लग्नासाठी मुलगी दिली नाही म्हणून भाच्याने मामाचा घेतला जीव
भाच्याने आपल्या मामाकडे लग्नासाठी त्याच्या मुलीला मागणी घातली. मात्र, मामाने भाच्याला नकार दिला. झोपेतच मामाला भाच्याने संपवले.
Source link
भाच्याने आपल्या मामाकडे लग्नासाठी त्याच्या मुलीला मागणी घातली. मात्र, मामाने भाच्याला नकार दिला. झोपेतच मामाला भाच्याने संपवले.
Source link
मृत मुलीला न्याय मिळवण्यासाठी बापाचा संघर्ष, नंदूरबारमधली धक्कादायक घटना
Source link
Rain Updates : गणेशोत्सवादरम्यान (Ganeshotsv 2022) काही अंशी उसंत घेतल्यानंतर आता पावसानं पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलं आहे. (Maharashtra Rain) महाराष्ट्रातील बहुतांश भागात सध्या मुसळधार पाऊस बरसू लागला आहे. इतकंच नव्हे, तर तुम्ही त्याच्या परतीची वाट पाहत, असाल तर किमान सध्यातरी तशी काही अपेक्षा ठेवू नका. कारण, पुढचे 2 दिवस पुण्यासह (Pune Rain) राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. शिवाय सध्या बरसणारा पाऊस परतीचा नाही अशी अत्यंत महत्त्वाची माहितीही पुणे हवामान विभागाने दिली आहे. (IMD predicts heavy rain monsoon in Mumbai maharashtra Konkan region )
सध्यातरी पावसानं परतीची वाट धरली असं तुम्हाला वाटत असल्यास तो मोठा गैरसमज असेल. कारण, अद्यापही पाऊस काही आपली पाठ सोडत नाही हेच स्पष्ट होत आहे.
आजचा दिवस पावसाचा…
मंगळवारी पहाटेपासूनच (Mumbai rain) मुंबईत जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. काही तास झालेल्या सततच्या पावसामुळं शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील (Bandra, Santacruz, Malad) वांद्रे, सांताक्रुझ, मालाड, कांदिवलीतही पावसानं जोर पकडल्याचं दिसत आहे.
साईनगरीला पावसानं झोडपलं
(shirdi) शिर्डी आणि परिसराला पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय. राहता, कोपरगाव, शिर्डी, बाभलेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे, मागील तीन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे नगर-मनमाड महामार्गाला ओढ्याचं स्वरूप आलंय. शिर्डीजवळच्या सावळीविहीर गावातील नागरिकांच्या घरातही पाणी घुसलंय.
कोकणाची काय अवस्था? (Konkan Rain)
(Sindhudurg) सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्याला मुसळधार पावसानं झोडपलं. सलग दुसऱ्या दिवशी निर्मला नदीला पूर आला. त्यामुळे 27 गावांना जोडणारा आंबेरी पूल पाण्याखाली गेल्याची माहिती समोर आली आहे. माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा यामुळे संपर्क तुटला. आंबेरी पुलावर वाहतूक ठप्प झाली. या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
संभाजीनगर : दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनावेळी व्यासपीठावर बोलू न दिल्याचं नाराजी नाट्य राज्यभर चर्चेचा विषय ठरला. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याचा उल्लेख करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. पैठणमधील आयोजित सभेमध्ये बोलताना शिंदे यांनी, कसं काय पाटील बरं आहे या गाण्याच्या ओळी म्हणत पाटलांवर शेलक्या शब्दात टीका केली.
जुन्या चित्रपटामध्ये एक गाणं होतं जे फेमस झालं होतं. कसं काय पाटील बरं आहे काल दिल्लीत झालं ते खरं आहे का?, जयंत पाटील यांनी दादांना बोलून दिलं नाही. त्यामुळे दादा निघून गेले रागारागाने, कारण जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेता व्हायचं होतं मात्र त्यांना होता आलं नाही, दादांची दादागिरी काम करूव गेली. याचं शल्य पाटलांच्या मनात होतं म्हणून महाराष्ट्रात त्यांना थांबवता येत नाही म्हणून दिल्लीत त्यांना थांबवल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.
सरन्यायाधीश उदय लळीत यांचा सत्कार समारंभ एकनाथ शिंदे उपस्थित राहिले होते. यावरून पाटील यांनी टीकास्त्र डागलं होतं. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे सुपुत्र देशाचे सरन्यायाधीशांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. कोर्टाचा कार्यक्रम होता आम्हाला निमंत्रण दिलं होतं. आम्ही कार्यक्रमाला गेलो तर त्यावरूनही आमच्यावर टीका, किती संकोचित वृत्ती आहे, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेबांची खरी शिवसेना कुठही याचं उत्तर आजच्या या सभेने दिली आहे. पैसे देऊन जमवलेली ही गर्दी नाही. प्रेमाने आलेली ही गर्दी आहे. ही सच्चा शिवसैनिकांची गर्दी आहे. आम्ही घेतलेल्या निर्णयाला पसंती देणारी ही गर्दी आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांनी एकच शिकवण दिली आहे. जे होणार असेल तेच बोला. मी दिलेला शब्द पाळतो आणि एकदा शब्द दिला की मी स्वत:चं ही ऐकत नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
पुण्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, रस्त्यांच्या कडेला पार्किंग केलेली अनेक वाहनं वाहून गेली
Source link
डॉक्टरांवर हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ, मनमाडनंतर आता बारामतीत डॉक्टरांना मारहाण
Source link