…म्हणून सरकार ‘लाडकी बहीण’ योजना गुंडाळणार; ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली शंका

…म्हणून सरकार ‘लाडकी बहीण’ योजना गुंडाळणार; ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली शंका


Ladki Bahin Yojana Supreme Court Comment: “देश स्वतंत्र झाल्यावर पंडित नेहरू यांनी जनतेला एक संदेश दिला, देश उभारणीसाठी प्रत्येक भारतीयाला जास्त काम करावे लागेल. (‘आराम हराम है’), पण नेहरूंवर ऊठसूट टीका करणाऱ्या ‘अमृतकाल’वाल्यांनी देशातील बहुतेक लोकांना फुकटे, आळशी बनविण्याचा चंग बांधलेला दिसतो. आराम करा, घरपोच फुकट धान्य सरकार देईल या ‘फुकट्या’ म्हणजे रेवडिया संस्कृतीवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे मारले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी लोकांना आत्मनिर्भर बनविण्याचा विचार मांडला होता, पण त्यांचे सरकार लोकांना ‘परजीवी’ बनवतेय का? हा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला आहे. निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ किंवा अन्य योजनांमधून फुकट दिल्या जाणाऱ्या वस्तूंमुळे लोकांना काम करण्याची इच्छा होत नाही. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी हे सांगताना महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेचे उदाहरण दिले. याचा अर्थ सरळ आहे, महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाच्या खांद्यावर बंदूक ठेवून ‘लाडकी बहीण’ योजना गुंडाळताना दिसत आहे,” असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

कृषी क्षेत्र, बांधकाम व्यवसायावर परिणाम

“‘लाडकी बहीण’ योजनेचा आर्थिक भार महाराष्ट्र सरकारला झेपत नाही व आता निवडणुका जिंकून झाल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींची गरज संपली आहे. हे तर कधीतरी होणारच होते, पण इतक्या लवकर होईल असे वाटले नव्हते. लोक आळशी बनले आहेत. लोक काम करायला तयार नाहीत. त्यांना फुकट राशन व महिन्याला पैसे मिळू लागले आहेत. त्यामुळे संपूर्ण समाजरचनाच बिघडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे परखडपणे सांगितले. महाराष्ट्रासह संपूर्ण देश कर्जाच्या ओझ्याखाली दडपून गेला आहे. भारताची अर्थव्यवस्था ही 205 लाख कोटी कर्जाच्या ओझ्याखाली गुदमरून तडफडते आहे. भारताचे कर्ज सतत वाढत आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यावर साधारण साडेसहा लाख कोटींचे कर्ज आहे. भारतीय नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजे कॅगने महाराष्ट्राच्या आर्थिक दुरवस्थेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. तरीही निवडणुकीआधी सरकारी तिजोरीवर भार टाकून मते विकत घेण्याचा प्रयत्न झाला. देशात सर्व काही फुकट मिळत आहे. त्यामुळे पोटापाण्याची चिंता वाटण्याचे कारण उरलेले नाही. याचा परिणाम कृषी क्षेत्र, बांधकाम व्यवसायावर झाला,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

…तर अशा रेवड्या वाटण्याची वेळ येणार नाही

“सरकार (मोदी) 85 कोटी लोकांना घरपोच फुकट धान्य देते. हे धान्य जास्त होत असल्याने वरचे धान्य लोक पुन्हा दुकानदारांना विकून पैसे मिळवतात. त्यामुळे फुकट धान्य आणि खर्चाला पैसे मिळतात. अशा रेवडिया योजनांमुळे लोकांना काम करण्यासाठी बाहेर पडावे असे वाटत नाही, परिणामी बांधकाम क्षेत्रामध्ये कामगारांचा तुटवडा जाणवत आहे हे लार्सन टुब्रोचे अध्यक्ष श्री. सुब्रमण्यम यांनी सांगितले. स्वतः न्या. गवई म्हणतात, ‘‘मी शेतकरी कुटुंबातील आहे. महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी झालेल्या मोफतच्या घोषणांमुळे शेतमजूर मिळेनासे झाले. ही बाब गंभीर आहे.’’ ग्रामीण भागात शेतीच्या कामाला मजूर उपलब्ध नाहीत. मजुरी करण्यापेक्षा घरी बसून पोट भरत आहे. मग मेहनत का करायची? हा प्रश्न आहे. फुकट पाणी, फुकट वीज बिल, महिन्याला बँकेत पैसे, मोफत धान्य अशा सर्व योजना म्हणजे सरकारची कर्ज काढून दिवाळी आहे. त्यापेक्षा प्रत्येक हाताला काम व मजुरांना योग्य दाम, शेतकऱ्यांच्या उत्पादनांना न्यूनतम समर्थन मूल्य दिले तर अशा रेवड्या वाटण्याची वेळ येणार नाही,” असा टोला ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे.

‘सब का साथ, सब का विकास’ धोरणाचा हा बट्ट्याबोळ

“लोकांना निवारा द्यावा व हाताला काम द्यावे. फक्त ‘राम’ देऊन काम होणार नाही. प्रयागराजच्या महाकुंभाला 50 कोटी लोकांनी डुबकी मारल्याचे अभिमानाने सांगितले जाते. त्यांना आध्यात्मिक सुख, शांती मिळाली असेलही, परंतु सुखी आयुष्यासाठी लागणाऱ्या नोकऱ्यांचे, रोजगाराचे काय? हे सर्व मिळावे म्हणूनच लोक कष्ट करतात, पण शेवटी सरकारच्या ‘रेवडी’ योजनांवरच त्यांना अवलंबून राहावे लागते. पंतप्रधान मोदी व त्यांचा पक्ष ‘आत्मनिर्भर’ भारताचे स्वप्न दाखवीत सत्तेवर आला, पण लोकांना परजीवी बनवून ते नेहमीच परग्रहावर किंवा परदेशात फिरत असतात. निवडणूक विजयाचे जल्लोष केले जातात. त्या जल्लोषात हे परजीवी सामील असतात व ‘जय’ करणारे फुकट धान्य, ‘लाडकी बहीण-भाऊ’ योजनांचे लाभार्थी आहेत. ‘सब का साथ, सब का विकास’ धोरणाचा हा बट्ट्याबोळ आहे,” असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.

त्यासाठीच या रेवडी योजनांचा वर्षाव सुरू

“महाराष्ट्रात सत्तेवर येताच लाडक्या बहिणींना मानधन वाढवून 2100 रुपये करू व शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंतचे कर्जही माफ करण्याचे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे वचन होते, पण आता ते सर्व योजनाच बंद करायला निघाले. त्याचा फटका शिवभोजन थाळीसारख्या गरीबांच्या योजनांना बसतो. मनरेगासारख्या योजनांत प्रचंड बजबजपुरी आहे. भ्रष्टाचार तर आहेच. काम न करणाऱ्यांना हजेरीपटावर दाखवून पैसे काढले जातात व त्यावरही ताशेरे मारले गेले आहेत. देशातील लोकांना केंद्र सरकारने अकर्मण्य बनवून आपल्या मेहेरबानीवर जगण्यास सोडून दिले आहे आणि त्यासाठीच या रेवडी योजनांचा वर्षाव सुरू आहे,” असा घणाघात ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.

सरकार अनेक फुकट्या योजना बंद करणार

“कधीकाळी पंतप्रधान मोदी हे केजरीवाल यांच्या रेवडी संस्कृतीवर प्रहार करीत होते, पण तेच मोदी निवडणुका कामावर किंवा योजनांवर नाहीत, तर रेवड्यांचा वर्षाव करून जिंकू लागले हे आश्चर्यच म्हणावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाने कान टोचून आता त्याकडे लक्ष वेधले आहे, पण उपयोग काय! सोनाराने कान टोचले आणि लोहाराने हातोडा मारला तरी केंद्र सरकार आपल्या मस्तीतच राहील. सर्वोच्च न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार अनेक फुकट्या योजना बंद करणार हे मात्र नक्की,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

 





Source link

‘त्यांच्या’ विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी – एकनाथ शिंदे

‘त्यांच्या’ विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी – एकनाथ शिंदे



राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त टोलेबाजी केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 



Source link

Scam : 1400000000… महाराष्ट्रात सर्वात मोठा CGST घोटाळा उघड; 18 बनावट कंपन्या, 26.92 कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट आणि…

Scam : 1400000000… महाराष्ट्रात सर्वात मोठा CGST घोटाळा उघड; 18 बनावट कंपन्या, 26.92 कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट आणि…


CGST Scam In Maharashtra : महाराष्ट्रात सर्वात मोठा CGST घोटाळा उघड झाला आहे. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) मुंबई विभागा अंतर्गत, ठाणे सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी 140 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या व्यवहारांचा समावेश असलेले बनावट जीएसटी पावत्यांचे रॅकेट उघडकीला आणले आहे. 26.92 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) चा छडा लावण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. तपासाअंती, या बनावट व्यवहारांचा सूत्रधार कपाडिया महमद सुलतान याला, प्रॉक्सी आणि डमी व्यवहार करण्यासाठी 18 बनावट कंपन्या निर्माण करून त्यांचे व्यवस्थापन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

सुलतान हा मिरारोड पूर्व, ठाणे येथील रहिवासी असून, त्याच्या विरोधात बनावट पावत्या तयार करण्यासाठी बनावट कंपन्यांचे जाळे तयार केल्याचा आणि वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बेकायदेशीरपणे आयटीसी जारी केल्याचा आरोप आहे. आरोपीने केवळ सरकारची फसवणूक करण्याच्या उद्देशाने रॉयल एंटरप्राइझ, सरस्वती एंटरप्रायजेस, लुकास इन्फ्राट्रेड एलएलपी आणि मारुती ट्रेडिंग यासह 18 हून अधिक डमी कंपन्या स्थापन केल्याचे या तपासात आढळून आले आहे.

हा घोटाळा करण्यासाठी सुलतानने अनेक व्यक्तींचे आधार, पॅन आणि इतर केवायसी कागदपत्रांचा गैरवापर केला, जे त्याने पैशांच्या मोबदल्यात मिळवले. त्यानंतर त्याने या ओळखपत्रांचा गैरवापर करून जीएसटीची नोंदणी केली आणि बनावट कंपन्यांच्या नावाने बँक खाती उघडली. तसेच, सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 70 अंतर्गत नोंदवलेल्या जबाबानुसार, त्याने फसव्या आयटीसीचा लाभ घेतल्याची आणि ते जारी केल्याची कबुली दिली.

कपाडिया महंमद सुलतान याला, सीजीएसटी कायद्याच्या कलम 69 अंतर्गत, कलम 132 अन्वये उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. सुलतान याला,  11 फेब्रुवारी 2025 रोजी ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.





Source link

तुळजाभवानीची मूर्ती, गर्भ गाभारा आणि मंदिराच्या शिखराला धोका! मंदिराचा पाया आणि भूगर्भ स्थितीची तपासणी करणार

तुळजाभवानीची मूर्ती, गर्भ गाभारा आणि मंदिराच्या शिखराला धोका! मंदिराचा पाया आणि भूगर्भ स्थितीची तपासणी करणार



तुळजाभवानी मंदिराच्या गाभा-याला तडे पडलेत. जिल्हाधिका-यांकडे पुजारी मंडळाने दुरुस्तीसाठी निवेदन दिलंय. निवेदनावर 5000 नागरिक-पुजायांच्या स्वाक्षरा केल्या.



Source link

अलिबागजवळ आहे महाष्ट्रातील रहस्यमयी किल्ला; जो कधी जलदुर्ग बनतो तर कधी भूइकोट, मुरुड जंजीऱ्यापेक्षा भारी

अलिबागजवळ आहे महाष्ट्रातील रहस्यमयी किल्ला; जो कधी जलदुर्ग बनतो तर कधी भूइकोट, मुरुड जंजीऱ्यापेक्षा भारी


Chhatrapati Shivaji Maharaj Forts, Kolaba Fort :  महाराष्ट्रात एक अनोखा किल्ला आहे जो कधी जलदुर्ग बनतो तर कधी भूइकोट किल्ला. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. अलिबागजवळच्या समुद्रात हा किल्ला आहे. सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी महाराजांनी हा किल्ला उभारला. हा किल्ला मुरुड जंजीरा किल्ल्याला टक्कर देतो.   

अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर हा किल्ला आहे.  कुलाबा किल्ला  असे याचे नाव आहे. हा  किल्ला मिश्रदुर्ग प्रकारातील आहे. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढलेला असतो. यामुळे हा किल्ला जलदुर्ग बनतो. तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते. यामुळे हा  किल्ला भूइकोट बनतो. हा किल्ला एका मोठ्या खडकावर उभारण्यात आला आहे.हा खडक दक्षिणोत्तर दिशेला 267 मीटर तर पूर्व पश्चिम दिशेला 109  मीटर लांब आहे.

अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटरवर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती. ‘‘ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र‘‘ हे शिवाजी महाराजांना माहीत होते. यामुळे मोक्याच्या बेटांवर त्यांनी किल्ले बांधले. तर, काही ठिकाणचे जुने किल्ले बळकट केले. 1680 दरम्यानस महाराजांनी कुलाबा किल्ला बांधायला सुरुवात केली. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला. त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा किल्ला केंद्रबिंदू होता. 

किल्ल्याचे प्रवेशद्वार किनार्‍याच्या बाजूस पण, इशान्येकडे वळवलेले आहे. शिवाजी महाराजांनी दुर्ग स्थापत्यात अनेक प्रयोग केलेले आहेत. याची झलक या किल्ल्यात पहायला मिळते.  हा दुर्ग बांधतांना दगडाचे मोठे मोठे चिरे नुसते एकमेकांवर रचलेले आहेत. दोन दगडांमधील फटीत चुना भरलेला नाही. त्यामुळे समुद्राची लाट किल्ल्याच्या तटाच्या भिंतींवर आपटल्यावर पाणी दगडांमधील फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर कमी होतो अशी याची रचना आहे. यामुळे लाटांचा या किल्ल्यावर परिणाम होत नाही. 

किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोर, हत्ती, हरण, कमळ, शरभ अशी विविध शिल्पे कोरलेली आहेत. दुर्गाचा दुसरा दरवाजा अवशेष रुपात शिल्लक आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर, डाव्या बाजूने गेल्यास भवानी मातेचे मंदिर आहे.  त्याच्या समोरच पद्मावती देवीचे छोटे व गुलवती देवीचे मोठे मंदिर आहे. पुढे गेल्यावर डाव्या हाताला वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष पहायला मिळतात.

जायचे कसे?

मुंबईहून  पनवेल – वडखळ मार्गे  अलिबागला जाता येते.  अलिबागच्या समुद्र किनार्‍यावरुन ओहोटीच्या वेळेस किल्ल्यात चालत जाता येते. मुंबईहून बोटीने मांडव्याला जाता येते. यानंतर अलिबाग एसटी  स्थानकातून किनार्‍यावर जाण्यासाठी रिक्षा मिळतात.





Source link

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा पर्यटन खात्याला विसर! वादग्रस्त FB पोस्ट डिलीट

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा पर्यटन खात्याला विसर! वादग्रस्त FB पोस्ट डिलीट



Maharashtra Tourism : काय चाललंय काय? महाराष्ट्र राज्य पर्यटन खात्यानं सोशल मीडियावर केलेली पोस्ट वादाच्या भोवऱ्यात. स्त्रीत्वाचा जागर सावित्रीबाईंविनाच… 
 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp