Navi Mumbai: शाळेतील भांडण जीवावर उठले, विद्यार्थ्यांच्या मारहाणीत अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Navi Mumbai: शाळेतील भांडण जीवावर उठले, विद्यार्थ्यांच्या मारहाणीत अल्पवयीन मुलाचा मृत्यू


Navi Mumbai Crime News:  शाळेतील विद्यार्थ्यांची गटा-तटाची भांडणे, हुल्लडबाजी या घटना काही नवीन नाहीत. मात्र, नवी मुंबईतील एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या भांडणात एकाचा जीव गेल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तर, शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. 

नवी मुंबईतील तुर्भे परिसरात एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉ. सी. वि. सामंत शाळेच्या बाहेर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांमध्ये मोठा राडा झाला. या गंभीर घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांना या घटनेबाबत समताच ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, त्यांच्यात हा वाद नेमका कशावरुन झाला हे मात्र अद्याप समोर आलेले नाहीये. आदित्य भोसले असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 

तुर्भे येथील मैदानात बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली होती. बारावीसह इतर वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद झाला होता. शाळेत झालेल्या हा वाद शाळेबाहेर आल्यावर पुन्हा उफाळला. एका गटाच्या 10 ते 15 विद्यार्थ्यांनी दोन विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली. यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान आदित्यचा मृत्यू झाला. तर, दुसरा मुलगा याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, शाळेतील विद्यार्थ्यांवरही याचा परिणाम झाला आहे. पालकही या गंभीर घटनेने धास्तावलेले आहेत. 

गंभीर घटनेचे कारण अद्यापही समोर नाही पण पोलिसांनी घटनेचा संशयित आरोपी विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात आहेत. मयत,जखमी आणि आरोपी मुलगा अकरावीचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. दहावीचा पेपर सुरू असताना बाहेर राडा झाला असून एपीएमसी पोलीस अधिक तपास करत आहेत. 
 
बुधवारी ही घटना घडल्यानंतर मृत व जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेत कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर पोलिसांनी काही संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे तर, इतरांचा शोध सुरू आहेत. तसंच, या मुलांमध्ये वाद नेमका कशामुळं झाला, हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिस याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळं अल्पवयीन मुलांच्या होणाऱ्या वादांचे पडसाद इतक्या गंभीरपणे उमटू शकतात हे वास्तव समोर आले आहे. 





Source link

अजित पवार यांना थेट बारामतीत चॅलेंज करणाऱ्या विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार भेट

अजित पवार यांना थेट बारामतीत चॅलेंज करणाऱ्या विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार भेट



Maharashtra politics : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा तिरंगी लढत होणार आहे. कारण महायुतीत असलेले शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारेंनी बारामतीत पवारांनाच ललकारलंय. विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून लढणार आहेत.



Source link

Short Form मध्ये 'भाजप' लिहिण्यासाठी योजनेचं नाव बदललं; जनतेच्या पैशातून औषधांवरही जाहिरात

Short Form मध्ये 'भाजप' लिहिण्यासाठी योजनेचं नाव बदललं; जनतेच्या पैशातून औषधांवरही जाहिरात



BJP Advertising On Medicine Bottle: पूर्वी या योजनेच्या नावामध्ये परियोजना हा शब्द नव्हता. मात्र ‘भा.ज.प’ असे संक्षिप्त स्वरुप लिहिता यावे म्हणून या योजनेच्या नावामध्ये संपूर्ण शब्दाचा समावेश करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.



Source link

मुख्यमंत्र्यांनी आपल्या शिवराळ नेत्यांना आवरावं नाही तर… अजित पवार यांचा शिंदे गटाला इशारा

मुख्यमंत्र्यांनी आपल्या शिवराळ नेत्यांना आवरावं नाही तर… अजित पवार यांचा शिंदे गटाला इशारा



बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशीच लढाई होणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. आता या लढाईत आता तिसराही उमेदवार उतरलाय. तोही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा.. या उमेदवाराने थेट पवारांनाच चॅलेंज दिलंय. त्यामुळे बारामतीची लढाई आणखी रंगतदार बनलीय. 



Source link

Weather news : रखरखाट! राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र; डोंगरदऱ्यांमधील हिरवळ दिसेनाशी

Weather news : रखरखाट! राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र; डोंगरदऱ्यांमधील हिरवळ दिसेनाशी


पुढील
बातमी

Kolhapur LokSabha : शाहू महाराजांविरुद्ध कोण ठोकणार शड्डू? कोल्हापुरात भाजपची तिरकी चाल!





Source link

'चंद्रहार पाटील कुस्तीतील सचिन तेंडुलकर, लोकसभा निवडणुकीत सांगलीचा पहिला निकाल असेल'

'चंद्रहार पाटील कुस्तीतील सचिन तेंडुलकर, लोकसभा निवडणुकीत सांगलीचा पहिला निकाल असेल'


Loksabha 2024 : महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याने आज  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितित मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात (Shivsena Thackeray Group) प्रवेश केला. यावेळी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) तब्बल 500 गाड्यांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत दाखल झाला. उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील याच्या मनगटावर शिवबंधन बांधलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी या मर्दाची छाती पाहिल्यानंतर सांगलीत आपल्याशी लढण्याची छाती कोणचाी होणार नाही असं म्हटलं, तसंच संपूर्ण महाराष्ट्रात आणि एकूण राजकारण बघता, पक्षातून नामर्द पळून जातायत, पण मर्द शिवसेनेत येतायत, शिवसेना ही नेहमी मर्दांची संघटना राहिलीय. लोकसभा निवडणुकीत सांगलीचा पहिला निकाल असेल असं म्हटलंय. 

गदा आणि मशाल ही नेही मर्दाच्या हाती शोभतं, आता ही गदा आणि मशाल घेऊन आपल्याला सांगलीतून एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित केलंय. आता लवकरच सांगलीचा दौरा करणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. गद्दारांना आडवं करायचं आहे, भविष्य तुमच्या हाती आहे, जनता आपल्याकडे अपेक्षेने पाहतेय, आजच्या पक्षप्रवेशामुळे जनतेला हे कळलंय, आपल्यासाठी लढणारे मर्द आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

चंद्रहार पाटील यांची प्रतिक्रिया
एका शेतकऱ्याच्या मुलाला जो मानसन्मान दिलात, त्याबद्दल मनापासून आभार असं म्हणत चंद्रहाट पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे आभार मानले. यावेळी चंद्रहार पाटील यांच्या सहकाऱ्यांनी अब की बार चंद्रहार अशा घोषणा दिल्या. 

चंद्रहार पाटील निवडणुकीच्या आखाड्यात?
महाविकास आघाडीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तीढा सूटल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने सांगली लोकसभा मतदारसंघात लक्ष केंद्रीत केलंय. मातोश्रीवर सांगली लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार यावर चर्चा करण्यात आली.  या मतदार संघातून माजी हिंद केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil)ला लोकसभा उमेदवारी मिळणार हे आता जवळपास निश्चित झालंय. 

काही दिवसांपूर्वी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. सांगली लोकसभा मतदारसंघ  जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीने सुद्धा पाठिंबा दिला आहे

चंद्रहार पाटील निवडणुकीच्या तयारीला
चंद्रहार पाटील गेल्या चार महिन्यांपासूनची लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. रक्तदान चळवळीच्या माध्यमातून त्याने जिल्ह्यातील गावागावात संपर्क सुरु केला आहे. सैनिकांसाठी महारक्तदान यात्रेचंही आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करुन त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp