by Hansraj Agrawal | Jan 17, 2026 | Trending News
Amit Thackeray On MNS Poor Performance In BMC Election: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबई महानगरपालिकेमध्ये म्हणावं तसं यश मिळालं नाही. मनसेला दोन आकडी नगरसेवकही महापालिकेवर निवडून पाठवता आलेले नाहीत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करुन लढलेल्या या निवडणुकीमध्ये मनसेचे केवळ सहा उमेदवार निवडून आले आहेत. मराठी, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणारा यासारख्या भावनिक मुद्द्यांच्या आधारे निवडणुकीला सामोरे गेलेल्या ठाकरे बंधूंच्या हाती निराशाच पडली. या निकालाने मनसैनिकांना धक्का बसला असला तरी आता मनसेच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांना मानसिक आधार देण्याचं काम सुरु झालं असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंपाठोपाठ आता अमित ठाकरेंनीही मुंबई महानगरपालिकेच्या निकालावर भाष्य करताना एक शब्द दिला आहे.
Add Zee News as a Preferred Source
माझं आणि तुमचं नातं फक्त…
अमित ठाकरेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मुंबईच्या निकालासंदर्भात एक पोस्ट केली आहे. “मराठी माणसासाठी आमचा लढा सुरुच राहील! निकाल काहीही असो… खंत एकाच गोष्टीची वाटते की, माझ्या मराठी माणसाला जे अपेक्षित होतं ते देण्यासाठी मला कदाचित अजून थोडी मेहनत घ्यावी लागेल. पण एक लक्षात ठेवा, माझं आणि तुमचं नातं फक्त एका ‘बटणापुरतं’ किंवा ‘मतापुरतं’ कधीच नव्हतं. राजकारणात जय-पराजय होतच असतो, पण माणसांची मनं जिंकणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे,” असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे. ‘मराठी माणसासाठी आमचा लढा सुरूच राहील,’ अशी कॅप्शन देत अमित ठाकरेंनी एक पोस्ट शेअर केली आहे.
नक्की वाचा >> आदित्य ठाकरेंमुळे ठाकरे बंधूंनी मुंबई महानगरपालिका गमावली? ‘ती’ एक कृती ठरली कारणीभूत? खळबळजनक दावा
‘मराठी’ला आणि ‘मराठी माणसाला’ कधीच…
तसेच, “तुम्ही आम्हाला जे प्रेम आणि साथ दिली, ती कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी आहे. माझा शब्द आहे तुम्हाला… सत्ता असो किंवा नसो, तुमच्या हक्कासाठी महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक नेहमी धावून येतील. ‘महाराष्ट्र’ आणि ‘मराठी’ माणसाच्या हितासाठी आमचा लढा यापुढेही सुरुच राहील. खचून जाऊ नका… ‘मराठी’ला आणि ‘मराठी माणसाला’ कधीच एकटं पडू देणार नाही… हा शब्द आहे ठाकरेंचा!” असं अमित ठाकरेंनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हे विसरायचं नाही, राज ठाकरेंचं आवाहन
दरम्यान, यापूर्वी राज ठाकरेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मराठीसाठी लढत राहणार असल्याचं पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की. आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही,” असं राज यांनी म्हटलं आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 16, 2026 | Trending News
वनिता सुनिल कांबळे या ‘झी 24 तास’ डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
…Read More
Source link
by Hansraj Agrawal | Jan 16, 2026 | Trending News
Thane TMC Election Results 2026 Top 10 Big Fights: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये काय निकाल लागणार याबद्दलची उत्सुकता कायम आहे. विशेष म्हणजे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका होत असून ठाकरे बंधू एकत्र आल्याने एकनाथ शिंदेंच्या वर्चस्वाला ठाण्यात आव्हान तयार होईल अशी एक शक्यता व्यक्त करण्यात आलेली. शिंदेंना ठाण्यात धक्का बसेल यासाठी अजून एक कारण सांगितलं जात होतं ते म्हणजे बंडखोर उमेदवार. ठाण्यातील 10 अव्वल लढायांकडे पाहिलं तरी त्यामधील चार जागांवर बंडखोरच सत्ताधाऱ्यांना आव्हान देणार असल्याचं स्पष्ट होतंय. (ठाण्यातील मतमोजणीसंदर्भातील घडामोडींचे LIVE UPDATES पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
Add Zee News as a Preferred Source
बडे बंडखोर कोण?
ठाण्यातील प्रतिष्ठित लढतींमध्ये सेना बंडखोर रवी घरात, भूषण भोईर, किरण नाकती आणि प्रमिला केणी यासारखे बंडखोर मित्रपक्षांना आणि थेट शिंदेंच्या सेनेला आव्हान देतील असं मानलं जात आहे. या स्थानिक नेत्यांचं आपआपल्या प्रभागांमध्ये प्रबाल्य असून त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.
नक्की वाचा >> ठाण्यात तुफान राडा! EVM शी छेडछाड केल्याचा शिंदे सेनेचा आरोप; आयोगाच्या बस आडवून…
ठाण्यात एका ठिकाणी अजित पवारांचा पक्ष विरुद्ध शरद पवारांचा पक्ष अशी थेट लढत असून प्रभाग क्रमांक 31 (ब) हा सामना रंगतोय. तर प्रभाग क्रमांक 2 (ब) मध्ये भाजपा आणि मनसेमध्ये थेट लढत आहे. ठाण्यातील 10 प्रतिष्ठेच्या लढती पुढील प्रमाणे आहेत
1) प्रभाग क्रमांक 1(ड )
सिद्धार्थ ओवळेकर – सेना (शिंदे गट )
vs
रवी घरात –( सेना बंडखोर )
————————————————————————————————————————-
2) प्रभाग क्रमांक 2 (ब )
मनोहर डुंबरे (भाजप )
vs
रवींद्र मोरे (मनसे )
————————————————————————————————————————
3) प्रभाग क्रमांक 3 (ब )
विक्रांत वायचळ सेना (शिंदे गट )
vs
भूषण भोईर (सेना बंडखोर )
———————————————————————————————————————-
4) प्रभाग क्रमांक 20 (ब )
नम्रता पमनाणी सेना (शिंदे गट )
vs
राजेश्री नाईक (मनसे )
———————————————————————————————————————-
5) प्रभाग क्रमांक 21 (ब)
सुनेत जोशी (भाजपा)
vs
किरण नाकती (सेना बंडखोर)
नक्की वाचा >> ठाण्यात EVM पळवलं? शिंदेंच्या घरापासून हाकेच्या अंतरावरवरील मतदारकेंद्रातून अचानक…; पोलिसांना काही कळण्याआधीच…
———————————————————————————————————————-
6) प्रभाग क्रमांक 7 (क)
विक्रांत चव्हाण (काँग्रेस)
vs
वैभव कदम (भाजप )
———————————————————————————————————————-
7) प्रभाग क्रमांक 31 (ब)
सुधीर भगत (शरद पवार) राष्ट्रवादी काँग्रेस
vs
मोरेश्वर किणे (अजित पवार) राष्ट्रवादी काँग्रेस
———————————————————————————————————————-
8) प्रभाग क्रमांक 23 (अ )
मिलिंद पाटील (सेना शिंदे )
vs
प्रकाश पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार _
———————————————————————————————————————–
9) उमेश पाटील (शिंदे सेना )
vs
अभिजित पवार (शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस )
————————————————————————————————————————
10) मनाली पाटील (शिंदे सेना )
vs
प्रमिला केणी ( बंड खोर सेना शिंदे गट )
Source link
by Hansraj Agrawal | Jan 15, 2026 | Trending News
BMC Election Exit Poll 2026 : महाराष्ट्रातील 26 महानरपालिकांसाठी मतदान झाले. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मतदारांचा कौल कुणाला मिळतो हे येत्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. मुंबई महापालिकेचे निवडणुक चर्चेत आहे ती ठाकरे बंधूच्या युतीमुळे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे (Shivsena UBT Chief Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेसोबत राज ठाकरे यांची मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS Chief Raj Thackeray) निवडणुकीच्या रिंगमात उतरली आहे. ठाकरे बंधू किती जागा जिंकणार याचीच चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. अशातच एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत.
Add Zee News as a Preferred Source
सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपमध्ये मुसंडी मारताना दिसत आहे. भाजप, शिवसने रिपाई यांच्या महायुतीने 100 च्या पुढे आकडा गाठल्याचे दिसत आहे. तर, ठाकरेंची शिवसेना-मनसे 80 पर्यंत पोहचल्याचे दिसत आहे. मात्र, ठाकरेंची शिवसेना-मनसेची युती 100 चा आकडा गाठू शकत नसल्याचे या एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. अशातच जेव्हीसीच्या एक्झिट पोलची आकडेवारी खूपच खळबळजनक आहे. मनसेला फक्त 2 ते 5 जागा मिळू शकतात असा जेव्हीसीच्या एक्झिट पोलचा अंदाज आहे.
JVCच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत महायुतीला 138 जागा मिळू शकतात
ठाकरेंची शिवसेना-मनसेला 59 जागांचा अंदाज
काँग्रेस आणि वंचितला 23 जागा मिळण्याचा अंदाज
मुंबईत इतरांना 7 जागा मिळण्याचा अंदाज
जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार कोणता पक्ष किती जागा जिंकणार?
भाजप – 97–108
एकनाथ शिंदे शिवसेना – 32–38
उद्धव ठाकरे शिवसेना – 52–59
मनसे – 2–5
काँग्रेस – 21–25
इतर – 6–9
DV रिसर्चच्या पोलनुसार महायुतीला 107-122 जागा
मुंबईत ठाकरे बंधूंना 68-83 जागांचा अंदाज
काँग्रेस आणि वंचित मिळून 18-25 जागांचा अंदाज
मुंबईत इतरांना 8-15 जागा मिळण्याचा अंदाज
जनमतच्या पोलनुसार मुंबईत महायुतीला 198 जागा
मुंबईत ठाकरे बंधूंना 62 जागा मिळण्याचा अंदाज
काँग्रेस-वंचितला 20 जागा मिळण्याचा अंदाज
मुंबई इतरांना 7 जागा मिळण्याचा अंदाज
अॅक्सीसच्या पोलनुसार महायुतीला 131-151 जागा
मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना 58-68 जागांचा अंदाज
काँग्रेस आणि वंचितला 12-16 जागांचा अंदाज
अॅक्सीसच्या पोलनुसार महायुतीला 131-151 जागा
Source link
by Hansraj Agrawal | Jan 14, 2026 | Trending News
उद्धव ठाकरेंकडे सध्या 54 नगरसेवक आहेत. तर, राज ठाकरे यांच्या मनसेचा एकही नगरसेवक नाही. दोन्ही ठाकरेंचे किती नगरसवेक जिंकणार याची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच भाजप नेत्याने ठाकरेंचे किती नगरसेवक जिंकून येणार याचा आकडा सांगितला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 14, 2026 | Trending News
Mumbaikar Tamilian Slams Annamalai: “बॉम्बे हे महाराष्ट्रातील शहर नसून अंतरराष्ट्रीय शहर आहे,” असं वादग्रस्त विधान केल्याने भारतीय जनता पार्टीचे दक्षिण भारतामधील नेते के. अण्णामलाई सध्या मुंबईच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. के. अण्णामलाई यांच्या विधानामुळे मराठी विरुद्ध दक्षिण भारतीय म्हणजेच तमीळ असे गट पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे भारतीय जनता पार्टीचे शीव येथील आमदार सेल्वन यांनी के. अण्णामलाई यांची पाठराणख केली आहे. मात्र त्याचवेळी एका तमिळ व्यक्तीने के. अण्णामलाई यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. के. अण्णामलाई यांना स्वत:च्या राज्यात जिंकता आलं नाही अशी बोचरी आठवण या व्यक्तीने आपल्या फेसबुक पोस्टमधून करुन दिली आहे.
Add Zee News as a Preferred Source
तमिळ लोकांनाही लाज वाटतेय
“के. अण्णामलाई हा माणूस तमिळ मुंबईकरांना कोणाला मतदान करायचे हे का सांगत आहे?” असा सवाल पोस्टच्या पहिल्याच वाक्यात राजकीय विश्लेषक अशी स्वत:ची ओळख करुन देणाऱ्या सुजित नायर यांनी विचारला आहे. “अन्नामलाई यांना मुंबईत येऊन अनावश्यक, चिथावणीखोर विधाने करण्याचा काही अधिकार नव्हता. हा केवळ पक्षीय राजकारणाबद्दलचा विषय नाही. यामुळे महाराष्ट्रीयन लोकांच्या मनात कटुता निर्माण झाली आहे आणि मुंबईत अनेक दशकांपासून अभिमानाने आणि सन्मानाने राहणाऱ्या तमिळ लोकांनाही लाज वाटत आहे,” असं परखड मत नायर यांनी व्यक्त केलं आहे.
नेतृत्व नाही राजकीय अहंकार
“स्थानिक निवडणुकांवर लोकांना व्याख्यान देण्यासाठी दुसऱ्या राज्यातील नेत्याने हे अशा प्रकारे येऊन वक्तव्य करावी अशी अपेक्षा कोणी का करेल? तमिळ भाषिक मुंबईकरांना बाहेरून राजकीय सूचनांची आवश्यकता नाही. त्यांच्या वॉर्डात आणि त्यांच्या शहरात कोण त्यांच्या मतदानासाठी पात्र आहेत हे ठरवण्यास ते पूर्णपणे सक्षम आहेत.अधिक महत्त्वाचे म्हणजे, अन्नामलाईंच्या नेतृत्वाखाली भाजप त्यांच्याच राज्यात लोकसभेची एकही जागा जिंकू शकलेली नाही. ते स्वतः सुद्धा निवडणूक हरलेत असं असताना तामिळनाडूच्या या राजकारण्याला इतरत्र जाऊन मतदारांना सल्ला देण्याचा कोणता नैतिक अधिकार आहे? या साऱ्यामुळेच हे नेतृत्व म्हणून नाही तर राजकीय अहंकार म्हणून समोर येत असल्यासारखं वाटतंय,” असंही नायर यांनी म्हटलं आहे.
राजकीय दादागिरीने नव्हे तर…
“मुंबई हे महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय शहर आहे. याबद्दल कोणतीही शंका नसावी. हे महाराष्ट्रातील लोकांचे आहे आणि येथे काम करण्यासाठी, जगण्यासाठी आणि सुसंवाद साधण्यासाठी आलेल्या प्रत्येक भारतीयाचेही ते तितकेच आहे. राजकीय दादागिरीने नव्हे तर परस्पर आदराने हा समतोल साधला गेला आहे. प्रथम, आपण महाराष्ट्रावर आर्थिक हल्ला पाहिला आहे, मोठे प्रकल्प गुजरात आणि इतर राज्यांमध्ये शांतपणे हलवले गेले. आता आपल्याला अनावश्यक राजकीय हस्तक्षेप दिसतो ज्यामुळे सामाजिक सौहार्द बिघडण्याचा धोका आहे. ही सारी पद्धत फार त्रासदायक आहे,” असं विश्लेषणही नायर यांनी केलं आहे.

‘आपण’ विरुद्ध ‘ते’ अशा मानसिकतेने विषारी वातावरणाला तयार करु नका.
“महाराष्ट्रातील लोक आदरातिथ्य करणारे आणि सहिष्णु आहेत. भारताच्या कानाकोपऱ्यातील लोक येथे शांततेत आणि सन्मानाने राहतात कारण हे शहर सर्वांना जागा देते. कृपया फुटीरतावादी राजकारण किंवा ‘आपण’ विरुद्ध ‘ते’ अशा मानसिकतेने विषारी वातावरणाला तयार करु नका. मुंबईला श्वास घेऊ द्या आणि आम्हाला शांततेत जगत राहू द्या,” असं नायर यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.
Source link