'आफ्रिकन पोपट परत दे; तरच तुला घटस्फोट देईन' पुण्यात पतीची पत्नीकडे अजब मागणी

'आफ्रिकन पोपट परत दे; तरच तुला घटस्फोट देईन' पुण्यात पतीची पत्नीकडे अजब मागणी



Pune News: पुण्यात चर्चा एकाच घटस्फोटाची. पतीच्या मागणीमुळं सगळेच चक्रावले. पाहा पतीनं का केली अशी मागणी…. 
 



Source link

कफनचोर आणि खिचडीचोर, कोरोना काळात भ्रष्टाचार… मुख्यमंत्र्यांचा ठाकरे पिता-पुत्रांवर आरोप

कफनचोर आणि खिचडीचोर, कोरोना काळात भ्रष्टाचार… मुख्यमंत्र्यांचा ठाकरे पिता-पुत्रांवर आरोप


Maharashtra Politics : नागपूर अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी (CM Eknath Shinde) पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) लक्ष्य केलं. कोरोना काळात मुंबईत मोठा भ्रष्टाचारा केल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच टेंडर घोटाळ्यांना (Tender Scam) पेंग्विनपासून सुरूवात झाल्याचा दावा त्यांनी विधानसभेत केला.  भीतीच्या वातावरणात लोक जगच असताना पैसे लुटण्याचा प्रकार सुरु होता. कफनचोर, खिचडी चोर असा बिरुद देखील कमी पडतील असा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ऑक्सिजन प्लांट मध्येही भ्रष्टाचार करण्यात आला. काही लोकांच्या कृपेने उत्तर प्रदेशमधल्या हाय वे कंस्ट्रक्शन कंपनीला कामं दिली असल्याचा गौप्यस्फोटही मुख्यमंत्र्यांनी केला.

आदित्य राजाच्या कृपेने वरुन राजाच्या टेंडरचा पाऊस पडला आहे असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. या प्रकरणात रोमिन छेडा हा त्याचा प्यादा आहे. सुरुवातीला जिजामाता उद्यानातील पेंग्विन कक्षा पासून झाली. हायवे बांधनाऱ्या कंपनीला पेंग्विन कक्षाचे काम दिलं गेलं. पेंग्विन पाठोपाठ ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे कामही देण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. कोव्हीड काळात काम पूर्ण केले नाही म्हणून 9 कोटी दंड करणं अपेक्षित पण 3 कोटी दंड वसूल केले गेले, नेमकी मेहरबानी का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. 

पैशांसाठी लोकांच्या जीवाशी खेळायचं, थोडा तरी विचार करण्याची आवश्यकता होती 60 कोटींचं काम जुलैपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते, ते ऑक्टोबर पर्यंत झालं. ऑगस्टपर्यंत काम पूर्ण न केल्याने 3 कोटींचा दंड ठोठावला. पण 9 कोटी दंड आकारणे अपेक्षित होतं. 
ऑगस्ट मध्ये बोगस कागदपत्रे दाखवत काम पूर्ण झाल्याचे दाखवलं. याच दाखल्याच्या आधारे 80 कोटींचे काम देण्यात आली. ज्या कथा आहेत, त्या अचंबित करणाऱ्या आहेत. रोबोटिक झू, प्रशासकीय कारवाई, लांडगे, कोल्हे, बिबट्या, तरस, पक्षाचे पिंजरे अशी सर्व कामे देण्यात आली. पेंग्विन कक्ष निगा आणि देखभालीसाठी काम देण्यात आली असे एकामागोमाग एक खुलासे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केले.

रस्ते तयार करणारी रोमिंग छेडा कंपनीला किती वेगवेगळी काम दिली गेली हे तपासात बाहेर येईल असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. त्यांना फक्त पैशांशी मतलब आहे, जिथ टेंडर तिथ सरेंडर अशी त्यांची भूमिका होती. या कंपनीला नंतर महापालिका शाळांत वॉटर प्युरिफायर पुरवण्याचे काम देण्यात आलं. फिल्टर पंप, जुहू रुग्णालयात हाऊस कीपिंग कामं, बाळासाहेब ट्रॉमा रुग्णालयात काम, हे कमी की काय महापालिका रुग्णालयात एसीचं काम देण्यात आलं. ही कंपनी काय काय करते याची जंत्री फार मोठी आहे
हे वाचून माझं डोके गरगरायला लागलं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुढील चार वर्षांत या रोमिनला छोटी-मोठी मिळून सुमारे 270 कोटी रुपयांची तब्बल 57 कंत्राटं देण्यात आल्याचा गौप्यस्फोटही मुख्यमंत्र्यांनी केला.

ही लोक कुठल्या थराला गेले, याचा अंदाज येतोय. रोज तुम्ही आमच्यावर आरोप करणार, रोज शिव्या घालणार आता हे सर्व विथ प्रुफ बाहेर येणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. राज्यातील जनता मृत्यूशी लढा देत भीतीच्या वातावरणात जगत असताना पैसे लुटण्याचा हा किळसवाणा प्रकार पाहिल्यानंतर कुठल्याही सामान्य माणसाच्या मनात तिडिक उठल्याशिवाय राहाणार नाही

आदित्य ठाकरेंच्या मित्राची चौकशी
रेमडीसीवर इंजेक्शन घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरेंचा मित्र पुण्यशाली पारिखला चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. आर्थिक गुन्हे शाखेनं पारिखला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स पाठवलंय. कंत्राट देण्यासाठी महापौर बंगल्यावर बोलावण्यात आलं त्यावेळी पारिख तेथे उपस्थित होता. असं बीएमसी अधिका-यांनी चौकशी दरम्यान सांगितल्याची माहिती समोर येतेय…त्यानुसार पारिखला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचं समजतंय. मुख्यमंत्री शिंदेंनीही याच मुद्यावरून ठाकरेंचं नाव न घेता निशाणा साधलाय.





Source link

थकित कर्जवसुलीसाठी म्हाडाची शक्कल; मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गालगत बांधणार म्हाडाची घरं

थकित कर्जवसुलीसाठी म्हाडाची शक्कल; मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गालगत बांधणार म्हाडाची घरं


Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg : एमएसआरडीसीकडील थकित कर्जवसुलीसाठी म्हाडाने शक्कल लढवली आहे. एमएसआरडीसीच्या अंतर्गत येणाऱ्या  मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गालगतच्याजमीनीवर म्हाडा घर बांधणार आहे. यामुळे येत्या काही वर्षात  मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गालगत म्हाडाच्या वसाहती दिसू शकतात. यामुळे महाराष्ट्रात नविन घरांची निर्मीती होणार आहे. 

मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गालगत म्हाडाची घरं निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हाडाने एमएसआरडीसीकडून एक हजार कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. हे कर्ज थकीत असून त्या मोबदल्यात म्हाडाने एमएसआरडीसीच्या नवनगर प्रकल्पात जमिनी देण्याचा प्रस्ताव पाठवलाय. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास म्हाडाला 701 किमी दरम्यान जमिनी मिळाल्या तर भविष्यात समृद्धीनगर म्हाडाची घरे निर्माण होतील आणि सर्वसामान्यांना ती सोडतीद्वारे उपलब्ध होतील.

समृद्धी महामार्गाचा 600 किमीचा टप्प्याचं काम पूर्ण झालं असून म्हाडा सातत्याने कर्जाच्या परतफेडीसाठी एमएसआरडीसीकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, सरकारने या कर्जाचं रुपांतर समभागात करण्याचा निर्णय घेतलाय…तर, समभागाऐवजी समृद्धीलगतच्या नवनगरांमध्ये गृहनिर्मितीसाठी जमिनींची मागणी म्हाडाने केलीये.

छत्रपती संभाजी नगर गृहनिर्माण मंडळ अल्प उत्पन्न गटासाठी  घरं बांधणार

म्हाडाच्या छत्रपती संभाजी नगर गृहनिर्माण मंडळ अल्प उत्पन्न गटासाठी अतिरिक्त 1 हजार घरं बांधणारेय. त्यासाठी निवीदा मागवण्याचं काम सुरूये. पुढील 24 महिन्यांमध्ये घरांचं काम पुर्ण होण्याची शक्यता आहे.

ठाण्यात म्हाडाची एक हजार घरं

‘म्हाडा’च्या कोकण मंडळाला पुढच्या वर्षी  ठाण्यातल्या चितळसर मानपाड्यात 1 हजार 173 घरं उपलब्ध होणार आहेत. मानपाड्यातील ‘स्विस चॅलेंज प्रकल्पातून म्हाडाच्या जागेवर खासगी विकासक घरं बांधून देणारेय. सध्या या प्रकल्पाचं 90 टक्के काम पूर्ण झालंय.

सेवाशुल्क माफ करण्याचा म्हाडाचा निर्णय

मुंबईतील म्हाडाच्या  56 वसाहतींतील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडील 1998 ते 2021 कालावधीतील वाढीव सेवाशुल्क माफ करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतलाय. त्यामुळे जवळपास 380.41 कोटींचं वाढीव सेवाशुल्क माफ होणारेय. मुंबईतील ५० हजार सदनिकाधारकांना दिलासा मिळणारेय. गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी याबाबत माहिती दिली.





Source link

मुंबई- ठाणे जोडणाऱ्या मेट्रो मार्गावरील 2 स्थानके वगळली; आता असा असेल मार्ग

मुंबई- ठाणे जोडणाऱ्या मेट्रो मार्गावरील 2 स्थानके वगळली; आता असा असेल मार्ग


Mumbai Metro 4 station: वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या मेट्रोमुळं ठाण्यातील प्रवाशांना थेट मुंबईत येणार आहे. तसंच, हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही दक्षिण मुंबईत येण्याचा पर्याय उपलब्ध होईल. मात्र, या प्रकल्पात थोडे बदल करण्यात आले आहेत. जागेचा अडसर आणि प्रकल्पाचा वाढता खर्च यामुळं मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने दोन स्थानके वगळण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रो 4 मार्गावरील सुमननगर आणि अमर महाल ही दोन स्थानके वगळण्यात आली आहे. 

MMRDA ने यापूर्वी मेट्रो-2B (DN नगर-मांडाळे) योजनेतून नॅशनल कॉलेज स्टेशन वगळले होते. त्यानंतर आता पुन्हा स्थानके वगळ्यात आली आहे. पुरेशी जागा नसल्याने अमर महाल स्थानक बांधणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाहीये. जागेच्या कमतरतेमुळं उड्डाणपुल आणि हायटेन्शन वायर टॉवर बांधणे शक्य नाहीये, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मेट्रो 4 प्रकल्पातील पहिले स्थानक भक्ती पार्क येथील असून अमर महालपर्यंत पूर्ण पूर्व द्रुतगती मार्ग व्यापतो आणि नंतर एलबीएल रोडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी गरोडिया नगरमार्गे 90 फूट रस्त्यापर्यंत जातो. मात्र, आता अमर महाल स्थानक वगळण्यात आल्यामुळं प्रवाशांना 1 किमी दूर असलेल्या गरोडिया नगर स्थानकाचा वापर करावा लागेल. अमर महलच्या आधीचे स्थानक पूर्व द्रुतगती महामार्गावरील सिद्धार्थ कॉलनी आहे.

सूमन नगर स्थानक का वगळण्यात आले हेदेखील समोर आले आहे. सूत्रांनुसार, सायन-ट्रॉम्बे रोड आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे (EEH) च्या जंक्शनवर हे स्थानक आहे. तसंच, प्रकल्पाचा खर्चात कपात व्हावी यासाठी हे स्थानक वगळण्यात आले आहे. मेट्रो 4 प्रकल्पातील सिद्धार्थ कॉलनी स्थानक, जे पूर्वीच्या आराखड्यानुसार सुमन नगर स्थानकानंतर येणार होते, ते अशा प्रकारे बांधले जाईल की ते मेट्रो-2B च्या EEH स्थानकासोबत जोडले जाईल. 

मेट्रो 4 मार्गावरील दोन स्थानके हटवल्यामुळं या मार्गावरील स्थानकांची संख्या आता 30 झाली आहे. प्रत्येक स्थानकातील अंतर आता 1 किमी इतके असणार आहे. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत स्थानके वगळण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. 





Source link

Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद


Pune water closer on Thursday : येत्या गुरुवारी पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद (Pune Water cut) असणार आहे. जल केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद करावा लागणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील जल केंद्रांच्या अखत्यारीतील पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी सोडता येणार नाही. शुक्रवारी सकाळी शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यानंतर संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. पाणीपुरवठा बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याच्या तसेच वापरासाठी च्या पाण्याची करून तजवीज करून ठेवावी लागणार आहे.

पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, लष्कर जलकेंद्र, नवीन आणि जुने होळकर जलकेंद्र, भामा-आसखेड जलकेंद्र, वारजे, एसएनडीटी, चतु:श्रृंगी, वडगांव जलकेंद्र, अशा अनेक ठिकाणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरूवारी पुणेकरांना संकटाला सामोरं जावं लागणार आहे. तर पुण्यात शुक्रवार सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याने पुणेकरांची तारंबळ उडू शकते.

कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद?

गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ, सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-१ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र,, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर याला भागात पाणी पुरवठा बंद असेल.

शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमंहस नगर, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हण मळा, लम्हाण तांडा, सूस रस्ता, रेणूका नगर, पॉप्युलर नगर, वारजे माळवाडी, गोकुळ नगर, अतुलनगर, महात्मा सोसायटी, एकलव्य महाविद्यालय परिसर, धनंजय सोसायटी, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद, लक्ष्मीनगर झोपडपट्टी परिसर, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर, कर्वेनगर गावठाण, तपोधान परिसर, रामनगर या भागात देखील पाणी पुरवठा बंद असणार आहे.

कालवा रस्ता, बाणेर, बालेवाडी, पॅनकार्ड क्लब रस्ता, विजनगर, दत्तनगर, कर्वेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर गल्ली क्रमांक एक ते दहा, गोखलेनगर, औंध, बोपोडी, विद्यापीठ परिसर, विधी महाविद्यालय रस्ता, बीएमसीसी, आयसीएस कॉलनी, भोसलेनगर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, दशभूजा गणपती परिसर, नळस्टॉप, वकीलनगर, करिष्मा सोसायटी, शिवाजीनगर, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी परिसर ना देखील पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर 1 आणि 2 , लेक टाऊन परिसर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी गावठाण, डायस प्लॉट, ढोले मळा परिसर, सॅलेसबरी पार्क, गिरीधर भवन चौक (Pune) परिसर, पर्वती गावठाण, मीठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज, धनकवडी परिसर, हडपसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळे पडळ, बीटी कवडे रस्ता, भीमनगर, रामटेकडी, औद्योगिक परिसर, वानवडी, पुणे कॅन्टोन्मेंट परिसर, केशवनगर, साडेसतरा नळी या भागात देखील पाणी येणार नाही.

फुरसुंगी, उरूळी देवाची, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, खराडी, वडगांवशेरी, ताडीवाला रस्ता, मंगळवार पेठ, मालधक्का, येरवडा, रेसकोर्स, मुळा रस्ता, खडकी, हरीगंगा सोसायटी, लोहगाव, विमाननगर, वडगांवशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, कळस, धानोरी, पाषाण, भूगाव रस्ता, बावधन, उजवी आणि डावी भुसारी कॉलनी, गुरूगणेशनगर, चिंतामणी सोसायटी, पूजा पार्क, सारथी शिल्प सोसायटी, डुक्कर खिंड परिसर या भागात गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 





Source link

'परवाच्या दिवशी माझी बायको काय..'; दिशा सालियन प्रकरणाच्या आदित्य कनेक्शनवर राज ठाकरेंची कमेंट

'परवाच्या दिवशी माझी बायको काय..'; दिशा सालियन प्रकरणाच्या आदित्य कनेक्शनवर राज ठाकरेंची कमेंट


Raj Thackeray About His Wife Comment Regarding Aditya Thackeray:  दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणामध्ये राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारने तपासासाठी विशेष पथकाची म्हणजेच एसआयटीची स्थापना केली आहे. या प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरेंची चौकशी होणार आहे. मात्र आदित्य ठाकरेंवर या प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात बोलता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी आपलं मत नोंदवत पुतण्याला पाठिंबा दिला. मात्र पत्नीने दिलेल्या या प्रतिक्रियेचा उल्लेख करत राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांनाच फैलावर घेतल्याचं आज मुंबईत पाहायला मिळालं.

शर्मिला ठाकरे काय म्हणालेल्या?

पत्रकारांनी दिशा सालियन प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन केली जात असल्याचा संदर्भ देत 15 डिसेंबर 2023 रोजी शर्मिला ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाला अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर देताना काकू शर्मिला यांनी पुतण्या आदित्य ठाकरे यांची बाजू घेतल्याचं पहायला मिळालं. मनसे आणि उद्धव ठाकरे गटामध्ये राजकीय मतभेद अनेकदा दिसून आले आहेत. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांवर अनेकदा टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र दिशा सालियन प्रकरणामध्ये कुटुंब म्हणून राज ठाकरेंचं कुटुंबिय आदित्य ठाकरेंच्या पाठिशी उभे असल्याचं दिसत आहे.

दिशा सालियन प्रकरणासंदर्भात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणाकडे कसं पाहता, असा प्रश्न पत्रकारांनी शर्मिला ठाकरेंना विचारला. हा प्रश्न ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता शर्मिता ठाकरेंनी, “आदित्य असं काही करेल असं मला वाटतं नाही,” अशी प्रतिक्रिया नोंदवली. पुढे बोलताना शर्मिला ठाकरेंनी, “चौकश्या काहीही लावू शकतात. आम्ही पण याच्यातून खूपदा गेलो आहोत,” असं म्हटलं आणि त्या निघून गेल्या. काही वर्षांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणामध्ये चौकशीसाठी सक्तवसुली संचलनालयाची नोटीस आली होती. राज यांची ईडीच्या कार्यालयामध्ये सखोल चौकशीही झाली होती. याच्याशीच शर्मिला यांच्या या वक्तव्याचा संदर्भ जोडला जात आहे.

नक्की वाचा >> ‘भाजपाने आमच्या आदित्यवर…’; संजय राऊतांनी मानले राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांचे आभार

राज ठाकरेंवर प्रश्नांचा मारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील 22 लोकसभा मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी मुंबई पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर राज ठाकरेंना धारावी विकास प्रकल्पासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज यांनी सविस्तर उत्तर दिलं. त्यानंतर या बैठकीसंदर्भात प्रश्न विचारण्याऐवजी पुढला प्रश्न एका महिला पत्रकाराने मराठा आरक्षणासंदर्भात विचारला. झालेल्या बैठकीऐवजी इतर विषयांवरुन प्रश्नांचा भडीमार होत असल्याचं पाहून राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत पत्रकारांचाच समाचार घेतला.

नक्की वाचा >> ‘अदानींकडे असं काय आहे की…’; ‘टाटां’चा उल्लेख करत राज ठाकरेंचा रोखठोक सवाल

राज यांच्याकडून शर्मिला ठाकरेंच्या प्रतिक्रियेचा उल्लेख

“इथं वरती (मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत) काय झालं ते सांगू शकतो. मी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला इथे आलेलो नाही. नंतर तुम्ही काय वाटेल ते सांगता. वाटेल ते छापता,” असं म्हणत राज यांनी बैठक वगळता इतर प्रश्नांवर उत्तरं देणं नाकारलं. आपली नाराजी व्यक्त करताना राज यांनी शर्मिला ठाकरेंनी आदित्य ठाकरेंसंदर्भात दिशा सालियन प्रकरणावरुन केलेल्या विधानाचा संदर्भही दिला. “परवाच्या दिवशी माझी बायको काय बोलली. त्यातलं पहिलं वाक्य घेतलं. पुढचं वाक्य घेतलच नाही. कारण ते तुमच्या फायद्याचं होतं. असो,” असं म्हणत राज यांनी काढता पाय घेतला. राज ठाकरेंनी एवढं सुनावल्यानंतरही एका महिला पत्रकाराने त्यांना संसदेमधील सुरक्षा भेदण्यात आल्यासंदर्भात विचारलं. त्यावर राज ठाकरे नाही मला नाही माहिती असं म्हणत प्रश्नाचं उत्तर देणं टाळत तिथून निघाले.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp