by Hansraj Agrawal | Jul 30, 2024 | Trending News
एकीकडे मसने विरुद्ध अमोल मिटकरी असा वाद रंगला असतानाच दुसरीकडे आता महिला नेत्यांमध्ये जुंपल्याचं दिसत आहे. शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 29, 2024 | Trending News
पुढील
बातमी
ED ची कारवाई, ठाकरे, पवार आणि फडणवीस यांची मोठी ऑफर! अनिल देशमुख यांच्या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ
Source link
by Hansraj Agrawal | Jul 29, 2024 | Trending News
Father Vs Son Fight In Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे या दोन पक्षांमध्ये संघर्ष झाला तसेच चित्र पुन्हा दिसण्याची दाट शक्यता आता एका निर्णयाने निर्माण झाली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 28, 2024 | Trending News
Raj Thackeray : अमेरिका दौ-यानंतर राज ठाकरे सक्रिय झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईत मिशन वरळी हाती घेतल्याची चर्चा सुरू आहे. वरळीतील नागरिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. तसेच बीडीडी चाळ रहिवासी, पोलीस वसाहतीमधील रहिवासी, विविध सामाजिक संघटनांचे लोक राज ठाकरे यांच्या भेटी घेत आहेत. दरम्यान वरळीतील काही कार्यकर्त्यांचा मनसेत पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या मिशन वरळीची चर्चा सुरू आहे. आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहेत. संदिप देशपांडे मनसेकडून इच्छुक आहेत.
येत्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं स्वबळाचा नारा दिलाय. त्यानुसार मनसेच्या संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरु झाली आहे. संभाव्य उमेदवारांना आपल्या मतदारसंघात कामाला लागण्याच्या सूचनाही केल्या गेल्यात. 225 ते 250 जागांवर मनसे उमेदवार उभे करणार आहे.
यापैकी मुंबईतील शिवडीतून बाळा नांदगावकर, वरळीतून संदीप देशपांडे, माहीममधून नितीन सरदेसाई, जोगेश्वरीमधून शालिनी ठाकरे यांच्या नावांची चर्चा आहे. तर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे एकमेव विद्यमान आमदार राजू पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात साईनाथ बाबर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे
मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा केलाय…वसंत मोरे यांनी मनसे सोडल्यानंतर हडपसरमधून मनसेचा नवा शिलेदार रिंगणात उतरणार आहे…साईनाथ बाबर यांनी व्हॉट्सअप स्टेट्स ठेवत त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केल्याची माहिती दिलीय.
अंत्यसंस्कार पद्धतीवरील राज ठाकरे यांच्या विधानावरून नितेश राणेंनी सवाल उपस्थित केलाय. सगळ्या सूचना हिंदू समाजालाच का? …बकरी ईदला बकरी कापू नका अशी सूचना का केली जात नाही?…हिंदू समाजातील परंपराना कोणी ही हात लावू नये असं नितेश राणेंनी म्हटलंय…हिंदू धर्मात अंतिम संस्कार करण्यासाठी लाकडं जाळली जातात… हिंदू धर्मातील ही परंपरा बदलण्याची गरज आहे, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं होतं…यावरून नितेश राणेंनी सवाल उपस्थित केलेयत…
Source link
by Hansraj Agrawal | Jul 28, 2024 | Trending News
Sanjay Raut On Fadnavis Shinde Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना आपण वेश बदलून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटण्यासाठी सत्तेत सामिल होण्यापूर्वी जवळपास दहा बैठकांसाठी आले होते असा खुलासा केला. या खुलाश्यावरुन उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक शब्दांमध्ये महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी नाट्यसृष्टीचं मोठं नुकसान केल्याचा उपहासात्मक टोला लागवला आहे. पत्रकारांंशी बोलताना अजित पवारांनी केलेल्या विधानावरुन राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही फिरकी घेतली.
इतक्या उत्तम पद्धतीने ते मेकअप…
अजित पवारांनी वेश बदलून अमित शाहांना भेटायला यायचो असं विधान केल्याचा संदर्भ देत पत्रकारांनी राऊतांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये, “तोंडाला मुखवटे घालून, टोपी घालून भेटायला जायचे. यावरुन यांचं महाराष्ट्रासंदर्भातील कपट किती आधीपासून सुरु होतं, हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे,” असं म्हटलं. पुढे बोलताना शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांना नाटकामध्ये संधी दिली पाहिजे असं राऊत म्हणाले. “महाराष्ट्राला नाटकाची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राने अनेक मोठेमोठे कलाकार दिले आहेत. श्रीराम लागू, नाना पाटेकर, बालगंधर्व अगदी अलीकडे प्रशांत दामले आपण पाहतो. नाट्यसृष्टीची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. नाट्यसृष्टीनं अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे दुर्लक्ष केलं. यांनासुद्धा यापुढे नाटकांमध्ये सहभागी करुन घेत रंगमंच दिला पाहिजे. इतक्या उत्तम पद्धतीने ते मेकअप करतात. इतक्या उत्तम पद्धतीने चेहरे बदलतात. इतक्या उत्तम पद्धतीने राजकारणातील फिरत्या रंगमंचावर काम करतात,” असं राऊत म्हणाले.
या कलाकारांनी मराठी…
“आता पाहा ना अजित पवार हे एखाद्या गुप्तहेराप्रमाणे रहस्य नाटकाप्रमाणे नाव बदलून, टोप्या बदलून, खोट्या पिळदार मिशा लावून दिल्लीत अमित शाहांना भेटायला जात होते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे रात्री 12 नंतर वेश बदलून मुंबईमधल्या दिव्याच्या लाईटखाली बसून सरकार कसं पाडायचं याच्यावर चर्चा करत होते. हे लोक बोलत आहे की लोक त्यांना ओळखत नव्हते. म्हणजे किती हुबेहुब मेकअप केला आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. या कलाकारांनी मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटांचं मोठं नुकसान केलं आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करताना केली आहे.
नक्की वाचा >> RSS कार्यकर्ता ते राज्यपाल… महाराष्ट्रातील BJP नेत्याला लॉटरी; राजभवनात दिसणार गांधी टोपी
मी कथा लिहून देतो
“आता खोट्या कथा लिहून एकनाथ शिंदे चित्रपट काढत आहेत लोक. मात्र त्यांनी हे जे काही स्वत:वर नाटक रचलं त्यावर त्यांना लिहिता येत नसेल तर मी उत्तम लेखक आहे. मी लिहितो. मला प्रसंग त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. एकनाथ शिंदे आतापासून वेश बदलून जात नव्हते. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ते वेश बदलून अहमद पटेलांना भेटायला जात होते. हे पृथ्वीराज चव्हाण उत्तमप्रकारे सांगू शकतील,” असं सूचक विधान राऊत यांनी केलं.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 27, 2024 | Trending News
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आज जल्लोषात साजरा झाला… यानिमित्तानं मातोश्रीवर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली… मात्र शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं शनिवारी चक्क काळा दिवस पाळण्यात आला.. काय कारण? पाहूयात हा रिपोर्ट…
Source link