by Hansraj Agrawal | Aug 16, 2023 | Trending News
भाजपबरोबर जाणार नाही, शरद पवारांची स्पष्टोक्ती. अजित पवारांबरोबरच्या बैठकीत राजकीय चर्चा नाही असे देखील शरद पवार म्हणाले. पवारांचा दावा, देश मोदींसाठी अनुकूल नाही अस भाकित देखील पवारांनी केले.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 15, 2023 | Trending News
sharad pawar and ajit pawar : शरद पवार आणि अतित पवार असे राष्ट्रावदीचे दोन गड पडले आहेत. अजित पवार यांच्या गट शिंदे फडणवीस सरकारसोबत सत्तेत सहभागी झाला आहे. तर, शरद पवार यांचा एक गट महाविकास आदघाडीसोबत विरोधात आहे. असे असताना राष्ट्रवादीत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुण्यातील गुप्त भेटीनंतर दोन्ही गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्यांमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
आमच्यावर शरद पवारांचा आशीर्वाद आहे असं विधान अजित पवार गटाचे बडे नेते असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. तर, राष्ट्रवादीत फूट पडली नाही. सर्वजणं पवारांसाठीच काम करत असल्याच्या वक्तव्य शरद पवार गटासोबत असलेले राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या या वक्तव्यामुंळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
2 जुलै 2023 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांचा मोठा गट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट राष्ट्रवादीत पडले आहेत.
शरद पवार बरोबर आले नाहीत तरी ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र राहणार
शरद पवार बरोबर आले नाहीत तरी ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र राहण्याचा विचार करतंय. शरद पवार आणि अजित पवार भेटींवर ठाकरे गट आणि काँग्रेस दोघांनीही नाराजी व्यक्त केलीय. पवारांच्या या भेटींमुळे संभ्रमावस्था आहे. एकीकडे इंडियाची बैठक मुंबईत होत असताना दुसरीकडे शरद पवारांच्या अजित पवारांशी गाठीभेटी होत असल्यानं महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे. त्यामुळे शरद पवार गटानं सोबत राहण्याबाबत वेगळी भूमिका घेतली तरी ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र राहण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात राजकीय टोलेबाजी जोरदार सुरू झालीय.
पुतण्याने काकांना भेटण्यात गैर काय ? अजित पवारांचा सवाल
पवार काका पुतण्याच्या भेटींवर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केलीय. या भेटी हा चिंतेचा विषय आहे. लपून होणा-या भेटी योग्य नाहीत अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलीय. तर पुतण्याने काकांना भेटण्यात गैर काय असा सवाल अजित पवारांनी केलाय. मी लपून फिरणारा माणूस नाही असंही ते म्हणाले.
महाविकास आघाडीत कुठलाही संभ्रम नाही
महाविकास आघाडीमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर संभ्रम आहे, अनेक नेते नाराजी व्यक्त करतायत. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. महाविकास आघाडीत कुठलाही संभ्रम नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 15, 2023 | Trending News
Vande Bharat Express Kolhapur: महाराष्ट्राला आणखी एका वंदे भारत एक्स्प्रेसचे (Vande Bharat Express) गिफ्ट मिळणार आहे. राज्याला पाचवी वंदे भारत लवकरच मिळणार असून मुंबई ते कोल्हापूर (Mumbai-Kolhapur) या मार्गावर ती धावणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून या प्रस्तावित रेल्वेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळं मुंबई ते कोल्हापूर अंतर कमी होणार आहे.
कोल्हापूरला जाण्यासाठी मुंबई मार्गावर अवघी एकच गाडी आहे. त्यामुळं गर्दीतून या गाडीतून प्रवास करावा लागतो. त्याचबरोबर वेटिंग लिस्टही असते. अशे असतानाच काही दिवसांपूर्वी कोकण रेल्वेला जोडणाऱ्या कोल्हापूर-वैभववाडी मार्गासाठी गती घेतल्याचे समोर आले होते. त्यानंतर कोल्हापुरकरांना आता वंदे भारत एक्स्प्रेसचे गिफ्ट मिळणार आहे. मात्र, प्रवाशांना वंदे भारतसाठी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र असे असले तरी वेगवान आणि आरामदायी प्रवास कोल्हापुरकरांना लाभणार आहे.
मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन मुंबई-कोल्हापूर दरम्यान दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सातारा आणि मिरज जंक्शन येथे थांबेल. तर मुंबईहून कोल्हापूरला जाण्यासाठी फक्त 7 तास लागणार आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसमुळं शहरांतील प्रवासाचा वेळ 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूर बारा महिने पर्यटकांनी बहरुन जाते. त्यामुळं भाविकांसाठी वंदे भारत एक्स्प्रेस ही मोठी पर्वणी ठरणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमुळं मिरज, सांगलीतील प्रवाशांचीही सोय होणार आहे.
मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस कधी सुरु होणार हे मात्र अद्याप निश्चित नाहीये.रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणींचं कारण देत या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस मार्च 2024 नंतर धावू शकते असं म्हटलं आहे. या मार्गावरील तांत्रिक अडचणी, रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण, पुणे मिरज मार्ग दुहेरी करण्याची काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या मिरज- पुणे मार्गाचं दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करण्याचं काम सुरु आहे. कोल्हापूर आणि मिरज दरम्यानचा मार्ग एकेरी आहे, जेव्हा आमची कामं पूर्ण होतील, त्यावेळी वंदे भारत ट्रेन सुरु करणं शक्य होईल, अशी भूमिका विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांनी अलीकडेच मांडली होती
Source link
by Hansraj Agrawal | Aug 14, 2023 | Trending News
भाजपनं मनसेला युतीची ऑफर दिल्याची चर्चा आहे. मनसे पदाधिकारी बैठकीत संभाव्य युतीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 14, 2023 | Trending News
Sharad Pawar : कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाची दखल घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 13, 2023 | Trending News
ज्यांच्यासोबत आघाडी करून निवडणूक लढवीत होता, तेच दुसरीकडे गेले. आता स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय नाही..बीडचे प्रभारी अमित देशमुखांनी दिला स्वबळाचा नारा दिला आहे.
Source link