by Hansraj Agrawal | Apr 1, 2025 | Trending News
MNS On Marathi: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुन्हा एकदा मराठी बाणा पाहायला मिळतोय. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक आक्रमक झालेत. मराठीच्या आग्रह धरत मनसैनिकांनी राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केल्याचं पाहायला मिळालं. तर पवईत मराठीचा अवमान करणाऱ्याला मुजोर सुरक्षारक्षकाला मनसैनिकांनी चोप दिलाय.
गुढी पाढव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानंतर मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.मुंबई आणि पुण्यात मनसैनिक मराठीच्या मुद्द्यावर आग्रही पाहायला मिळाले.
मनसेच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी बँकांमधील व्यवहार मराठीत चालतात का? हे तपासण्याचे आदेश राज्यातील मनसैनिकांनी दिले होते. त्यानंतर ठाण्यातील मनसैनिकांनी स्टेट बँकेला भेट देत. बँकेत लावण्यात आलेले हिदि फलक हटवलेत.. आणि बँकेत मराठी फलक लावण्याची मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलीय.
पुण्यात वाहतूक पोलिसांनी लावलेल्या इंग्रजी पाट्यांविरोधातही मनसे आक्रमक झालीय.इंग्रजी पाट्यांवरून मनसेनिकांनी पोलिसांना जाब विचारलाय. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर इंग्रजी पाट्या लावण्यात आलेत. भारतात आहोत की इंग्लंडमध्ये”? असा प्रश्न वाहतूक पोलिसांना मनसेकडून विचारण्यात आलाय.
मुंबईच्या पवईत मराठीबाबत आक्षेपार्ह विधान करणा-या सुरक्षरक्षकाला मनसैनिकांनी चोप दिलाय. मनसैनिकांनी सुरक्षारक्षकाला चोप देत माफी मागायला लावलीय. पवईतील एल अँड टी इमारतीतील एका सुरक्षारक्षकाचा एका मराठी युवकासोबत काही कारणावरून वाद झाला. यावेळी युवकाने सुरक्षारक्षकाला मराठीत बोलण्यास सांगितलं होतं. त्यावर सुरक्षारक्षकाने मराठीविषयी वादग्रस्त विधानं केली. त्यानंतर मनसैनिकांनी संबंधित सुरक्षारक्षकाला चांगलाच प्रसाद दिलाय.
दरम्यान महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आली पाहिजे. मात्र त्यासाठी कोणी कायदा हातात घेत असेल तर कारवाई केली जाईल अशी भूमिका शिवसेनेचे प्रवक्ते डॉ राजू वाघमारेंनी मांडलीय. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंच्या मनसेनं पुन्हा एकदा मराठीचा बाणा स्विकारल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आगामी काळात मुंबईत मराठीचा मुद्दा चांगलाच जागण्याची शक्यताय.
‘लाडकी बहीण योजना होणार बाद’; राज ठाकरेंचं भाकीत खरं ठरणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आता एप्रिल महिन्याच्या हप्ता कधी मिळणार? याबाबत महिलांना उत्सुकता लागली आहे. अशातच लाडकी बहीण योजना बंद होणार, असे भाकित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडतोय.लाडक्या बहिणांना 2100 रुपये निधी केल्यास सरकारवर वर्षाला 63 हजार कोटींचा बोजा पडणार असल्याचंही राज ठाकरे म्हणालेत.राज ठाकरेंच्या या भाकितावर सत्ताधा-यांनी टीका केलीये.योजनेमुळे सरकारवर ताण येतोय, हे खरंय पण लाडक्या बहिणींना आम्ही वा-यावर सोडणार नाही.उत्पन्न वाढण्यावर आमचा भर आहे असं शंभुराज देसाई, प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.’लाडक्या बहिणींना वा-यावर सोडणार नाही. 2 वर्षांत आर्थिक स्थिती भक्कम होईल, असं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येतंय.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 1, 2025 | Trending News
Miniter Shivendra Raje Bhosale: ‘बिग बॉस’ फेम अभिनेते अभिजीत बिचुकले यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना बिचुकले यांनी कठोर शब्दांमध्ये आपला संपता व्यक्त करताना थेट मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंवर निशाणा साधला आहे. 29 मार्चच्या रात्री घडलेल्या एका घटनेवरुन बिचुकलेंनी संताप व्यक्त केला आहे.
29 मार्चला काय घडलं?
29 मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन होता. त्या दिवशी शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बीचा दणदणात करून गाण्याचे कार्यक्रम केले, असं अभिजीत बिचुकलेंनी म्हटलं आहे. पुढे बोलताना, 29 तारखेला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानात दिवशी डॉल्बी लावून गाणे वाजवत असाल तर ही लज्जास्पद गोष्ट आहे, असंही बिचुकलेंनी घडलेल्या प्रकारावरुन टीका करताना म्हटलंय.
लज्जास्पद गोष्ट आहे
“एक गोष्ट ठणकावून सांगतो, 29 मार्च आमवस्या होती. त्या आमवस्याला आमचे छत्रपती, धर्मवीर श्रीमंत संभाजी महाराजांचा बलिदान दिन होता. शिवेंद्रराजे मी तुम्हाला ठणकावून प्रश्न विचारतो, तुम्ही त्या राजघराण्यात जन्माला आलात याची भनक आपल्याला आहे का?” असा सवाल बिचुकलेंनी उपस्थित केला आहे. “छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाच्या दिवशी तुमच्या टुकार कार्यकर्त्यांनी जो डॉल्बीचा दणदणाट केला, त्याला तुमचा होकार होता. नाच-गाण्याचे कार्यक्रम लागले 29 मार्चला. तुमचा वाढदिवस होता 30 मार्चला. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाला तुम्ही वाढदिवस साजरा करत असाल तर ही लज्जास्पद गोष्ट आहे छत्रपती घराण्याला आणि शिवेंद्रराजे या नावाला,” असा हल्लाबोल बिचुकलेंनी केला.
मंत्रिपदाचा राजीनामा द्या
मंत्री शिवेंद्रराजे यांचा वाढदिवस 30 मार्चला असतो शिवेंद्रसिंहराजे तुम्ही राजघराणात जन्माला आला त्याची तुम्हाला किंमत आहे का? असा सवालही बिचुकलेंनी उपस्थित केला. “छत्रपतींची वैचारिक वारस म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो, संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाला तुम्ही जो डॉल्बीचा जो दणदणाट केला याची जाणीव असेल तर तुम्ही आता मंत्रिपदाचा राजीनामा द्या. छत्रपतीच्या घरात जन्माला येऊन तुम्ही संभाजी महाराजांचा अपमान करता. अरे, 30 मार्चला तुम्ही काहीही केलं असतं तर मी काही बोललो नसतो. दुसरी गोष्ट पत्रकारांकडून कळली की तुम्ही अनधिकृत बॅनर लावले आहेत. हा पहिला वाढदिवस तुम्ही एवढा मोठा साजरा करता कारण तुम्हाला मंत्रिपद मिळालं, हे नशीब समाजा. तुमच्या या यशामध्ये अभिजित बिचुकलेचा फार मोठा वाटा आहे, वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी येतील बाहेर,” असं बिचुकलेंनी व्हिडीओच्या शेवटी म्हटलं आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 31, 2025 | Trending News
No match is being played.
Mar 31, 2025 | Match 12
Indian Premier League, 2025
|
MI
(16.2 ov) 116
|
VS |
KKR
121/2(12.5 ov)
|
| Mumbai Indians beat Kolkata Knight Riders by 8 wickets |
| Full Scorecard → |
Mar 31, 2025 | Match 12
Indian Premier League, 2025
|
KKR
(16.2 ov) 116
|
VS |
MI
121/2(12.5 ov)
|
| Mumbai Indians beat Kolkata Knight Riders by 8 wickets |
| Full Scorecard → |
Mar 30, 2025 | Match 11
Indian Premier League, 2025
|
CSK
(20 ov) 182/9
|
VS |
RR
176/6(20 ov)
|
| Rajasthan Royals beat Chennai Super Kings by 6 runs |
| Full Scorecard → |
Source link
by Hansraj Agrawal | Mar 31, 2025 | Trending News
Devendra Fadnavis on being Narenra Modi Heir: संघ नरेंद्र मोदींचा वारसदार ठरवेल आणि तो बहुतेक महाराष्ट्रातील असेल असा दावा खासदार संजय राऊतांनी केला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही 2029 चे पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहत आहोत. त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य नाही असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
संजय राऊतांनी नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी म्हणून तुमचं नाव घेतल्यासंबंधी विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही. नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत. अजून बरीच वर्षं नरेंद्र मोदी काम करणार आहेत. आमचा सर्वांचा आग्रह आहे. आम्ही 2029 चे पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहत आहोत. त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य नाही”.
पुढे ते म्हणाले की, “भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही आणि करायचाही नसतो. ही मुघली संस्कृती आहे. तिथे वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचे विचार करतात. सध्या कोणताही उत्तराधिकारी निवडण्याचा प्रश्न नाही”.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
“नरेंद्र मोदी-मोहन भागवत यांच्या भेटीचे संकेत स्पष्ट आहेत. नरेंद्र मोदी यांनी 75 वर्ष झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये असं धोरण जाहीर केलं होतं. त्यामुळे सरसंघचालकांनी त्यांना त्यांच्या भूमिकेची आठवण करुन देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली. सप्टेंबर महिना येत असून, देशाचं नेतृत्व बदलावं लागेल. दुसरीकडे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीही संघाची एक भूमिका असल्याचं समोर आलं आहे. त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपाच्या अध्यक्षपदी यावी अशी संघाची भूमिका स्पष्ट दिसत आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“मोदींचा वारसदार संघ ठरवेल असं दिसत आहे. संघाची चर्चा बंद दाराआड असते. बंद दाराआड झालेली चर्चा बाहेर येत नाही. पण काही संकेत स्पष्ट असतात. संघ पुढील नेता ठरवेल आणि तो बहुतेक महाराष्ट्रातील असेल,” असंही ते म्हणाले.
राज ठाकरेंच्या भाषणावर मांडली भूमिका
दरम्यान यावेळी त्यांनी राज ठाकरेंनी भाषणात मांडलेल्या मुद्यांवरही भाष्य केलं. राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्य चालवताना सर्वांची मदत आणि विश्वासात घेऊन राज्य चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्य चालवताना सर्वांना सोबत घेऊन चालवणे हे आमचं उद्दिष्ट आहे असं त्यांन सांगितलं. मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले, 100 टक्के जे नियमाच्या बाहेर असतील आणि सुप्रीम कोर्टांचा जो आदेश आहे या आदेशाचे तंतोतंत पालन महाराष्ट्र सरकार करेल.
राज ठाकरेंनी औरगंजेबाच्या कबरीसंदर्भात मांडलेल्या भूमिकेवर ते म्हणाले, “ही जी कबर आहे तिला एएसआयचं संरक्षण आहे. आम्हाला औरंगजेब आवडो ना आवडो, कायद्याने 50-60 वर्षांपूर्वी त्या कबरीला संरक्षण दिलं आहे. म्हणून त्या ठिकाणी कायद्याचं पालन करणं आमची जबाबदारी आहे. पण कुठल्याही परिस्थितीत औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही”.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 30, 2025 | Trending News
Raj Thackeray MNS Gudhi Padwa 2025 : छावा चित्रपटानंतर महाराष्ट्रात औरंगजेबच्या कबरीवरुन मोठा वाद सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबची कबर आहे. ही कबर हटवण्याची मागणी केली जात. विधानसेभतही औरंगजेबच्या कबरीवर चर्चा झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रथमच जाहीर सभेत औरंगजेबच्या कबरीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. मुबईच्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्या नेमकं काय म्हणाले राज ठाकरे जाणून घेऊया.
औरंगजेबची कबर आत्ताच का आठवली? चित्रपट पाहून जागे होणारे हे कोणते हिंदू. विकी कौशलला पाहून संभाजीराजे आठवले. अक्षय खन्नाला पाहून औरंजेबची कबर आठवली. संभाजी महाराज, औरंगजेब, औरंजेबाची कबर यावर बोलणाऱ्या वाद घालणाऱ्यांनी आधी इतिहास वाचावा. छत्रपती शिवाजी महाराज एक विचार आहे. देशावर केलेला संस्कार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा संस्कार आहे. हा एक विचार आहे. त्यांच्या जन्माआधी हिंद प्रांताची काय अवस्था होती.
इतिहासावर कोणीही बडबडत आहे विधानसभेत बोलतात. औरंगजेब गुजरात मध्ये जन्मला आला असं सांगत भडकावून दिलं जात आहे. इतिहासाशी काही संबंध नाही. जातीपातीत भांडण लावत आहे माथी भडकवत आहे. 300-400 वर्षाच्या इतिहासावरुन आज जाती पातीवरुन वाद सुरु आहे.
शिवाजी महाराज यांचे वडील आदिलशाही,निजाम शाहीर गेले त्यावेळची वेगळी परिस्थिती होती. इतिहासातील प्रत्येक गोष्ट इतिहासात लिहिलेली नाही आज जातीत भांडतो. औरंगजेब बादशाह याचे राज्य अफगाणिस्थान ते दक्षिण आणि बंगाल पर्यंत होत. शिवाजी महाराज आग्र्याहून आले.औरंगजेबाचा एक मुलगा पळून आला तेव्हा त्याला संभाजी महाराज यांनी आसरा दिला. नरहर कुरुंदकर लेखक म्हणाले मराठे लढाई हरत होते पण तरीही औरंगजेब जिंकत नव्हता. औरंगजेबाला शिवाजीचा विचार मारायचा होता पण त्याला जमलं नाही.
औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. पण, औरंगजेबची सजवलेली कबर आहे तिथे मोठ्या अक्षरात बोर्ड लावा. तिथे मराठ्यांचा इतिहास लिहा. लहान मुलांच्या शाळेच्या सहली इथे घेऊन जा. मुलांना सांग हाच तो औरंगजेब… यानेच हिंदूंची मंदिरे पाडली, यानेच अत्याचार केला… येणाऱ्या पिढीला औरंगजेबचा क्रूर इतिहास सांगा ही औरंगजेबची कबर दाखवा असे राज ठाकरे म्हणाले.
अफजल खानाची कबर आहे ती शिवाजी महाराजांना विचारून केली असेल औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे का राखली पाहिजे या चर्चेत. आत्ता कुठून आठवला औरंगजेब ? चित्रपट पाहिल्यावर हिंदुत्व आठवलं ? चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आठवतं ? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 30, 2025 | Trending News
Myanmar Earthquake : 28 मार्च रोजी म्यानमार येथे मोठा भूकंप झाला, या महाकाय भूकंपामुळे हाहाकार उडाला असून यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा आकडा 1644 वर पोहोचला आहे. काही संस्थांनी हा मृत्यूचा आकडा 10 हजारांपर्यंत पोहोचू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे. म्यानमार सरकारच्या माहितीनुसार तीन हजाराहून अधिक लोक यात जखमी झाले असून 139 लोक अद्याप बेपत्ता आहेत. म्यानमार येथील भूकंपग्रस्तांना (Myanmar Earthquake) मदत करण्यासाठी भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा सुरु करण्यात आलं असून भारतीय बचाव पथक तेथे दाखल झालं आहे.
मृतांचा एकदा 10 हजारपर्यंत पोहोचण्याची शक्यता :
बीबीसीच्या वृत्तानुसार, म्यानमारच्या लष्करी नेतृत्वाने सध्याच्या घडीला भूकंपामुळे देशातील मृतांची संख्या 1,644 झाली असल्याचे सांगितले आहे. तर जवळपास 3,408 लोक यात जखमी आहेत. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेने म्यानमारमध्ये मृतांची संख्या 10,000 पेक्षा जास्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. म्यानमारमधील भूकंपामुळे सर्वाधिक प्रभावित झालेले क्षेत्र मंडाले, बागो, मॅग्वे, उत्तर-पूर्व शान राज्य, सागाइंग आणि नायपीडाव आहेत. तर यंगून-मंडाले महामार्गाचे खूप नुकसान झाले असल्याने मदत कार्यात अडचणीत येत आहेत.
हेही वाचा : Weather Update : कोकणात यलो अलर्ट, तर काही भागात विजांसह पावसाची शक्यता; एप्रिल महिना नेमका कसा?
भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा :
म्यानमारमधील भूकंपग्रस्त लोकांची मदत करण्यासाठी भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा मोहीम सुरु करण्यात आली आहे. भूकंपग्रस्त लोकांची मानवतावादी मदत करण्यासाठी ही मोहीम असून या अंतर्गत तंबू, ब्लँकेट, स्लीपिंग बॅग, फूड पॅकेट, स्वच्छता किट, जनरेटर आणि आवश्यक औषधांसह 15 टन मदत सामग्री भारताकडून यंगूनला पाठवण्यात आली आहे. भारतीय नौदलाची जहाजे INS सातपुडा आणि INS सावित्री जवळपास 40 टन सामग्री घेऊन मदत घेऊन यंगून बंदराच्या दिशेने निघाली आहेत. भारतासह न्यूझीलंडने देखील म्यानमारला दोन दशलक्ष न्यूझीलंड डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. तर चीन आणि रशियानेही मदतकार्यात पुढाकार घेतला आहे.
Source link