'आपली व्यक्ती आज इथे नाही…', म्हणत धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडचा उल्लेख

'आपली व्यक्ती आज इथे नाही…', म्हणत धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडचा उल्लेख


परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होता. या मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी नाव न घेता वाल्मिक कराडच्या नावाचा उल्लेख केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

धनंजय मुंडे म्हणाले की, गेल्या 10 महिन्यांपासून एक माणूस इथे नाही. जगमित्र कार्यालय तरीही सुरु आहे. नाव न घेता धनंजय मुंडे यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची आठवण नाव न घेता उल्लेख केला. 

धनंजय मुंडे काय म्हणाले? 

मला माझ्या सहकाऱ्याची आज आठवण येतेय. परळीतले जगमित्र कार्यालय 12 महिने 24 तास सुरू होते आणि आहे. पण तिथे एक व्यक्ती नाही. त्या कार्यालयातून अडल्या नडलेल्यांना गोरगरिबांना आपण मदत करायचो. पण या सगळ्यात एक सहकारी आपल्यात नाही आहे, याची मला जाणीव आहे. कुणाचे काय चुकले, काय नाही हे न्यायदेवता तपासून पाहील, असे धनंजय मुंडे म्हणाले. परळीच्या प्रचारसभेत वाल्मिक कराड याची आठवण काढून शहरात हजारोंच्या संख्येने असलेल्या वाल्मिक अण्णा समर्थकांना चुचकारण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केल्याची चर्चा आहे.

काय आहे प्रकरण?

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला..या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मीक कराड काही महिन्यांपासून जेलमध्ये आहे. वाल्मिक कराडचं नाव या प्रकरणात आल्यानंतर त्याचे निकटवर्तीय असलेल्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठली होती.  या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचंही नाव जोडलं गेलं होतं आणि यामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

राजकारणाच्या मुख्यप्रवाहातून काहीसे बाजुला फेकल्यासारखी धनंजय मुंडेंची अवस्था झाली मात्र एवढं सगळं होऊनही मुंडे अद्यापही धनंजय मुंडे यांना आरोपी वाल्मिक कराडची आठवण येत असल्याचं पाहायला मिळतं आहे. 10 महिन्यापासून आपला एक व्यक्ती आपल्यासोबत नाही असं म्हणत धनंजय मुंडे यांनी वाल्मिकची आठवण काढली आहे. परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात धनंजय मुंडेंनी वाल्मिकची आठवण काढली आहे.

धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडच्या काढलेल्या आठवणीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर सडकून टीका केलीय. तर अजित पवारांचे आतातरी डोळे उघडावेत आणि धनंजय मुंडेंना पाठिशी घालणं बंद करावं असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 

राक्षसी प्रवृत्तीच्या वाल्मिक कराडने संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या केली..अशा व्यक्तीबद्दल कोणतीही भावना असणाऱ्या माणसाला माणूस म्हणता येणार नसल्याचं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. अशा नेत्यांना निवडून न देण्याचा आवाहनही दमानिया यांनी परळीच्या जनतेला केलं आहे. 

सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो व्हिडिओ जेव्हा समोर आले होते तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. एवढ्या क्रूरपणे देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या सगळ्याचा मुख्यसुत्रधार वाल्मिक कराड जेलची हवा खातोय. यामुळे टीकेचे धनी ठरलेले आणि मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागलेले राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे अद्याप वाल्मिकच्या प्रेमातून बाहेर पडल्याचं दिसत नाही.. त्यामुळे धनंजय मुंडेंवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठलीय. वाल्मिकची आठवण काढणाऱ्या धनंजय मुंडेंना धनंजट मुंड़ेंच्या लेकरांचा तो केविलवाणा चेहरा आठवला नसेल का हा प्रश्न निर्माण होतो आहे. 





Source link

खारघर, कळंबोली, तळोजा, घणसोली परिसरात स्वत:च्या आवडीचा फ्लॅट निवडा… सिडकोची 4508 घरांसाठी जबरदस्त लॉटरी योजना

खारघर, कळंबोली, तळोजा, घणसोली परिसरात स्वत:च्या आवडीचा फ्लॅट निवडा… सिडकोची 4508 घरांसाठी जबरदस्त लॉटरी योजना


Navi Mumbai Cidco Lottery 2025 : सिडकोच्या इतिहासात प्रथमच “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” तत्त्वावर 4,508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे.  22 नोव्हेंबर 2025 पासून या योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात होणार आहे. या योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता नवी मुंबईतील तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथील सिडकोच्या गृहसंकुलांतील 4,508 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अर्जदारांना प्रथमच स्वत:च्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. 

Add Zee News as a Preferred Source

“सिडकोच्या सोयी सुविधांनी सुसज्ज गृहसंकुलांतील 4,508 सदनिका या योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेकरिता सोडत किंवा लॉटरी नसून आपल्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य अर्जदारांना आहे. यामुळे त्यांना शब्दश: आपल्या स्वप्नातील घर साकारता येणार आहे. पुन्हा एकदा सर्वसामान्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असलेल्या नवी मुंबईमध्ये आपले घर घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. याकरिता अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मी करतो असं सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल म्हणाले.

सिडकोतर्फे सातत्याने विविध आर्थिक उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता गृहनिर्माण योजनांद्वारे परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्यात येतात. या योजनेंतर्गत तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथील सिडकोच्या गृहसंकुलांतील उर्वरित 4,508 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एकूण 4,508 सदनिकांपैकी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता 1,115 तर अल्प उत्पन्न गटाकरिता 3,393 सदनिका उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सदनिकांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रु. 2.50 लाख अनुदान उपलब्ध आहे. 

सदर योजनेतील सदनिका या तयार (रेडी टू मूव्ह) असून अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर सदनिकांची विक्री करण्यात येणार आहे. सदनिकेच्या किंमतीच्या संपूर्ण रकमेचा भरणा केल्यानंतर अर्जदारांना लगेच सदनिकेचा ताबा देण्यात येणार आहे. कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पात्र अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याची संधी मिळणार आहे. 

या योजनेतील सर्व गृहसंकुले ही नवी मुंबईतील विकसित नोडमध्ये आहेत. या परिसरामध्ये सर्व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून नजीच्या अंतरावर असलेल्या या गृहसंकुलांना उपनगरीय रेल्वे, मेट्रो आणि महामार्ग यांद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे.  ऑनलाइन अर्ज नोंदणीकरिता cidcofcfs.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. योजनेचा सविस्तर तपशील जसे, सदनिकेचे क्षेत्रफळ, किंमत इ. देखील सदर संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी दि. 22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 04.00 वाजेपासून सुरू होणार आहे. दि. 21 डिसेंबर 2025 पर्यंत नोंदणी केलेल्या पात्र अर्जदारांना दि. 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून त्यांच्या पसंतीच्या सदनिकेची निवड करता येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सदनिकांची विक्री केली जाणार असल्याने अर्जदारांनी उपरोक्त कालावधीमध्ये, लवकरात लवकर अर्ज करून आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.





Source link

मुंबईच्या माजी अंडर-16 खेळाडूचा मृतदेह झाडाला लटकलेला, मोबाईलमुळे पटली ओळख!

मुंबईच्या माजी अंडर-16 खेळाडूचा मृतदेह झाडाला लटकलेला, मोबाईलमुळे पटली ओळख!


Sagar sourati Dies: मुंबईचा माजी 16 वर्षांखालील फुटबॉल खेळाडू सागर सोरती (वय अज्ञात) याचा मृतदेह 18 नोव्हेंबर 2025 रोजी पालघर जिल्ह्यातील मेंढावन खिंड जंगलात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. घटनेनंतर त्याच्या मित्रपरिवाराकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांना प्रथमदर्शनी आत्महत्येचा संशय आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.    

Add Zee News as a Preferred Source

15 नोव्हेंबरपासून बेपत्ता

सागर 15 नोव्हेंबरला “पुण्यात फुटबॉल खेळायला जातो” असे सांगून घरातून निघाला होता. त्यानंतर त्याचा कुटुंबियांशी संपर्क तुटला आणि तो बेपत्ता झाल्याची माहिती जवळच्यांनी दिली आहे.

दोन वर्षांपासून गंभीर मानसिक तणाव

कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, सागर गेल्या दोन वर्षांपासून गंभीर मानसिक तणावात होता. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या धाकट्या भावाच्या लग्नासाठी नवीन कपडे शिवण्यासही त्याने नकार दिला होता, अशीही माहिती समोर येत आहे.

मोबाईल फोनमुळे ओळख पटली

मृतदेहाजवळ सागरचा मोबाईल फोन सापडल्याने पोलिसांना त्याची ओळख पटवण्यास मदत झाली. सध्या कासा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा (Accidental Death Report – ADR) गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

मृतदेह मुंबईतील जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी सांगितले की, पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण व पुढील तपासाची दिशा स्पष्ट होणार आहे.

FAQ 

प्रश्न: सागर सोरतीचा मृतदेह कधी आणि कुठे सापडला?

उत्तर: सागरचा मृतदेह १८ नोव्हेंबर २०२५ रोजी पालघर जिल्ह्यातील मेंढावन खिंड जंगलात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.

प्रश्न: सागर कधीपासून बेपत्ता होता आणि तो कुठे जातोय असे सांगितले होते?

उत्तर: सागर १५ नोव्हेंबर २०२५ रोजी “पुण्यात फुटबॉल खेळायला जातो” असे सांगून घरातून निघाला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला आणि कुटुंबियांचा त्याच्याशी संपर्क तुटला.

प्रश्न: सध्या पोलिसांनी कोणता गुन्हा दाखल केला आहे आणि पुढे काय होणार?

उत्तर: कासा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा (ADR) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण व पुढील कारवाई ठरेल.





Source link

'भाजपला 130 च्या घरात बसवण्यात शिंदेंचे मोठे योगदान' शिवसेनेकडून आलेल्या पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!

'भाजपला 130 च्या घरात बसवण्यात शिंदेंचे मोठे योगदान' शिवसेनेकडून आलेल्या पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!


Akshay Maharaj Post: शिवसेना-भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरु असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. पण सर्वकाही सुरळीत असल्याचे दोन्हीकडच्या नेत्यांनी म्हटलंय. या पार्श्वभूमीवर आचा शिवसेनेकडून भाजपचे नाव न घेता टीका केलीय. शिवसेना प्रवक्ते अक्षय महाराज भोसले यांच्या पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ झालीय. काय म्हणाले अक्षय महाराज? जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

शिवसेना प्रवक्ते अक्षय महाराज भोसले यांनी सोशल मीडियावर (ट्विटरवर) सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. नाव न घेता त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली, ज्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भोसले म्हणाले, “चिखलात कमळ असत… पण राज्यात ते गटरात रुतलेलं होतं, तेव्हा जनतेच्या सेवेसाठी कोणी बाहेर काढलं? हे काही लोक लवकर विसरतात.” यातून महायुतीतील अंतर्गत तणाव दिसतोय.

शिंदेंच्या नेतृत्वाची प्रशंसा

भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कष्टांची आठवण करून दिली. “राजकारणात आरोप-प्रत्यारोप सोपे आहेत, पण जनतेचा विश्वास पुन्हा निर्माण करून राज्याला स्थैर्य देणे हे शिंदे यांचे काम! शिंदेंविरोधात लढणे म्हणजे वादळाविरुद्ध मशाल पेटवणे, मशालीने स्वतःच जळून जाल,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना (भाजपला) इशारा दिला. भाजपला 130 च्या घरात बसवण्यात शिंदेंचे मोठे योगदान असल्याचेही सांगितले. “जनतेचा आशीर्वाद, विकासाची गती आणि भगव्याची शक्ती यांसमोर विरोधकांचे राजकारण फक्त धुरकट कुजबुज!” असा टोला त्यांनी लगावला.

‘सर्वसामान्यांची भावना’

हे माझे वैयक्तिक मत नाही, तर साधू-संत, सर्वसामान्यांशी बोलून मांडलेली भूमिका आहे. “शिंदे हे संयमी नेते आहेत, महाराष्ट्राच्या जनतेचा उद्रेक होऊ नये. मी कोणाचे नाव घेतले नाही, पण जनता सुज्ञ आहे, असे ते म्हणाले. सर्वांनी हिंदुत्व दावणीला बांधले तेव्हा शिंदे यांनी बंड केले आणि लोककल्याणाच्या योजना आणल्या, हे विसरू नका,” असे म्हणत त्यांनी जनतेला सावध केले. ही टीका महायुतीतील समीकरणे हादरवू शकते, असे दिसते.

FAQ 

प्रश्न : अक्षय महाराज भोसले यांनी नेमके काय म्हणून भाजपवर टीका केली?

उत्तर : त्यांनी नाव न घेता लिहिले, “चिखलात कमळ असत… पण राज्यात ते गटरात रुतलेलं होतं, तेव्हा जनतेच्या सेवेसाठी कोणी बाहेर काढलं?” यातून भाजपला २०२२ मध्ये सत्ताबाहेर असताना एकनाथ शिंदे यांनीच सत्तेत आणल्याचा अप्रत्यक्ष दावा केला. ते म्हणाले की, काही लोक हे कष्ट लवकर विसरतात.

प्रश्न : शिंदे साहेबांविरोधात लढण्याबद्दल भोसले यांनी काय इशारा दिला?

उत्तर : ते म्हणाले, “ना. शिंदे साहेबांविरोधात लढणे म्हणजे वादळाविरुद्ध मशाल पेटवण्यासारखे आहे. काळजी करू नका… मशालीने स्वतःच जळून जाल!” यातून विरोधकांना (म्हणजे भाजपला) थेट इशारा दिला की, शिंदे यांच्यासमोर कोणी टिकणार नाही आणि जनतेचा आशीर्वाद, विकास व भगव्याची ताकद शिंदे यांच्यासोबत आहे.

प्रश्न : ही पोस्ट वैयक्तिक मत आहे की शिवसेनेची अधिकृत भूमिका?

उत्तर : अक्षय भोसले यांनी स्पष्ट केले की, “हे माझे वैयक्तिक मत नाही. साधू-संत, सर्वसामान्य जनतेला भेटलो, त्यांच्या भावना आहेत. मी कोणाचेही नाव घेतले नाही, पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे.” तरीही ही पोस्ट शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीचे आणि भाजपला “कृतघ्न” ठरवण्याचे प्रतीक मानली जाते.





Source link

शरद पवारांनी फटकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसकडून मनसेबाबत मोठं विधान, 'आम्ही एकत्र…'

शरद पवारांनी फटकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसकडून मनसेबाबत मोठं विधान, 'आम्ही एकत्र…'


Vijay Wadettiwar on MNS: मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मनसेशी आमची विचारधारा जुळत नाही. मात्र भाजपविरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलं आहे. भाजपच्या पराभवासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक असून मनसेला सोबत घेण्याबाबत चर्चा सुरु असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. शरद पवार या आघाडीला घेऊन सकारात्मक असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले आहेत. शरद पवारांनी मोर्चात एकत्र, निवडणूक वेगळी का लढवता? अशी विचारणा केली होती. महाविकास आघाडी म्हणून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली पाहिजे असं स्पष्ट मत शरद पवारांनी मांडलं होतं. 

Add Zee News as a Preferred Source

“मनसेची आणि आमची विचारधारा जुळत नाही. त्यामुळे तो विषय आला असावा. पण शरद पवारांनी आपण आघाडीत लढलं पाहिजे अशी भूमिका मांडली आहे. आपण सर्वांनी भाजपाचा पराभव करण्यासाठी, या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे आणि त्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे,” असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

दरम्यान दडपशाही करणा-यासंबोत काँग्रेस जाणार नाही असं वक्तव्य काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांनी दिली होती. महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्यास त्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र वडेट्टीवारांनी मात्र भाजप विरोधात मनसेला सोबत घेण्यास सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. त्यामुळे मनसेवरुन काँग्रेसमध्ये दोन प्रवाह असल्याचं समोर येत आहे. 

वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं, “मुंबई एक असं शहर आहे जिथे सर्व राज्यातील लोक असतात आणि मुंबईच्या विकासात प्रत्येकाचा हातभार आहे. त्यामुळे दडपशाही करणाऱ्या किंवा कायदा हातात घेणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही”.

शरद पवारांनी काय म्हटलं?

मुंबईत मनसे पक्षाला सोबत घेण्यासाठी शरद पवार सकारात्मक आहेत. महाविकास आघाडी म्हणून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली पाहिजे असं शरद पवार यांचं मत आहे. मतदार यादीच्या घोळाच्या संदर्भात आणि मतचोरीच्या संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता आणि मग निवडणूक का वेगळी लढवता? असा स्पष्ट मत शरद पवारांनी मांडलं आहे. 

शरद पवारांचा काँग्रेसच्या नेत्यांना फोन 

शरद पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन केला होता. मुंबई महानगरपालिका कशी लढायची  यावरती सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होणार आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवारांची मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली होती. मुंबई महानगरपालिका निवडणूक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यास काँग्रेस नेत्यांनी हिरवा कंदील दिला होता. मात्र शरद पवार काँग्रेस सोबत आघाडी करणार की महाविकास आघाडी म्हणून नव्याने आणखी काही प्रयत्न करणार यावरती स्पष्टता नव्हती. 





Source link

महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका नगराध्यक्ष पदासह सर्व 26 नगरसेवक मतदान न होताच विजयी! 'या' पक्षाचे आहेत सर्वजण; नाव जाणून धक्का बसेल

महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका नगराध्यक्ष पदासह सर्व 26 नगरसेवक मतदान न होताच विजयी! 'या' पक्षाचे आहेत सर्वजण; नाव जाणून धक्का बसेल


Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या ‘झी 24 तास’ डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

…Read More





Source link

YouTube
Instagram
WhatsApp