'मलाही वाटतं मुख्यमंत्री व्हावं पण…',अजित पवारांनी पुन्हा बोलून दाखवली सल; कधी होणार पूर्ण?
Ajit Pawar Of CM Post: अजित पवारांच्या याच विधानावरुन आता जोरदार चर्चा सुरु झाल्यात.
Source link
Ajit Pawar Of CM Post: अजित पवारांच्या याच विधानावरुन आता जोरदार चर्चा सुरु झाल्यात.
Source link
Pahalgam Terror Attack: काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती आणि उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अलाहाबाद कोर्टाच्या लखनौ खंडपीठाच्या निर्णयानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी 2 मे रोजी सुनावणी पार पडली. हायकोर्टाने याचिका निकाली काढली असून आता फौजदारी तक्रार दाखल केली जाईल.
न्यायाधीश राजन राय आणि जस्टिस ओम प्रकाश शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी याचिका दाखल करण्यात आले. ही याचिका हिंदू फ्रंट फार जस्टिस आणि अन्यजणांकडून दाखल करण्यात आली होती. याचिकेत मागणी करण्यात आली होती की, या प्रकरणी एसआयटी गठित करण्यात यावी, असे आदेश केंद्र सरकारला देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच, रॉबर्ट वॉड्रा यांच्यावही कारवाईचे आदेश देण्यात यावे, असंही नमूद करण्यात आलं आहे.
याचिकेनुसार, रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं होतं की, पहलगाममध्ये हिंदूवर हल्ला झाला कारण दहशतवाद्यांना वाटत असेल की देशातील मुसलमानांना चुकीची वर्तवणूक देण्यात येत आहे. जेव्हा पण सांप्रदायिक मुद्दे पुढे येतात आणि लोकांना असुरक्षित वाटू लागते तेव्हा देशात दोन गट पडतात. त्याचा फायदा शेजारी राष्ट्रांना होतो. आता राजकारण आणि धर्म वेगळा करण्याची वेळ आली आहे. राजकीय पक्षांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असं रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर रॉबर्ट वाड्रा यांच्या वक्तव्यानंतर हिंदू फ्रंट फॉर जस्टिज आणि अन्य संघटनांनी याचिका दाखल केली आहे. याचिकेत केंद्र सरकारने या प्रकरणी SIT स्थापन करावी आणि वाड्रा यांच्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. याचिकाकर्त्यांनी कोर्टाला वाड्रा यांच्याविरोधात BNS अंतर्गंत कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे अशीही मागणी केली आहे.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात फिरायला आलेल्या पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला होता. या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला होता.
Monsoon Trekking in Raigad District : ट्रेकिंग… कठिण ते अगदी सोप्या वाटा सर करत एखाद्या गडकिल्ल्याच्या किंवा सुळक्याच्या टोकाळी पोहोचण्याचा कमाल थरार. पावसाळ्याची सुरुवात होताच अनेक मंडळी ट्रेकिंगसाठी निघतात. राज्यातील बहुतांश गडकिल्ल्यांपर्यंत पोहोचतात आणि भटकंतीला वेगळ्याच दृष्टीकोनातून अनुभवतात.
ट्रेकर आणि प्रवासवेड्या अनेकांचंच प्राधान्य असणारं ठिकाण म्हणजे रायगड जिल्हा. मुंबईपासून दोन ते तीन तासांच्या अंतरावरही या जिल्ह्यातील काही गडकिल्ले स्थित असून काही गडकिल्ल्यांची नावं तर अनेकांना ठाऊकही नाहीत. चला तर मग, याच रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये असणाऱ्या विविध गडकिल्ल्यांच्या नावाची यागी पाहूनच घ्या.
कर्जत – विकटगड, पदरगड, कोथळीगड, भिमगड, सोंडई, ठाक बहिरी, तुंगी, सोनगिरी
खालापूर- ईरशाळगड
सुधागड- सुधागड, भोरपगड, सरसगड, मृगगड
रोहा- सूरगड, बिरवाडी, घोसाळगड
माणगाव- विश्रामगड, मानगड, पन्हाळेदुर्ग
महाड- रायगड, पाचाड कोट, लिंगाणा, सोनगड, चांभारगड, मंगळगड, कोकणदिवा, दासगाव
पोलादपूर- चंद्रगड, कोंढवी
श्रीवर्धन- मदगड
मुरूड- जंजिरा, कोरलई, समराजगड, पद्मदुर्ग
तळा- तळागड
अलिबाग- उंदेरी, खुबलढा, कुलाबा, सर्जेकोट, सागरगड, रेवदंडा, हिराकोट, रामदरणे, राजकोट
उरण- घारापुरी, द्रोणागिरी
पेण- सांकशी, रतनगड, मिरगड
पनवेल- प्रबळगड, कर्नाळा, माणिकगड
पावसाच्या दिवसांमध्ये निसर्गसौंदर्याची वेगळीच छटा पाहायला मिळते. त्यातगी रायगडमधील बहुतांश ठिकाणं अशी आहेत जी आजही गर्दीपासून दूर आहेत. अशा या ठिकाणांवर पोहोचण्याची वाट बिकट असली तरीही तिथवर जाण्याची वाट मात्र तितकीच थरारक आहे. त्यामुळं यंदाच्या वर्षी हा थरार अनुभवायचा असेल तर रायगड जिल्ह्यातील या प्रसिद्धीझोतात नसलेल्या गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. एका पॉडकास्टमधून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याचं आवाहन केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही जाहीर कार्यक्रमातून सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर राज्याच्या राजकारणात मनोमिलनाच्या चर्चांना वेग आला. परदेशातून आल्यानंतर राज ठाकरे यावर बोलतील असं मनेसकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळं राज ठाकरे परतल्यामुळे आता हालचालींना वेग आल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे युतीबाबत सकारात्मक असल्याचं सांगून संजय राऊतांनी उत्सुकता वाढवली आहे.
राज्याच्या राजकीय वर्तुळात यावरून प्रतिक्रिया उमटल्यात. शरद पवारांनीही राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याबाबत भाष्य केलं आहे.
लोकसभा आणि विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास बीएमसी निवडणुकीत चित्र वेगळं दिसू शकतं, असंही बोललं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनीही या युतीच्या चर्चावर प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, हुतात्मा चौकात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट झाली. सुप्रिया सुळे हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट झाली. राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यात दोन ते तीन मिनिटं संवाद झाला.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी नाही. मात्र यावेळी चर्चेचा सूर कधी नव्हे इतका सकारात्मक दिसतोय. दोन्ही बाजूनं युतीसाठी पावलं टाकली जात आहेत. त्यामुळे ही केवळ चर्चाच न राहता युतीबाबत ठोस पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे.
1 मे आज जगभरात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. 6 विभाग 36 जिल्ह्यांमध्ये विभागला गेलेला महाराष्ट्र वेगवेगळ्या गोष्टींनी संपन्न आहे. आजही महाराष्ट्रातील कानाकोपरा विविधतेने नटलेला आहे. आज महाराष्ट्र दिनानिमित्त असं गाव पाहणार आहोत, ज्याने आपली ओळख ‘गुलाबी’ गाव म्हणून निर्माण केली आहे. एवढंच नव्हे तर या कमी लोकसंख्या असलेल्या गावाने अनोखा विक्रम जगाच्या नकाशात नोंदवला आहे.
हे गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेले शेळकेवाडी. एकेकाळी सत्तेच्या नजरेतून दुर्लक्षित राहिलेले, पंचायतीला विकास निधी म्हणून २-३ लाख रुपये मिळत होते. अशावेळी गावकऱ्यांनी गावाचे कायापालट करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. अन् गेल्या २० वर्षांत ‘आदर्श गाव’ म्हणून पुन्हा स्वतःची ओळख निर्माण केली.
फक्त १०२ घरे आणि १००० लोकसंख्या असलेले शेळकेवाडी आता देशाच्या नकाशावर पहिले १००% सौरऊर्जेवर चालणारे गाव म्हणून ठसा उमटवत आहे. सौरऊर्जेवर चालणारे स्वतःचे बायोगॅस प्रकल्प असलेले पहिले गाव होण्याचा मानही या गावाला मिळाला आहे. याशिवाय आता राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकावर असलेल्या या गावाने मिळवलेली बक्षीस रक्कम सध्या उघड्यावर शौचमुक्ती मोहीम राबविण्यासाठी वापरली जात आहे. आणि या गावाबद्दल सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे येथील ‘गुलाबी घरं’.
“गुलाबी घरे आपल्या एकतेचे प्रतीक आहेत. आम्ही सर्वांनी एकमताने एका रंगाच्या पॅटर्नचे पालन करण्याचा निर्णय घेतला जो आम्हाला गावाच्या हितासाठी लढण्याचा संकल्प करण्यास मदत करेल,” असे रहिवासी म्हणाले.
गावकऱ्यांनी सौरऊर्जेद्वारे गावात वीजपुरवठा करण्यासाठी एकत्र आल्यावर, त्यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत औपचारिकता सुरू केली. या योजनेअंतर्गत, घरगुती सौरऊर्जा यंत्रणेला अनुदान दिले जाते. ग्रामपंचायतीने 100 घरांमध्ये 1 किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प आणि दोन मोठ्या घरांमध्ये 2 किलोवॅट प्रणाली बसवल्या, ज्यामुळे ते कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे पहिले गाव बनले.
स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत शेळकेवाडीला एक आदर्श गाव असल्याचा अभिमान आहे. प्रत्येक घर बायोगॅसशी जोडलेल्या शौचालयांनी जोडले गेले आहे, जिथे सर्व ओला कचरा बायोगॅसमध्ये प्रक्रिया केला जातो. बायोगॅसच्या या निर्मितीमुळे एलपीजी सिलिंडरवरील अवलंबित्व कमी झाले आहे. गावातील सुका आणि प्लास्टिक कचरा अवनी संस्थेद्वारे व्यवस्थापित केला जातो, तर सांडपाणी मोठ्या सेप्टिक टँकमध्ये पाठवले जाते.
“गावात आदर्श गाव म्हणवण्यासारखे सर्वकाही आहे. सर्वत्र स्वच्छतेचे निकष पाळले जातात. गटारे बंद आहेत, रस्ते स्वच्छ आहेत आणि योग्य कचरा व्यवस्थापनामुळे वातावरणही खूप चांगले झाले आहे,” असे ग्रामविकास अधिकारी सुरेखा आवाड म्हणाल्या. लोकसहभाग हा त्यांच्या यशाचा मंत्र असल्याने, गावाने पाणी वितरणासाठी स्वतःचा धरण बांधले आहे.
या परिवर्तनामुळे गावात खूप आनंद झाला आहे कारण कोणालाही वीज बिल भरावे लागत नाही. “आम्ही पंखे, मिक्सर आणि वॉशिंग मशीन वापरतो – आणि तरीही आम्हाला कोणतेही बिल भरावे लागत नाही,” असे एका रहिवाशाने सांगितले.
संत गाडगे बाबांच्या ग्राम स्वच्छता मोहिमेअंतर्गत राज्यस्तरीय सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी गावातील रहिवाशांसाठी डिजिटल प्रशासन, आरोग्य जागरूकता, शिक्षण हे प्राधान्य आहे.
“आम्हाला पूर्वी मागासलेले किंवा दुर्लक्षित गाव म्हणून पाहिले जात असे. परंतु ग्रामस्थांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि सरकारी योजनांचा योग्य वापर यामुळे परिस्थिती बदलण्यास मदत झाली आहे. आता आम्ही स्वच्छता आणि शाश्वततेसाठी राज्य क्रमवारीत जिंकण्याकडे पाहत आहोत,” असे गावकरी सांगतात.