महाविद्यालयातील विद्यार्थी करत होते वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी

महाविद्यालयातील विद्यार्थी करत होते वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी


 नाशिक : मुलांचे सध्याचे असलेले महागडे शोक मध्यमवर्गीय आई वडील  पूर्ण करू शकत नाही. मात्र मुल हे शोक पूर्ण करण्यासाठी गुन्हेगारी कडे वळू लगले आहेत. सायबर गुन्हेगारीत झटपट पैसे मिळत असल्याने तरुण मुल ऑनलाईन (Online) गुन्ह्याकडे मोठ्या प्रमाणात वळले आहे. आता तरुणांनी वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी (smuggling) करण्याचे सुद्धा सुरु केले असुन नाशिक मध्ये तीन महविद्यालयीन (College students) विद्यार्थीना वन विभागाने अटक केली आहे.  

महाविद्यालयातील विद्यार्थी करत होते तस्करी

नाशिकच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडे बिबट्याची कातडी, चिंकाराचे आणि निलगायीचे शिंगे असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी वन विभागाला मिळाली होती. वनविभागाला मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे वन परिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे आणि कर्मचाऱ्यांनी बनावट ग्राहक तयार करून संशयितांशी संपर्क साधला. सुरवातीला वन्यप्राण्यांच्या अवयवांची किमत २० लाख रुपये सांगण्यात आले होते. मात्र तडजोड करत ४ लाख रुपये देण्याचे ठरले.

मंगळवारी (२० सप्टेंबर) शहरातील उच्चभ्रू समाजल्या जाणाऱ्या कृषी नगर जॉगिंग ट्रॅक जवळ तीन संशयित आरोपींना  अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. अखेर संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास तीन तरुणांना वन्यजीवांच्या अवयवांसह रंगेहात अटक केली आहे. संशयित आरोपींची चौकशी केली असता ते नाशिकमध्ये महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याच उघड झाल आहे. तीन साथीदार असल्याचा संशय वन विभागाने व्यक्त केला आहे.

कोण आहेत हे तीन तरुण

वन विभागाने अटक केलेले तीनहि संशयित नाशिक शहरातील आहेत. यातील दोन तरुण महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. एक तरुण बी. फार्मसी, तर दुसरा बी. एस. सी. करत आहे. तर तिसऱ्या तरुणाचा नाशिक शहरात खाजगी व्यवसाय आहे.

जिल्ह्यातील तिसरी घटना

नाशिक जिल्ह्यातील १५ दिवसांतील ही तिसरी कारवाई आहे. यापूर्वी इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात सुद्धा कारवाई करण्यात आली होती. यातही बिबट्याच्या कातडी मिळून आली होती. ग्रामीण भागातील वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणारी टोळी आता शहरातही सक्रीय होत असल्याच या घटनेमुळे समोर आल आहे.

नाशिक जिल्हायात बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच राजापूर भागात हरीण काळवीट अभयारण्यात संख्या अधिकच झाली आहे. परिणामी गेल्या सहा महिन्यात वन्य जीवांची आणि त्यांच्या अवयव विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे अनेक घटनांत समोर आले आहे. अंधश्रद्धेच्या बाजारात अशा वस्तुंना मागणी वाढल्याने नाशिक मधील काही प्रतिष्टीत यामागे असल्याचे बोलले जात आहे.





Source link

मोठी बातमी!! शिंदे-फडणवीस सरकारला हायकोर्टाची नोटीस

मोठी बातमी!! शिंदे-फडणवीस सरकारला हायकोर्टाची नोटीस


विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : सत्तातरानंतर राज्यात सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे (eknath shinde) – देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) सरकारने आधीच्या महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi) मंजूर केलेले निधी स्थगित करत मोठा झटका दिला होता. या निर्णयानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येत होती. दरम्यान, या निर्णयांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या (bombay high court) औरंगाबाद खंडपीठात (aurangabad bench) याचिकेद्वारे (petition) आव्हान देण्यात आले होते. यावर सुनावणी करताना कोर्टाने (court) राज्याच्या मुख्य सचिवांसह विविध विभागांच्या सचिवांना नोटीस (Notice) बजावण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकेवरील पुढील सुनावणी 18 ऑक्टोंबर 2022 रोजी ठेवण्यात आली आहे. (aurangabad high court notice to eknath shinde devendra fadnavis government)

हिंगोलीचे (Hingoli) राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे (NCP MLA Raju Navghare) आणि इतर याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल करत महाविकास आघाडी सरकारच्या ((Maha Vikas Aghadi) काळात मंजूर करण्यात आलेल्या निधीनुसार कामे व्हावीत अशी विनंती हायकोर्टाला (High Court) केली होती. यावर सुनावणी घेताना खंडपीठाने राज्याच्या मुख्य सचिवांसह नियोजन, ग्रामविकास आदिवासी, नगर विकास, मृद व जलसंधारण विभागाच्या सचिवांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा (irrigation) अनुशेष मोठा असल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने त्यासाठी विविध विभागांना विकासाच्या योजनांना मंजुरी दिली होती. वसमत नगर परिषदेला पाच कोटी मंजूर करून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम सुरु करण्याचे आदेश दिले होते.

28 जून 2022 रोजी नगर परिषदेच्या खात्यात चार कोटी जमा करण्यात आले होते. ग्रामविकास विभागाला 9 कोटी मंजुर केले होते आणि 3 मार्च 2022 च्या पत्रानुसार 2 कोटी 78 लाख रूपये जमा झाले होते. मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने 19 कोल्हापुरी बंधारे बांधण्यासाठी 25 कोटी 53 लाखांचा निधी देण्यात आला होता. 

नवीन सरकार आल्यानंतर मुख्य सचिवांनी 21 जुलै 2022 रोजी स्थगितीसाठीचा प्रस्ताव पाठवला होता आणि 23 जुलै 2022 रोजी सर्व कामे स्थगित केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या पत्रानुसार 23 जुलै 2022 रोजी जी कामे सुरू नाहीत अशी स्थगित करण्यात यावीत असे म्हटले होते.

राज्य सरकार बदलल्यामुळे धोरणात्मक निर्णय बदलण्यात येऊ नये असे राज्य घटनेच्या 202 व्या कलमात नमूद असल्याने या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनात संबंधित कामांना मंजुरी दिली जाते. त्यानंतर राज्यपालांच्या आदेशानुसार कामांना मंजुरी दिली जाते. त्यामुळे अशा धोरणात्मक कामात बदल करु नयेत असे संकेत आहेत. परंतु नवीन सरकारने सरळ-सरळ सर्व कामांना स्थगिती दिल्याचे कारण देत याचिका करण्यात आली आहे.





Source link

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज ठाकरे संतापले, चौकशीची पुन्हा केली मागणी

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज ठाकरे संतापले, चौकशीची पुन्हा केली मागणी



वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प नेमका फिस्कटला कुठे असा सवाल उपस्थित करत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. 



Source link

Rain Update : पावसाने झोडपले; कोंडीने छळले! ‘असा’ असेल पावसाचा अंदाज

Rain Update : पावसाने झोडपले; कोंडीने छळले! ‘असा’ असेल पावसाचा अंदाज


Rain Update : मागच्या काही दिवसांपासून थैमान घातलेल्या पावसाने (Monsoon Update) दोन दिवस पश्चिम महाराष्ट्रात उघडीप दिली. मुंबई आणि उपनगर परिसरात रात्रभर पावसाची संततधरा सुरु आहे. सध्या मुंबईत (mumbai rain) रिमझिम पाऊस सुरू असून मुंबईतील लोकल वाहतूक आणि रस्ते (road transport) वाहतूक सुरळीत आहे.

दरम्यान उद्यापासून राज्यात (state monsoon) पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आली आहे.  

मुंबईसह उपनगरात पावसाने मागच्या 24 तासांत जोरदार हजेरी लावली. (mumbai pune rain weather update) याचबरोर पुण्यात पावसाचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून खडकवासलासह अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबईसह उपनगरातही पावसाची रिपरिप सुरूच आहे. याशिवाय कोकण आणि मध्य महाराष्ट्रात (maharashtra rain update) पावसाने हजेरी लावली. तसेच सातारा जिल्ह्यातील कोयनेतूनही पाण्याच विसर्ग वाढवण्यात आला आहे.

वाचा : विकेंडला बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी! 

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, परभणी, वर्धा, नांदेड, अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आजही राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp