Maharashtra Rain : आता फक्त गडगडाट; रविवार मात्र मुसळधार पावसाचा
Maharashtra Rain : महाराष्ट्रात परतीचा पाऊस अद्यापही सुरु झाला नसून, हा मान्सूनचाच पाऊस राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार हजेरी लावताना दिसत आहे.
Source link
Maharashtra Rain : महाराष्ट्रात परतीचा पाऊस अद्यापही सुरु झाला नसून, हा मान्सूनचाच पाऊस राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार हजेरी लावताना दिसत आहे.
Source link
Gautami Patil : ‘सबसे कातील गौतमी पाटील’ रोजच चर्चेत असते. गणोशोत्सवानिमित्ताने अनेक ठिकाणी गौतमीचे कार्यक्रम पार पडले. गौतमीच्या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी असते. अहमदनगर गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेणं आयोजकांना चांगलंच महागात पडलंय. कार्यक्रम आयोजीत करणाऱ्या मंडळासह गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल झाला आहे.
नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर अहमदनगर मधील तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल अशा प्रकारे गौतमी पाटील हिचा कार्यक्रम घेतल्याबद्दल गणपती मंडळाच्या अध्यक्षांसह गौतमी पाटील आणि तिच्या मॅनेजर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर शहरातील पाईपलाईन रोडवर काल सायंकाळी मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळ यांच्यावतीने गौतमी पाटील नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास प्रशासनाने परवानगी नाकारली होती. मात्र, तरीही हा कार्यक्रम घेतल्यामुळे पोलिसांनी आता गौतमी पाटीलसह तिचा स्वीय सहाय्यक अशोक खरात याच्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. गौतमीसह कार्यक्रमाचे आयोजक असलेले मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल सांगळे, आनंद कैलास नाकाडे, हर्षल किशोर भागवत, यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी परवानगी नाकारली असताना देखील हा कार्यक्रम घेण्यात आला. तोफखाना पोलीसांनी आता कारवाई केली आहे. रस्त्यात अडथळा निर्माण होईल असे कार्यक्रम घेणे तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी क्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन करून डी जे सिस्टीम लावून कर्णकर्कश आवाजामध्ये गाणी लावून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करणे, वारंवार आवाज कमी करण्याच्या सूचना देऊनही सूचनांकडे दुर्लक्ष करणे या कारणांसाठी भादवी कलम 188, 283, 341, 34 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 2, 15 व ध्वनी प्रदुषण अधिनियम 2000 चे कलम 3, 4, 5, 6, मु.पो.का.क 37 (1) (3)/ 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंडोरीत शाळेच्या प्रांगणात झालेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची शिक्षणाधिका-यांनी गंभीर दखल घेतलीय. याप्रकरणी गटशिक्षण अधिकारी आणि गटविकास अधिका-यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वलखेडमध्ये प्राथमिक शाळेच्या प्रांगणात गौतमी पाटीलचा डान्स कार्यक्रम झाला होता. शाळेच्या प्रांगणात गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यानं आयोजकांवर टीका झाली होती. झी 24 तासनं याबाबतची बातमी दाखवल्यानंतर शिक्षणविभागाला खडबडून जाग आलीय.
नालासोपारा रेल्वे स्थानकात विचित्र घटना घडली आहे. एसी लोकल स्टेशन सोडून चार डबे पुढे थांबवली यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहना करावा लागला.
Source link
Lalbaugcha Raja: लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक सकाळी 10 वाजताच सुरू झाली आहे. राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. याचदरम्यान एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
Source link
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. यामध्ये एका मराठी महिलेचा संताप अनावर झालेला पाहायला मिळतोय. या महिलेने आणि तिच्या पतीने मुलुंड पश्चिमेला शिवसदन नावाच्या इमारतीमध्ये कार्यालयासाठी जागा पहिली होती मात्र आम्ही मराठी लोकांना जागा देत नाही असं या सोसायटीमार्फत महिलेला सांगण्यात आलं. लेखी द्या असं या महिलेने सांगितल्यानंतर या महिलेसोबत सोसायटीच्या सचिवांनी अरेरावाची भाषा सुरू केली आणि हुज्जत घातली.. या महिलेनं घडलेला प्रकार फेसबुकवर व्हिडीओद्वारे शेअर केलाय आता यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
चीड आणणारी घटना…
पण प्रश्न हा आहे, की हे पाहून मिंधे-भाजपा सरकार काय करणार?
आमच्या मराठमोळ्या वारकऱ्यांवर, बारसूमधल्या महिलांवर, मराठा समाजावर लाठ्या चालवल्या…
तसा इथेही कायद्याचा धाक दाखवणार, की दिल्लीश्वर नाराज होतील म्हणून ‘हाताची घडी तोडांवर बोट’ ठेवून गप्प बसणार? ह्या बिल्डींगवर कारवाई होणार का? उद्या BMC आणि पोलीस पाठवणार का? की ‘थॅंक यू’ म्हणून बुलेट ट्रेनच्या कामाला वेग देणार? हिम्मत करा! कायद्याचा धाक ‘इथे’ दाखवा! महाराष्ट्र बघतोय! अतिशय संतप्त करणारी ही घटना! असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
मुंबई मध्ये आता मराठी माणसाला च जागा नाही ?? आज मुलुंड मुंबई येथे एका मराठी भगिनी बाबतीत झालेला प्रकार हा अतिशय संतापजनक आहे. Maharashtrian Not Allowed अशी मुजोरी काही मंडळी येथे मुंबई मध्ये करत आहेत हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. यांच्या मागे कोणत्या शक्ती आहेत हे बघितले पाहिजे,केंद्रातील भाजपा सरकार मुंबई मराठी माणसापासून परिणामी महाराष्ट्रापासून तोडण्याचे काम करत आहे. राज्यातील येड्याचे सरकार हे दिल्लीश्वरा समोर झुकलेले आहे. मराठी स्वाभिमान जागृत ठेवून राज्य सरकारने या घटनेची चौकशी करावी आणि अश्या घटना परत घडू नये याची काळजी घ्यावी.
ही घटना अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रात मराठी माणसालाच Maharashtrians are not allowed म्हणून मुजोरी केली जाणार असेल तर ते सहन करता कामा नये. राज्य सरकारने तातडीने चौकशी करावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.
अशा पद्धतीने हे अजिबात चालणार नाही. कुणाची मक्तेदारी चालू देणार नाही आणि सहनही करणार नाही. माहिती घेतली जाईल या घटनेची. जर यात तथ्य असेल तर गंभीरतेने नोंद घेवू. मराठी माणसाचा असा अपमान करण्याचा कदापि धाडस होणार नाही अशी भूमिका घेवू. महाराजांच्या भूमीत हे घडत असेल तर ही लाजीरवाणी बाब आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
मुंबईतून महाराष्ट्र हळू हळू वजा कसा करण्यात येत आहे त्याचे हे आजचे प्रकरण उत्तम उदाहरण आहे. जी मुंबई मराठी माणसांची आहे तिथे त्यांनाच जागा नाही असे म्हणत मराठी माणसांचा द्वेष करणारे कोण आहेत? भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एका विशिष्ठ धर्मातील लोकांबद्दल असलेला द्वेष आपण मागील आठवड्यात एका भाजप खासदाराच्या भाषेतून बघितला. हा द्वेष आता मराठी माणसाकडे यायला लागला का ? जात- पात,धर्म,भाषेला पकडून जो द्वेष पसरवण्यात येत आहे तो थांबला पाहिजे. महायुती सरकारने कोणत्याही वोट बँकेची चिंता न करता सबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करावी ही आमची मागणी आहे.
Sangli Husband Sucide: दत्तात्रय निंगाप्पा कोळी असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव असून ते 46 वर्षांचे होते. जत शहरातील दत्त कॉलनीतील ते राहत होते. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत त्यांनी सासू आणि इतर दोघांच्या विरोधात चिठ्ठी लिहीली.
Source link