‘त्या’ 50 जणांना फडणवीसांकडे नाक मुठीत घेऊन जावं लागेल
सामनाच्या अग्रलेखामध्ये मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून शिंदे गटावर निशाणा साधला आहे
Updated: Aug 16, 2022, 12:09 PM IST
सामनाच्या अग्रलेखामध्ये मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून शिंदे गटावर निशाणा साधला आहे
Updated: Aug 16, 2022, 12:09 PM IST

गजानन देशमुख, झी मीडिया हिंगोली : शिंदे गटामध्ये सर्वात शेवटी सामील झालेले वादग्रस्त आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कामगार विभागाच्या मध्यान्ह भोजन योजनेतील निकृष्ठ दर्जाच्या जेवणाचा बांगर यांनी भांडाफोड केला आहे. अन्नाची पाहणी करताना त्यांनी उपहारगृहाच्या मॅनेजरच्या कानशिलात लगावली आहे. (MLA Santosh Bangar Viral Video)
कामगार कल्याण मंडळाकडून असंघटीत कामगारांसाठी महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली आहे. कामगारांना मध्यान्ह भोजन पुरवण्याची जबाबदारी खासगी कंत्राटदारांना देण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा एमआयडीसी उपहारगृहाला संतोष बांगर यांनी भेट दिली त्यावेळी जेवणामध्ये आळ्या, करपलेल्या चपात्या आणि माशा आढळल्या.
कामगारांना निकृष्ठ दर्जाचे अन्न दिलं जात असून यामध्ये आर्थिक स्वार्थ पाहिला जात असल्याचा आरोप संतोष बांगर यांनी केला आहे. या कंत्राटदारांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. त्यासोबतच निकृष्ठ दर्जाचं जेवण देणाऱ्या कंत्राटदाराला हे काम मिळालं कसं?, याच्या चौकशीची मागणीही बांगर यांनी केली आहे.
मेन्यूमध्ये कांदा, लोणचं, गूळही दाखवण्यात आला आहे. मात्र, कामगारांना फक्त करपलेल्या चपात्या, डाळ आणि भात दिली जात असल्याचं बांगर यांनी दाखवलं. व्यवस्थापकाला आणि कंत्राटदाराला या प्रकाराचा जाब विचारला, पण उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यामुळे आमदार बांगर यांनी तिथे उपस्थित व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली.
सतत कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदार संतोष बांगर यांना हातात कायदा घेण्याचे अधिकार कुणी दिला हाच खरा सवाल आहे, जेवण जर निकृष्ट दर्जाचे असेल तर जिल्ह्यात सक्षम यंत्रणा आहे, मग बांगर नेहमीच पोलखोलच्या नावाखाली सामन्यांमध्ये दहशत पसरवित आहेत. यापूर्वी काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेमधून त्यांनी चिथावणीखोर भाषण केलं होतं.
— Govind Hatwar (@GovindHatwar) August 15, 2022
दरम्यान, याधीही संतोष बांगर यांनी एका खाजगी डॉक्टरला फीच्या कारणातून धमकावल होतं. शासकीय रूग्णवाहिका चालकाला फोन करून सर्व रूग्णवाहिका फुकुन देण्याची भाषा केली होती. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात नक्की कायद्याचे राज्य आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आशीष अम्बाडे, झी मीडिया चंद्रपूर : काँग्रेसच्या (Congress) ”आझादी का गौरव” कार्यक्रमात बोलताना खासदार बाळू धानोरकर (Mp balu Dhanorkar) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावर टीका करताना खासदार बाळू धानोरकर यांची जीभ घसरली.
ब्राह्मण समाजावर (Brahmin society) टीका करताना शिवराळ भाषा वापरल्यानेही नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
भाषणात बोलताना धानोरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना ”क्लिन चिट” असे म्हणत टोलेबाजी केली. ब्राह्मणांची पोरं बदाम-खारका खातात आणि बहुजनांची जांभया देतात, असेही धानोरकर म्हणाले. मात्र याबाबत लगेचच त्यांनी सारवासारव केली.
काय म्हणाले बाळू धानोरकर?
“देवेंद्र फडणवीस यांना मानायला हवं. जन्माला यावं तर ब्राह्मणांच्या पोटी. ब्राह्मणांची पोरं बदाम-खारका खातात आणि बहुजनांची जांभया देतात, अशी परिस्थिती आहे,” असे बाळू धानोकर म्हणाले.
दरम्यान, यानंतर खासदार बाळू धानोरकर यांनी याबाबत सारवासारव केली आहे. ‘अशी काही काही लोकं असतात’ असं धानोरकर यांनी शेवटी म्हटलं आहे.
बाळू धानोरकर लोकसभेत महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत. शिवसेनेतून काँग्रेस असा त्यांचा प्रवास आहे. याआधीही त्यांनी आपल्या वक्तव्यावरून वाद ओढवून घेतला आहे
प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : शिवसंग्राम (Shivsangram) पक्षाचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं आज पहाटे मुंबईकडे येत असताना अपघाती निधन झालं. रविवारी पहाटे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (mumbai pune expressway) विनायक मेटे यांचे अपघाती निधन झालं (Vinayak Mete dies in car accident). विनायक मेटे यांच्या निधनाने कुटुंबियांसह कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, राजकीय वर्तुळातही हळहळ व्यक्त होतं आहे.
या निधनानंतर मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रातून उमटत आहे. दरम्यान, विनायक मेटे यांच्या निधनांनंतर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात, मेटेंचं निधन यावर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अपघातानंतर त्यांना कोणी मदत केली माही असा आरोप त्यांच्या कार्यकत्यांनी केला.
मात्र हा अपघात होण्यापूर्वीच विनायक मेटे यांना त्यांच्या कुटुंबियांनी हा प्रवास टाळण्यास सांगितले होते. मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी नियोजित बीड मधील कार्यक्रम सोडून विनायक मेटे मुंबईला येत होते. पोलीस दलातील सुरक्षा रक्षक आणि वाहन चालकाला सोबत घेऊन मेटे मुंबईच्या दिशेने निघाले.
बीड मधील मेटे यांच्या निवासस्थानाहून निघाल्यावर त्यांच्या गाडीखाली कुत्र्याचा अपघात झाला. हा अशुभ संकेत आहे त्यामुळे त्यांनी मुंबईला जाऊ नये असा आग्रह घरच्या सदस्यांनी धरला. मात्र तरीही विनायक मेटे महत्वाची बैठक असल्याने मुंबईला निघाले आणि त्यानंतर विनायक मेटे यांचा पहाटे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
विनायक मेटे यांनी दुर्लक्ष केले
दरम्यान, जर त्या घटनेकडे विनायक मेटे यांनी दुर्लक्ष केलं नसतं तर, त्यांचा जीव वाचला असता असे मत ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी वक्त केले. पत्रकारांशी बोलताना राठोड यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर (Mumbai-Pune Express highway) वाहतुकीची प्रचंड (Traffic Jam) कोंडी झाली आहे.
Updated: Aug 13, 2022, 11:49 PM IST