कांद्याला बाजारभाव मिळत नसेल तर जगायचं कसं? शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

कांद्याला बाजारभाव मिळत नसेल तर जगायचं कसं? शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी


पुढील
बातमी

सांगलीत अघोरी प्रकार, घोड्यांचे गुप्तांग तारांनी शिवले, कारण ऐकून अंगावर काटा येईल





Source link

कल्याणमधील अल्पवयीन मुलीचे हत्या प्रकरण; ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखासह 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

कल्याणमधील अल्पवयीन मुलीचे हत्या प्रकरण; ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखासह 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल



कल्याणमध्ये आई समोरच 12 वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली. 25 वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून या 12 वर्षाच्या मुलीची हत्या केली. 



Source link

Maharashtra Rain : चांद्रयान चंद्रापर्यंत पोहोचलं तरी पावसाचा थांगपत्ता नाही; हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं की…

Maharashtra Rain : चांद्रयान चंद्रापर्यंत पोहोचलं तरी पावसाचा थांगपत्ता नाही; हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं की…


Maharashtra Rain : महाराष्ट्रातील पावसानं काही केल्या माघारी फिरण्याचं नाव घेतलं नाहीये त्यामुळं आता शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही चिंता सतावू लागली आहे. पावसाअभावी शेतीची कामं ताटकळली आहेत. तर, शहरी भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा असला तरीही पावसाची सद्यस्थिती पाहता पालिका प्रशासनांन पाणीकपात सध्यातरी रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं इथंही चिंतेचीच लाट. राज्यात एकंदर अशीच परिस्थिती असल्यामुळं आता पाऊस नेमका कधी परतणार असाच प्रश्न सर्वांना पडतोय. ‘आतातर हे चांद्रयान चंद्रावर पोहोचेल पण, पाऊस काही महाराष्ट्रात परतण्याच्या मनस्थितीत दिसत नाही’, अशाही मिश्किल प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. 

राज्यावर मान्सूनची कमजोर पकड 

महाराष्ट्रात सध्या पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होत असली तरीही मान्सूनची पकड मात्र कमकुवत झालेली दिसत आहे. विदर्भात मध्यम स्वरुपाता पाऊस बरसतोय, तर कोकणात मात्र तुरळक सरीच सुरु आहेत. येत्या 24 तासांमध्येही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

येत्या काही दिवसांमध्ये मुंबई, नवी मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रामध्ये ऊन- पावसाचा खेळ पाहायला मिळेल. तर, पुणे- सातारा आणि कोल्हापुरात घाटमाथ्यावर बहुतांशी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. राज्यात पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्या तरीही पावसाचं हे प्रमाण दिलासा देणारं नसेल असंच हवामान विभागानं सांगितलं आहे. 

दरम्यान, राज्यात पावसाचं प्रमाण बेताचं असल्यामुळं सध्यातरी कोणत्याही जिल्ह्यासाठी ऑरेंज किंवा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. असं असलं तरीही भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती येथे मात्र काहीसा दिलासादायक पाऊस होणार आहे. इथं साधारण 65 मिमी पाऊस होण्याची शक्यता हवामान  विभागानं वर्तवली आहे. 

भरतीच्या वेळा आणि किनारपट्टी भागासाठीचा इशारा 

मान्सूनचे वारे सध्या किनारपट्टी भागावर फारसा प्रभाव पाडणार नाहीयेत. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील किनारपट्टी भागांमध्ये दुपारी 3 वाजून 32 मिनिटांनी भरतीचा इशारा देण्यात आला असून, इथं या काळात 3 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा दिला गेला आहे. 





Source link

Onion Price : मुख्यमंत्री साहेब वेड्यात तर काढलं नाही ना? कांद्याच्या निर्णयावरून रोहित पवारांची सडकून टीका!

Onion Price : मुख्यमंत्री साहेब वेड्यात तर काढलं नाही ना? कांद्याच्या निर्णयावरून रोहित पवारांची सडकून टीका!


Rohit pawar On Onion Price: कांद्याचं निर्यात शुल्क 40 टक्के केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. नाशिक, पुणे, अहमदनगर याचबरोबर राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर केंद्र सरकार नाफेड मार्फत दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. 2410 रुपये प्रति क्विंटल भावाने ही कांदा खरेदी करण्यात येईल. धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

१७ ऑगस्ट २०२३ रोजी ‘नाफेड’मार्फत अतिरिक्त २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय झाला होता. २० ऑगस्ट २०२३ रोजी त्याच दिवशी ४० टक्के निर्यातशुल्क लादण्याचाही निर्णय झाला. दोन्ही निर्णय जाहीर झाले. त्यानंतर निर्यातशुल्क विरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली परिणामी राज्य सरकार खळबडून जागं झालं. त्यानंतर राज्याचे कृषिमंत्री दिल्लीत जाऊन वाणिज्य मंत्र्यांशी बैठक करतात, उपमुख्यमंत्री जपानमधून फोन करतात आणि केंद्र सरकार शेतकरी हितासाठी २ लाख टन कांदा खरेदी करणार असल्याचं ट्विटर वरून घोषितही करतात. त्यावर भर म्हणून राज्याचे मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारच्या २ लाख टन कांदा खरेदी करण्याच्या निर्णयाचं अफाट कौतुक करतात. जर २ लाख टन अतिरिक्त कांदा खरेदी करण्याचा निर्णय तीन-चार दिवसांपूर्वीच झाला होता तर मग, राज्याच्या कृषिमंत्र्यांनी आज दिल्लीला जाऊन नेमकी काय चर्चा केली? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

उपमुख्यमंत्री साहेबांनी जपानमधून फोनवरून केंद्रीय मंत्र्यांशी काय संवाद साधला? मुख्यमंत्री साहेबांनी केंद्र सरकारचं कशाबद्दल कौतुक केलं? श्रेय घेण्याच्या नादात किती बनवाबनवी करणार? तीन-चार दिवसांपूर्वी घेतलेला निर्णय पुन्हा जाहीर करून पियुष गोयल साहेबांनी राज्याचे कृषिमंत्री धनुभाऊ, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना वेड्यात तर काढलं नाही ना? किंवा राज्य आणि केंद्र सरकार मिळून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेड्यात तर काढत नाही ना? असा प्रश्न पडलाय, असं रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

केंद्र शासनाच्या ‘ऑपरेशन ग्रीन’ अंतर्गत अहमदनगर क्लस्टरमध्ये, राहुरी येथे हिंदुस्तान ॲग्रो को-ऑपरेटिव्ह लिमिटेड, या 25 हजार शेतकरी सभासद असणाऱ्या संस्थेच्या कांदा प्रकल्पासाठी ११७ कोटी रुपयांची मान्यता दिली आहे. हा प्रकल्प तातडीने राबविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. 

आणखी वाचा – कांद्याचा प्रश्न पेटलाच कसा! शेतकऱ्यांच्या संपापासून केंद्राच्या निर्णयापर्यंत; वाचा, नेमकं काय घडलं!

दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानही दिलं असून शासनाला शेतकरी व ग्राहक दोघांचाही विचार करावा लागतो. कांदा चाळींसाठी वाढीव निधीची तरतूद करण्यात येईल. चाळीसाठी १८ टक्के अनुदान देण्यात येते, त्यातही वाढ करण्याचा विचार आहे. कांदा निर्यातमूल्य कमी करण्याचीही मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या सर्वच प्रश्नांवर शासन संवेदनशील आहे, असंही पवार यांनी सांगितलं.





Source link

Maharashtra Rain : राज्यातील पावसाची सुट्टी वाढली, मुंबईत उन्हाच्या झळा

Maharashtra Rain : राज्यातील पावसाची सुट्टी वाढली, मुंबईत उन्हाच्या झळा



Maharashtra Rain : ये रे ये रे पावसा रुसलास का? असं म्हणत आता पावसाला चक्क विनवणी करण्याची वेळ आली आहे. कारण दडी मारून बसलेला हा पाऊस आता फक्त लपंडावाचा खेळ खेळताना दिसत आहे. 
 



Source link

कोकण रेल्‍वेच्‍या गेटमनची गोळ्या झाडून हत्‍या; रायगड जिल्ह्यातील थरारक घटना

कोकण रेल्‍वेच्‍या गेटमनची गोळ्या झाडून हत्‍या; रायगड जिल्ह्यातील थरारक घटना



कोकण रेल्वे मार्गावर एक थरारक घटना घडली आहे. कोकण रेल्‍वेच्‍या गेटमनची गोळ्या झाडून हत्‍या करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोलाडजवळील तिसे येथील रेल्‍वे फाटकाजवळ हा हत्येचा थरार रंगला. यामुळे रेल्वे फाटक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  



Source link

YouTube
Instagram
WhatsApp