पुण्यात बाईने 'त्याच्या' कानाला चावा घेतला; होस्टेलमधील मुलींची छेड काढल्याच्या संशयावरुन राडा

पुण्यात बाईने 'त्याच्या' कानाला चावा घेतला; होस्टेलमधील मुलींची छेड काढल्याच्या संशयावरुन राडा


Pune Crime News : पुणे शहर हे विद्येचे माहेर घर मानले जाते. हजारो तरुण तरुणी शिक्षणानिमित्ताने पुण्यात शिक्षणासाठी येतात. अनेक विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहतात. होस्टेलमधील मुलींची छेड काढल्याच्या संशयावरुन पुण्यात राडा झाला आहे. एका महिलेने या संशयिताच्या कानाला चावा घेतला आहे. 

पुण्यातील होस्टेलमधील मुलींची छेड काढल्याच्या संशयावरुन होस्टेलचालक आणि त्याच्या सुनेने एका व्यक्तीला मारहाण केली. या सुनेने त्याच्या कानाचा चावा घेतला. यात त्याच्या कानाला पाच टाके बसलेत. संबंधित व्यक्तीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात होस्टेलचालकासह महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?

जेवण झाल्यानंतर मित्रासोबत गप्पा मारत थांबले असताना होस्टेल मधील मुलींची छेड काढल्याच्या संशयावरुन होस्टेलचालक  आणि त्याच्या सुनेने तरुणाला मारहाण केली. सुनेने कानाचा चावा इतका जोरात घेतला की त्याच्या कानावर पाच टाके घालावे लागले.

याबाबत मिलिंद वसंत कोठारी (वय ४०, रा. दत्त वसाहत, दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर, शिरोळे रोड, शिवाजीनगर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुरेश विठ्ठल कांबळे (वय ६०) व त्यांची सुन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिलिंद कोठारी हे ड्रायव्हर म्हणून नोकरी करतात. सोमवारी दुपारी ते जेवण करुन घराबाहेर उभे असणारे मित्र अभिजित जाधव, अमित खेंगरे यांच्याबरोबर गप्पा मारत होते. त्यावेळी तेथे लोकमान्य गर्ल्स होस्टेल चालविणारे सुरेश विठ्ठल कांबळे आणि त्यांची सुन आले. कांबळे यांनी तुम्ही मुलींना का छेडता असे म्हणून फिर्यादी यांच्याशी भांडायला लागले. 

तेव्हा फिर्यादी यांनी आम्ही त्यांना छेडत नाही. आम्ही गप्पा मारत उभे आहोत, असे म्हणाले. त्यावर त्यांनी व त्यांच्या सुनेने त्यांना मारण्यास सुरुवात केली. त्या झटापटीत त्यांच्या सुनेने फिर्यादी यांच्या उजव्या कानाचा जोरात चावा घेऊन जखमी केली. त्यांच्या पोटाला दोन ठिकाणी कटरसारख्या धारदार हत्याराने मारले. मिलिंद कोठारी यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या कानाला पाच टाके घालण्यात आले तर पोटावर दोन्ही ठिकाणी दोन दोन टाके घालावे लागले. डेक्कन पोलिसांनी ससून रुग्णालयात जाऊन त्यांची फिर्याद घेतली असून पोलीस उपनिरीक्षक प्रविण कुलकर्णी तपास करीत आहेत.

 





Source link

महाराष्ट्रातील 'या' महानगरपालिकेच्या 8 शाळांचा प्रताप, सुट्टीच्या दिवशी खिचडी शिजवल्याचं दाखवून लाटला अनुदान

महाराष्ट्रातील 'या' महानगरपालिकेच्या 8 शाळांचा प्रताप, सुट्टीच्या दिवशी खिचडी शिजवल्याचं दाखवून लाटला अनुदान


अमरावती महानगरपालिकेच्या 8 शाळांचा प्रताप समोर आलाय. सुट्टीच्या दिवशी खिचडी शिजवल्याचं दाखवून अनुदान लाटण्याचा प्रयत्न या शाळांकडून करण्यात आला. दरम्यान यानंतर या  शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आलीय. अमरावती महानगरपालिकेच्या आठ शाळांमध्ये खिचडी घोटाळा झाल्याचं समोर आलंय. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये खिचडी वाटप करण्यात येते, मात्र सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे त्या दिवशी विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्याचं दाखवून पैशांवर डल्ला मारायचा होता असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय. संबंधित पोर्टलवर दाखल करण्यात आलेल्या माहितीतून या घोटाळ्याचा भांडाफोड झालाय. 

विद्यार्थ्यांची खिचडी कोणी खाल्ली? 

14 एप्रिल रोजी अमरावतीमधील
सर्व सरकारी शाळांना सुट्टी होती

मात्र, पालिकेच्या 8 शाळांमध्ये
त्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी खिचडी
शिजवल्याचं समोर आलं

सुट्टीच्या दिवशी शाळेत विद्यार्थी
नसताना खिचडी शिजवल्याचं
दाखवल्यानं हा घोटाळा समोर आला

दरम्यान सुट्टीच्या दिवशी खिचडी शिवजणाऱ्या शाळांमध्ये महापालिका मराठी शाळा बेनोडा, महापालिका उर्दू गर्ल्स स्कूल नंबर 3 महापालिका, मराठी शाळा अकोली संत गाडगे बाबा प्रायमरी स्कूल, शिवाजीनगर महापालिका प्रायमरी मराठी स्कूल नंबर 20, नवाथे नगर असोसिएशन उर्दू गर्ल्स हायस्कूल चांदनी चौक, अमरावती महापालिका उर्दू प्रायमरी, स्कूल नंबर 5 फ्रेजरपुरा अमरावती याचा समावेश आहे. खिचडी घोटाळा समोर आल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याप्रकरणी मुख्यध्यापकांना खुलासा देण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

फक्त अमरावतीच नव्हे तर इतर जिल्ह्यात देखील अशेच प्रकार निदर्शनास आल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांची हक्काची खिचडी डल्ला मारणं कितपत योग्य आहे, असा सवाल यानिमित्तानं उपस्थित केले जात आहेत..





Source link

हगवणेंचा वकिलाचा खळबळजनक क्राइम रेकॉर्ड उघड! सरकारी वकिलाची कॉलर पकडून…

हगवणेंचा वकिलाचा खळबळजनक क्राइम रेकॉर्ड उघड! सरकारी वकिलाची कॉलर पकडून…


Advocate Vipul Dushing Shocking Details: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सुनावणी कोर्टात बुधवारपासून सुरु झाली आहे. या सुनावणीचा पहिलाच दिवस गाजला तो हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशींग यांनी युक्तीवादादरम्यान केलेल्या काही खळबळजनक आरोपांमुळे आणि विधानामुळे. सुनावणीनंतर विपुल दुशींग यांनी कोर्टाबाहेर प्रसारमाध्यमांशीही संवाद साधल्याने ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. असं असतानाच आता विपुल दुशींगेचा पूर्व इतिहास समोर आला आहे. ‘नवऱ्याने बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही,’ असा युक्तीवाद करणाऱ्या विपुल दुशींगेंवरही यापूर्वी मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.

वकिलांवरच दाखल आहे गुन्हा

हगवणेंचे वकील विपुल दुशींगविरोधात वडगांव मावळ कोर्टात 2022 साली मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. वडगाव मावळ न्यायालयात वकील दुशींग हे 2022 साली एका आरोपीचे वकील म्हणून काम पाहत होते. न्यायाधीशांसमोर सुनावणीची पुढची तारीख कोणती ठेवायची यावरुन त्यांचे सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्यासोबत वाद झाला‌. याच वादातून पुढे दुशींग यांनी सरकारी वकिलाला मारहाण केली.

कॉलर पकडून मारहाण

सुनावणीदरम्यान अचानक चिडून न्यायालयातून बाहेर पडल्यावर वकील दुशींग यांनी सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर वकील दुशींग आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन वकीलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात 353/ 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्यावेळी अटकपूर्व जामीन दिल्याने दुशींग यांची अटक त्यावेळी टळली होती. 

नक्की पाहा हे फोटो >> चांदीच्या गौरी, दागिने, मानपान अन्… वैष्णवीच्या माहेरी हगवणेंचा शाही थाट; समोर आलेले नवे Photos पाहाच

न्यायालयामध्ये युक्तीवाद करताना वैष्णवीचं चारित्र्यहनन

आरोपींचे वकील असलेल्या विपुल दुशींग यांनी बुधवारी न्यायालयामध्ये युक्तीवाद करताना वैष्णवीचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. “वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते‌, ते आम्ही पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आम्हाला न्याय हवा आहे,” असं आरोपीचे वकील म्हणाले. “एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ ठरत नाही,” असा युक्तिवादही आरोपीच्या वकिलांनी वैष्णवीच्या अंगावरील व्रणांसदर्भात बोलताना केला. कोर्टाने वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांना 1 दिवसाची, तर सासरा आणि दिर यांना पुन्हा 3 दिवसांची म्हणजे 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.





Source link

हगवणे पिता-पुत्राला पळून जाण्यास मदत करणाऱ्या चोंधे कुटुंबाबद्दल धक्कादायक खुलासा; सासरे, नवरा, दीर यांनी सूनेवर…

हगवणे पिता-पुत्राला पळून जाण्यास मदत करणाऱ्या चोंधे कुटुंबाबद्दल धक्कादायक खुलासा; सासरे, नवरा, दीर यांनी सूनेवर…



हगवणे पिता-पुत्राला पळून जाण्यासाठी मदत केलेल्या चोंधे कुटुंबानं देखील हुंड्यासाठी त्यांच्या सुनेचा छळ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 
 



Source link

बदलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! आता मेट्रोतून प्रवास करुन थेट मुंबई गाठा, 15 स्थानके अन् असा असेल मार्ग!

बदलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! आता मेट्रोतून प्रवास करुन थेट मुंबई गाठा, 15 स्थानके अन् असा असेल मार्ग!


Badlapur Metro Update In Marathi: बदलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येतेय. ठाण्याच्या पुढे आता शहरीकरण वाढल्याने मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग मुंबईत कामासाठी येतात. मात्र लोकलमधील गर्दी वाढत चालल्याने आता नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. आता बदलापूरकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार आहे. कांजूरमार्ग ते बदलापूर लवकरच मेट्रो धावणार आहे. मेट्रोची निविदा निघाली असून मेट्रो 14च्या 38 किमी लांबीच्या मार्गिकेचं काम लवकरच सुरू होणार आहे. 

कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रोच्या कामाची निविदा प्रसिद्ध झालीय. त्यामुळे मुंबई आणि बदलापूर ही दोन्ही शहरं आता लवकरच मेट्रोने जोडली जाणार आहेत. एमएमआरडीए कडून कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो 14 च्या 38 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचं काम लवकरच सुरू होणार आहे. या मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी तसच सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर खाजगी क्षेत्रातील सहभागींची नियुक्ती करण्यासाठी एमएमआरडीएनं ही निविदा प्रसिद्ध केलीय. या भागीदाराच्या माध्यमातून पाच वर्षात ही मार्गिका उभी होणार आहे. या प्रकल्पासाठी 14 हजार 898 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही मार्गिका सुरू झाली की दररोज 7 लाख प्रवाशांची ये-जा शक्य असेल. खाडी पार करून येणारी ही मुंबईतील पहिली मेट्रो असेल. 

मेट्रोच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे बदलापूरकरांचा प्रवास सुकर होणार आहे. या मेट्रोवर 15 स्थानके असणार आहेत. या मेट्रोमुळं बदलापूर थेट मुंबईशी जोडले जाणार आहे. त्याचबरोबर नवी मुंबई-ठाणे-भिवंडी या शहरांशीदेखील जोडला जाणार आहे. बदलापूर ते कांजूरमार्ग मेट्रो 14, वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो 4, स्वामी समर्थ नगर जोगेश्वरी-कांजूरमार्ग मेट्रो 6, कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन आणि इतर 3 ठिकाणे इंटरचेंज करून जोडली जातील. 

कशी असतील स्थानके 

मेट्रो बदलापूर, अंबरनाथ, निलजे, शिळफाटा, महापे, घणसोली या भागातून पुढे जाऊन अखेरीस ठाणे खाडी ओलांडून कांजूरमार्ग येथे मुंबईच्या हद्दीत पोहोचेल. या मार्गावर एकूण 15 स्थानके असतील त्यातील 13 उन्नत स्थानके असणार आहे. 





Source link

'कोविड रुग्णाला मारून टाक', डॉक्टरची ऑडिओ क्लिप व्हायरल; महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

'कोविड रुग्णाला मारून टाक', डॉक्टरची ऑडिओ क्लिप व्हायरल; महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ



‘कोविड रुग्णाला मारून टाक’ अशी चिथावणी देणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp