by Hansraj Agrawal | Jan 24, 2023 | Trending News
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : देशाने स्वातंत्र्याची पंच्यात्तरी ओलांडली तरी जाती पातीमुळे होणारे अत्याचार 21 व्या शतकातही सुरु असल्याचे पाहायला मिळत आहेत. पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातही (Maharashtra News) हा प्रकार सर्रास सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. श्री गौड ब्राह्मण समाजाच्या (Sri Goud Brahmin Caste Panchayat) जातपंचायतीने सामाजिक बहिष्काराची भीती दाखवल्याने 400 मुलांची लग्नच होत नसल्याची (400 marriages stopped ) धक्कादायक बाब समोर आहे. जात पंचायतीच्या धाकामुळे तरुणांची लग्ने रखडल्याने त्यांच्या पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे आता जातपंचायतीच्या या मनमानी कारभाराविरोधात पुण्याच्या (Pune News) बिबेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत तक्रार दाखल
आंतरजातीय विवाह, पुनर्विवाह यांना कायदेशीर मान्यता असताना देखील जात पंचायतीच्या मनमानीमुळे श्री गौड ब्राह्मण समाजातील तब्बल ४०० विवाह रखडले आहेत. समाजातून कुटुंबांना बहिष्कृत करणे, दंड ठोठावणे असे बेकायदेशीर प्रकार जात पंचायतीकडून सर्रास चालू असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आता थेट पोलिसांत धाव घेतली असून या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळीत टाकल्यामुळे कुटुंबातील इतर मुलांची लग्न रखडली
श्री गौड ब्राम्हण समाजात मुलींचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने मुलांना लग्नासाठी मुलीचं मिळत नाहीत. त्यामुळे अनेक मुलांनी पोटजातीत किंवा आंतरजातीय लग्न करत आपला जोडीदार निवडला आहे. त्यानंतर या समाजाच्या जातपंचायतीने त्यांच्या पूर्ण कुटुंबालाच वाळीत टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. समाजातून वाळीत टाकल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील इतर मुलांची लग्न होत नाहीयेत. तसंच कुठल्याही नातेवाईकांच्या मंगल कार्यात अथवा दुःखद प्रसंगी त्यांना सहभागी होऊ दिले जात नाही. त्यामुळे केवळ जात पंचायतीच्या मनमानी कारभारामुळे या कुटुंबांना हा त्रास सहन करावा लागत आहेत. यातून बाहेर पडता यावं यासाठी बहिष्कार टाकलेल्या कुटुंबांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे मदतीचा हात मागितला होता. यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुणे पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जातीत पुन्हा घेण्यासाठी लाखोंचा दंड
दरम्यान, याप्रकरणी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली होती. यावेळी बोलताना मुक्ता दाभोळकर यांनी याबाबत माहिती दिली होती. “महाराष्ट्रात काही हजार श्रीगौड ब्राह्मण कुटुंबे आहेत. त्यांपैकी विवाहासाठी इच्छुक असणाऱ्यांनी जातीबाहेर विवाह केले होते. त्यानंतर जातपंचायतीकडून त्यांच्यावर बहिष्कार टाकला गेला. त्यांना पुन्हा जातीत सामावून घेण्यासाठी लाखो रुपये दंड आकारला जातो. अशा अनेक तक्रारी महाराष्ट्र अंनिसकडे आल्या आहेत. या मनमानीमुळे अनेक कुटुंबांचे शोषण झाले आहे,” असे मुक्ता दाभोळकर यांनी म्हटले होते.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 23, 2023 | Trending News
Online Frauds: विष्णू बुरगे, झी 24 तास: ऑनलाईन (Online Shoping) वस्तू खरेदीच्या नावावर अनेकांची फसवणूक (Frauds) होत असते. अशातच बीडमधील (Beed News) धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन बैल खरेदी करण्याच्या बहाण्याने चक्क एका शेतकऱ्याला सायबर भामट्यांनी 95 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. त्यानंतर बीडमध्ये एकच चर्चा होताना दिसत आहे. (beed online frauds 95000 was grabbed from a farmer by posting an advertisement on facebook to sell a pair of bullocks marathi news)
झालं असं की, कारी गावचे ज्ञानेश्वर फरताडे असं या शेतकऱ्याचे नाव असून फेसबुकवर त्यांनी ऑनलाईन बैलांची जोडी (Pair of bulls online Shoping) बुक केली. त्यानंतर समोरच्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्याकडून वेगवेगळ्या कामासाठी 95 हजार रुपये आपल्या खात्यावर टाकायला सांगितले. शेतकऱ्याने विश्वास ठेऊन पैसे पाठवले. मात्र…
शेवटी बैल जोडी न मिळाल्याने आपली फसवणूक (Online Frauds) झाल्याचा त्यांच्या लक्षात आल्यानंतर बीडच्या सायबर पोलिसात अज्ञात चौघाजणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी ऑनलाईन व्यवहार करताना फसला आणि मोठी किंमत त्याला चुकवावी लागली.
बैल जोडी घेण्यासाठी अनेकजण बाजाराची वाट धरतात मात्र लंबी (Lampi) आजारामुळे बीड जिल्ह्यासह जवळपासच्या सर्वच शहरातील बाजार बंद असल्यामुळे या शेतकऱ्यांना ऑनलाइनच बैलजोडी घ्यायचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आलेली आहे.
आणखी वाचा- Crime News: केवायसी करा, फॉर्म भरा, ओटीपी द्या… तुम्हालाही येतोय असा कॉल? धक्कादायक घटना समोर!
शेतकरी बैल जोडी घेताना त्याला दात आहेत का त्याचा रंग रूपाशिवाय बैलाची शरीरवृष्टी हे सर्व पाहून बैलाची खरेदी करतात मात्र या शेतकऱ्यांना फोटो मधीलच बैलांची शरीर वृष्टी पाहिली आणि बैल घेण्याचा निर्णय घेतला मात्र या शेतकऱ्याचा त्याने घेतलेला हा निर्णय त्याच्या चांगलाच अंगलट आला.
ऑनलाईन व्यवहार करताय तर सावधान…
अनेकजण ऑनलाईन व्यवहार करण्याच्या नादात आणि फेसबुक व्हाट्सअप आणि इतर सोशल माध्यमांवर येणाऱ्या जाहिरातीला बोलून अनेक जण व्यवहार करतात आणि व्यवहार करताना कुठलीही शहानिशा करत नाहीत त्यानंतर अनेकांची फसवणूक होते.
दरम्यान, फसवणुकीनंतर पोलिसांमध्ये (Cyber Crime) धाव घेतात मात्र अनेक हे सायबर ठग पहिल्यांदा वेगवेगळी आमिष दाखवतात आणि आम्हीच दाखवून पैशाची मागणी करून लूट करतात त्यामुळे सर्वाधिक सावधान होण्याची गरज आहे आणि जरी एखादी वस्तू आवडलीस तर पहिल्यांदा ती मागवावी आणि नंतरच आर्थिक व्यवहार करावा असं देखील तज्ञ व्यक्तींकडून सांगण्यात येतं. अशा भूलथापांना आणि सोशल मीडियातील खरेदी व्यवहार करताना शहानिशा करूनच व्यवहार करावेत असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 23, 2023 | Trending News
Maharashtra News : राज्यभरातील बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारकडून अनेक पदावर नोकरी भरती सुरु आहे. या सुवर्ण संधीचं सोनं करण्यासाठी असंख्य अर्जदारांनी रीघ लावली आहे.
Updated: Jan 23, 2023, 08:20 AM IST
Jobs news Maharashtra Police Bharti 2023 Police Constable Recruitment mumbai India Celebrating 74 Republic Day 2023
Source link
by Hansraj Agrawal | Jan 22, 2023 | Trending News
आजपर्यंत तुम्ही गोशाळा, सर्पशाळा पाहिली असेल, पण भटक्या कुत्र्याची श्वान शाळा नक्कीच पहिली नसेल. आज तुम्हाला महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिल्या श्वान शाळा कुठं उभारली याची माहिती देणार आहोत.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 21, 2023 | Trending News
शिवसेना कुण्याची यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरु आहे.या वादावर निकाल लागला नसताना आता डोंबिवलीत नव्या शिवसेनेचा जन्म झाला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 21, 2023 | Trending News
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : टीम इंडियाचा (Team India) वेगवान गोलंदाज उमेश यादवची (Umesh Yadav) लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक (Fraud) झाल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे त्याच्या मॅनजेरनेच त्याची फसवणूक केली. याप्रकरणी नागपूरमधल्या कोराडी पोलीस ठाण्यात (Nagpur Koradi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश ठाकरे असं या व्यक्तीचं नाव असून तो एकेकाळी उमेश यादवचा मॅनेजर म्हणून काम पाहायचा.
शैलेश ठाकरेने केली आर्थिक फसवणूक
उमेश यादव हा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आहे, क्रिकेटनिमित्ताने त्याला देशात आणि देशाबाहेर खेळण्यासाठी जावं लागतं. त्यामुळे उमेश यादवने त्याचा मित्र असलेल्या शैलेश ठाकरे याला पत्रव्यवहार, इन्कम टॅक्स, बँकेचे तसंच इतर व्यवहाराकरिता पगारी मॅनेजर म्हणून कामाला ठेवलं होतं. पण शैलेश ठाकरे याने त्याचा गैरफायदा घेतला.
उमेश यादवने स्टेट बँक शाखेतील आपल्या खात्यात 44 लाख रुपये ठेवले होते. पण शैलेशने ते पैसे परस्पर काढून घेतले, आणि स्वत:च्यान नावावर प्रॉपर्टी खरेदी केली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर उमेश यादवने कोराडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार शैलेश ठाकरेविरोधात कलम 406 ,420 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उसेन बोल्टची करोडोंची फसवणूक
काही दिवसांपूर्वीच जगातील वेगवान धावपटू उसेन बोल्टची (World’s Fastest Man Usain Bolt) करोडो रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं होतं. बोल्टची आयुष्यभराची कमाई काही क्षणात चोरीला गेले. बोल्टच्या खात्यातून तब्बल 98 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. बोल्टने जमैकामधील एका खासगी गुंतवणूक कंपनीच्या खात्यात हे पैसे ठेवले होते. बोल्टचं हे खातं किंग्स्टन, जमैका स्टॉक्स अॅण्ड सिक्युरिटीज लिमिटेड (Stocks and Securities Limited (SSL)) या खासगी कंपनीत होतं. बोल्टने 2012 साली या कंपनीमध्ये खातं सुरु केलं होतं.
बोल्टकडे आता केवळ 2 हजार डॉलर्स म्हणजे 1 लाख 62 रुपये शिल्लक राहिले आहेत. आपले पैसे 10 दिवसात मिळवून द्या अशी मागणी बोल्टने त्या कंपनीकडे केली आहे. वेळेत पैसे दिले नाहीत तर कंपनीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करु असा इशारा बोल्टने दिला आहे. उसेने बोल्टने ऑलिम्पिकमध्ये तब्बल 8 गोल्ड मेडल जिंकली आहेत. चीनमध्ये त्याने 100 आणि 200 मीटर शर्यतीत पदकं जिंकली होती. लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने 100, 200 आणि 4X100 मीटर शर्यतीतही सुवर्ण पदक पटकावलं होतं.
Source link