by Hansraj Agrawal | May 14, 2024 | Trending News
Mumbai Ghatkopar hoarding collaps : मुंबईच्या घाटकोपरमध्ये सोमवारी होर्डिंग कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 100 पेक्षा अधिक लोक या होर्डिंगखाली अडकले होते. कोसळलेलं होर्डिंग हे अडीचशे टनाचं बेकायदेशीर होर्डिंग असल्याचा आरोप केला जात आहे. या दुर्घटनेत अनेक निष्पाप मुंबईकरांचा बळी गेला आहे. याच दुर्घटनेत नालासोपाऱ्यातील टॅक्सी चालकाचा मृत्यू जाला आहे. जिथे ही दुर्घटना घडली त्या ठिकाणाहून हा टॅक्सी चालक 4 फूट मागे असता तर त्याचा जीव वाचला असता.
मी घरी येतोय.. आणि शेवटी त्यांचा मृतदेहच घरी आला
घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत नालासोपा-यातल्या टॅक्सी चालकाचाही दुर्देवी मृत्यू झाला आहे. 51 वर्षांचे सतीश बहाद्दर सिंह एक भाडं मारण्यासाठी मुंबईत आले होते. मुंबईतलं भाडं संपवून ते ठाण्यामार्गे नालासोपा-याला येणार होते. मात्र, येताना वाटेत टॅक्सीमध्ये सीएनजी भरण्यासाठी ते घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर आले आणि तिथेच काळाने घात केला.
जेव्हा होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं तेव्हा सतीश सिंह यांची टॅक्सी शेवटी उभी होती. जर 4 फूट अंतरानेही त्यांची टॅक्सी पंपापासून लांब असती तरी त्यांचा जीव वाचला असता. मात्र होर्डिंग कोसळल्यानंतर त्यांच्या टॅक्सीचा अक्षरक्ष: चेंदामेंदा झाला. दुपारी तीनच्या सुमारास सतीश सिंह यांचं कुटुंबियांसोबत फोनवरुन अखेरचं बोलणं झालं होतं. घरी येत असल्याचं त्यांनी कुटुंबियांना सांगितलं. मात्र हे त्यांचं अखेरचं बोलणं ठरलं. त्यांच्या पश्चात पत्नी शीला सिंह, मुलगा शुभम सिंह 29, शिवम सिंह 24 ,सत्यम सिंह, मुलगी सुप्रिया सिंह असा परिवार आहे.
होर्डिंग दुर्घटनेमुळे अनेक जणांचा बळी गेला आहे संबंधित प्रशासनाने स्ट्रक्चरल ऑडिट केलं असतं तर अशी दुर्घटना झाली नसती. अशा बेकायदा व परवानगी असलेल्या होल्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करावे तसेच मृतांच्या नातेवाईकांना सरकारने योग्य ती मदत करावी अशी मागणी माजी नगरसेवक किशोर पाटील यांनी केली आहे.
घाटकोपरमधील दुर्घटनाग्रस्त होर्डिंग क्रेन्सच्या साहाय्यानं काढण्याचा एनडीआरएफचा प्रयत्न अयशस्वी ठरला. होर्डिंग्सचं वजन जास्त असल्यानं ते मध्येच तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनडीआरएफच्या जवानांनी सरळ हँडकटरनी होर्डिंग काढायला सुरुवात केलीय. आधी 2 क्रेन्सच्या साहाय्यानं हे होर्डिंग उचलण्याचा प्रयत्न एनडीआरएफनं केला, मात्र त्यात यश आलं नाही.. पेट्रोल पंपावर हे होर्डिंग असल्यामुळे याठिकाणी एनडीआरएफला गॅस कटर किंवा इलेक्ट्रिक कटरच्या साहाय्यानं होर्डिंग तोडता येत नाहीये. त्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे.
Source link
by Hansraj Agrawal | May 13, 2024 | Trending News
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी रुपये आणण्यात आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय… त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कशा झडल्या आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | May 13, 2024 | Trending News
Mumbai Weather Alert : मुंबईकरांनी मोठ्या वादळाचा सामना केला आहे. भर दिवसा मुंबईत काळोख पडला होता. तुफान वारा वाहत होता. यानंतर पाऊस देखील पडला आहे. हवामान विभागाने मुंबईकरांना अलर्ट जारी केला आहे.
पुढील 3 ते 4 तास मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत प्रतितास 40 ते 50 किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने वारे पाहणार आहेत. हवामान विभागाने हा अलर्ट जारी केला आहे. मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत भर दुपारी काळोख पडला
मुंबईमध्ये भरदुपारी काळोख पडला आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. मुंबईसह उपनगरांतही जोरदार पाऊस पडतोय. दादर सायन माटुंगा कुर्ला परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पहायला मिळालं… मुंबईत अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान मुंबईत दोन दिवसांपासूनच वातावरणात बदल झालाय, ढगाळ वातावरण निर्माण झालंय. मुंबई शहर तसंच उपनगरात असह्य उकाडा जाणवतोय. ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये बुधवारपर्यंत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती.
विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट
नागपूर,यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीत आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.. यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीत वादळी वा-यासह मुसळधार पाऊस होईल तसंच गारपिटीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशक हवामान विभागाकडून पूर्व आणि पश्चिम विदर्भासाठी हा इशारा देण्यात आलाय. दरम्यान आज सकाळपासून नागपुरातही ढगाळ वातावरण आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला अवकाळीने झोडपलं
सिंधुदुर्ग जिल्ह्याला सलग दुस-या दिवशी अवकाळीने झोडपलं. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झालाय. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र, शेतकरी हवालदिल झालेत.
Source link
by Hansraj Agrawal | May 12, 2024 | Trending News
Ravindra Dhangekar Accused On BJP : पुण्यातील सहकार नगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकरांनी केला आहे. तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय.
Source link
by Hansraj Agrawal | May 12, 2024 | Trending News
Nashik News Today: नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक व मुख्यध्यापकानींच लाच घेतल्याचे समोर आले आहे.
Source link
by Hansraj Agrawal | May 11, 2024 | Trending News
Machal Village Ratnagiri : कोकणात समुद्र किनारे आणि इथला निसर्ग कायमच पर्यटकांना खुणावत असतो. मात्र याच कोकणात असं एक ठिकाण आहे ते पर्यटकांना आता खुणावतंय. या ठिकाणाला कोकणातलं मीनी महाबळेश्वर असंही संबोधलं जातं. हे आहे रत्नागिरीतलं माचाळ गाव.
हिरवीगार झाडी… नागमोडी वळणाचा रस्ता… परिसरात पूर्णपणे धुके… थंड वातावरण… डोंगरावरून कोसळणारे धबधबे… अशा सर्व गोष्टीनी वेढलेले हे गाव सध्या रत्नागिरीतलं मीनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. या गावाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने थंड हवेचे ठिकाण अर्थात पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले आहे.
लांजा तालुक्यातील छोटसं माचाळ गाव समुद्र सपाटीपासून सुमारे चार हजार फुटांवर वसलेलं आहे. खाली उतरलेले आभाळ. आल्हाददायक स्वच्छ हवा. या वातावरणातला प्रवास आपल्याला ताजातवाना करतो आणि पावसाळ्यात हे गाव पर्यटकांना खासकरून खुणावतो.
माचाळ गावातून मुचकुंदी नदीचा उगम होतो खरं तर या गावात मुचकुंदी ऋषिंची गुहा आहे याच ठिकाणाहून या नदीचा उगम झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळेच या नदीला मुचकुंदी नदी असं संबोधलं जातं. अवघे तीनशे ते चारशे लोकवस्तीचं हे माचाळ गाव आहे. येथील घरे कौलारु डोंगर उताराची आणि मातीची आहेत. पावसाळ्यात येथे कायम धुके असते त्यामुळे घरांच्या चहूबाजूला झाडांच्या पानांनी पूर्णपणे शाकारणी करावी लागते. माचाळची दुसरी खासियत म्हणजे इथून विशाळगडावर एक ते दीड तासांत पोचता येतं. माचाळचे ग्रामस्थही विशाळगडावर पाणी, दूध पुरवणे किंवा इतर कामांसाठी सतत येऊन जाऊन असतात.
एका डोंगरावर वसलेले माचाळ घनदाट जंगलानी समृद्ध तर आहेच पण इथल्या जंगलाचं वैशिष्टय़ हे की या जंगलांमध्ये औषधी वनस्पती मोठय़ा प्रमाणात आढळतात आणि म्हणूनच या ठिकाणी आल्यावर इथला निसर्ग पाहिल्यानंतर पर्यटकांना या ठिकाणाबद्दल शब्दात वर्णन करणं कठीण जातं.
माचाळ हे गाव पदभ्रमणासाठी रत्नागिरी जिल्हा हा एक उत्तम पर्याय. सुंदर निसर्ग, खळाळणारे पाणी, दाट धुके, नागमोडी वाटा, अतिशय नयनरम्य परिसर माचाळचा पाहण्याजोगा आहे. तुम्हीही एकदा येथे पावसाळ्यात भेट देऊन कोकणातल्या निसर्गसोंदर्याचा आगळा वेगळा आंनद नक्कीच घेऊन पहा.
Source link