तो 50 वर्षांचा आणि ती 23 वर्षांची, डेटिंग अॅपवर ओळख झाली आणि नको तेच घडलं

तो 50 वर्षांचा आणि ती 23 वर्षांची, डेटिंग अॅपवर ओळख झाली आणि नको तेच घडलं


सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : 23 वर्षांच्या राष्ट्रीय खेळाडू असलेल्या त्या मुलीने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु केली. सहज म्हणून तिने डेटिंग अॅप (Dating APPs) डाऊनलोड केलं. स्वत:च्या प्रोफाईलशी एक प्रोफाईल मॅच होतंय हे बघून तिने एक फ्रेंड रिक्वेस्ट (Freind Request) स्वीकारली. समोरच्याने अविवाहित असल्याचं सांगितलं आणि मग सुरू झाली ऑनलाईन चॅटिंग (Online Chating). 

एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या गेल्या. फोन नंबर एकमेकांना दिले गेले. भेटीगाठी होऊ लागल्या. 50 वर्षाच्या व्यक्तीला 23 वर्षांची ती मुलगी डेट करू लागली. त्याने त्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी बऱ्याच वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांनंतर तो 50 वर्षीय पुरुष विवाहित आहे, त्याला दोन मुलं आहेत आणि लग्नाचं खोटं वचन देण्यात आलं याबद्दल त्या मुलीला कळलं. आपण फसवलो गेल्याचं तिच्या लक्षात आलं, तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

ही एकच मुलगी नाही तर गेल्या काही महिन्यात डेटिंग साईट वरती फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी पुणे सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यात.

डिजिटल फ्रॉडच्या (Digital Fraud) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला दिसून येतेय. जसजशा टेक्नॉलॉजी येत गेल्या तसतसे ऐकिवात नसलेलेही फसवणुकीचे प्रकार व्हायला लागले आहेत. ज्यात सध्या डेटिंग ॲपचा उपयोग करून होणारे फसवणुकीचे प्रकार सर्रास ऐकायला मिळतात. या प्रकरणातही तसंच काहीसं घडलं.

ऑनलाईन फ्रॉडच्या घटनांमध्ये वाढ 
मॅट्रोमोनी फसवणूक – 69 केस
गिफ्ट आमिष – 94 केस
फोन कॉल फसवणूक – 391 केस

गेल्यावर्षी एकोणवीस हजार केस दाखल आहेत. त्यापैकी 25 ते 30 टक्के केस या सोशल साईट्स वरून फसवणुकीच्या आहेत. डेटिंग ॲप द्वारे फसवणुकीच्या प्रकारात आरोपी समोरच्याची संपूर्ण माहिती गोळा करण्यासाठी प्रयत्न करतात. समोरच्या व्यक्तीच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या जातात. 

असं ओढलं जातं जाळ्यात
त्यासाठी खरंखुरं भासेल अशी सोशल मीडियावर किंवा ॲप वर प्रोफाईल तयार केली जातात. समोरून तुम्हाला अप्रोच केला जातो. किंवा डेटिंग ॲपवर तुमची प्रोफाईल बघून स्वतःची प्रोफाईल आरोपी बनवतो. जेणेकरून तुम्हाला मिळत्या – जुळत्या प्रोफाईलचं सजेशन येईल. अशाप्रकारे तुम्हाला जाळ्यात ओढलं जातं.

डेटिंग ॲपवरून ओळख झाल्यानंतर मैत्री किंवा प्रेम इथपर्यंत जाण्याअगोदर समोरच्याची पूर्ण माहिती मिळवली पाहिजे. समोरून सांगितल्या जात आहेत त्या गोष्टींवर थेट विश्वास ठेवणं धोकादायक आहे.  बऱ्याच केस अशा झाल्या आहेत की समोरची व्यक्ती अविवाहित असल्याचं सांगते, पण ती व्यक्ती विवाहित असते. केवळ महीनोंमहिन्याच्या चॅटिंगवर करोडो रुपये दिल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. 

सोशल मीडियावरील ओळख पडतेय महागात
सोशल मीडियावरून महिला किंवा तरुणींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांना लग्नाचं आमिष दाखविलं जातं. त्यातून लैंगिक अत्याचार होतात. तसंच आर्थिक फसवणूक होण्याचेही प्रकार घडत आहेत.





Source link

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ म्हणत आले आणि 390 कोटी घेऊन गेले, जालनात आयकर विभागाच्या धाडीची Inside Story

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ म्हणत आले आणि 390 कोटी घेऊन गेले, जालनात आयकर विभागाच्या धाडीची Inside Story


योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : आयकर विभागाच्या (Income tax) नाशिक अन्वेषण व शोध (डिटेक्शन) विभागांतर्गत जालना (Jalana) इथल्या चार बड्या कारखानदारांनी स्टील उत्पादनात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले होते. हे व्यवहार रोख स्वरुपात करून बक्कळ कमाई केल्याचा आणि या व्यवहारातून आयकर बुडवल्याचा संशय आयकर विभागाला होता. 

जालन्यातील कारखानदारांच्या घरी आणि कारखान्यात छापे टाकले असता 390 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता मिळून आली आहे. विशेष म्हणजे या व्यवहाराशी संबंधित औरंगाबादचा एक बांधकाम व्यवसायिक आणि केटरर्स कंपनी आता रडारवर आहे

राज्यात सर्वाधिक लोखंडी गज ( steel company) तयार करणारे कारखाने जालना (jalna) इथं आहे. इथून राज्यातील बांधकाम व्यावसायिकांना लोखंडी गज पुरवले जातात. जालन्यामधील चार कारखानदारांनी कर बुडविल्याची माहिती औरंगाबाद इथल्या प्राप्तीकर विभागाच्या पथकाला मिळाली होती. 

याची माहिती नाशिक इथल्या मुख्य कार्यालयाला कळविण्यात आली होती. यानंतर नाशिकचं पथक आणि औरंगाबादमधलं स्थानिक पथकाच्या मदतीने जालन्यात 1 ऑगस्टला कारखानदारांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात छापे टाकले. मात्र या कारवाईत कुठेही संशयास्पद काहीही मिळून आले नाही.

असा टाकला छापा
या छाप्या करिता मुंबई, पुणे, ठाणे नाशिक च्या दोनशेहून अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं होतं. शंभराहून अधिक कारमध्ये हा सर्व ताफा जालण्याकडे रवाना झाला. कारखानदारांना किंवा संबधितांना या छाप्याची कुठलीही कुणकुण लागू नये याकरिता पथकाने आपल्या वाहनांवर ‘दुल्हन हम ले जायेंगे’ चा स्टीकर लावले होते. संशय येऊ नये म्हणून वाहनांवर वर आणि वधूचे नाव सुद्धा लावण्यात आलं होतं.

‘हाती लागलं घबाड’
प्राप्तीकर विभागाने कारखानदारांच्या घरी आणि कार्यालयात टाकलेल्या छाप्यात काहीही मिळून न आल्याने पथकाने त्यांच्या इतर ठिकाणाचा तपास केला होता. त्यात त्यांना जालना शहराबाहेर फार्म हाउस असल्याचा संशय आला. या फार्म हाउस वर छापा टाकला असता कोणालाही संशय येणार नाही अश्या प्रकारे पैसा लपवण्यात आला होता. घरातील कपाटाखाली, अडगळ पडलेल्या सामानातील पिशव्यात तसxच बिछान्यांमध्ये पैसा लपवण्यात आला होता.

इतके अधिकारी आणि कर्मचारी होते पैसे मोजायला
आयकर विभागाने केलेली ही कारवाई 1 ते 8 ऑगस्टपर्यंत चालली. या कारवाईत सुमारे 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली. त्यात 58 कोटींची रोकड, 16 कोटीचा ऐवज यात 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोत्यांचा समावेश आहे. तसंच सुमारे 300 कोटींची बेहिशेबी मालमत्ता मिळून आली आहे. ही रोकड मोजण्यासाठी पूर्ण दिवसभर मोजणी सुरु होती. याकरिता 10 ते 12 नोटा मोजणी यंत्रं लावण्यात आली होती.





Source link

IISc develops new method to measure seawater temperature with fish bones

IISc develops new method to measure seawater temperature with fish bones


The Indian Institute of Science (IISc) has discovered a way to measure seawater temperature by examining the microscopic fish ear bones. Mapping early seawater temperatures is important for a better understanding of earth’s history, said the IISc researchers.

“Oceans cover three-quarters of the Earth’s surface and host many remarkable life forms. Scientists have been attempting to reconstruct the seawater temperature over time, but it is not easy to do so. When you go back in time, you do not have any fossilised seawater,“ said Ramananda Chakrabarti, Associate Professor at the Centre for Earth Sciences (CEaS), IISc.

Otoliths hold the clues

Fish bones or otoliths, are made of calcium carbonate and grow throughout a fish’s lifetime by accumulating minerals from seawater. Like tree rings, otoliths also hold clues to the fish’s age, migration patterns, and the type of water that the fish lived in.

They used a thermal ionisation mass spectrometer (TIMS) to analyse the ratio of various calcium isotopes in the otolith. The ratios of the observed calcium isotopes in the sample can be used to correlate with the temperature of the saltwater where the fish were taken. “We demonstrated that calcium isotopes are a powerful tracer of water temperature, and our lab is the only one in the country that can actually measure these isotopic variations,” said Chakrabarti.

In addition to calcium isotopes, the team analysed the concentration of elements like strontium, magnesium, and barium, and their ratios in the same sample, and collated the data together to tease out a more accurate value for seawater temperature within a range of plus or minus one degree Celsius when compared to the actual value.

With the close correlation found between calcium isotope ratios and temperatures, the authors are confident that their approach can now be used on fossilised samples. Chakrabarti said, “Mapping early seawater temperatures is important to better understand earth’s history, they say. What happened back in time, is key to our understanding of what will happen in the future.”

Published on

August 11, 2022



Source link

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; तुमच्या खात्यात पैसे जमा, लगेच चेक करा

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; तुमच्या खात्यात पैसे जमा, लगेच चेक करा


7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता एक बातमी चांगली बातमी. कर्मचाऱ्यांच्या खात्यात डीए अरियरचे पैसे जमा झाले आहेत. 


Updated: Aug 11, 2022, 03:20 PM IST





Source link

एकदम फिल्मी स्टाईल 200गाड्यांचा ताफा आणि धाड, तब्बल 390 कोटींचे सापडले घबाड

एकदम फिल्मी स्टाईल 200गाड्यांचा ताफा आणि धाड, तब्बल 390 कोटींचे सापडले घबाड


Raid on Jalna Steel Industry : आयकर विभागाकडून मोठी कारवाई करताना एकदम फिल्मी स्टाईलने धाड टाकली. स्टील उद्योग, इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांवर छापा मारला.  


Updated: Aug 11, 2022, 10:36 AM IST





Source link

युजीसीच्या अटींची पूर्तता न केल्याने मुक्त विद्यापीठाचे २२ अभ्यासक्रम होणार बंद

युजीसीच्या अटींची पूर्तता न केल्याने मुक्त विद्यापीठाचे २२ अभ्यासक्रम होणार बंद


सोनू भिडे, नाशिक- अटींची पूर्तता न केल्याने नाशिक मधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला २२ अभ्यासक्रम  बंद करावे लागले आहे. यात सहा महिने, एक वर्ष आणि तीन वर्ष्याच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यापीठाला तांत्रिक आणि पूर्णवेळ अभ्यासक्रम राबविण्याची परवानगी नसताना सुद्धा हे अभ्यासक्रम राबविल्याने २२ अभ्यासक्रम बंद करावे लागले आहेत. 

मुक्त विद्यापीठ
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना १९८९ मध्ये झाली आहे. याचे मुख्य केंद्र नाशिक मध्ये असून आठ विभागीय केंद्र आहेत. या विद्यापीठात दहावी आणि बारावी नापास झालेले विद्यार्थी पुढील शिक्षण पूर्ण करू शकतात. विद्यापीठात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थी एकाच वेळी दोन शिक्षणक्रम पूर्ण करू शकतात. मुक्त विद्यापीठाच्या पदव्यांना यूजीसी आणि राज्य सरकारची मान्यता आहे. 

या कारणाने बंद करावा लागला अभ्यासक्रम
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियम आणि अटी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सहा महिने, एक वर्ष तीन वर्षाचे अनेक अभ्यासक्रम आहेत. गेली कित्येक वर्ष या विद्यापीठात ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या अभ्यासक्रमात तांत्रिक आणि पूर्णवेळ चालणारे अभ्यासक्रम सुद्धा सुरु करण्यात आले होते. मात्र यूजीसीचे नियम आणि अटींचे पालन न केल्याने अभ्यासक्रमांना बंद करण्याचे आदेश दिले होते. तरीही विद्यापीठाने हे अभ्यासक्रम सुरु असल्याची तक्रार युजीसीकडे वारंवार करण्यात आली. अखेर युजीसीने विद्यापीठातील बऱ्याच  वर्षापासून सुरु असलेले २२ अभ्यासक्रम बंद करण्याचे जाहीर केले आहे. मात्र या निर्णयाने हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून त्यांना इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा लागणार आहे.

कोणते अभ्यासक्रम होणार बंद

युजीसीने जाहीर केलेल्या निर्णयानुसार विद्यापीठातील खालील विविध प्रकारचे अभ्यासक्रम बंद होणार आहेत. 

प्रमाणपत्र  कोर्स

या अभ्यासक्रमातील बंद होणारे कोर्स 

१ सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर फंडामेंटल, २ सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर फायनान्शियल अकाउंटिंग, ३ सर्टिफिकेट इन प्रोग्रामिंग एक्सपटॉईज सी, ४ सर्टिफिकेट इन डाटा स्ट्रक्चर यूजिंग सी, ५ सर्टिफिकेट इन ओओपीएस अॅण्ड सी प्लसप्लस, ६ सर्टिफिकेट इन लिनक्स, ७ सर्टिफिकेट इन ओरॅकल, ८ सर्टिफिकेट इन मॅथेमॅटिक्स, ९ सर्टिफिकेट इन व्हिज्युअल प्रोग्रामिंग, १० सर्टिफिकेट इन इंग्लिश लॅग्वेज, ११ सर्टिफिकेट इन जर्मन लँग्वेज, १३ सर्टिफिकेट इन अरेबिक लँग्वेज, १४ सर्टिफिकेट इन फ्रेंच लँग्वेज.

डिप्लोमा  कोर्स

१ पीजी डिप्लोमा इन फायर अँण्ड सेफ्टी मॅनेजमेंट, २  डिप्लोमा इन फेब्रिकेशन, ३ डिप्लोमा इन फॅसिलिटी सर्व्हिसेस, ४ पी. जी. डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट, ५  पी. जी. डिप्लोमा इन अॅडव्हर्टाइजमेंट मीडिया अॅण्ड इव्हेंट.

पदवी अभ्यासक्रम 

१ बीएससी (ऑटोमोटिव्ह टेक्निक्स, व्ही-७२, विथ क्रेडिट डिस्टन्स एज्युकेशन), २ बी.एस्सी. कन्स्ट्रक्शन प्रक्टिसेस, ३ बी. कॉम को-ऑपरेटिव्ह मैनेजमेंट.

वरील  अभ्यासक्रमात तुमचा प्रवेश असेल तर तुम्हाला तुमचा कोर्स पूर्ण करता येईल मात्र नवीन कोर्स करण्याचा विचार करत असाल तर प्रवेश मिळणार नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp