महाराष्ट्राला हादरवणारी घटना! चौकशीसाठी आलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार, पोलीस ठाण्याच्या मागेच…

महाराष्ट्राला हादरवणारी घटना! चौकशीसाठी आलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार, पोलीस ठाण्याच्या मागेच…


Palghar Crime News: पालघर जिल्ह्यातील कासा येथे एक महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली आहे. जनतेचे रक्षकच भक्षक बनले आहेत. एका पोलीस हवलदाराने तक्रारी अर्जाच्या चौकशीसाठी आलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिस हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Add Zee News as a Preferred Source

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका तक्रारी अर्जाच्या चौकशीसंदर्भात कासा पोलीस ठाण्यात आली होती. तेव्हा याच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या शरद भोगाडे नावाच्या पोलीस हवलदाराने चौकशीच्या बहाण्याने पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या खोलीत नेले. त्याच ठिकाणी आरोपी पोलीस हवालदाराने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. महिलेने मोठे धाडस दाखवत पोलिसांत तक्रार दाखल केली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर या प्रकरणी पोलीस हवालदार भोगाडे याच्यावर लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, पुढील तपासासाठी गुन्हा कासा पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती माहिती मिळाली आहे. आरोपी हवालदार बुगडे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी कासा पोलीस ठाण्याच्या प्रभारीची तातडीने जिल्हा मुख्यालयात बदली केली आहे. तसेच या प्रकरणी सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे.

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलावर अत्याचार

मालेगाव पाठोपाठ आता मनमाड शहरात ही अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी 64 वर्षीय बाबा भागवतला अटक करून त्याच्या विरुद्ध ऍट्रॉसिटी आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या नराधमाने एका 7 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केला शिवाय तो शहरातील एका भागात असलेली लॉन्ड्रीच्या दुकान प्रेस करण्यासाठी कपडे घेऊन येणाऱ्या लहान मुलांशी अश्लील चाळे करून लैंगिक अत्याचार करीत असल्याचे डिवायएसपी बाजीराव महाजन यांनी सांगितले.

FAQ

  1. ही घटना पालघर जिल्ह्यात नेमकी कुठे घडली आहे?

ही घटना पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

2. आरोपी कोण आहे?

आरोपीचे नाव शरद भोगाडे आहे, जो कासा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस हवालदार आहे.

3. पीडित महिला पोलीस ठाण्यात कशासाठी आली होती?

पीडित महिला एका तक्रारी अर्जाच्या चौकशीसंदर्भात कासा पोलीस ठाण्यात आली होती.

4. आरोपीने महिलेवर कुठे लैंगिक अत्याचार केला?

आरोपी पोलीस हवालदाराने चौकशीच्या बहाण्याने पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या खोलीत महिलेवर लैंगिक अत्याचार केला.





Source link

पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई; शीतल तेजवानीनंतर दुसऱ्या आरोपीला अटक; आता फक्त एक जण राहिला

पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई; शीतल तेजवानीनंतर दुसऱ्या आरोपीला अटक; आता फक्त एक जण राहिला


Pune Koregaon Park Land Deal Parth Pawar:  झी 24 तासने समोर आणलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुद्रांक शुल्क विभागाच्या तक्रारीनंतर बावधन पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीची विक्री करणा-या शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीतील पार्थ पवार यांचे भागीदार दिग्विजय पाटील आणि  सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शीतल तेजवानीला अटक केल्यानंतर आता   दुय्यम निबंधक रवींद्र तारु याला अटक करण्यात आली आहे. आता तिसऱ्या व्यक्तीला अटक कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

Add Zee News as a Preferred Source

झी २४ तासनं उघड केलेला जमीन गैरव्यवहार प्रकरण मोठी अपडेट समोर आली आहे.  पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनी जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी निलंबित सब रजिस्ट्रार रवींद्र तारू याला बावधन पोलिसांनी  अटक केली आहे.  रवींद्र तारूला पौड कोर्टात हजर केले जाणार आहे. रवींद्र तारू याने गैरव्यवहार करत दस्त बनवून दिले होते.  या संदर्भात पुण्याच्या बावधन पोलीस ठाण्यात शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील, निलंबित सब रजिस्ट्रार रवींद्र तारू यांच्या विरोधात मुद्रांक शुल्क बुडवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी आपल्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून कोरेगाव पार्क येथे 40 एकर जमिनीचा व्यवहार झाला आहे. 300 कोटींच्या व्यवहारासाठी अवघ्या 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी घेण्यात आल्याच्या गोंधळाबरोबरच इतरही अनेक आक्षेप घेतले जात आहे.  या प्रकरणात पार्थ पवार यांच्या विरोधात कुठलीही तक्रार करण्यात आलेली नाही.  झी 24 तासने बुधवारी रात्रीपासून ही बातमी लावून धरली होती. त्यानंतर काल सकाळी मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर तातडीने तपासाची सूत्रे हलली आणि कारवाई सुरू झाला. रात्री मुद्रांक विभागाच्या तक्रारीनंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

FAQ

1 पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण काय आहे?
पुणे शहरातील मुंढवा भागात राज्याच्या कृषी विभागाच्या जमिनीबाबत अपहार केल्याप्रकरणी एक मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. सरकारी जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याप्रकरणी दिग्विजय अमरसिंह पाटील, शीतल तेजवानी, तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमेडिया कंपनीचाही यात समावेश आहे. बेकायदेशीर आदेश आणि पत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. नायाब तहसीलदार प्रवीणा चव्हाण यांनी तक्रार दाखल केली होती.

2  या प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे?उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी अमेडिया कंपनीच्या माध्यमातून कोरेगाव पार्क येथे ४० एकर जमिनीचा ३०० कोटी रुपयांचा व्यवहार केला असून, त्यासाठी अवघ्या ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी घेण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठा जमीन गैरव्यवहार उघडकीस आला, ज्याचा पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीशी डायरेक्ट कनेक्शन आहे. हे नवे प्रकरण पुण्याच्या मुंढवा भागातील आहे.

3  या प्रकरणी कोणत्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे?या प्रकरणी दिग्विजय अमरसिंह पाटील (पार्थ पवार यांचे मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार), शीतल तेजवानी (जागेची पॉवर ऑफ एटर्नी असलेली), निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले, रवींद्र तारू यांच्यासह एकूण ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगनमत करून शासनाचा ५ कोटी ८९ लाख ३१ हजार ८०० रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडल्याबद्दल हा गुन्हा आहे.

 





Source link

कोर्ट आवारातली कार, केक अन्…; ठाण्यात महिलेवर लैंगिक अत्याचार! अश्लील फोटो काढून…

कोर्ट आवारातली कार, केक अन्…; ठाण्यात महिलेवर लैंगिक अत्याचार! अश्लील फोटो काढून…


Crime News Women Sexual Herrasment Inside Car: ठाण्यातील कुटुंब न्यायालयाच्या आवारात एका विवाहित महिलेवर दोघा पुरुषांनी कारमध्ये सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा सारा प्रकार पोलिसांचा सतत वावर असलेल्या न्यायालयासारख्या संवेदनशील इमारतीच्या परिसरात घडला आहे. पोलिसांबरोबरच सर्वसामान्यांची वर्दळ असलेल्या ठाण्यासारख्या गर्दीच्या शहरात सार्वजनिक ठिकाणी हा प्रकार घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Add Zee News as a Preferred Source

नक्की घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी महिलेला नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने बोलावले होते. या महिलेच्या वाढदिवसानिमित्त आणलेल्या केकमध्ये गुंगीचे औषध मिसळून तिला केक खाऊ घालण्यात आला. त्यानंतर ती बेशुद्ध पडल्यावर आरोपींनी हे घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप आहे. ही घटना 25 ऑगस्ट 2024 रोजी घडली असल्याचे सांगितले जात असून, पीडित महिलेने 5 डिसेंबर 2025 रोजी ठाणे नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

इतक्या दिवस का शांत राहिली महिला?

जवळपास 15 महिन्यांपूर्वी हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत असताना पीडित महिला इतक्या दिवस का शांत राहिली असा सवाल उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी आरोपींनी महिलेसोबत घृणास्पद कृत्य केले तेव्हा त्यांनी त्याचे चित्रिकरणही केले होते. या महिलेचा अश्लील व्हिडिओ तयार करून आरोपींकडून महिलेला वारंवार दोघांनी ब्लॅकमेल केलं. त्यामुळेच ही महिला तक्रार करत नव्हती. मात्र सततच्या त्रासाला कंटाळलेल्या या महिलेचा संयम संपला आणि तिने 5 डिसेंबर रोजी म्हणजेच घटना घडल्यानंतर सव्वा वर्षाने तक्रार दाखल केली.

आरोपी कोण?

आरोपींपैकी एक हिरालाल केदार (युट्यूब पत्रकार) याला अटक करण्यात आली असून, दुसरा आरोपी रवी पवार फरार आहे. ठाणे नगर पोलिसांकडून पवार येथे तपास सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, न्यायालयाच्या आवारात अशी घटना घडल्याने सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ठाण्यात महिला अत्याचाराचं वाढतं प्रमाण

ठाण्यामध्ये मागील काही काळापासून महिलांवरील अत्याचारासंदर्भातील घटना घडल्या आहेत. ठाण्यात एका व्यक्तीने स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलीवर जून 2025 पासून डिसेंबरपर्यंत सतत अत्याचार केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच समोर आला. पीडितेच्या आईने जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. आरोपी वडीलांवर गुन्हा दाखल झाला असून, तपास सुरू आहे. ठाण्यातच 14 जुलै रोजी शाळकरी मुलींना ‘मासिक पाळी तपासणी’च्या नावाखाली कपडे काढण्यास भाग पाडण्यात आले. या प्रकरणावरूनही वातावरण चांगलेच तापले होते.

 

 





Source link

निलेश राणे एकनाथ शिंदेंचा पीए व्हायला का तयार झाले?, राणेंनी स्पष्टच सांगितलं, 'माझ्यामध्ये काही तरी खोट…'

निलेश राणे एकनाथ शिंदेंचा पीए व्हायला का तयार झाले?, राणेंनी स्पष्टच सांगितलं, 'माझ्यामध्ये काही तरी खोट…'


Neha Choudhary

नेहा चौधरी या ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

…Read More





Source link

मुंबईकरांनो उद्या चुकूनही 'या' रस्त्याकडे जाऊ नका! दिवसभर ट्रॅफिकमध्ये अडकून पडाल, कारण…

मुंबईकरांनो उद्या चुकूनही 'या' रस्त्याकडे जाऊ नका! दिवसभर ट्रॅफिकमध्ये अडकून पडाल, कारण…


Mumbai Traffic Update: सामान्यपणे तुम्ही मुंबई आणि उपनगरांमध्ये राहत असाल तर रविवारी रेल्वेच्या मेगाब्लॉक असल्याच्या बातम्या अनेकदा वाचल्या असतील. मात्र मुंबईला गुजरातशी कनेक्श करणाऱ्या एका महत्त्वाच्या मार्गावर उद्या म्हणझेच 7 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक असणार आहे. शहरातील वाहतुकीचा महत्त्वाचा भाग असलेल्या या रस्त्यावर तुम्ही उद्या चुकून गेलाच तर डिसेंबरमधील पहिलाच रविवार तुमचा वाहतूककोंडीमध्ये जाऊ शकतो.

Add Zee News as a Preferred Source

रस्ता कोणता आणि काय काम सुरु आहे?

मुंबईकडून गुजरातला जाणाऱ्या प्रमुख मार्गांपैकी एक असलेला राज्य महामार्ग 84 म्हणजेच घोडबंदर रोडवरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गायमुख ते फाऊंटनदरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामातील अंतिम टप्प्यात आहे. रविवार, 7 डिसेंबर रोजी याच कामाचा एक भाग म्हणून ग्राऊटिंग व मास्टिक अस्फाल्टचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठीच घोडबंदर रोड अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे.

संपूर्ण रस्ता कधी बंद असणार?

शनिवार मध्यरात्री 12 ते रविवार मध्यरात्री 12 या कालावधीत संपूर्ण रस्ता बंद राहणार आहे. यावेळी प्रवाशांची वाहतूककोंडी होऊ नये म्हणून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.

अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी अनेक त्रास प्रवास

मेट्रोची कामे, अरुंद-नादुरुस्ती रस्त्यांमुळे व अवजड वाहनांची वाहतूक यामुळे घोडबंदर प्रवास जीवघेणा आणि त्रासदायक झाला असून प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. अर्ध्या तासाचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना अनेक तासांच्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागतोय. हे कमी म्हणून की काय नादुरुस्त रस्त्यामुळे घोडबंदरवर अपघात होऊन अनेकांचे बळीदेखील गेले आहेत. मात्र अपघातांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी तसेच वाहतूककोंडी फोडण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात गायमुख ते फाऊंटन हॉटेलपर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम आता शेवटच्या टप्प्यात आले असून रस्त्याचे ग्राऊटिंग व मास्टिक अस्फाल्टचे काम रविवारी पूर्ण करण्यात येणार आहे.

कसे असतील निर्बंध:

अवजड वाहनांसाठी: मुंबई आणि ठाणेकडून घोडबंदरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना माजिवडा व्हाय जंक्शन आणि कापूरबावडी चौकात थांबवले जाईल. या वाहनांना 24 तासांसाठी बंदी आहे.

हलकी वाहने: ठाणेकडून घोडबंदरकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांना गायमुख चौकीवरून चुकीच्या बाजूने जाण्याची परवानगी आहे, आणि फाऊंटन हॉटेलसमोरच्या कटमधून पुढे जाऊ शकतात.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेद्वारे फाऊंटन हॉटेल ते काजुपाडा भागात दुरुस्ती होत आहे, ज्यामुळे वाहतुक व्यवस्था पूर्णपणे बदलली जाईल.

पर्यायी मार्ग:

मुंबई/ठाण्याकडून: व्हाय जंक्शनवरून सरळ नाशिक रोडमार्गे खारेगाव टोल प्लाझा, मंकोली, आणि अंजुरफाटा मार्गे. कापूरबावडी जंक्शनवरून उजवीकडे वळून कशेळी आणि अंजुरफाटा मार्गे.

मुंब्रा/कलवा येथून: खारेगाव टोल प्लाझापूर्वी थांबवून खारेगाव बे ब्रिज, खारेगाव टोल प्लाझा, मंकोली, आणि अंजुरफाटा मार्गे.

नाशिककडून: मंकोली नाक्यावर थांबवून मंकोली ब्रिजखाली उजवीकडे वळून अंजुरफाटा मार्गे.





Source link

फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची वर्षभरातली कामगिरी कशी होती? Survey काय सांगतो?

फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची वर्षभरातली कामगिरी कशी होती? Survey काय सांगतो?


Devendra Fadnavis Government Performance: राज्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं महायुतीचं सरकार स्थापन होऊन आज वर्ष होत आहे. महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याची धुरा आपल्या हाती घेतली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमन झाले. वर्षभरात तिन्ही पक्षांनी सरकार चालवताना नेमकी कशी कामगिरी केली याचा आढावा झी 24 तास आणि JDS या संस्थेनं महासर्व्हेच्या माध्यमातून घेतला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारला 5 डिसेंबर 2025 रोजी पहिले वर्ष पूर्ण होत असताना, झी 24 तास आणि ज्युबिलंट डेटा स्टुडिओ (JDS) यांच्या सहकार्याने महाराष्ट्राचा राज्यव्यापी मतदान सर्व्हे करण्यात आला आहे. महायुती सरकारची गेल्या वर्षभराची कामगिरी कशी राहिली? कोणत्या योजना सामान्य लोकांच्या पसंतीला उतरल्या? सामान्य लोकांचं महायुती सरकारबाबत काय मत आहे? याचा कानोसा झी 24 तास आणि JDS या संस्थेनं एका महासर्व्हेच्या माध्यमातून घेतला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची वर्षभरातली कामगिरी कशी होती? 

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची वर्षभरातली कामगिरी कशी होती? असा प्रश्न विचारला असता सर्वाधिक म्हणजेच 40 लोकांनी सर्वोत्कृष्ट असल्याचं म्हटलं आहे. तर तब्बल 31 टक्के लोकांनी अतीउत्कृष्ट असल्याचं शिक्कामोर्तब केलं आहे. 23 टक्के लोकांनी साधारण कामगिरी केल्याचं मत नोंदवलं आहे. तर 6 टक्के लोकांनी निराशाजनक म्हटलं आहे. म्हणजेच सरकारच्या कामगिरीवर समाधानी असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. 

झी 24 तास आणि JDS चा महासर्व्हे

14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 89 हजार 812 जणांना समाविष्ट करण्यात आलं. या सर्वेक्षणात, सामाजिक-राजकीय संशोधन व डेटा विश्लेषणातील दोन पद्धतींचा वापर करण्यात आला आहे. 

पहिल्या पद्धतीत प्रत्यक्ष भेटी व घरघर फिरून सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये 4 महानगरं, 24 जिल्हे, 37 नगरपरिषदा व 48 तालुके समाविष्ट होते. यादरम्यान 22 हजार 654 जणांच्या वैयक्तिक मुलाखती घेण्यात आल्या.

तर दुसरा टेलिया मोबाईल-आधारित AI व्हॉइस सर्व्हे आहे.  मोबाईलद्वारे अत्याधुनिक, संवादात्मक AI-आधारित व्हॉइस सर्व्हेमध्ये 67 हजार 158 जणांना समाविष्ट करण्यात आलं. 

AI टेलिफोनिक व्हॉइस सर्व्हे आणि प्रत्यक्ष संवादामुळे महाराष्ट्रातील जनमताचा कानोसा घेणारे हे सर्वेक्षण आगळे वेगळे ठरले आहे.

महाराष्ट्रातील सर्व्हेची भौगोलिक व्याप्ती

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र या विविध विभागांचे संतुलित प्रतिनिधित्व मिळावे यासाठी खालील 4 महानगरं, 24 जिल्हे, 37 नगरपरिषदा व 48 तालुके येथे सर्व्हे करण्यात आला.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp