कल्याणमध्ये खळबळ; देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

कल्याणमध्ये खळबळ; देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न



कल्याणमध्ये भर दिवसा महिलेची छेड काढण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 



Source link

बहिणीला वाचवण्यासाठी भावांनी घेतली तलावात उडी; खोल पाण्यामुळे तिघांचाही गेला जीव

बहिणीला वाचवण्यासाठी भावांनी घेतली तलावात उडी; खोल पाण्यामुळे तिघांचाही गेला जीव


पुढील
बातमी

‘ती वाघनखं कोणाची?’ छत्रपतींचे वंशज संभाजी राजेंनाही पडला प्रश्न; म्हणाले, ‘2017 ला मी तिथं गेलेलो तेव्हा…’





Source link

रणबीर याच्या नंतर कपिल शर्मा आणि हुमा कुरेशी यांना ईडीचे समन्स; सखोल चौकशी होणार

रणबीर याच्या नंतर कपिल शर्मा आणि हुमा कुरेशी यांना ईडीचे समन्स; सखोल चौकशी होणार


Mahadev app case: बॉलिवूड स्टार रणबीर कपूरला ईडीचे समन्स आले आहे. एका सट्टा अ‍ॅपची जाहिरात केल्याप्रकरणी रणबीरला समन्स बजावण्यात आलेत. आता याच प्रकरणी कॉमेडियन कपिल शर्मा याच्यासह अभिनेक्षी हुमा कुरेशी या दोघांना देखील ईडीचे समन्स आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. आता कपिल शर्मा आणि  हुमा कुरेशी यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणरा आहे. 

रणबीर कपूरनं ईडीकडे दोन आठवड्यांची वेळ मागितली

महादेव ऑनलाईन सट्ट्याच्या अ‍ॅप प्रकरणी रणबीर कपूरनं ईडीकडे दोन आठवड्यांची वेळ मागितलीय. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला ईडीनं समन्स पाठवलंय. रणबीर कपूरला ६ ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. महादेव अ‍ॅपप्रकरणी रणबीरची चौकशी करण्यात येणार आहे.  महादेव अ‍ॅप हे  ऑनलाईन सट्ट्याचं अ‍ॅप आहे. आणि या अ‍ॅपच्या जाहिरातीप्रकरणी यापूर्वीच अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी करण्यात आलेली आहे. याआधी सनी लिओनीसह, भाग्यश्री, टायगर श्रॉफ यांचीही चौकशी झालीय. आता रणबीरपर्यंत हे धागेदोरे गेले आहेत. आता रणबीर कपूरच्या मागणीवर ईडी काय उत्तर देतं, याकडे लक्ष लागलंय. 

अनेक सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर

 आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, अली असगर, विशाल ददलानी, टायगर श्रॉफ, नेगा कक्कर, भारती सिंग, एली अवराम, सनी लिओन, भाग्यश्री, पलकित सम्राट, कीर्ती खरबंदा, नुसरत भरूचा आणि कृष्णा असे अनेक सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत. 

नेमकं काय आहे प्रकरण? 

महादेव ऍप हे ऑनलाईन सट्ट्याचं ऍप आहे आणि या ऍपच्या जाहिरातीमुळे रणबीरसह अनेक स्टार्स ईडीच्या निशाण्यावर आले आहेत. फेब्रुवारीमध्ये यूएईमधल्या अलिशान हॉटेलात ऑनलाईन सट्टा ऍपप्रकरणातील आरोपी सौरभ चंद्राकरचा लग्न सोहळा पार पडला. या सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे रणबीरसह अनेक कलाकार ईडीच्या रडारवर आलेत. त्यामुळे हे प्रकरण केवळ ऑनलाईन सट्ट्यापुरतं मर्यादित नाही असा संशय ईडीला आहे.





Source link

देशात थंडीची चाहूल, राज्यात मात्र पावसाळा; पाहा IMD चा नवा इशारा

देशात थंडीची चाहूल, राज्यात मात्र पावसाळा; पाहा IMD चा नवा इशारा


Maharashtra Rain : तिथं देशातून (Monsoon) मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झालेला असताना इथं महाराष्ट्रातूनही येत्या काही दिवसांमध्ये पाऊस परतीची वाट धरताना दिसणार आहे. पण, तत्पूर्वी राज्यातील बहुतांश भागांमध्ये मात्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. बळीराजासाठी ही चांगली बातमी असून, राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशय क्षेत्रांमध्येसुद्धा पाणीपातळी समाधानकारक असल्यामुळं यंत्रणांवरील ताणही कमी होताना दिसणार आहे. 

‘या’ भागांसाठी 24 तास पावसाचे 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या कोकण (Konkan) आणि विदर्भात (Vidarbha) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, पुढच्या 48 तासांमध्ये मुंबई, पुणे आणि ठाण्यामध्ये मधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरील क्षेत्रामध्ये सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं राज्यात पावसासाठी पूरक वातावरण तयार होताना दिसत आहे. ज्यामुळं अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळू शकते. मुंबईत तुलनेनं हवामान दमट राहणार असून, सकाळ आणि दुपारच्या वेळी उष्णतेचा दाह अधिक तीव्र जाणवणार आहे. तर कोकण किनारपट्टी भागात मात्र अंशत: ढगाळ वातावरण दिसेल. 

देशातील मान्सून परतीच्या वाटेवर 

सध्या दिल्ली, राजस्थान, हिमाचल, हरियाणा, उत्तराखंडमधून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे. तर, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेशच्या विविध भागांमधूनही मान्सूननं काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं देशाच्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीची चाहूल लागणार आहे.

IMD च्या अंदाजानुसार पश्चिम बंगाल, सिक्किम, आसाम, मेघालयमध्ये पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढलेला असेल. तर उत्तर हिमालय क्षेत्रामध्ये काही भागांमध्ये पावसाच्या हजेरीसोबतच काही ठिकाणांवर तापमानाचा आकडाही कमी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हिमाचल आणि उत्तराखंडमधील पर्वतीय क्षेत्रांमध्ये काही ठिकाणांवर पावसाची रिमझिम असू शकते. तर, बहुतांश भागात तापमान अपेक्षेहून कमी नोंदवलं जाऊ शकतं. येत्या काळात देशाच्या उत्तरेकडील थंडीची ही चाहूल महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार असल्यामुळं हवामानाचं एकंदर रुपडं पालटणार आहे. 





Source link

कॅबिनेट विस्तार आणि महामंडळ वाटपात अजित पवार गटाला शिंदे गटा इतकाच वाटा पाहिजे? महायुतीत नवा पेच

कॅबिनेट विस्तार आणि महामंडळ वाटपात अजित पवार गटाला शिंदे गटा इतकाच वाटा पाहिजे? महायुतीत नवा पेच



अजित पवार यांचा एक मोठा गट शिंदे फडणवीस यांच्यासह सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवार यांच्यासह 9 जणांना मंत्रीपद मिळाले आहे. आता अजित पवार गटाला सत्तेत आणखी वाटा पाहिजे असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालेय. 



Source link

‘लव्ह जिहाद’नंतर ‘लँड जिहाद’चा महाराष्ट्राला धोका? नेमकं हे प्रकरण आहे तरी काय?

‘लव्ह जिहाद’नंतर ‘लँड जिहाद’चा महाराष्ट्राला धोका? नेमकं हे प्रकरण आहे तरी काय?


Special Report on Land Jihad : जिहादपाठोपाठ आता लँड जिहादनं डोकं वर काढलंय, महाराष्ट्राला लँड जिहादचा विळखा पडलाय आणि त्याची सुरुवात झालीय मालेगावपासून. असं आम्ही म्हणत नाहीयोत तर हे आरोप केले आहेत ते सत्ताधारी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी. मात्र, अचानक लँड जिहादचा विषय समोर का आला, लँड जिहाद म्हणजे नेमकं काय ह?  नितेश राणेंनी केलेले आरोप सर्व काही धक्कादाय आहे. 

नितेश राणेंचे आरोप काय? 

लव्ह जिहाद पाठोपाठ आता लँड जिहादने डोकं वर काढलंय असा गंभीर आरोप भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी केलाय. या प्रकरणात प्रशासनातले काही अधिकारी आहेत असा त्यांनी दावा केलाय. मालेगावमध्ये बांगलादेशी आणि रोहिंगे यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय, बांगलादेशींची वस्ती वसवण्याचे प्रकार काही अधिकारी करत आहेत असा आरोप नितेश राणेंनी केला आहे. मालेगावात तुकडेबंदी कायदा धुडकावत जमिनीची खरेदी-विक्री सुरु आहे. बांग्लादेशी-रोहिंग्यांची वस्ती बसवण्याचं काम अधिकारी करतात असे गंभीर आरोप नितेश राणे यांनी केले आहेत. 

मुंबईत माहिम दर्ग्याजवळ समुद्रात अतिक्रमण

मुंबईत माहिम दर्ग्याजवळ समुद्रात अतिक्रमण करण्यात आलं होतं, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्हिडीओ दाखवत हा प्रकार उघड केला होता.. मुंबादेवी डोंगरावरच्या मजारीच्या अतिक्रमणाचा मुद्दाही मनसेनं समोर आणला होता. त्यानंतर लँड जिहादचे प्रकार महाराष्ट्रात घडतायत, याची चर्चा सुरु झाली होती.

लँड जिहाद म्हणजे नेमकं काय ?

इतर धर्मियांच्या जमिनी बळकवण्याचा पूर्वनियोजित कट असल्याचे बोलले जात आहे. सार्वजनिक मालकीच्या जमिनी बळकवण्याचा प्लॅन आहे.  परधर्मियांच्या जमिनीवर धार्मिक विधी, प्रार्थना करत कब्जा करायचा अशा प्रकारे जमिनी बळकावल्या जातात. 

माहिम दर्गा येथील अतिक्रमणाचा मुद्दा समोर येताच शिंदे-फडणवीस सरकारनं तातडीनं कारवाई केली होती. आता मालेगावप्रकरणाचा मुद्दा खुद्द भाजप आमदार नितेश राणेंनी मांडलाय.. त्यामुळे या लँड जिहाद आरोपांप्रकरणी सरकारनं लक्ष घालण्याची मागणी होत आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp