्मचाऱ्यांना सुनावताना म्हटलं की, “काय प्रांत, काय चाललाय तुमचा कारभार? ही पद्दत आहे का? झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला दीड दीड तास उशिरा येता. राष्ट्राचा काही अभिमान आहे की नाही? तुमचा सरकारी कार्यक्रम आहे की पक्षाचा कार्यक्रम आहे?. तुमची जबाबदारी आहे की नाही? दाखवतोच तुम्हाला माझी ताकद काय आहे ती, अधिकाऱ्यांना घरी नाही पाठवलं तर माझं नाव भास्कर जाधव नाही”.

यावेळी त्यांनी उदय सामंत यांच्याकडेही नाराजी व्यक्त करत आम्ही तुमची वाट पाहत बसलोय आणि तुम्ही कार्यक्रम सुरु करता असं म्हटलं. त्यावर उदय सामंत यांनी कार्यक्रम अजून सुरु केला नसल्याचं म्हटलं. दरम्यान कार्यक्रमातील भाषणात उदय सामंत यांनी दिलगिरी व्यक्त केली. 

भास्कर जाधवांचा इशारा

“प्रत्येकवेळी 12, 18 किंवा 24 तासाची नोटीस मिळते आणि कार्यक्रमाला हजर राहायचं. पालकमंत्री महोदय किमान काही कार्यक्रम अपवाद करा. आजचा कार्यक्रम आगळावेगळा आहे. अधिकाऱ्यांवर चिडण्याचं कारणही तेच आहे. ते बिचारे रात्री येतात आणि साहेब आता कार्यक्रम आला अशी गयावया करतात. पण मी जिल्हाधिकाऱ्यांना अधिवेशनात खेचणार. संविधानाने आम्हालाही काही अधिकार दिले आहेत. हक्कभंग प्रस्ताव मला मांडावा लागेल,” असा इशारा भास्कर जाधव यांनी भाषणात दिला.

दरम्यान उदय सामंत यांनी पालकमंत्री नात्याने दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले की, “मी पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्विकारतो. त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. म्हणून मी उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पण जर 5 दिवसांपूर्वी जर कार्यक्रम आला आहे, तर तेव्हाच लोकप्रतिनिधींना सांगणं गरजेचं आहे. अधिकाऱ्यांकडून भविष्यात याबाबत सुधारणा झाली पाहिजे ही माझी सूचना आहे”.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp