UrjanovaC’s CO2 capture

UrjanovaC’s CO2 capture


A Mumbai-based start-up has developed an aqueous-based CO2 capture technology with a new catalyst. This technology can capture CO2 in industrial wastewater, marking a significant milestone in the country’s transition towards climate-friendly technologies.

The innovation emerged from research work at the National Centre of Excellence in Carbon Capture and Utilization (NCoE-CCU) at IIT Bombay. The Technology Business Incubator (TBI) of IIT Bombay (Society For Innovation & Entrepreneurship – SINE) nurtured UrjanovaC, which was fuelled by a vision to revolutionise clean energy solutions, says a press release.

UrjanovaC’s technology can capture CO2 from both industrial flue gas and ambient air in the presence of water, which can be industrial wastewater or even seawater. It relies upon earth-abundant elements along with non-potable water for a sustainable carbon management process implementable for multi-billion-tonne CO2 removal. The captured CO2 can be subsequently converted to high-value minerals while the catalyst gets recycled. It will ensure the efficient capture of CO2 to permanently fix them as stable mineral carbonates, thereby providing a sustainable CCUS technology.

The system developed by the start-up, which has been founded by IIT Bombay faculty members, Prof Vikram Vishal and Prof Arnab Datta, can be widely employed in the energy sector of the upcoming smart cities to lay the blueprint for carbon footprint-free power generation and provide solutions for reducing CO2, a major greenhouse gas. It is an environment-friendly solution that can also reduce slag and waste in industries like steel, cement and chemicals.

The patented technology, which is at TRL 5, will significantly help industries to minimise their carbon footprint without compromising their production capacities.





Source link

एअर इंडियामधून 180 कर्मचाऱ्यांना नारळ, कंपनीने सांगितलं 'हे' कारण

एअर इंडियामधून 180 कर्मचाऱ्यांना नारळ, कंपनीने सांगितलं 'हे' कारण


पुढील
बातमी

भाजपच्या प्रस्तावाला युवा स्वाभिमान पक्ष देणार पाठिंबा, ठराव मंजूर करताना नवनीत राणांना अश्रू अनावर





Source link

यंदा प्रथमच मिळणार 'वोट फॉर्म होम' सुविधा, कोण करु शकेल घरबसल्या मतदान?

यंदा प्रथमच मिळणार 'वोट फॉर्म होम' सुविधा, कोण करु शकेल घरबसल्या मतदान?


लोकसभा निवडणूक 2024 चे बिगुल अखेर वाजलं आहे. नुकत्याच झालेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. देशात 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. संपूर्ण देशभरात 19 एप्रिलपासून 1 जून अशा सात टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. तर संपूर्ण लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच मतदारांना वोट फॉर्म होम ही सुविधा देण्यात येणार आहे. 

प्रथमच मतदारांना ‘वोट फॉर्म होम’ सुविधा 

निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीसाठी असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांसाठी विशेष सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत. यंदा प्रथमच ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा दिली जाणार आहे. ज्या व्यक्तींचे वय 85 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त आहे, त्या मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेतले जाणार आहे. 

ज्या व्यक्तींचे वय 85 वर्षांपेक्षा अधिक आहे आणि जे दिव्यांग आहेत, त्यांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात येईल. त्यासाठी त्यांना एक फॉर्म भरुन द्यावा लागेल. त्यानंतर त्यांच्या मतदानाच्या दिवशी त्यांच्या घरी मतपेटी नेली जाईल, अशी माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

ही सुविधा 85 वर्षांच्या वृद्ध व्यक्तींसाठी

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाचा फॉर्म 12 डी भरून जमा करावा लागेल. निवडणुकांची घोषणा झाल्यापासून संबंधित लोकसभेची अधिसूचना जारी होईपर्यंत 15 दिवसांपर्यंत तुम्हाला अर्ज सादर करता येईल. त्यानंतर मतदानाच्या दिवशी अधिकारी स्वतः तुमच्या घरी येतील आणि बॅलेट पेपरवर तुमचं मत घेतील. ही सुविधा फक्त मतदान केंद्रांवर येऊ न शकणाऱ्या मतदारांसाठी असणार आहे. ही सुविधा 85 वयाच्या वृद्ध व्यक्तींसाठी असणार आहे. 

या पत्रकार परिषदेमध्ये राजीव कुमार यांनी मतदारांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार 1.82 कोटी तरुण पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. तर 82 लाख मतदार हे 85 वयापेक्षा अधिक आहेत. यंदाच्या मतदार यादीत महिलांचे प्रमाण जास्त आहे. या नवीन मतदार यादीत 85 लाख मुलींचा समावेश आहे. संपूर्ण देशात साडेदहा लाखांहून अधिक मतदार केंद्र आहेत. या मतदार केंद्रांवर पिण्याचे पाणी, शौचालय आणि व्हिलचेअरची सुविधा देण्यात येणार आहे. 

महाराष्ट्रात मतदान कधी?

महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. तसंच 26 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे.

पहिला टप्पा – मतदान तारीख – 19 एप्रिल 
महाराष्ट्र – रामटेक, नागपूर, भंडारा, गरचिरोली, चंद्रपूर

दुसरा टप्पा – मतदान तारीख – 26 एप्रिल 
महाराष्ट्र – बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा – मतदान तारीख – 7 मे 
महाराष्ट्र – रायगड, बारामती, उस्मानबाद, लातूर, सोलापर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा – मतदान तारीख – 13 मे 
महाराष्ट्र – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा – मतदान तारीख – 20 मे
महाराष्ट्र – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतल्या 6 जागा





Source link

जसं डॉक्टरांच्या नावामागे Dr लावतात तसंच आता शिक्षकांच्या नावा मागे Tr लागणार; सरकारचा मोठा निर्णय

जसं डॉक्टरांच्या नावामागे Dr लावतात तसंच आता शिक्षकांच्या नावा मागे Tr लागणार; सरकारचा मोठा निर्णय



जसं डॉक्टरांच्या नावामागे Dr लावतात तसंच आता शिक्षकांच्या नावा मागे Tr लागणार आहे. सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 



Source link

फोनवर बोलताना तुम्हीसुद्धा ही चूक करत नाही ना? मुंबईकराला 1.48 कोटींचा गंडा; पण…

फोनवर बोलताना तुम्हीसुद्धा ही चूक करत नाही ना? मुंबईकराला 1.48 कोटींचा गंडा; पण…


Group of 7 People Arrested By Mumbai Police: मुंबई पोलिसांच्या दक्षिण विभागाच्या सायबर गुन्हे शाखेने कोलकात्यामधील एका सायबर चोरांच्या टोळीला अटक केली आहे. कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या टोळीत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे जाऊन मुंबई पोलिसांनी 7 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडे 50 लाख रुपये कॅश आणि इतर डिजीटल साहित्य सापडलं आहे. या टोळीनं एका मुंबईकराला तब्बल दीड कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असा संपूर्ण टोळीच पोलिसांच्या हाती लागली आहे. 

1 कोटी 48 लाख 56 हजार रुपयांचा अपहार

चर्चगेट येथे राहणाऱ्या तक्रारदार व्यक्तीने सायबर पोलिसांकेड 7 मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणामध्ये फसवणूक, सायबर कायद्याच्या कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु करण्यात आला. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार 29 फेब्रुवारी ते 3 मार्चदरम्यानच्या काळात तक्रारदाराच्या कुटुंबियांच्या खात्यावरुन तब्बल 1 कोटी 48 लाख 56 हजार रुपयांचा अपहार करण्यात आला. अज्ञात व्यक्तीने तक्रारदाराबरोबरच त्याच्या कुटुंबियांच्या बँक खात्यातून, डेबीड कार्डमधून आणि क्रेडीट कार्डमधून माहिती मिळवून पैशांचा अपहार केला. तक्रारदार व्यक्तीबरोबरच त्याची पत्नी आणि परदेशात राहणाऱ्या मुलीच्या एचडीएफसी बँकेच्या बचत खात्यांमधून पैसे क्रेडीट कार्डद्वारे फ्लिपकार्ट, कार्डलेन, मंत्रा, स्वीगी सारख्या ऑनलाइन माध्यमांवरुन खर्च करण्यात आले. ऑनलाइन पोर्टलवर तब्बल 1 कोटी 48 लाख 56 हजार रुपयांची खरेदी 4 दिवसांमध्ये करण्यात आली. क्रेडीट कार्डवरुन महागड्या वस्तू मागवण्यात आल्या होत्या. या वस्तू कोलकात्यामधील वेगवेगळ्या ठिकाणावर डिलेव्हर करण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाल्यानंतर मुंबई पोलिसांची एक तुकडी तपासासाठी कोलकात्याला रवाना झाली. 

चोराची इंग्रजी ऐकून व्हाल थक्क…

मुंबई पोलीस शहरात आल्याचं समजल्यानंतर आरोपी सिलीगुडीमध्ये पळून गेले. मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतलं. चौकशीनंतर या 7 जणांना अटक करण्यात आलं. 7 जणांना अटक करुन सीलीगुडी न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं असता त्यांना 16 मार्चपर्यंत ट्रांझीट रिमांड देण्यात आली आहे. आरोपी कोलकात्यामध्ये कॉल सेंटर चालवत असल्याचं तपासात समोर आलं आहे. आरोपी भारतीय आणि परदेशी लोकांना क्रेडीट कार्डच्या सिक्युरीटीसंदर्भातील सेवा देण्याची ऑफर करत कॉल करुन त्यांच्या क्रेडीट कार्डची माहिती मिळवायचे. या माहितीच्या आधारे ते ऑनलाइन शॉपिंग करायचे. या व्यक्तीला 1.48 कोटींचा गंडा घालण्यात आला होता पण पोलिसांनी वेळीच कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. अगदी परदेशी कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांप्रमाणे ब्रिटीश अॅक्सेंटमध्ये फोनवर हे कर्मचारी बोलत असल्याने कॉल पदेशातून आल्यासारखं वाटायचं. या टोळीतील चोराची इंग्रजी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल…

50 लाख कॅश, 27 मोबाईल फोन्स, 5 घड्याळं अन्…

अटक करण्यात आलेल्यांमध्ये रयान शाहदास (22), अरुणभा हल्डर (22), रितम मंडल (23), तमोजीत सरकार (22), रजिब शेख (24), सुजोय नासकर (23) आणि रोहीत बैदय (23) यांचा समावेश आहे. हे सर्वजण कोलकात्याचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 50 लाख रुपये रोख रक्कम, 27 मोबाईल फोन्स, 5 महागडी घड्याळं, 3 एअर बड्स, 1 मॅकबूक, 1 आयपॅड, 11 परफ्युम बॉटल्स, 2 लेडीज बॅग, 2 फ्रिज, 2 एअर कंडिशनर, 2 प्रिंटर आणि 1 किचन चिमणी जप्त करण्यात आली आहे. 

पोलिसांनी केलं आवाहन

डल्ला मारलेल्या 1 कोटी 48 लाखांपैकी 60 लाखांच्या सामानची ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून डिलेव्हरी करण्यात आली होती. इतर मालाची डिलेव्ही पोलिसांनी तात्काळ थांबवली. पोलिसांनी अशाप्रकारे अज्ञातांना फोनवरुन आपला बँकिंगसंदर्भातील तपशील देऊ नये असं आवाहन केलं आहे. 





Source link

Latur LokSabha : विलासरावांच्या लातूरमध्ये भाजप हॅटट्रिक करणार? की काँग्रेसला सुर गवसणार?

Latur LokSabha : विलासरावांच्या लातूरमध्ये भाजप हॅटट्रिक करणार? की काँग्रेसला सुर गवसणार?


Sudhakar Shrangare vs congress : लातूर… कधीकाळची राष्ट्रकूट राजघराण्याची राजधानी… तब्बल १९ मार्गांनी जोडली गेलेली गंजगोलाईची बाजारपेठ ही लातूरची खासियत… हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत लातूर हैदराबाद संस्थानच्या अमलाखाली होतं. १९६० मध्ये ते महाराष्ट्रात विलीन झालं. 15 ऑगस्ट 1982 रोजी मराठवाड्यात लातूर जिल्हा अस्तित्वात आला. विलासराव देशमुख आणि डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर असे दोन माजी मुख्यमंत्री लातूरनं दिले. माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, केशवराव सोनवणे अशा दिग्गज राजकीय नेत्यांचा जिल्हा… मात्र एवढे मातब्बर नेते असतानाही लातूर विकासापासून दूरच राहिलं.

लातूरच्या समस्या काय?

भीषण पाणीटंचाई लातूरकरांच्या पाचवीलाच पुजलेली… पिण्याच्या पाण्याअभावी लातूर वर्षानुवर्ष तहानलेलंच आहे. त्यात दूषित पाणीपुरवठ्यानं डोकेदुखी वाढवलीय. लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्नही प्रलंबित आहे. आरोग्याच्या विविध समस्या देखील नागरिकांना जाणवतात. तर रस्ते आणि सोईसुविधांचा अभाव देखील दिसून येतो.

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2009 पासून लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या सलग दोन निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवारांचा पराभवाची चव चाखावी लागली.

लातूरचं राजकीय गणित

2009 मध्ये काँग्रेसचे जयवंत आवळे यांनी भाजपचे सुनील गायकवाड यांचा ८ हजार मतांनी पराभव केला. मात्र 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपचे डॉ. सुनील गायकवाड यांनी काँग्रेसचे दत्तात्रय बनसोडे यांना तब्बल अडीच लाखांच्या मताधिक्यानं हरवलं. 2019 मध्ये भाजपच्या सुधाकर श्रृंगारे यांनी काँग्रेसचे मच्छिंद्र कामत यांचा पावणे तीन लाखांनी पाडाव केला. विधानसभेत सध्या लातूर शहरमधून अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख हे दोन काँग्रेस आमदार आहेत. अहमदपूरमध्ये बाबासाहेब पाटील आणि उदगीरमधून संजय बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. निलंग्यात भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, तर लोहामध्ये शेकापचे शामसुंदर शिंदे आमदार आहेत.

भाजपकडून अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. मात्र भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांनाच उमेदवारी जाहीर केलीय. तर काँग्रेसकडेही इच्छुकांची भाऊगर्दी असली तरी मातब्बर, तगडा उमेदवार नाही. माजी सनदी अधिकारी भा. ई. नागराळे आणि बाबासाहेब गायकवाड हे काँग्रेसकडून इच्छुक असल्याचं समजतंय. 

दरम्यान, मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंनी सुरू केलेल्या आंदोलनाचा परिणाम यंदाच्या निवडणुकीत पहायला मिळणार आहे. भाजपसाठी सध्या तरी पोषक वातावरण असल्याचं मानलं जातंय. भाजपला लागोपाठ तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून विजयाची हॅटट्रिक करायची आहे. तर पुन्हा एकदा पक्षाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं मोठं आव्हान काँग्रेसपुढं आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपचं वर्चस्व मोडून काढणं काँग्रेसला खरंच शक्य होईल? असा सवाल विचारला जातोय.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp