मुंबईत BMC रूग्णालयातून भरदिवसा 20 दिवसाच्या बाळाची चोरी; महिला CCTV कॅमेऱ्यात कैद
कांदिवली पश्चिमेच्या शताब्दी रूग्णालयातून 20 दिवसांच्या बाळाची चोरी झाली होती. बाळ चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
Source link
कांदिवली पश्चिमेच्या शताब्दी रूग्णालयातून 20 दिवसांच्या बाळाची चोरी झाली होती. बाळ चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
Source link
सरफराज मुसा सनदी, झी मीडिया, सांगली : सरकारी कामकाजात सर्वसामान्यांना कायमच वाट पाहावी लागते. यामध्ये आता अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांवरही हीच वेळ आल्याचे पाहायला मिळत आहे. सांगलीत एका रुग्णाला त्याच्या पेन्शचे पैसे मिळवण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेतून प्रवास करावा लागला आहे. आधीच वेदना सहन कराव्या लागत असताना रुग्णाने आपण जीवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी सरकारी कार्यालयापर्यंत रुग्णवाहिकेपर्यंत प्रवास केला आहे.
पेन्शनची रक्कम मिळावी यासाठी हयात दाखला गरजेचा असतो. तो हयातीचा दाखल मिळवण्यासाठी एका पेन्शनधारक रुग्णाला शासकीय गलथान कारभाराचा चांगलाच फटका बसला आहे. अर्धांग वायूचा झटका आणि खुब्याचं ऑपरेशन झालेल्या परिस्थितीत एका जेष्ठ नागरिकाला ॲम्बुलन्समधून बँक आणि शासकीय ट्रेझरी कार्यालयामध्ये स्ट्रेचरवरून फिराव लागलंय.
सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाळवा तालुक्यातल्या कणेगाव येथील युवराज संभाजी बनसोडे यांना दर महिन्याला पेन्शन मिळते. पण या पेन्शनसाठी त्यांना नियमाप्रमाणे हयातीचा दाखला मागण्यात आला होता. त्यासाठी त्यांना येलूर येथील बँक कर्मचाऱ्यांनी युवराज बनसोडे यांनी सांगलीतील ट्रेझरी ( कोषागार ) कार्यालयामध्ये जाण्यास सांगितले. हे कार्यालया बॅंकेपासून तब्बल 50 किमी लांब होतं.
जिवंत असल्याचा पुरावा मिळण्यासाठी बनसोडे यांना प्रकृती अत्यंत खालावली असतानाही सरकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागले आहेत. बनसोडे यांना त्यांच्या नातेवाईकांनी ॲम्बुलन्समधून सांगलीतल्या ट्रेझरी कार्यालयात आणलं होतं. या धक्कादायक प्रकारामुळे ट्रेझरी आणि बँकेच्या कारभाराविरोधात नातेवाईकांकडून आता संताप व्यक्त करण्यात येतोय.
“पेन्शनच्या कामासाठी ट्रेझरीमध्ये आलो होता. बॅंक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी मला इथे पाठवलं होतं. रुग्ण पॅरिलिसीस असून त्याचा खुबा मोडलेला आहे. रुग्णाला महिन्याभरापासून उठता बसता येत नाही. रुग्णाला आम्ही बॅंकेत घेऊन गेलो होतो. तेव्हा बॅंक कर्मचाऱ्यांनी ट्रेझरीला घेून जाण्यास सांगितलं,” असे रुग्णाचे नातेवाईक संभाजी बनसोडे यांनी सांगितले.
पालघरमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ
पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ पाहायला मिळतो. शासनाकडून शाळांना पुरवलं जाणार धान्य निकृष्ट दर्जाचं पाहायला मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यान भोजनासाठी येणार धान्य निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलंय. शाळेत ठेकेदाराकडूनच धान्य निकृष्ट दर्जाचं पुरवलं जातं असल्याची धक्कादायक बाब उघड झालीय. पालघर मधील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या 2377 शाळांना साई मार्केटिंग ट्रेडिंग कंपनी जळगाव यांच्याकडून धान्य पुरवठा होतो. चालू शैक्षणिक वर्षाचं धान्य पुरवठा करण्याचा ठेका साई मार्केटिंग ट्रेडिंग कंपनी जळगाव यांच्याकडे आहे. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या कडून कारवाईच आश्वासन देण्यात आले आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर अटल सागरी सेतूवर 10 किलोमीटर परिघातल्या ग्रामस्थांना टोलमाफी द्या अशी मागणी काँग्रेसने राज्य सरकारकडे केली आहे.
Source link
Santosh Bangar Controversy: बांगर यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा करुन साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. असं नेमकं काय म्हणाले बांगर हे सविस्तर जाणून घेऊया.
Source link
हा सत्याचा विजय आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाचं स्वागत केलं आहे. ही एक मोठी चपराक असून, लोकशाहीचा विजय आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘झी 24 तास’शी संवाद साधताना दिली आहे. मात्र यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे आमदार पात्र ठरल्याने नाराजी जाहीर केली आहे. विधानसभा अध्यक्षांवर नेमका कोणता दबाव होता अशी विचारणा त्यांनी केली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल सुनावताना एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला. तसंच भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवली. विशेष म्हणजे राहुल नार्वेकर यांनी यावेळी दोन्ही गटांनी दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिका फेटाळून लावत दोन्ही गटातील सर्व आमदारांना पात्र ठरवलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “हा सत्याचा विजय आहे. या निकालामुळे घराणेशाही मोडीत निघाली आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे हे आज सिद्ध झालं आहे. ही एक मोठी चपराक असून, लोकशाहीचा विजय आहे”.
पुढे ते म्हणाले की, “खरी शिवसेना, खरा धनुष्यबाण यापूर्वी निवडणूक आयोगाने आम्हाला दिला होता. तो निर्णय त्यांनी कायम ठेवला. खऱी शिवसेना एकनाथ शिंदेंची असल्याचा निर्णय दिला आहे. कारण पक्षाकडे जास्त समर्थन आहे. त्यासह भरत गोगावले मुख्य प्रतोद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय सुनील प्रभू यांनी सादर केलेली कागदपत्रं खोटी असून, उद्धव ठाकरेंना सर्वाधिक समर्थन असल्याचा दावा त्यांनी फेटाळला आहे. राजकीय पक्ष एखाद्याची खासगी मालमत्ता असू शकत नाही. त्यामुळे प्रमुखांनी चुकीचा निर्णय घेतल्यास त्याविरोधात आवाज उठवता येतो असं मत मांडण्यात आलं आहे. मी या निर्णयाचं स्वागत करतो”.
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे आमदार पात्र ठरल्याने नाराजी जाहीर करत म्हटलं की, “अध्यक्षांनी भरत गोगावले यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली आहे, ती अयोग्य आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बाजूने दिला असताना, त्या अर्थाने आम्ही जो व्हिप दिला होता त्या हिशोबाने 14 आमदार अपात्र ठरायला हवे होते. कोणत्या दबावाखाली अपात्र केलं नाही ते अनपेक्षित आहे. या निकालाचा पूर्ण अभ्यास करुन, कायदेतज्ज्ञांची चर्चा करुन नेमकं कोणत्या कारणांमुळे त्यांना अपात्र ठरवलं नाही हे समजून घेऊ. कारण आम्ही दिलेला व्हीप मिळाला नाही असं त्यांच्यातील कोणी सांगितलं नव्हतं”.
Pune News Today: दोघे एकाच रूमवर राहायचे. एक होता 37 वर्षाचा तर दुसरा 19 वर्षाचा. वयाने मोठा असणारा सतत दुसऱ्यावर रुबाब दाखवायचा. घरातली सर्व कामे त्यालाच सांगायचा. स्वयंपाक करायला लावायचा. भांडी घासायला लावायचा. रूम साफ करण्याची जबाबदारी ही त्याच्यावरच टाकायचा आणि काही चुकलं की मारहाणही करायचा. या सर्वाला कंटाळून छोट्याने अखेर मोठ्याचा खून केला. हा सर्व प्रकार घडलाय पुण्यातील कोंढवा परिसरात. कुठलाही पुरावा मागे नसताना अवघ्या काही तासात कोंढवा पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे
नसीम सइदुल्लाह खान (वय ३७ वर्षे, रा. लेबर कॅम्प, कामठेनगर, पुणे मुळ रा. कुशीनगर उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कमल रोहित ध्रुव (वय १९ वर्षे, रा.लेबर कॅम्प, कामठेनगर, पुणे, मुळ रा. छत्तीसगड) असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कामठे पाटील नगर येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इथून जवळच एका निर्जन ठिकाणी पोलिसांना मंगळवारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. मारहाण करत गळा चिरुन त्याचा खून करण्यात आला होता. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. मयत व्यक्तीच्या खिशात सापडलेल्या मोबाईलवरून त्याने शेवटचा फोन कमल ध्रुव याला केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी कमल ध्रुव याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनेच खून केल्याची कबुली दिली.
मयत आणि आरोपी कोंढवा परिसरात टाइल्स फिटिंगचे काम करतात. ज्या ठिकाणी त्याचे काम सुरू आहे त्याच परिसरातच त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दोघांचीही राहण्याची व्यवस्था एकाच खोलीत करण्यात आली होती. वयाने मोठा असणारा नसीम कमलला सारखा त्रास द्यायचा. घरातील सर्व कामे त्यालाच करायला लावायचा. इतकाच नाही तर दारू पिऊन मारहाण करायचा. सोमवारी रात्रीही नसीम याने ध्रुव त्याला दारूच्या नशेत शिवीगाळ करत मारहाण केली आणि घराच्या बाहेर निघून गेला. त्यानंतर आरोपी ध्रुव हा देखील त्याच्या पाठोपाठ गेला आणि त्याला मारहाण करत गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर काही घडलंच नाही अशा अविर्भावात येऊन तो पुन्हा रूमवर झोपी गेला. मात्र मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या काही तासात कोंढवा पोलिसांनी गुन्ह्याची उकल करत आरोपी ध्रुव याला अटक केली
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, दिनेश पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी अमोल हिरवे, विशाल मेमाने, लवेश शिंदे, विकास मरगळे, शशांक खाडे, अभिजीत रत्नपारखी, राहुल वंजारी यांच्या पथकाने केली आहे.