by Hansraj Agrawal | Jun 14, 2024 | Trending News
Sanjay Raut Slams Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी एका कार्यक्रमामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाला मराठी मतं मिळालेली नाहीत, असं विधान केलं. तसेच हिंदू मतदार ठाकरेंपासून दूर गेल्याचंही फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी केलेल्या या दाव्यावरुन आता उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. मराठी मतं आम्हाला नाही मिळाली तर मुंबई परदेशी नागरिकांनी मतदान केलं का? असा सवाल राऊत यांनी फडणवीसांना विचारला आहे.
…मग मुंबईत कोणी मतदान केलं?
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मराठी लोकांची मतं मिळाली नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे, असा संदर्भ देत मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी, ‘मग कोणाची मतं मिळाली आहेत?’ असा प्रतिप्रश्न केला. “ही मतं तुम्हाला मिळाली का?” असा सवालही राऊत यांनी फडणवीस यांना केला आहे. “आम्हाला लाखो मतं मिळाली आहेत की कोणाची मतं आहेत? इथे दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इराण आणि इराकमधील लोकांनी येऊन मतदान केलं का?” असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
नक्की वाचा >> ‘शिवसेना-भाजपा युती तुटू नये अशी RSS ची भूमिका होती, पण मोदी-शाहांचा..’; खळबळजनक दावा
तुमचा विजय चोरीचा
“धारावीत बघा, गिरगावात बघा, भांडूपमध्ये मतदान बघा. जिथे जिथे आमचे लोक जिंकले आहेत किंवा थोडक्या फरकाने पडले आहेत तिथे मराठीच लोक राहतात. ज्यांना मतदानाचा अधिकार आहे त्यांनी आम्हाला मतदान केलं आहे. तुमचा विजय हा सरळ मिळालेला विजय नाही. तुम्ही अमोल किर्तीकरची जागा चोरली. आमचा विजय निर्मळ आणि निर्णायक आहे. या राज्यातील सर्व जाती-धर्माच्या लोकांनी आम्हाला मतदान केलं आहे. मराठी, मुस्लीम, ख्रिश्चन, पारसी असो किंवा गुजराती असो सर्वांनी आम्हाला मतदान केलं आहे,” असं संजय राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> ‘अहंकारामुळे रामाने 241 वरच रोखलं’, जाहीर कार्यक्रमात RSS चा BJP ला घरचा आहेर
संघाच्या टीकेवरुन टोला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता राऊत यांनी मागील 10 वर्षांपासून देशात अहंकारच पाहायला मिळाल्याचा टोला राऊत यांनी लगावला. तसेच देश टिकून रहावा असं वाटत असेल तर संघाने पडद्यामागे राहणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधताना फडणवीस हे मराष्ट्रतील राजकारणातील खलनायक आहेत, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच वायनाडमधून राहुल गांधींनी मतदासंघ सोडल्यास तिथून प्रियंका गांधी लढणार असतील तर आमचा त्यांना पाठींबा असेल असंही राऊत म्हणाले.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 13, 2024 | Trending News
Aditya Thackeray Birthday : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने (Kiran Mane) यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोशल मिडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचे तोंडभरुन कौतुक केले आहे. आदित्य ठाकरे यांचे कौतुक करताना किरण माने यांनी विरोधकांवर शाब्दिक बाण सोडले आहेत.
किरण माने यांची पोस्ट जशीच्या तशी…
काळानुसार जगण्याची पद्धत बदलत जाते. भवतालातली परिस्थिती बदलत जाते. माणसाचं वागणं-बोलणं बदलत जातं. आज्जा जसा बोलत होता, वागत होता तसं तंतोतंत आपला बाप नसतो… आणि आपण बापासारखे वागणारे-बोलणारे नसतो. जुन्यातलं नेमकं काय घ्यायचं, काय टाकायचं…आणि घेतलेलं नव्याशी कसं जोडायचं हे ज्याला कळलं तो घराण्याचं नांव काढतो !
ज्यांचे बापजादे महान, कर्तृत्त्ववान होऊन गेलेत त्यांच्यावर तर जबाबदारीचं प्रचंड मोठं ओझं असतं. कारण समाजाच्या त्यांच्याकडून खुप अपेक्षा असतात. लोक त्यांच्यात महामानव ठरलेल्या त्याच्या पुर्वजाला बघतात. म्हणून त्या अपेक्षा बर्याचदा फोल ठरतात. पण लाखात एखादा असा हिरा असतो, जो आपल्या थोर पुर्वजांचं नांव आणखी ऊंच तर करतोच, पण स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवण्याची क्षमता बाळगतो. असाच एक लखलखता सुर्य महाराष्ट्राकडे आहे, ज्याचं नांव आहे आदित्य ठाकरे !
…ज्याचे पणजोबा होते साक्षात प्रबोधनकार ठाकरे. प्रबोधनकार म्हणजे वर्चस्ववादी भिक्षुक्यांचा कर्दनकाळ… प्रतिगामी किड जाळणारा पुरोगामी विचारांचा जाळ… बहुजनांना प्रकाशवाट दाखवणारी धगधगती मशाल ! …ज्याचे आजोबा होते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. मुंबईतल्या मराठी माणसांचा तारणहार… सिनेनाट्य कलाकारांचा आधार… तमाम हिंदुंच्या काळजातलं भगवं शिवार !
आणि ज्याचा बाप आहे द ग्रेट उद्धव ठाकरे. जणू वर्चस्ववाद्यांनी प्रबोधनकारांचा बदला घेण्यासाठी की काय, पण या नातवाला एकाकी खिंडीत गाठला. ज्याला संपवण्यासाठी जबरदस्त सापळा रचला. पण हा ठाकरी वाघ त्या हिंस्त्र लांडग्यांच्या झुंडीला भिडला, नडला, एकेकाला फाडून पुरून उरला !
अशी थोर परंपरा लाभलेला हा पोरगा. ‘आदित्य’ हे नांव सार्थ ठरवत दुश्मनांनी रचलेली बदनामीची सगळी कारस्थानं भेदून तेजानं लखलखत वर आलाय. वरवर कोवळ्या दिसणार्या या मुलात तिन पिढ्यांचा सगळा अर्क तर आहेच, पण भवतालाचं सखोल भान असलेलं स्वत:चं म्हणून एक संवेदनशील, भक्कम व्यक्तीमत्त्व आहे !
आदित्यजी, तुम्ही महाराष्ट्र पिंजून सगळे नवे-जुने शिवसैनिक शिवबंधनाच्या अनमोल धाग्यात बांधलेत… आता आम्ही एकजुटीनं तुमच्या सोबत आहोत. शिवसेनेच्या घातक्यांना आता निष्ठेची खरी ताकद दाखवूया. समाजातही आणि राजकारणातही विषारी तण माजलंय… सगळी ताकद लावून ते उपटून फेकून देऊया. या महाराष्ट्रातल्या राजकीय आणि सामाजिक वातावरणाला शुद्ध बनवू या, सुंदर बनवुया.
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा, आदित्यजी. जय महाराष्ट्र.
– किरण माने.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 13, 2024 | Trending News
Mahayuti Leaders Come Forward To Oppose This Project: कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी श्रमिक महासंघच्या वतीने 18 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांपेक्षा सत्ताधारी नेते शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीला शक्तीपीठ महामार्ग प्रकरणाचा जबर फटका महायुतीला बसला. त्यामुळेच हा महामार्ग रद्द करावा यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ताधारी नेते एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
सत्ताधारी एकवटले
माजी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश अबिटकर, भाजप नेते समरजित घाटगे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत शेतकरी हिताचा नसणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी केली आहे. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तर शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारावे लागेल असा इशारा दिलाय. तर भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी देखील हा महामार्ग रद्द करावा अशी आग्रही मागणी केली आहे. शक्तिपीठ महामार्ग हा गावांचा विनाश करणारा असून भांडवलदार आणि कंत्राटदार यांना मालामाल करणार आहे असं श्रमिक महासंघाचे म्हणणं आहे. केवळ संपत्तीची लूट करून हा माल परदेशात पाठवण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला गेला असा आरोप देखील श्रमिक महासंघाने केला आहे.
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात विरोधकांनी चांगली मोट बांधली आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील, स्वामिनी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, ठाकरे गटाचे नेते माजी आमदार संजय घाटगे, श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे यांनी शेतकऱ्याची चांगली मोट बांधून वातावरण निर्मिती केली आहे.
कसा आहे हा महामार्ग?
– राज्य सरकारने नागपूर ते गोवा असा शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचे काम हाती घेतले आहे.
– यासाठी 27 हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे.
– या महामार्गाठी 85 हजार कोटी खर्च होणार आहे.
– या माहामार्गाच्या भूमी संपादनालां सुरूवात झाल्यानंतर तीव्र विरोध सुरू झाला.
– या महामार्गासाठी संपादित करण्यात येणारी जमीन सर्वाधिक सुपीक असल्याच शेतकऱ्यांचे म्हणणं आहे .
सत्ताधारी नेत्यांनी या महामार्गाला तीव्र विरोध का केला आहे याची प्रमुख कारणे पाहूया…
– लोकसभा निवडणुकीत शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या पट्ट्यात महायुतीच्या उमेदवाराला कमी मतदान झाले.
– सत्ताधारी नेत्यांच्या मतदारसंघातून हा महामार्ग जात असल्यामुळे याचा फटका विधानसभेला बसू शकतो.
– शक्तीपीठ महामार्ग ज्या भागातून जातो त्या भागांचा विचार केल्यास लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला 12 जागांचा फटका बसल्याचं सत्ताधारी पक्षातील नेत्यांचं म्हणणं आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 12, 2024 | Trending News
चार महिन्यांत सरकार बदलायचंय आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 11, 2024 | Trending News
शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 11, 2024 | Trending News
लोकसभा निवडणुकीत महाविकासघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. यामुळे महायुतीवर दबाव आला आहे. अशातच आता महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीवरून नाराजी नाट्य रंगले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उद्धव ठाकरे यांच्यावर भडकले आहेत.
Source link