by Hansraj Agrawal | Nov 17, 2025 | Trending News
Balasaheb Thackeray And Sharad Pawar Relation : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल नेते शरद पवार यांची मैत्री जगजाहीर आहे. यांचे नाते मात्र, मैत्रीपलिकडचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा भाचा आहे शरद पवारांचा जावई आहे. शरद पवारांचा जावई हा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उद्योगपती देखील आहे. यांचे नाव जाणून तुम्ही शॉक व्हाल. बाळासाहेब ठाकरे यांचा भाचा आहे शरद पवारांचा जावई कसा झाला. ठाकरे आणि पवार कुटुंबाचे सोयरीक कसे जुळले जाणून घेऊया.
Add Zee News as a Preferred Source
सदानंद भालचंद्र सुळे…. यांच्या नावाची फारशी चर्चा होत नाही. मात्र, सुप्रिया सदानंद सुळे म्हंटले की सदानंद सुळे हे नाव देखील चर्चेत येते. सदानंद सुळे महाराष्ट्रातील मोठे उद्योगपती आहेत. सदानंद सुळे हे खासदार सुप्रिया सुळे यांचे पती आहेत. बाळासाहेब ठाकरे हे सदानंद सुळे यांचे मामा आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची बहिण सुधा सुळे यांचे सदानंद हे सुपूत्र आहेत.
सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची ओळख कशी झाली?
सुप्रिया सुळे यांचं 12 वी पर्यंत शिक्षण पुण्यातच झालं. 12 वी नंतर त्यांनी मुंबईतील जय हिंद काँलेजमधून मायक्रोबायलाॅजी विषयात Bsc केली. त्यावेळी शऱद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ठाकरे आणि पवार कुंटुंबाचे चांगले संबध होते. याच दरम्यान फॅमिली फ्रेंडच्या माध्यमाथून सुप्रिया यांची सदानंद सुळे य़ांच्यासोबत ओळख झाली. त्यावेळेस संदानद सुळे हे अमेरिकेमध्ये नोकरी करत होते.
सुप्रिया आणि सदानंद सुळे यांच्या दोघांचा स्वभाव शांत आणि मनमिळावू असल्यामुळे यांच्या मैत्रीचं रूपातंर प्रेमात झालं. त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना विरोधी बाकावर होती. मात्र असं असलं शरद पवार आणि बाळासाहेबांची मैत्री होती. हीच मैत्री त्यांनी राजकारणापलिकडे जपली होती.पवारांचं आणि ठाकरे कुटुंबियांच पूर्वी पासून एकमेकांच्या घरी येण जाण असायचं. बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई आणि प्रतिभाताई पवार यादेखील सख्ख्या मैत्रिणी होत्या.
सुप्रिया आणि सदानंद सुळे यांचे मनं जुळले होते. स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी लग्न ठरवण्यास पुढाकार घेतला. या लग्नाला तसा कोणाचा विरोध नव्हताच. सगळं जुळून आलं. तारीख ठरली गेली. शरद पवारांनी स्वत: अनेक गावात जाऊन सुप्रियाताईच्या लग्न पत्रिका वाटल्या. देशभरातून दिग्गज नेते या लग्न सोहळ्यात सहभागी झाले होते. लाखो लोकांच्या उपस्थितीत 4 मार्च 1991 मध्ये हा दिमाखदार लग्ना सोहऴा पार पडला.
लग्नानंतर सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळे अमेरिकेत गेले. सदानंद सुळे यांची नोकरी तिथं सुरू होती. काही काळानंतर सदानंद सुळे यांची सिंगापुरला बदली झाली. सुप्रिया आणि सदानंद सुळे काही काळ तिथे राहिले. त्यानंतर जकार्ताला काही ते नोकरीला होते. मात्र त्यानंतर त्यांनी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. भारतात परतल्यानंतर सदानंद सुळे यांनी व्यवसाय क्षेत्रात आपलं नशिब आजमावलं. तर, सुप्रिया सुळे राजकारणात सक्रिय झाल्या.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 17, 2025 | Trending News
Discount on bus fare: राज्यातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी बस खूप उपयोगी पडते. शाळा-कॉलेजमध्ये जाण्यासाठी हा पर्याय स्वस्त आणि उत्तम ठरतो.दरम्यान महाराष्ट्र सरकारने शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी भेट दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात गुड न्यूज दिलीय. काय म्हणाले प्रताप सरनाईक? सविस्तर जाणून घेऊया.
Add Zee News as a Preferred Source
विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी राज्य रस्ते वाहतूक महामंडळ म्हणजेच एमएसआरटीसी यंदा मोठ्या संख्येने नव्या बस उपलब्ध करुन देणार आहे. याशिवाय सहलीच्या भाड्यात 50 टक्के सूटदेखील मिळणार आहे. दिवाळी सुट्टीनंतर विद्यार्थी उत्साहाने सहलीची वाट पाहत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवास देण्यासाठी ही योजना असल्याचे असे मंत्री म्हणाले.
दररोज 800 ते 1000 बस
एमएसआरटीसीचे 251 डेपो दररोज शाळा-कॉलेजांना 800 ते 1000 नव्या बस देणार आहेत. मंत्र्यांच्या कार्यालयाच्या निवेदनात यासंदर्भातील माहिती देण्यात आलीय. या व्यवस्थेमुळे शैक्षणिक प्रवास सोपा होणार असल्याचे सरनाईक म्हणाले. विद्यार्थ्यांसाठी परवडणारी आणि सुरक्षित सहल ही आमची प्राथमिकता आहे. राज्य सरकार या सहलींना पूर्ण पाठिंबा देत असून त्यात 50% भाडेसवलत देणार असल्याची घोषणा यावेळी सरनाईकांनी केली. यामुळे विद्यार्थी ऐतिहासिक-धार्मिक स्थळांना सहज भेट देऊ शकणार आहेत.
मागील वर्षीची आकडेवारी:
नोव्हेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत एमएसआरटीसीने शैक्षणिक सहलीसाठी 19 हजार 624 बस पुरवल्या. यातून सरकारला 92 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. ही यशस्वी कामगिरी पाहता यंदा आणखी मोठ्या प्रमाणात बस उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. मंत्री सरनाईक यांनी 2025-26 साठी डेपो व्यवस्थापक आणि स्टेशन प्रमुखांना शाळा-कॉलेजांशी समन्वय साधण्याचे आदेश दिले आहेत.
प्राचार्यांशी साधणार संपर्क
डेपो प्रमुख आणि स्टेशन अधिकाऱ्यांना मुख्याध्यापकांना भेटून सहलीची योजना आखण्यास सांगितले आहे. ते राज्यातील महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणांना भेटीचे आयोजन करणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कृतीची ओळख होण्यास मदत होईल. सरकारने घेतलेल्या या पुढाकारामुळे शैक्षणिक सहलींना चालना मिळेल यासोबतच एमएसआरटीसीला अधिक महसूल मिळणार आहे.
योजनेचा उद्देश काय?
एमएसआरटीसीने केलेली ही घोषणा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. स्वस्त भाडे आणि नव्या बसांमुळे पालकांचा भार कमी होणार आहे. तर विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळणार आहे. राज्यभरातील शैक्षणिक संस्थांना याचा थेट लाभ होणार आहे.
FAQ
१. महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक सहलीसाठी किती टक्के भाडेसवलत जाहीर केली?
उत्तर: शाळा-महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहलीसाठी भाड्यात ५० टक्के सूट देण्यात येईल. ही सवलत एमएसआरटीसीच्या बसांसाठी आहे आणि विद्यार्थ्यांना स्वस्त-सुरक्षित प्रवास मिळावा हा उद्देश आहे.
२. एमएसआरटीसी किती नव्या बस उपलब्ध करणार आणि कधीपासून?
उत्तर: एमएसआरटीसीचे २५१ डेपो दररोज ८०० ते १००० नव्या बस शाळा-कॉलेजांना देणार. ही सुविधा यंदाच्या वर्षी (२०२५-२६) सुरू होईल, दिवाळी सुट्टीनंतर सहलींना प्राधान्य.
३. मागील वर्षी किती बस पुरवल्या आणि महसूल किती?
उत्तर: नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत १९,६२४ बस उपलब्ध करून ९२ कोटी रुपये महसूल मिळाला. यंदा डेपो प्रमुख शाळा-प्राचार्यांशी समन्वय साधून ऐतिहासिक-धार्मिक स्थळांच्या सहली आयोजित करतील.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 16, 2025 | Trending News
Mumbai To Alibaugh In 10 Min Revas Karanja Bridge : मुंबईते अलिबाग हा सध्या दोन तासांचा प्रवास आहे. मात्र, हाच 2 तासांचा प्रवास फक्त 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे. मुंबईजवळ आणखी एक सागरी मार्ग बांधला जाणार आहे. मुंबई-एमएमआर प्रदेशात वाहतूक सुलभ करण्यासाठी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहेत. मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा देशातील सर्वात लांब मुंबई ट्रान्सहार्बर सी लिंक ब्रिज उघडल्यानंतर, रायगड जिल्ह्यात किनारी संपर्क वाढवण्याचे काम आता सुरू आहे. धरमतरजवळील खाडीवर रेवस-करंजा पुलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे, ज्यामुळे मुंबई ते अलिबाग प्रवास सोपा होणार आहे.
Add Zee News as a Preferred Source
2.04 किमी लांबीचा हा पुल असेल. सुरुवातीला एमएसआरडीसीने 2,079 कोटी रुपयांचा हा प्रकल्प सादर केला होता. परंतु कालांतराने त्याची किंमत 42.56 टक्क्यांनी वाढली आहे. पुढील तीन वर्षांत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 20.04 किमी लांबीच्या या पुलामुळे अंतर 50 किमीने कमी होईल. रायगड जिल्ह्यातील किनारी शहर असलेल्या अलिबागला जाण्यासाठी मुंबईहून नवी मुंबई, पनवेल आणि पेण मार्गे अंदाजे 120 किमी रस्त्याने प्रवास करावा लागतो. रेवस आणि कारंजा दरम्यान 2.04 किमी लांबीच्या समुद्री पुलाच्या बांधकामामुळे, मुंबईहून एमटीएचएल आणि नवाशेवा मार्गे अलिबागचे अंतर जवळजवळ निम्म्याने कमी होणार आहे.
सध्या, रेवस आणि कारंजा दरम्यान सुमारे 70 किमी अंतर पार करण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. या समुद्री पुलाच्या बांधकामामुळे, रेवसहून करंजा येथे फक्त 10 मिनिटांत पोहोचता येते. सध्या रेवस आणि कारंजा दरम्यान फेरी सेवा चालतात, परंतु त्यामध्ये चारचाकी वाहने बसत नाहीत. पावसाळ्यात, खराब हवामानामुळे फेरी सेवा विस्कळीत होतात.
अलिबाग ते जेएनपीटी दरम्यानचे अंतर 25 किमीने कमी होणार आहे. एकदा समुद्री पूल रेवस आणि कारंजा यांना जोडला की, अलिबागहून जेएनपीटीला सहज पोहोचता येईल. या पुलामुळे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि अलिबागमधील रस्ते अंतर अंदाजे 55 किमीवरून फक्त 30 किमीपर्यंत कमी होईल. याव्यतिरिक्त, नियमित वाहनचालकांना मुंबई आणि अलिबागमधील जड वाहतुकीपासून मुक्तता मिळेल. सध्या, मुंबईहून अलिबागला थेट प्रवास करण्यासाठी रो-रो सेवा उपलब्ध आहेत, परंतु त्या खूप महाग आहेत.
रायगड जिल्ह्यातील राज्य महामार्ग क्रमांक 4 वर हा चार पदरी पूल बांधला जाईल. 29.50 मीटर रुंदीच्या या पुलावर वाहने ताशी 80 किमी वेगाने प्रवास करू शकतील. त्याच्या दोन्ही बाजूला 1.5 मीटर रुंदीचा पादचाऱ्यांसाठीचा पदपथ देखील असेल. कारंजामध्ये 5.13 किलोमीटर लांबीचा अप्रोच रोड बांधला जाईल, तर रेवसमध्ये 1.17 किलोमीटर लांबीचा रस्ता स्टिल्टवर बांधला जाईल.
FAQ
प्रश्न 1: रेवस-करंजा समुद्री पुलाचे बांधकाम कधी सुरू होणार आहे?
उत्तर: रेवस-करंजा समुद्री पुलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.
प्रश्न 2: हा पुल किती लांबीचा असेल?
उत्तर: हा पुल 2.04 किमी लांबीचा असेल.
प्रश्न 3: या पुलामुळे मुंबई ते अलिबाग प्रवास किती कमी होणार आहे?
उत्तर: या पुलामुळे मुंबई ते अलिबाग प्रवास 2 तासांवरून 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 16, 2025 | Trending News
Nagpur Crime News: नागपुरात शनिवारी भरदिवसा धारदार शस्त्राने वार करत भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाची हत्या करण्यात आली आहे. सचिन उर्फ सोनू साहू असं मयत व्यक्तीचे नाव आहे. यशोधरा पोलीस स्टेशन स्टेशनच्या हद्दीतील कांजी हाऊस येथे हा थरार घडला आहे.
Add Zee News as a Preferred Source
सचिन साहू असं मृताचं नाव असून तो उत्तरं नागपुरातील वार्डचा अध्यक्ष होता. जुन्या पैशाच्या देवाण घेवाणचा वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक सचिनच्या मुलाचा वाढदिवस होता. तो मुलाच्या वाढदिवसाच्या तयारीचे साहित्य आणण्यासाठी बाहेर गेला होता. घरी परतत असतानाच वाटतेच कांजी हाऊस परिसरात त्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दोन दुचाकींवर आलेले चार मारेकरी पूर्ण तयारीनिशी आल्याचा संशय पोलिसांना आहे. सोनुच्या खूनानंतर चौघेही फरार झाले असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आर्थिक वादातून खून झाल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. काही संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठीदेखील बोलवले होते.
मारेकरी नेमके कोण होते? हत्येमागाचे नमेके कारण काय? याचा तपास सुरू असून आजूबाजूच्या परिसरात सीसीटीव्ही तपासात आरोपीचा मागोवा घेत आहेत. तीन ते चार जण असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसंच, मृतक सचिन शाहूचा गणपतीच्या दरम्यान काही लोकांशी वाद झाला होता त्यामुळे याच्या हत्येमागे त्या लोकांचा समावेश असल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
FAQ
प्रश्न 1: नागपुरात शनिवारी कोणत्या व्यक्तीची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे?
उत्तर: सचिन उर्फ सोनू साहू या भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाची धारदार शस्त्राने वार करत भरदिवसा हत्या करण्यात आली आहे.
प्रश्न 2: ही घटना नागपुरात कोणत्या ठिकाणी घडली?
उत्तर: यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कांजी हाऊस परिसरात हा थरार घडला आहे.
प्रश्न 3: मृत सचिन साहू कोणत्या पक्षाचे व कोणत्या भागाचे अध्यक्ष होते?
उत्तर: मृत सचिन साहू हे उत्तर नागपुरातील भाजपचे वॉर्ड अध्यक्ष होते.
प्रश्न 4: हत्येमागे प्राथमिक संशयित कारण काय आहे?
उत्तर: प्राथमिक तपासात, ही हत्या जुन्या पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 15, 2025 | Trending News
Ajit Pawar : झी 24 तासनं पर्दाफाश केलेल्या कोरेगाव जमीन गैरव्यवहार प्रकरणाचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटले आहेत. अजित पवारांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतलीय. या भेटीत अजित पवार आणि अमित शाहांमध्ये कोरेगाव जमीन गैरव्यवहारासंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. कारण झी 24 तासनं ही बातमी ब्रेक केल्यानंतर पार्थ पवार अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे अजित पवारांची देखील दाणादाण उडल्याचं चित्र आहे.
Add Zee News as a Preferred Source
झी 24 तासची बातमी, अजितदादांची धावाधाव?
बिहारच्या निकालानंतर रात्री 10 वाजता अजित पवारांनी दिल्लीत देशाचे गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली आहे. पुण्यातील कोरेगाव परिसरातील जमीन गैरव्यवहार प्रकरणाबाबत चर्चा झाल्याची माहिती. जमीन प्रकरणातील वस्तूस्थिती दादांनी शाहांसमोर मांडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. झी 24 तासनं समोर आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाचे पडसाद थेट दिल्लीपर्यंत उमटल्याचं पाहायला मिळालं.
अजित पवारांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची देखील वर्षा बंगल्यावर जात भेट घेतली होती. दरम्यान या भेटीत देखील अजित पवारांनी फडणवीसांसोबत जमीन प्रकरणावर चर्चा केल्याची माहिती होती. दरम्यान आता शाहांच्या भेटीतही याच प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिल्यानंतर विरोधकांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय.
पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय अंजली दमानियांनी व्यक्त केलाय. शाहांच्या भेटीनंतर प्रकरणाला दाबलं जात असेल तर ईडी, शाहांविरोधात याचिका करण्याचा इशारा अंजली दमानियांनी दिलाय. तर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील अजित पवारांवर शरसंधान साधलंय. तर तिकडे अमित विजय वडेट्टीवारांनी देखील या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय.
वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
पुणे मुंढवा जमीन प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी विजय वडेट्टीवारांची मागणी. जमीन प्रकरणी नेमलेल्या चौकशी समिती मधील अधिका-यांचाही जमीन गैरव्यवहार प्रकरणात सहभाग, त्यामुळे समिती रद्द करा. स्वतंत्र समिती नेमून निष्पक्ष चौकशी, आणि जबाबदार अधिका-यांवर कारवाईची वडेट्टीवारांची मागणी.
झी 24 तासनं पुणे जमीन प्रकरणाचा भांडाफोड केल्यानंतर पार्थ पवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांनी केलीय. दरम्यान याच प्रकरणी अजित पवारांनी अमित शाहांसोबत चर्चा केल्याची माहितीय. तर दुसरीकडे वडेट्टीवारांनी या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 15, 2025 | Trending News
Maharashtra Weather Update: राज्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसाने नागरिकांची चिंता वाढवली होती. मात्र आता हळूहळू थंडीचा कडाका वाढू लागला आहे. राज्यातील बहुसंख्य शहरात तापमानाचा पारा घसरतोय. विकेंडला नागरिकांना थंडीचा सुखद अनुभव घेता येणार आहे. सोमवारपर्यंत गारठा टिकून राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
Add Zee News as a Preferred Source
उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे झेपावत असल्याने थंडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट काही दिवस टिकून राहणार आहे. राज्यातही गारठा वाढणार असून अनेक ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात किमान तापमान 11 अंशाच्या खाली आल्याने थंडीचा कडाका वाढणार असल्याने कमाल तापमानातही घट होऊ लागली आहे.
राज्याच्या कमाल तापमानात हळूहळू घट होत आहे. राज्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट आणि हुडहुडी कायम आहे. किमान तापमानाचा पारा 10 अंशाखाली घसरल्यास आणि तापमानात सरासरीपेक्षा 4.5 अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास थंडीची लाट आल्याचे असे समजले जाते.
मुंबईचे शुक्रवारी किमान तापमान 18.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. शनिवार, रविवार आणि सोमवारी हा पारा 16 ते 17 अंशांवर उतरण्याची शक्यता आहे. यामुळे गारेगार झालेल्या मुंबईकरांना बोचरी थंडी अनुभवता येणार आहे. मुंबई शेजारचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानचे किमान तापमान 18 नोंदविण्यात आले.
14 ते 20 नोव्हेंबर आणि 21 ते 27 नोव्हेंबर या दोन आठवड्यांत महाराष्ट्र व मध्य भारतातील बहुतेक भागात किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
FAQ
प्रश्न १: राज्यात थंडी का वाढू लागली आहे?
उत्तर: उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे झेपावत असल्याने राज्यात थंडी वाढू लागली आहे.
प्रश्न २: सध्या राज्यातील तापमानाची स्थिती काय आहे?
उत्तर: राज्यातील बहुसंख्य शहरांमध्ये तापमानाचा पारा घसरू लागला आहे आणि थंडीचा कडाका हळूहळू वाढू लागला आहे.
प्रश्न ३: थंडीची लाट येण्याची शक्यता कोणत्या भागात आहे?
उत्तर: उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट काही दिवस टिकून राहणार आहे, तसेच राज्यातही गारठा वाढणार असून अनेक ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Source link