by Hansraj Agrawal | Sep 7, 2022 | Trending News
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : सहसा लोकांना जेव्हा अचानक पैशांची चणचण भासते तेव्हा ते कर्ज घेण्याचा पर्याय निवडतात. बरेचदा असे देखील होते की कर्जाचे काही हप्ते (EMI) भरल्यानंतर लोक अडचणीत येतात आणि हप्ते थकू लागतात. यानंतर बँकांचे कर्ज वसुली करणारे एजंट कर्जदाराला त्रास देऊ लागतात. कर्ज वसूल करण्यासाठी एजंट कधीही आणि कुठेही अपमानास्पद वागणूक करतात आणि कॉल करुन गैरवर्तन करतात. मात्र या सर्व कृती बेकायदेशीर आहेत, परंतु आजकाल ते अगदी सामान्य झाले आहे.
असाच काहीसा प्रकार पुण्यात (Pune) समोर आला आहे. मात्र यावेळी चक्क पोलिसांवरच (Policeman) हात उचलण्यापर्यंत या रिकव्हरी एजंटची (recovery agent) मजल गेली आहे. क्रेडिट कार्डचे बिल (credit card bill) थकवल्याने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आलीय. एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांची गुंडागर्दी सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
आरबीएल बँकेचे क्रेडिट कार्डचे बिल थकवल्यामुळे बिल वसुलीसाठी आलेल्या चार कर्मचाऱ्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ससाने नगरमध्ये मंगळवारी सायंकाळच्या वेळी हा प्रकार घडला. तर या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरातील एका महिलेसोबत धक्काबुक्की करत तिचा विनयभंग देखील करण्यात आला.
अर्जुन लक्ष्मण राऊत, निखिल ज्ञानेश्वर ताम्हाणे, परम नामदेव पाटील आणि ऋषिकेश हनुमंत पांदीवाले अशी आरोपींची नावे आहेत. हडपसर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी घुसून रिकव्हरी एजंट व त्याच्यासोबत आलेल्या कर्मचाऱ्यांनी मारहाण करत इमारतीमध्ये गोंधळ घातला. यानंतर याप्रकरणी पोलीस ठाण्यात घरात बेकायदा घुसून कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्यांवरच अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर सर्वसामान्यांच्या बाबतीत काय होत असेल असेल तसेच रिकव्हरी एजंटच्या नावाखाली गुंडगिरी करणाऱ्यांना कायद्याचा धाक नाही का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत
Source link
by Hansraj Agrawal | Sep 6, 2022 | Trending News
मुंबई : टाटा सन्सचे (tata sons) माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे रविवारी रस्ते अपघातात निधन झाले आहे. पारशी धर्मगुरूला भेटण्यासाठी ते गुजरातमधील उडवाडा येथे गेले होते. यावेळी अहमदाबादहून मुंबईला परतत असताना त्यांची कार पालघरजवळ ( Cyrus Mistry car crash) डिव्हायडरला धडकली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर राजकीय, सामजिक आणि उद्योग विश्वातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी सायरस मिस्त्री यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहली आहे.
पोस्टमध्ये काय?
सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुळे यांनी सायरस मिस्त्री सोबतचे हृदयस्पर्शी फोटो शेअर केले आहेत. मिस्त्रीसोबतच्या (Cyrus Mistry)जवळपास 30 वर्ष जुन्या मैत्रीची आठवण सांगत त्यांनी ही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे (Supriya sule) म्हणाल्या आहेत की, अजूनही विश्वास बसत नाही. आम्ही सर्व तुमची नेहमीच आठवण ठेवू. रेस्ट इन पीस साइरस.
सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी याआधी देखील एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, आमच्यातून तू निघून गेला असलास तरी आमच्या हदयातून जाणार नाही आहेस. रेस्ट इन पीस साइरस,असेही त्यांनी म्हटले होते.
सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी सायरस (Cyrus Mistry)आणि त्यांच्या सवयी सारख्याच असल्याचं म्हटलं होतं. असं वाटायचं की ते महाराष्ट्रीयन आहेत. कारण, त्याला ठेचा आवडतो, जो महाराष्ट्रातील शाकाहारी पदार्थ आहे आणि हिरवी किंवा लाल मिरची, मीठ, लसूण, तूप/तेल आणि लवंगा एकत्र करून बनवलेला आहे,असे त्या म्हणतात.
दरम्यान आज दुपारी मुंबईच्या वरळी स्मशानभूमीत सायरस मिस्त्री (Cyrus Mistry)यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणाचे सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले होते. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 6, 2022 | Trending News
Aurangabad : शहरात गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सामान्य नागरीक त्रस्त झाले आहेत. व्यवसायिक, व्यापारी, उद्योजक आणि रस्त्यांवरून दैनंदिन प्रवास करणारे हजारो नागरिक सातत्याने पालिकेकडे अर्ज करत आहेत. त्यातच आता ऑरिक सिटीमुळे (Auric City) जागतिक चर्चेत असलेले औरंगाबाद (Aurangabad ) शहरात देखील खड्ड्यांचे सामाज्र पाहायला मिळत आहे.
धक्कादायक म्हणजे औरंगाबादच्या बिडकीन (Bidkin) येथे जागा पाहण्यासाठी आलेले चिनी (china) उद्योगांचे पथक हे पैठण रस्त्यांवरील खड्डे पाहून अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरल्यामुळे औरंगाबादची मोठी नाचक्की झाली आहे.
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC) अंतर्गत स्थापन केलेल्या या ऑरिकमध्ये (Aurangabad Industrial City ) औद्योगिक भूखंड वाटपातून तब्बल 81 कोटी 28 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. दिल्ली- मुंबई कॉरिडॉर अंतर्गत ऑरिक सिटी (Auric City) उभारण्यासाठी एकूण 10 हजार एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात शेंद्रा आणि बिडकीनमध्ये उद्योग विकासाचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे आगामी काळात सर्वच उद्योगांना बिडकीनमध्ये जागा देण्याचे नियोजन आहे.
याचपार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी चीनमधील एक कंपनीचे पथक गुंतवणुकीसाठी औरंगाबादमध्ये आले होते. हे पथक बिडकीन येथे जागा पाहण्यासाठी पैठण रस्त्यावरून बिडकीन येथे जाणार होते. मात्र औरंगाबाद शहरातून पैठण रस्त्यावरून बिडकीन (Bidkin) येथे जाण्यासाठी पथक निघाले असताना रस्त्यात वाहतुकीची कोंडी, रस्त्याची अवस्था पाहून जमीन न पाहताच बिडकीन येण्यापूर्वीच त्यांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला.
वाचा: तुम्ही Corona Positive की Negative? मोबाईलच सांगणार, कसं ते अधिक जाणून घ्या
पाच मंत्री असलेल्या जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था
औरंगाबाद-पैठण (Aurangabad-Paithan) रस्त्याच्या चौपदरीकरणाचा (quadrupling) मुद्दा अनेक वर्षांपासून गाजत आहे. या कामाचे अनेकदा उद्घाटने झाली पण प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली नाही. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यात दोन केंद्रीय आणि राज्यातील सरकारमधील तीन कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र असे असतांना शहरातील आणि ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न काही मार्गी लागतांना दिसत नाही. औरंगाबाद-पैठण रस्ता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या मतदारसंघातील असूनही, रस्त्यांवरील खड्डे आणि चौपदरीकरणाचा मुद्दा कायम आहे. मात्र यापूर्वी सुद्धा अनेकदा असे उद्घाटन सोहळे पार पडल्यानंतरही रस्ता बनला नसल्याने, आतातरी हा रस्ता होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 5, 2022 | Trending News
आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : लहान भावाने मोठ्या भावाचा व वहिनीचा खून केल्याची धक्कादायक घटना (Younger brother killed elder brother and sister in law) चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्यातील सावली तालुक्यातील गायडोंगरी येथे घडली आहे. या हत्येचे कारणही समोर आलं आहे.
मोठ्या भावासोबत जमिनीसाठी झालेल्या वादातून लहान भावाने टोकाचं पाऊल उचललं. लहान भावाने मोठ्या भावासह वहिनीचा खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सावली तालुक्यातील मनोहर गुरुनुले (6)2 आणि शारदा मनोहर गुरुनुले (50) यांचा लहान भाऊ धनराज गुरुनुले (52 ) यांच्या सोबत जमिनीवरुन सातत्याने वाद व्हायचा.
त्यानंतर सोमवारी हा वाद टोकाला गेला आणि दोन्ही भावांमध्ये जोरदार भांडण झालं. या भांडणात धनराज गुरुनुले याने मोठा भाऊ मनोहर व वहिनी शारदा यांच्यावर जमीन खोदण्याच्या सब्बलने हल्ला केला.
त्यात मनोहर गुरुनुले हे जागीच ठार झाले तर शारदा गुरुनुले यांना जखमी अवस्थेत सुरुवातीला सावली व नंतर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार मंगेश मोहड हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले व त्यांनी आरोपी धनराज गुरुनुले याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पाथरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 5, 2022 | Trending News
viral video of doctor who rescue patient: डॉक्टरांना देवाचं दुसरं रूप म्हंटल जात .आणि याचाच प्रत्यय देणारा एक video सध्या सोशल मीडियावर(social media) व्हायरल होत आहे .
कोल्हापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ अर्जुन अडनाईक यांच्या रुग्णालयात हा सर्व प्रकार घडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आणि पाहता पाहता या व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळवली.
आतापर्यंत बऱ्याच जणांकडून हा व्हिडीओ पहिला जात आहे. एक व्यक्ती आणि त्यांचे नातेवाईक डॉक्टरांना भेटण्यासाठी क्लीनिक मध्ये गेले होते ,
डॉक्टरांसोबत चर्चा चालू होती आणि अचानक समोर खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला बोलता बोलताच हार्ट अटॅक आला. आणि तो बेशुद्ध होऊ लागला .
पण यावेळी डॉक्टरांनी तत्परता दाखवत अतिशय प्रसंगावधानाने त्या व्यक्तीच्या छातीवर हाताने हलके मारायला सुरवात केली आणि या व्यक्तीचा जीव वाचला..
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर डॉक्टरांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे सर्व स्तरातून सध्या या डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे ..
कोल्हापूरमधील एका घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही यामध्ये दिसणाऱ्या डॉक्टरचं कौतुक कराल.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 4, 2022 | Trending News
लाखोंच्या खंडणीसाठी प्राध्यापकाचं अपहरण, पोलिसांनी तातडीने चक्र फिरवताच वाचा काय झालं
Source link