कॉंग्रेस नेत्यांची मुंबईत गुप्त बैठक! वर्षा गायकवाडांचं टेन्शन वाढणार? उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच…'
Loksabha Varsha Gaikwads: उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम यांच्यात लढत होणार आहे.
Source link
Loksabha Varsha Gaikwads: उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम यांच्यात लढत होणार आहे.
Source link
Devendra Fadnavis : माझ्याशी विश्वासघात केला तर त्याचा सत्यानाश होतो असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अकलूजच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले. माझा इतिहास तपासा, ईश्वरच त्यांचा सत्यानाश करतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील, उत्तम जानकर यांच्यासह विरोधकांना इशारा दिला आहे.
विजयसिंह मोहिते पाटलांना देवेंद्र फडणवीसांनी उपकाराची जाणीव करुन दिली. मोहिते पाटलांचं राजकारण पवारांनी संपुष्टात आणलं तेव्हा भाजपनं त्यांना पाठिंबा दिल्याचं फडणवीस म्हणाले. महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या निर्णयावर, फडणवीसांनी सोलापुरात प्रतिक्रिया दिली.
माढा लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक पाहायला मिळालाय. काँग्रेस नेते धवलसिंह मोहिते पाटलांचा भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा मिळवण्यात फडणवीसांना यश आलंय. धवलसिंह हे विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे आहेत. त्यांच्या रुपात फडणवीसांनी आणखी एक पुतण्या गळाला लावला आहे. तसंच माढा निवडणुकीत मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील संघर्ष निर्माण करण्यातही त्यांना यश आलंय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा कुठे होणार याबाबत आम्ही लवकरच जाहीर करू, असं देवेंद्र फडणवीसांनी सोलापुरात सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचं नेतृत्व करावं यासाठी राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी सभा घेणार का याबाबत उत्सुकता होती. या पार्श्वभूमीवर, फडणवीसांनी ही माहिती दिली.
देशात दारूबंदी करण्यासाठी मोदींकडे मागणी करणार असल्याचं वक्तव्य लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी केलय. तसेच लाल किल्ल्यावरून स्वच्छ भारताची घोषणा करणारे नरेंद्र मोदी हे एकमेव पंतप्रधान असल्याचा दावाही त्यांनी केला. बार्शीतील प्रचार सभेत त्या बोलत होत्या.
2017 सालीच भाजपसोबत जाण्याचं ठरलं होतं. अजित पवारांचा दौंडच्या सभेमध्ये गौप्यस्फोट केला. एका उद्योगपतीच्या बंगल्यावर देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि आमच्या बैठका व्हायच्या. काँग्रेससोबतही बोलणी सुरू होती. खरगे आणि शरद पवारांमध्ये खटके उडाले आणि सकाळचा शपथ विधी झाला. अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीबाबत स्पष्टच सांगितलं.
जावेद मुलानी, झी 24 तास, बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी राज्यात चर्चेत असतात. ते भाषणादरम्यान मध्येच बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना स्टेजवरुन चिमटे काढताना दिसतात. अनेकदा बोलण्याच्या भरात त्यांच्याकडून भलतीच विधाने निघतात. पण काही चुकीचे शब्द वापरले गेल्यास ते तात्काळ माफीदेखील मागताना दिसतात. दरम्यान अजित पवारांचे एक विधान सध्या सोशल मीडियात व्हायरल होतंय. यामध्ये ते आपल्या कार्यकर्त्यांना सज्जड दम देताना दिसतायत.
इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथील वक्तव्य अजूनही अजित दादांना चांगलेच बोचते आहे. आजही त्यांनी शिर्सुफळ येथील सभेत बोलताना याचा उल्लेख केला. काही वर्षांपूर्वी माझ्या तोंडून चुकून ते धरणातील वाक्य गेले आणि त्याचा फार मोठा फटका मला बसला असे अजित पवार यांनी आवर्जून सांगितलेय..
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते.. या सभेत पवार बोलत होते..
अजित पवार हे त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली तर पुन्हा माझ्या घरची पायरी चढायचं नाही. काहीजण माझी सभा झाली रे झाली की, समोरच्या पार्टीकडे जातात. बिनविरोध पदे मी दिली आणि प्रचार मात्र त्यांचा करत आहेत, असे अजित पवार म्हणाले.
आपले विधान आणखी स्पष्ट करण्यासाठी अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं..कुंकू लावायचा असेल तर एकाचेच लावा. माझे तरी लावा नाहीतर त्यांचे तरी लावा. हा काय चाटाळपणा लावलाय. हे झाकून राहत नाही. मला कळते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतसुद्धा मला कळले होते. पण जुने पुराने उकळून काढायचे नाही, असे मी ठरवल्याचे अजित पवार म्हणाले.
ते वाक्य वापरताना अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांचा संदर्भ घेतला आणि ते म्हणाले की उद्या कदाचित ते बोलतील अजितदादा दम द्यायला लागलेत पण मी माझ्या कार्यकर्त्यांना दम देतोय. अशा स्वरूपात अप्रत्यक्षरीत्या रोहित पवार यांना त्यांनी टोला मारलाय.
पण हे बोलतानाच त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील नेते देशमुख यांच्या उपोषणाचा संदर्भ घेऊन जे वाक्य वापरले होते आणि त्यातून त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.. त्याचा संदर्भ पुन्हा एकदा घेतला.. आणि त्यांनी सांगितले की, मी माझ्या मेंदूला सातत्याने सांगत असतो की आपल्याला शब्द जपून वापरायचे आहेत, असे ते यावेळी म्हणाले.
Ajit Pawar On Maharashtra CM Post: अजित दादा मुख्यमंत्री कधी होणार हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलेला असतो. याचे उत्तर खुद्द अजित पवारांनी दिले आहे.
Source link
Eknath Shinde on Film Nayak: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अभिनेता मनिष पॉल (Manish Paul) याच्या पॉडकास्टमध्ये नुकतीच हजेरी लावली. यादरम्यान मनिष पॉलने एकनाथ शिंदे यांना अनेक प्रश्न विचारले. लहानपणी असणाऱ्या इच्छा तसंच मुंबई खड्डेमुक्त होणार का? अशा मुद्द्यांवर मनिष पॉलने एकनाथ शिंदेंचं मत जाणून घेतलं. तसंच यावेळी मनिष पॉलने एकनाथ शिंदेंसह अनिल कपूरचा (Anil Kapoor) चित्रपट ‘नायक’संबंधीही (Nayak) चर्चा केली. या चित्रपटात अनिल कपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री दाखवण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांना त्यांच्या लहानपणीची स्वप्नं तसंच नायक चित्रपट पाहून मुख्यमंत्री होण्याची इच्छा झाली का? अशी विचारणा करण्यात आली. यावर एकनाथ शिंदे म्हणाले की. “चित्रपट हा चित्रपट असतो, सत्यात असं काही होत नसतं, त्यामुळे असं काही नाही”. यावेळी एकनाथ शिंदे यांनी चित्रपटात अनिल कपूर ज्याप्रकारे फटाफट निर्णय घेऊन सर्व समस्या सोडवतो ते आवडलं असल्याचं म्हटलं.
“मी शाखाप्रमुख पदापासून माझी राजकीय आणि सामाजिक कारकिर्द सुरु केली. तेव्हापासून मी फार मेहनत घेत आहे. जे काम मी स्विकारतो किंवा करण्याचा विचार करतो, ते काम होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करतो. मी पूर्ण आत्मसमर्पण देऊन काम करत असतो. त्यात श्रद्धाही असते. त्यामुळे मी हे काम कधी होईल, मला माहिती आहे, हे पद हवं आहे असा विचार केला नाही. मी काम करत गेलो आणि जनतेची सेवा करणं मला आधीपासून आवडतं. माझे गुरु आनंद दिघे यांच्यासह मी काम केलं असून, जनता आणि त्यांची सेवा याची मला आवड आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मनिष पॉल याने एकनाथ शिंदे यांचं कौतुक करत तुम्हीही नायक चित्रपटाप्रमाणे रस्त्यावर उतरुन काम करता असं म्हटलं. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “मी मुख्यमंत्री झाल्यानंतरच रस्त्यावर उतरुन कामांची पाहणी करत आहे असं नाही. पण जमिनीवर जी स्थिती आहे ती तिथे गेल्यावरच कळते. ऑफिसमध्ये बसून तुम्हाला सत्यस्थिती समजत नाही. मी तळागाळातून वर आलो आहे. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. खाली जमिनीवर उतरुन काम करणं मला आवडतं. कार्यालयात बसून तुम्ही फक्त माहिती घेऊ शकता. तिथे गेल्यानंतर माहिती घेऊन लगेच कारवाई करता येते. लोकांनाही नैतिक आधार मिळतो. मी समस्या संपवत असल्याने लोकांनाही बरं वाटतं”.
“पाऊस सुरु होण्यापूर्वी नाल्यांची सफाई होते. आम्ही जिथे पाणी साचतं त्या जागांची माहिती घेतली. यानंतर आयुक्तांना एक योजना आखण्यास सांगितलं. जिथे पाणी साचणार नाही तेथील अधिकाऱ्याचा सन्मान करण्याचं ठरवलं. पण जर साचलं तर कारवाई केली जाईल असंही सांगितलं,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
नाशिकच्या उमेदवारीवरुन महायुतीत गोंधळ उडाल्याचं चित्र आहे तर दिंडोरीत मविआत बिघाडी झाल्याचं चित्र आहे.
Source link