महाराष्ट्रात उभारणार देशातील आधुनिक सायबर लॅब; नवी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

महाराष्ट्रात उभारणार देशातील आधुनिक सायबर लॅब; नवी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा



Navi Mumbai News :  नवी मुंबई येथ देशातील आधुनिक सायबर लॅब उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 



Source link

'निवडणूक होईपर्यंत साथ सोडणार नाही'; पक्षांतर्गत वादावर भास्कर जाधवांचा थेट निशाणा

'निवडणूक होईपर्यंत साथ सोडणार नाही'; पक्षांतर्गत वादावर भास्कर जाधवांचा थेट निशाणा



Maharashtra Politics : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या भावनिक पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यावर बोलताना भास्कर जाधव यांनी निवडणूक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे



Source link

कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वेच्या कामाची पायाभरणी; .कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या 27 गावांना मोठा फायदा

कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वेच्या कामाची पायाभरणी; .कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या 27 गावांना मोठा फायदा



कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात जाली आहे. मेट्रोच्या कामाची पायाभरणी करण्यात आली आहे, 



Source link

नाशिक हादरलं! भाच्याने मामीकडे केली Sex ची मागणी! नकार दिल्याने हत्या

नाशिक हादरलं! भाच्याने मामीकडे केली Sex ची मागणी! नकार दिल्याने हत्या


Man Killed 27 year old Aunt: नाशिकमध्ये मामा-भाच्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. 6 मार्च रोजी नाशिक रोड भागात राहत्या घरात एका महिलेची हत्या झाल्याच्या प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा पोलीस तपासात समोर आला आहे. मामीकडे शरीरसुखाची मागणी केल्यानंतर तिने नकार दिल्याने भाच्यानेच मामीची निघ्रृण हत्या केल्याचं उघड झालं असून यासंदर्भातील माहिती पोलिसांनी दिली आहे. नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळकेंनी यासंदर्भातील सविस्तर माहिती शुक्रवारी प्रसारमाध्यमांना दिली. 

नेमका हा प्रकार घडला कुठे?

“6 मार्च 2024 रोजी एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राजवळ जगताप मळा परिसरामध्ये ही घटना घडली आहे. मयत महिलेचे नाव कांती सुदाम बनेरीया असं आहे. कांती या केवळ 27 वर्षांच्या होत्या. कांती या त्यांच्या पतीला पाणीपुरी आणि भेळपुरी विकण्याच्या व्यवसायामध्ये हातभार लावायच्या,” असं शेळकेंनी सांगितलं. एकलहरे परिसरात राहणारं बनेरीया कुटुंब हे हातावर पोट असलेलं कुटुंब आहे, असंही शेळकेंनी नमूद केलं.

दोघांबरोबर राहत होता भाचा

“कांती आणि त्यांच्या पतीबरोबर मागील 7 ते 8 महिन्यांपासून पती सुदामचा भाचा अभिषेक सिंह राहत होता. अभिषेक हा मूळ गावी येऊन जाऊन नाशिकमधील आपल्या मामाच्या घरी राहत होता. काही दिवसांपूर्वी तो इथे राहायला आला होता. तो सुद्धा पाणीपुरीच्या व्यवसायामध्ये होता,” अशी माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली.

भाच्याच्या गळ्यावर होते वार

कांती यांची हत्या झाली त्यावेळी घरात असलेल्या अभिषेकवरही अज्ञात व्यक्तीने वार केल्याचा दावा करण्यात आला. अभिषेकच्या गळ्यावरही वार करण्यात आले होते, असं पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं होतं. “भाचा अभिषेकने दिलेल्या माहितीच्या आधारे मयत कांतीचे पती सुदाम यांनी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, अज्ञात इसमाने पत्नीची हत्या करुन भाच्याच्या गळ्यावर चाकूने हल्ला केल्याचं सुदाम यांनी म्हटलं होतं. पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावा आणि केलेल्या तक्रारीमधील घटनाक्रम जुळवून खात्री करुन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही अज्ञात इसम या ठिकाणी आलेला नव्हता असं पोलिसांच्या तपासात समोर आलं,” असं शेळकेंनी सांगितलं. 

नक्की वाचा >> ‘मी शुद्धीवर आले तेव्हा तो माझ्यावर बलात्कार करत होता’; 21 वर्षीय मुंबईकर तरुणीच्या दाव्याने खळबळ

मामीकडून शरीरसुखाची मागणी

“पोलिसांनी तपास अन्य मार्गाने सुरु केला. पोलिसांनी कांती, सुदाम आणि अभिषेक या तिघांचेही मोबाईल रेकॉर्ड्स तपासले. परिस्थितीजन्य पुरावे आणि इतर माहिती पोलिसांनी गोळा केली. या तपासात असं निष्पण्ण झालं की कांतीचा भाचा अभिषेक हा तिच्याकडे अनैतिक संबंधांसाठी (शरीरसुखाची) सातत्याने मागणी करायचा. मात्र कांती त्याच्या या मागणीकडे दुर्लक्ष करायची. यातूनच कांती आणि अभिषेकमध्ये वाद झाला होता. याच मुळ वादातून रोज वेगवेगळ्या गोष्टींचं निमित्त काढून या दोघांमध्ये वाद व्हायचे. त्यामुळेच अभिषेकला घरातून कायमचं हकलवून लावण्याचा कांतीचा विचार होता. यासंदर्भातील चाहूल अभिषेकला लागली. त्यामुळेच त्याने स्वत:च्या मामीची हत्या केली,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.

…म्हणून स्वत:वर केले वार

आपणच मामीची हत्या केली आहे हे उघडकीस येऊ नये म्हणून अभिषेकने स्वत:च्या गळ्यावर वार करुन घेतले आहेत. तो स्वत: गुन्हा लपवण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत, असं शेळके म्हणाले. पोलिसांची त्याच्यावर नजर असून तो बरा झाल्यानंतर त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाईला सुरुवात होईल असं पोलिसांनी सांगितलं.

तपासाची दिशा वळवण्याचा प्रयत्न…

अज्ञात इसम सांगून तपासाची दिशा वळवण्याचा प्रयत्न आरोपीने केला. मात्र वरिष्ठांच्या सूचनेनुसार योग्य मार्गावर तपास करत पोलीस खऱ्या आरोपीपर्यंत पोहचल्याबद्दल शेळकेंनी पोलिसांच्या टीमचं कौतुक केलं आहे.





Source link

सुनेचा सासुवर अत्याचार; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही वृद्ध महिला असुरक्षित

सुनेचा सासुवर अत्याचार; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही वृद्ध महिला असुरक्षित


Supreme Court : वृद्ध महिलांमधील सर्वेक्षणात, 16% ने उघड केले की त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून कोणत्या ना कोणत्या स्वरुपात त्रास सहन करावा लागला आहे, शारीरिक शोषण हे अत्याचाराच्या शीर्ष प्रकारांपैकी एक आहे. 66% वयोवृद्ध स्त्रिया समाजात वृद्ध अत्याचार प्रचलित असल्याचे मानतात, ज्यांचे शोषण झाले, त्यापैकी फक्त 16% महिलांनी अत्याचाराची नोंद केली. गैरवर्तन मुख्यतः शारीरिक शोषण (52%), शाब्दिक अत्याचार (51%), अनादर (60%), दुर्लक्ष (51%) आणि आर्थिक शोषण (25%) या स्वरूपात होते. सून, पती-पत्नी आणि इतर नातेवाईकही अत्याचार करणारे होते.

संपूर्ण जग ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा करत आहे आणि त्याच वेळी, शारीरिक, भावनिक आणि आर्थिक शोषणाच्या सर्वात लक्षणीय प्रकरणात, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला तिच्यावरील सन्मान आणि निवडीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. दुसऱ्या महिलेच्या सांगण्यावरून दैनंदिन व्यवहार, जी तिची सून असते. 

जुहू येथे राहणाऱ्या नलिनी महेंद्र शाह या ज्येष्ठ नागरिक विधवा महिलेने सर्वोच्च न्यायालयासह विविध न्यायालयांच्या आदेशानंतरही आपल्या सून शीतल शाहच्या जुहू हाऊसमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ही घटना त्या ज्येष्ठ नागरिकाची आहे जिने ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणासमोर अर्ज दाखल केला होता आणि त्यानंतर 16/8/2 रोजी तिचा मुलगा व सुनेला घराबाहेर काढण्याचा आदेश देण्यात आला होता.

सुनेने या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि मुंबई उच्च न्यायालयाने न्यायाधिकरणाच्या आदेशाची पुष्टी केली. शीतल शहा यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि सर्वोच्च न्यायालयाने तिला प्रथम न्यायाधिकरणाच्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश दिले आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तिला लोणावळा येथील एका बंगल्यात पर्यायी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने नंतर शीतलची याचिका फेटाळून लावली आणि न्यायाधिकरणाच्या आदेशाची पुष्टी केली.

तथापि, 5/2/2024 रोजी, शीतलने काही गुंडांसह जुहू हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि जुहू पोलिस अधिकाऱ्यांची दिशाभूल केली आणि तिने 6/2/2024 रोजी पुन्हा जबरदस्तीने मालमत्तेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार नलिनी शहा यांनी शीतलविरुद्ध अवमानाची कारवाई केली असून त्यामध्ये शीतल शहा यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

या घटनेमुळे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आणि दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर देशाच्या उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतरही त्यांना खटकणाऱ्या वादकांकडून धमक्या आणि भीती वाटते, अशा ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याण आणि सुरक्षिततेबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे. शीतल शहा सारख्या ज्यांनी काही अत्यंत प्रभावशाली लोकांच्या सांगण्यावरून न्यायालयाच्या आदेशांची पूर्ण अवहेलना केली.

आपल्या समाजात अकार्यक्षम कौटुंबिक नातेसंबंधांना खूप कलंक लावले जातात. वृद्धांवर अत्याचार ही गंभीर समस्या बनत चालली आहे. अनेक प्रकरणे नोंदवली जात नाहीत कारण वडील घाबरतात किंवा पोलिस, मित्र किंवा कुटुंबाला हिंसाचाराबद्दल सांगू शकत नाहीत. पीडितांना हे ठरवावे लागेल की त्यांना दुखावले जात आहे हे सांगायचे किंवा ते ज्यांच्यावर अवलंबून आहेत किंवा त्यांची काळजी घेत आहेत त्यांच्याकडून अत्याचार करणे सुरू ठेवावे.





Source link

पहिली प्रतिक्रिया; शेळकेंवर संतापलेल्या शरद पवारांना पाहून सुनील तटकरे म्हणतात 'उद्यापर्यंत….'

पहिली प्रतिक्रिया; शेळकेंवर संतापलेल्या शरद पवारांना पाहून सुनील तटकरे म्हणतात 'उद्यापर्यंत….'


पुढील
बातमी

Weather News : राज्यात थंडी शेवटच्या टप्प्यात; उन्हाच्या झळा तीव्र होऊन वीकेंडला होणार जीवाची काहिली





Source link

YouTube
Instagram
WhatsApp