'पार्थवर गुन्हा…' मुख्यमंत्र्यांचं नाव घेत कोरेगाव जमीन गैरव्यवहारावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

'पार्थवर गुन्हा…' मुख्यमंत्र्यांचं नाव घेत कोरेगाव जमीन गैरव्यवहारावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया


Koregaon Park Land Controversy : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ करणाऱ्या आणि पवार कुटुंबाला हादरा देणाऱ्या कोरेगाव भूखंड गैरव्यवहार प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांकडून होणारे आरोप, नवनवीन खुलासे आणि समोर येणारी नावं या साऱ्यांदरम्यानच ‘झी 24तास’नं ही मोठी बातमी दाखवल्यानंतर अवघ्या 48 तासांच्या आत कोरेगाव पार्कातील जमीन खरेदी व्यवहार रद्द करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं. या संपूर्ण प्रकरणात अद्यापही कैक प्रश्न उपस्थित होत असून, आता खुद्द (Sharad Pawar) शरद पवार यांनीसुद्धा त्यावर आपली पहिली प्रतिक्रिया माध्यमांसमोर मांडली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

अकोला इथं माध्यमांशी संवाद साधत असलाना राज्याच्या राजकारणातील मातब्बर नेते अशी ओळख असणाऱ्या पवारांना त्यांचे नातू पार्थ पवार यांचं नाव गोवलं गेलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाती प्रश्न विचारला असता, ‘पार्थवर गुन्हा का नाही, हे मुख्यमंत्रीच सांगतिल’ असं सूचक विधान केलं. 

काय म्हणाले शरद पवार? 

जिथं सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांवरील होणाऱ्या आरोपांवर दिलेल्या प्रतिक्रियेनं अनेक प्रश्न उपस्थित झाले, त्याचसंदर्भात प्रश्न केला असता, आपल्या कुटुंबाची विचारधारा एक असून प्रशासकीय आणि कौटुंबीक गोष्टी वेगळ्या आहेत असं सांगताना ‘सुप्रियाचं मत तिचं वैयक्तीक असू शकतं’ असं पवारांनी स्पष्ट केलं. 

सदर प्रकरण आणि त्यात समोर आलेल्या गोष्टी या गंभीर असून, त्यासाठी सरकारनं समिती स्थापन केली आहे. त्यामुळं पार्थ प्रकरणात चौकशी करून मत समाजासमोर ठेवलं पाहिजे. जमीन गैरव्यवहार प्रकरणात सत्य समाजासमोर आलं पाहिजे आणि . पार्थवर गुन्हा का नाही मुख्यमंत्रीच सांगतील…, असं शरद पवार म्हणाले. 

 

इथं शरद पवारांनी या प्ररकरणावरील प्रतिक्रिया देण्यापूर्वी शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2025 रोजी अजित पवार यांनी माध्यमांना कोरेगाव प्रकरणी माहिती देत हा व्यवहार रद्द झाल्याची माहिती दिली. याचदरम्यान कोरेगाव जमीन प्रकरणावर पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न विचारला असता, ‘कोणी कोणाची फसवणूक केली, याची चौकशी होईल. कोणी सांगितल्यामुळं हे घडलं, कोणाचे फोन गेले, कोणाकडून या प्रकरणात दबाव आणला होता? आणला होता तर कोणी आणला होता? याबाबतची चौकशी होईल,’ असं म्हणत हा व्यवहार झाल्याचं आपल्याला ठाऊक नव्हतं, ठाऊक असतं तर आपत त्याबाबतच सांगितलं असतं असं ते माध्यमांना उद्देशून सांगत ‘जे काही असेल ते नियमानुसार करा’ याचाच त्यांनी पुनरुच्चार केला. 

 





Source link

Pune Koregaon Park Land Deal: '…तर चोरावरचा गुन्हा रद्द होतो का?', अंबादास दानवेंचा अजित पवारांना थेट सवाल

Pune Koregaon Park Land Deal: '…तर चोरावरचा गुन्हा रद्द होतो का?', अंबादास दानवेंचा अजित पवारांना थेट सवाल


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र यांच्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून पुण्यातील कोरेगाव येथे जमीन व्यवहार झाला. या व्यवहाराचा भांडाफोड ‘झी 24 तास’ ने केल्यानंतर हे प्रकरण महाराष्ट्रासह सगळीकडे गाजली. यानंतर आज अखेर अजित पवारांनी हा जमिनीचा व्यवहार रद्द झाल्याच पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे. यानंतर या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी या अजित पवारांच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

Add Zee News as a Preferred Source

चोरी केलेला माल रिकव्हर केला तर…

चोरी केलेला माल रिकव्हर केला तर चोरावरचा गुन्हा रद्द होतो का?’असा थेट सवाल अंबादास दानवेंनी अजित पवारांना विचारला आहे. या प्रकरणात पार्थ पवारांचे का नाही? कंपनीवर गुन्हा दाखल करावा. 300 कोटी कुठून आले…सरकारी जमीन विकली गेली आहे. 

तसेच पुढे ते म्हणाले की, हे उघड झाले नसते तर पचवले असते ना… राज्य सरकार बनवाबनवी करत आहे. अजित पवारांनी राजीनामा देण्याची गरज आहे, अशी मागणी देखील अंबादास दानवे यांनी केली आहे. 

या प्रकरणाची ईडीने चौकशी करायला हवी. कारण अशाच प्रकरणत खडसेंना राजीनामा द्यायला लावला होता, मग अजित पवारांना वेगळा न्याय का?महसूल मंत्री अजित पवारांना वाचवत आहे? असा सवालही विचारण्यात आला आहे. 

हाच नियम सर्वांना लावावा, कोरेगाव पार्कातील ४० एकर जमीन दिली जाते व एकही पैसा दिला जात नाही..आणखी मोठे आश्चर्य आहे. अजितदादा फक्त गोष्टी करतात. आता घाला टायरमध्ये एकेकाला…एवढा मोठा व्यवहार करत असेल तर मुलाला सांभाळले पाहिजे. अजितदादांना माहिती नाही असं कसं होवू शकते. भ्रष्टाचाराचे बरबटलेले हे सरकार आहे. अजित पवारांना क्लिनचीट देणे हे पाप ठरेल, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे. 

अंबादास दानवेंनी काय म्हटलं आहे?

मुलगा पुण्यात 300 कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही. आणि जेव्हा या मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत. तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हे बोलताना? असं आश्चर्य अंबादास दानवे यांनी पोस्टमधून व्यक्त केलं आहे. बाजार भावापेक्षा कमी दरात जमीन घेतली गेली आहे. खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता. चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून तुम्हीही राजीनामा द्या अशी मागणीही त्यांनी केली आहे. न्या. झोटिंग समितीच्या धर्तीवर कोरेगाव पार्क प्रकरणातही समिती मुख्यमंत्री महोदयांनी नेमावी. अशी आमची स्पष्ट मागणी आहे असंही ते म्हणाले आहेत. 





Source link

डायरेक्ट धनंजय मुंडे यांचे नाव घेतले; मनोज जरांगे यांनी केला महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट

डायरेक्ट धनंजय मुंडे यांचे नाव घेतले; मनोज जरांगे यांनी केला महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट


Manoj Jarange On Dhananjay Munde :  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला आहे. या प्रकरणी जालना पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. मनोज जरांगे यांना आलेल्या धमकीमुळे एकच खळबळ उडाली होती. यापूर्वी लॉरेन्श बिश्नोई गँगकडून त्यांच्या जीविताला धोका असल्याचा दावा करण्यात येत होता. आता मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे. धनंजय मुंडे यांनी आपली हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता. याप्रकरणी जालना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. मराठा समाजाला सांगतो शांततेने घ्या. तुम्ही  मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. यातून आता सगळे जागे होणार. मनोज जरांगे यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. 

बीडचा कांचन नावाचा कार्यकर्ता धनंजय मुंडे यांचा पीए आहे. त्याने या आरोपींना सोबत घेऊन परळी येथील रेस्ट हाऊसला नेलं .तिथे पकडलेल्या एका पैकी माझ्याकडे भरपूर आहे असं सांगत दोन कोटी त्यांना द्यायचे ठरले.  संभाजीनगरच्या झालटा फाटा येथे धनंजय मुंडे या आरोपींची एक तास वाट पाहत राहिले. आरोपींना गोळ्या पुरवण्याचं आश्वासन दिलं. यात खूप जण आहे अंतरवालीच्या परिसरातील बडे नावाची व्यक्ती देखील आहे यात एकूण 10 ते 11 जण आहेत. ठिकाणी मग मुंडे यांनी आपल्याला मारण्यासाठी गोळ्या देण्यास सांगितल्याचा दावा जरांगे यांनी केला. तर आपल्या वाहनाला दुसऱ्या वाहनाची धडक देण्याची योजना पण असल्याचा दावा जरांगेंनी केला.

दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगें पाटलांच्या हत्येचा कट रचला गेल्याचं समोर आलंय.याप्रकरणी राजकीय वर्तुलळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत.. हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हणत याबाबत चौकशी करून कारवाई व्हावी असं मत राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केलंय. तर मनोज जरांगे हे समाजासाठी लढणारे नेते म्हणून उदयास आले आहेत.. मतभेद असून शकतात..मात्र विचारांची लढाई विचारांनी लढावी, असं वडेट्टीवार म्हणालेत.

FAQ

1 मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट कसा उघडकीस आला?
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला असून, या प्रकरणी जालना पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी आल्याचा दावा होता. आता मनोज जरांगे यांनी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेत हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. जालना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

2  मनोज जरांगे पाटील यांनी कोणते आरोप केले आहेत?
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप केले आहेत. बीडचा कांचन नावाचा कार्यकर्ता धनंजय मुंडे यांचा पीए असून, त्याने आरोपींना सोबत घेऊन परळी येथील रेस्ट हाऊसला नेले. तिथे आरोपींना २ कोटी रुपये देण्याचे ठरले. संभाजीनगरच्या झालटा फाटा येथे धनंजय मुंडे आरोपींची एक तास वाट पाहत राहिले आणि गोळ्या पुरवण्याचे आश्वासन दिले. यात अंतरवाली परिसरातील बडे नावाच्या व्यक्तीसह एकूण १० ते ११ जणांचा समावेश आहे. मुंडे यांनी जरांगे यांना मारण्यासाठी गोळ्या देण्यास सांगितल्याचा आणि वाहनाला धडक देण्याची योजना असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे.

3 मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला काय सांगितले?मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला शांततेने घ्या असे सांगितले. “तुम्ही मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. यातून आता सगळे जागे होणार,” असे ते म्हणाले. त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि समाजाला धीर दिला.

 





Source link

'मी चालणार नाही म्हटलं होतं, पण…' , अजित पवारांना होती पार्थ पवारांच्या जमीन व्यवहाराची कल्पना? दिली जाहीर कबुली

'मी चालणार नाही म्हटलं होतं, पण…' , अजित पवारांना होती पार्थ पवारांच्या जमीन व्यवहाराची कल्पना? दिली जाहीर कबुली



अजित पवारांनी कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहारावर स्पष्टीकरण देताना या प्रकरणाची कल्पना होती अशी अप्रत्यक्ष कबुलीच दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 
 



Source link

महाराष्ट्रातील रुम मालकांसाठी आनंदाची बातमी, फक्त फ्लॅटच नव्हे त सोसायटीच्या जमिनीतही मिळणार हिस्सा!

महाराष्ट्रातील रुम मालकांसाठी आनंदाची बातमी, फक्त फ्लॅटच नव्हे त सोसायटीच्या जमिनीतही मिळणार हिस्सा!


Vertical Property Card: आता फ्लॅट घेतला की फक्त छत नव्हे, तर खालची जमीनही तुमचीच! महाराष्ट्र सरकार लवकरच ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ आणत आहे. यामुळे 50-100 मजली इमारतीत राहणाऱ्या प्रत्येकाला इमारतीखालच्या जमिनीतील त्याचा नेमका हिस्सा कायदेशीर कागदावर मिळेल. सातबारा उताऱ्यावरही तुमचे नाव चढणार आहे. काय आहे नेमका हा कायदा?

Add Zee News as a Preferred Source

आतापर्यंत काय होते?

तुम्ही 50 लाखांचा फ्लॅट घेतला तरी जमिनीचा मालकीहक्क सोसायटीच्या नावावर किंवा 100 जणांच्या संयुक्त नावावर असायचा. बँक लोन, विक्री, वारसाहक्क यात प्रचंड गोंधळ! ‘माझी जमीन किती?’ हे कोणालाच सांगता येत नव्हते.

व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय?

महाराष्ट्र सरकारने आज देशातील सर्वात मोठी संपत्ती-क्रांती जाहीर केली. आता प्रत्येक फ्लॅटमालकाला ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ मिळणार असून, त्यात फ्लॅटसह खालच्या जमिनीचा वैयक्तिक हिस्सा कायमचा नोंदवला जाणार आहे!“आजपासून फ्लॅट म्हणजे फक्त छत नव्हे, तर जमिनीचा मालक!” असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.या कार्डमध्ये इमारतीचे एकूण क्षेत्रफळ, तुमचा नेमका हिस्सा (उदा. 1/150 हिस्सा) आणि QR कोडसह डिजिटल स्वाक्षरी असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सातबारा उताऱ्यावर तुमचे नाव शेतकऱ्याप्रमाणे चढणार आहे. नवीन फ्लॅटना 1 जानेवारी 2026 पासून हे कार्ड सक्तीचे, तर जुन्या 2 कोटी फ्लॅटमालकांना केवळ 500 रुपयांत 2027 पर्यंत मिळेल. बँक लोन, रिडेव्हलपमेंट, वारसाहक्क आता 48 तासांत मिळेल.“60 वर्षांची गुंतागुंत एका कार्डाने संपली. महाराष्ट्राने देशाला नवा आदर्श दिल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

नवीन कार्ड काय देणार?  

मुख्य प्रॉपर्टी कार्डसोबतच तुम्हाला वैयक्तिक ‘व्हर्टिकल कार्ड’चे फायदे मिळतील. उदाहरणार्थ इमारतीखालील एकूण चटई क्षेत्रफळ 10 हजार चौ.फूट आहे.   त्यात तुमचा नेमका हिस्सा 99.25 चौ.फूट जमीन अधिक 800 चौ.फूट हवेतला भाग असेल.  यात QR कोडसह डिजिटल स्वाक्षरी असल्याने छेडछाड अशक्य आहे.

सातबारा उताऱ्यावर नाव

आता ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याप्रमाणे मुंबई-पुण्यातल्या फ्लॅटमालकाचाही सातबारा उताऱ्यावर हिस्सा दिसेल! ‘गट नं. 456/2, हिस्सा 1/120’ असे लिहिले जाईल. वारसनोंद, विक्री, गहाण ठेवणे सोपे होणार.

का आणली ही क्रांती?  

रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डर फसवणूक करायचे. बँका लोन देण्यास नकार द्यायच्या. न्यायालयात १५-२० वर्षे खटले चालायचे अशा विविध कारणांमुळे 2 कोटींहून जास्त फ्लॅटमालक हैराण होते 

कधी मिळणार?

उच्चस्तरीय समितीचा अहवाल डिसेंबर 2025 पर्यंत येणार. जानेवारी 2026 पासून नवीन फ्लॅटना तरतूद सक्तीची, जुन्या इमारतींना 2 वर्षांत अपडेट करता येणार. अवघ्या ₹500 शुल्कात तुमची जमीन तुमच्या नावावर!आता फ्लॅट म्हणजे खरोखरच ‘माझ्या मालकीची जमीन + त्यावरचे माझे घर’! सरकारने 60 वर्षांची गुंतागुंत एका कार्डाने संपवली आहे.  

FAQ

व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड१. प्रश्न: व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड म्हणजे नेमके काय आहे?

उत्तर: हे एक स्वतंत्र कायदेशीर कागदपत्र आहे जे तुम्हाला तुमच्या फ्लॅटसह इमारतीखालच्या जमिनीतील तुमचा नेमका हिस्सा (उदा. १/१०० किंवा ९९.५० चौ.फूट) कायमस्वरूपी देते. हे मुख्य प्रॉपर्टी कार्डला जोडलेले असते आणि QR कोडसह डिजिटल स्वाक्षरी असते.

प्रश्न: माझ्या जुन्या फ्लॅटला हे कार्ड कधी आणि कसे मिळेल?

उत्तर: जानेवारी २०२६ पासून नवीन इमारतींना हे कार्ड सक्तीचे होईल. जुन्या सोसायट्यांना २ वर्षांत (डिसेंबर २०२७ पर्यंत) फक्त ₹५०० शुल्क भरून सोसायटीमार्फत अर्ज करता येईल. सातबारा उताऱ्यावरही तुमचे नाव आपोआप चढेल.

प्रश्न: याचा मला काय फायदा होईल?

उत्तर:  बँक लोन त्वरित मिळेल.रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डर फसवू शकणार नाही. विक्री-वारसाहक्क २ दिवसांत पूर्ण होईल.न्यायालयात खटला चालण्याची वेळ १५ वर्षांऐवजी १५ दिवस! तुम्ही खरोखरच “जमिनीचे मालक” व्हाल, फक्त “फ्लॅटचे” नव्हे!





Source link

बॉयफ्रेण्डकडून 12 वर्षाच्या पोटच्या लेकीचं करुन घेतलं लैगिक शोषण, आईचं कृत्य ऐकून येईल संताप!

बॉयफ्रेण्डकडून 12 वर्षाच्या पोटच्या लेकीचं करुन घेतलं लैगिक शोषण, आईचं कृत्य ऐकून येईल संताप!


Kerala Crime: आई म्हणजे मुलीला जगाची ओळख करुन देणारी पहिली हक्काची मैत्रिण. जगात कसं वावरायला हवं? काय बरोबर? काय चूक? याबद्दल आई लेकीला वेळोवेळी समज देत असते. लेकीच्या भल्यासाठी आयुष्यभर झटत असते. पण आईच आपल्या लेकीच्या लैंगिक शोषणासाठी कारणीभूत ठरत असेल तर?  केरळच्या मंजेरी येथे आई-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीय.  

Add Zee News as a Preferred Source

केरळमधील विशेष पोस्को न्यायालयाने एका आईला लैंगिक शोषणासाठी 180 वर्षे कठोर कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश अशरफ ए.एम. यांनी हे गुन्हेगार पोस्को कायदा, भारतीय दंड संहिता आणि बाल न्याय कायद्याच्या विविध कलमांतर्गत दोषी ठरवले. प्रत्येक घटनांसाठी 40 वर्षे तुरुंगवास आणि 2 लाख रुपयांचा दंड असे एकूण 11.75 लाखांचे दंड ठोठावले. दंड न भरल्यास अतिरिक्त 20 महिने तुरुंगसेवा भोगावी लागेल. 

मुलीचे बालपण उद्ध्वस्त

तिरुवनंतपुरम येथे पती आणि मुलीसोबत सुखी जीवन जगणारी 30 वर्षीय महिला फोनद्वारे एका 33 वर्षीय पुरुषाशी मैत्री करून 2019 मध्ये घर सोडून पळून गेली. पलक्कड आणि मलप्पुरम जिल्ह्यातील भाड्याच्या घरात ती मुलीसह राहू लागली. डिसेंबर 2019 ते ऑक्टोबर 2021 या काळात बॉयफ्रेण्डने मुलीवर अनेकदा बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे आईने यात सक्रिय सहभाग घेतला. तिने मुलीला मद्य पाजण्यास भाग पाडले, अश्लील व्हिडिओ दाखवले आणि सर्व जगजाहीर करेन अशी धमकी दिली तसेच मुलीला त्यांच्या लैंगिक क्रियांचे साक्षीदार होण्यास भाग पाडले, ज्यामुळे तिच्या निष्पाप मनावर कायमची जखम बसली.

न्यायालय काय म्हणाले? 

‘जेव्हा आईचे स्नेहभावनाही वासनेच्या आगीत भस्म होतात, तेव्हा बालक कोणावर अवलंबून राहू शकते?’ असे न्यायाधीश अशरफ ए.एम. यांनी म्हटले. विशेष सरकारी वकील सोमसुंदरन ए. यांनी सांगितले की, ही महिलेला पोस्को प्रकरणात दिलेली सर्वात कठोर शिक्षा आहे. आईने केवळ पाहिले नाही तर गुन्ह्यात भागीदार होऊन मुलीला शांत ठेवण्यासाठी भयाच्या जाळ्यात अडकवल्याचे यात दिसून आले. 

गुपित उघडकीस कसे आले? 

2021 मध्ये मलप्पुरम येथील वनिता पोलिस ठाण्यात महिलेच्या पालकांशी वाद होऊन तिने तक्रार दाखल केली. पोलिसांना समुपदेशनासाठी पाठवताना शेजाऱ्यांनी मुलीला योग्य जेवणही न मिळाल्याची खबर दिली. मुलीची दुर्दैवी स्थिती पाहून आजी-आजोबांनी चाइल्ड हेल्पलाइनला कळवले. आश्रयगृहात नेल्यानंतर मुलीने संपूर्ण कथा सांगितली, ज्यामुळे तपास सुरू झाला.

FAQ 

१. केरळमधील आई आणि सहजिवयाला किती वर्षांची शिक्षा झाली?

विशेष पोक्सो न्यायालयाने दोघांना एकूण १८० वर्षे सक्तमजुरी आणि ११.७५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. प्रत्येक गुन्ह्यासाठी ४० वर्षे तुरुंगवास आणि २ लाख दंड आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त २० महिने तुरुंगवास भोगावा लागेल.

२. गुन्हा कसा उघडकीस आला?

महिलेने मलप्पुरम पोलिसांत पालकांविरुद्ध तक्रार केली. पोलिस समुपदेशनासाठी गेले असता शेजाऱ्यांनी मुलीला जेवणही न मिळाल्याची माहिती दिली. आजी-आजोबांनी चाइल्डलाइनला कळवले आणि स्नेहिता आश्रयगृहात मुलीने संपूर्ण सत्य सांगितले.

३. न्यायालयाने दंडाची रक्कम काय ठरवली?

दंडाची संपूर्ण ११.७५ लाख रुपये रक्कम पीडित मुलीला भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. न्यायाधीशांनी हे प्रकरण ‘मातृत्वाच्या सन्मानावर खोल जखम’ म्हटले आणि समाजासाठी भयावह इशारा असल्याचे नोंदवले.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp