राष्ट्रवादी अदित पवार गटाची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर; महादेव जानकर परभणीतून निवडणूक लढणार

राष्ट्रवादी अदित पवार गटाची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर; महादेव जानकर परभणीतून निवडणूक लढणार



राष्ट्रवादी अजित पवार गटाची लोकसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. महादेव जानकर परभणीतून उमेदवारी देण्यात आली आहे. 



Source link

राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, आंबा बागांसह उन्हाळी पिकांना फटका

राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, आंबा बागांसह उन्हाळी पिकांना फटका


Unseasonal Rains: होळीची आग धगधगती असताना, उन्हाळ्याला सुरुवात झालेली असताना राज्यात अवकाळी पाऊस आलाय. विविध जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पंढरपूर, वाशिम, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर, नाशिकमधील चांदवडमध्ये अवकाळी पाऊस पाहायला मिळाला. या पावसामुळे गरमीत हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी आंबा बागांसह उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे. 

वाशिम जिल्ह्याचे तापमान मागील आठवड्यापासून  40 अंश सेलसियसच्या समोर पोहचलेला असताना आज दुपारी वाशिमच्या मालेगाव तालुक्यासह जिल्ह्यातील काही ठिकाणी अचानक विजेच्या कडकडाटासह बरसलेल्या अवकाळी पाऊसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना बारसलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने वाशीमकरांना दिलासा मिळाला.पावसाचे कोणतेही लक्षण नव्हते मात्र विजेच्या कड -कडाटासह अवकाळी पावसाला सुरवात झाली आहे.या पावसामुळे आंबा बागांसह उन्हाळी पिकांना फटका बसणार असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.

विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता

हवामान खात्याने विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे संयकाळी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली…अकोला जिल्हाचा तापमान मागील दोन दिवसापासून 42 अंशावर पोहचला आहेय..आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने एकच धावपळ उडाली आहेय..या अवकाळी पावसामुळे गहू, फळ पिकाचा नुकसान झाल्याचे चिन्ह आहे.

नाशकात रस्त्यावरुन वाहू लागले पाणी

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील सोनी सांगवी,विटावे, साळसाने,पाटे, कोलटेक परिसरात बेमोसमी पावसाने हजेरी लावली आहे,काही ठिकाणी तर रस्त्यावरून पाणी वाहु लागले तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला,अवकाळी पावसामुळे बळीराजा मात्र धास्तावला आहे. नाशिक जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वतावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पंढरपूर परिसरातदेखील अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.





Source link

साताऱ्यात यंदा हाय-व्होल्टेज ड्रामा! शरद पवार विरुद्ध उदयनराजे भोसलेंमध्ये थेट लढत?

साताऱ्यात यंदा हाय-व्होल्टेज ड्रामा! शरद पवार विरुद्ध उदयनराजे भोसलेंमध्ये थेट लढत?


Loksabha Election 2024 Sharad Pawar Likely To Contest From Satara: सातारा मतदारसंघातून श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच साताऱ्यातील पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. शरद पवार यांनी कार्यकर्ते आणि पत्रकारांशी संवाद साधताना या मतदारसंघातून कोणला उमेदवारी द्यायची याबद्दल येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये निर्णय घेऊ असं शरद पवारांनी जाहीर केलं आहे. सातारा मतदारसंघामधील राज्यसभेचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीतून चार ते पाच दिवसांच्या दौऱ्यानंतर पुन्हा दाखल आपण निवडणूक लढवणारच असं जाहीर केलं आहे. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून स्वत: शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात अशी शक्यताही नाकारता येत नाही. तसे संकेत पवार यांनीच दिले आहेत. असं झालं तर साताऱ्यामध्ये उदयनराजे विरुद्ध शरद पवार अशी थेट लढाई पाहायला मिळू शकते. 

साताऱ्याने कायमच राष्ट्रवादीला प्रेम दिलं

साताऱ्यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवार यांनी साताऱ्यातील मतदारांनी कायमच राष्ट्रवादीवर प्रेम केल्याचं नमूद केलं. तसेच श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला असला तरी पक्षासाठी इतर सर्व कामं मी आवडीने करेन असं सांगितलं असल्याचीही माहिती शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिली. “यशवंतराव चव्हाणानंतर साताऱ्याचं कायचम राष्ट्रवादीवर प्रेम राहिलं आहे,” असं शरद पवार म्हणाले. महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा पूर्ण झाल्याची माहितीही शरद पवारांनी दिली आहे.

आम्ही समजून घालण्याचा प्रयत्न केला

“श्रीनिवास पाटील यांनी तब्बेतीचं कारण देत निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. आम्ही त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रकृतीसंदर्भातील कारण त्यांनी दिल्याने नाइलाजानं आम्ही त्यांची भूमिका मान्य केली आहे. असं असलं तरी पक्षासाठी सर्व काम करेन असं श्रीनिवास पाटलांनी सांगितलं आहे,” असं शरद पवार म्हणाले. श्रीनिवास पाटील नाही तर कोण असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला असून त्यासंदर्भातही पवारांनी सूचक संकेत दिले आहेत. अगदी आपणही साताऱ्यामधून निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतो असे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.

नक्की वाचा >> ‘खैरेंचं काम करणार नाही, मी…’; उमेदवार यादीतून वगळल्यानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

पवार स्वत: उभे राहणार?

“साताऱ्यात उमेदवार देताना विशेष काळजी द्यावी लागते. एका गोष्टीचा मला आनंद आहे की सर्व सदस्य आणि सहकाऱ्यांच्या बैठकीत ज्या सूचना केल्या आहेत त्या पक्षाचा विचार करुनच केल्या आहेत,” असं शरद पवार म्हणाले. “साताऱ्यातील पदाधिकाऱ्यांची मतं मी जाणून घेतली आहेत. उमेदवार कोण असेल यासंदर्भात 2 ते 3 दिवसांमध्ये निर्णय जाहीर केला जाईल. साताऱ्यातून लढण्यासाठी काहींनी माझं नवंही सुचवलं आहे,” असं शरद पवार म्हणाले. काही आठवड्यांपूर्वीही शरद पवारांनी साताऱ्यासहीत अनेक ठिकाणाहून निवडणूक लढवण्याची ऑफर असल्याचा उल्लेख केला होता. मात्र यावेळी त्यांनी आपण निवडणूक लढणार नाही असंही म्हटलं होतं. तरीही साताऱ्या सारख्या महत्त्वाच्या जागेवर सक्षम उमेदवार न मिळाल्यास पवार स्वत: या ठिकाणी उभे राहिल्यास आश्चर्य वाटणार नाही, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

नक्की वाचा >> ‘मविआ’बरोबर काय बिनसलं? आंबेडकर स्पष्टच म्हणाले, ‘त्यांनी ‘तो’ फॅक्टर लक्षातच घेतला नाही म्हणून..’

सातारा किंवा माढ्यातून लढण्याची मागणी

शरद पवार यांनी यापूर्वी 22 मार्च रोजी पत्रकार परिषदेत बोलताना समोरच्या बाजूने उमेदवार घोषित झाल्यानंतर इनकमिंगमध्ये वाढ होईल, असा दावा केला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातारा किंवा माढा लोकसभेला शरद पवारांनी स्वतः उतरावं यासाठी कार्यकर्त्यांकडून मागणी केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवार यांनी आपण कोठूनही निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केलं होतं. पण आता अगदी जवळचा मित्र निवडणुकीत उतरत नसल्याने पवार या निर्णयाचा फेरविचार करु शकतात अशी चर्चा आहे. दरम्यान श्रीनिवास पाटील यांच्या नकारानंतर साताऱ्यामधून शशिकांत शिंदे किंवा बाळासाहेब पाटील यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळू शकते अशीही चर्चा आहे.





Source link

माढाचा तिढा सुटता सुटेना! भाजपला बसणार पक्षांतर्गत वादाचा फटका

माढाचा तिढा सुटता सुटेना! भाजपला बसणार पक्षांतर्गत वादाचा फटका


सचिन कसबे, झी मीडिया, माढा पंढरपूर : माढा… आधीचा पंढरपूर मतदारसंघ. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या पंढरीच्या विठुरायाची नगरी.. संत सावता माळींचं जन्मगाव अरण देखील इथलंच. मनकर्णा नदीच्या तीरावर वसलेला हा भाग. माढेश्वरी देवीच्या नावावरून माढा (Madha Loksabha Constituency) हे नाव पडलं. राव रंभाजी निंबाळकर राजेंनी बांधलेला प्राचीन भुईकोट किल्ला हे माढ्याचं वैशिष्ट्य. 2009 साली माढा हा नवा मतदारसंघ तयार झाला. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील चार आणि सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश माढामध्ये होतो.

माढा… समस्यांचा वेढा 
माढा तालुक्यातल्या अनेक गावात पाणीटंचाई पाचवीला पुजलीय. कुर्डुवाडीचा रेल्वे कारखाना कधीही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कुर्डुवाडी मोठी बाजारपेठ असतानाही रेल्वे उड्डाणपूल नसल्यानं नागरिकांची गैरसोय होतेय. टेंभुर्णी अहिल्यानगर महामार्गाचं दुहेरीकरण रखडलंय. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झालीय. केममधील नैसर्गिक पद्धतीनं कुंकू बनवण्याचा उद्योग मदतीअभावी दुर्लक्षित ठरलाय. साखर कारखाने वगळता इतर कोणतेही औद्योगिक प्रकल्प वा वसाहती इथं नाहीत

आतापर्यंत दोनवेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा, तर एकदा भाजपचा खासदार माढ्यामधून विजयी झालाय…

माढाचं राजकीय गणित
2009 साली शरद पवारांनी (Sharad Pawar) बारामतीऐवजी माढ्यामधून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. त्यांनी भाजपच्या सुभाष देशमुखांचा 3 लाख मतांनी पराभव केला. 2014 मध्ये मोदी लाटेतही माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले. त्यांनी स्वाभिमानी पक्षाचे सदाभाऊ खोत यांना केवळ 25 हजारांच्या मताधिक्यानं हरवलं. त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांनी भाजपची वाट धरली. 2019 मध्ये भाजपनं उमेदवार बदलला. मोदी लाटेत रणजीतसिंह नाईक निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या संजयमामा शिंदेंचा 85 हजार मतांनी पराभव केला. सध्या विधानसभेत राष्ट्रवादीचे 2, भाजपचे 2, शिवसेनेचा 1 आणि अपक्ष 1 असे सगळे महायुतीचे आमदार आहेत.

भाजपामध्ये पक्षांतर्गत मतभेद
माढामधून भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना (Ranjeetsingh Naik Nimbalkar) उमेदवारी दिलीय. त्यामुळं पक्षांतर्गत वाद उफाळून आलाय. धैर्यशील मोहिते पाटलांना (Dhairyasheel Mohite Patil) उमेदवारी नाकारल्यानं अकलूजच्या मोहिते पाटलांनी बंडाचं निशाण फडकावलंय. दुसरीकडं फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्याही विरोधाला धार आलीय. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी नाराजांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र धैर्यशील मोहिते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. महाविकास आघाडीनं अद्याप आपले पत्ते खोललेले केलेले नाहीत. माणमधील उद्योजक अभयसिंह जगताप राष्ट्रवादी पवार गटाचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे.

या मतदारसंघात मराठा समाजासोबत धनगर समाजाची लोकसंख्याही लक्षणीय आहे. त्यामुळं मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून इथली निवडणूक गाजण्याची शक्यता आहे. आरक्षणाचा मुद्दा उमेदवारांची डोकेदुखी वाढवू शकतो. पक्षांतर्गत नाराजीचा फटका रणजितसिंह नाईक निंबाळकरांना बसू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. मोहिते पाटील आपलं बंड कायम ठेवतात की तह करतात, यावर माढाचं जय-पराजयाचं गणित अवलंबून असणाराय. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच माढाचं राजकीय चित्र स्पष्ट होणाराय.





Source link

अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील आले समोरासमोर; इतक्यात चिमुकला म्हणाला….

अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील आले समोरासमोर; इतक्यात चिमुकला म्हणाला….



Amol Kolhe Shivaji Adhalrao Patil : अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील समोर आले अन्…. तितक्यात चिमुकल्यानं केलेल्या वक्तव्यानं वेधलं सगळ्यांचे लक्ष



Source link

महाविकास आघाडीसोबत काडीमोड; प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितची जरांगेंसोबत नवी आघाडी

महाविकास आघाडीसोबत काडीमोड; प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितची जरांगेंसोबत नवी आघाडी



जागावाटपावरुन वंचितची महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिस्कटली. वंचितने आघाडीवर घाव घालत नवी खेळी केली आहे. वंचितने थेट जरांगेंसोबत हातमिळवणी केली आहे. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp